Shraddha Kandalgaonkar

Abstract

4.0  

Shraddha Kandalgaonkar

Abstract

कोण बरोबर? कोण चूक?

कोण बरोबर? कोण चूक?

10 mins
182


सकाळ पासून पडत असलेल्या बर्फामुळे सगळे रस्ते बंद झाले होते. काश्मीर च्या त्या भागात सगळे चिडीचूप झाले होते.अख्खे गाव जणू बर्फाची दुलई पांघरून शांत झोपी गेले होते.

अतिरेक्यांच्या कारवाईने मधून गावची शांतता भंग पावत होती.पण तेवढ्यापुरती..

अचानक बर्फामधून काहीतरी हालचाल दिसली.

कुणीतरी हळूहळू रांगत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते.खिडकीत काचेच्या आतून तिला ते दिसल्याबरोबर ती सावध झाली .आजूबाजूचा अंदाज घेऊ लागली.बर्फाच्या आतून जो कोणी होता तोही सावध पुढे सरकत होता.तिच्या श्र्वासाचा आवाजही तिला मोठा वाटत होता.आजूबाजूला लक्ष ठेवत ती तिथेच बघत होती.अचानक तिच्या खिडकी खाली हालचाल झाली.पापणी हलवली तर आवाज होईल,श्वास घेतला तर गोंगाट होईल,इतकी ती शांत झाली.बर्फातून एक निळा पडत चाललेला हात वर आला.त्या हातात एक फुल होते.. फुल साधेच रस्त्याच्या कडेचे होते.पण तो ह्या अशा परिस्थितीत ते घेऊन आला हे तिच्या साठी खूप मोठे अप्रूप होते.तिने थरथरत्या हाताने ते धरले.त्याच्या गोठलेल्या हाताला तिचा स्पर्श झाल्यावर जणू तो बर्फ वितळला..आणि त्याने आपले बोट तिच्या हातात दिले.जगाच्या अंतापर्यंत ते असे राहायला तयार होते.पण अचानक तिच्या मागे कसली तरी हालचाल तिला जाणवली,मागे वळून न पाहताही तिला अघटिताची चाहूल लागली होती.तिच्या बाजूने हळूच एक बंदुकीचे नळकांडे पुढे आले आणि तिच्या तोंडावर हात आला.कुठेही कसलाही आवाज न होता, त्याचा बरोबर गेम केला गेला.तिचे विस्फारलेल्या डोळ्यात कसली तरी याचना होती .तिचे मुक आक्रंदन त्यांना ऐकू येत नव्हते.की त्यांना ऐकायचे नव्हते ..देवास ठाऊक..


दूर कुठेतरी धावण्याचा आवाज आला.आणि ती खिडकी ज्या शांतपणे उघडली होती त्याच शांतपणे बंदही झाली.भारतीय सैन्य आणि इतर लोक धावत आले त्यांना बर्फातून वर आलेला हात दिसला.त्यांनी घाईघाईने तो हात धरून त्याला वर ओढले.

एक एकोणीस वीस वर्षाचा तो कोवळा तरुण होता.अजून मिसरूड ही फुटली नव्हती.गोळीने त्याचा जीव घेतला होता तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक मंद हसू होते.त्याच्या मिटलेल्या डोळ्यात एक समाधान होते. जे त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.

अचानक सगळीकडे गोंधळ आरडा ओरडा सुरू झाला.

कपाळावर लावलेल्या गंधाने सगळ्यांचे लक्ष गेले.आणि एकच गोंधळ सुरू झाला.पत्रकार,चॅनल पत्रकार सगळे जण आले. दिवसभर टीव्ही आणि इतर सोशल मीडिया वर हाच विषय होता,की ,एका हिंदू कोवळ्या मुलाला अत्यंत निर्घृण पणे मारले गेले आहे. कोवळ्या मुलाला निर्घुण पणे हे सगळे गैरलागू होते .....जास्तीतजास्त उगाळला जाणार विषय होता ..हिंदू मुलगा......

राजकारणी,समाज कंटक आणि मिलिटरी यांना एक आयते कोलीत मिळाले होते.

मुस्लिम समाज बहुल असलेल्या त्या भागात सगळेजण अगदी जीव मुठीत घेऊन बसले होते.कारण आता कधीही दंगे होण्याची शक्यता होती.त्यांना हेही माहीत नव्हते की कोणी कोणाला मारले आहे.तरीही त्यांचे सगळ्यांचेच जीव धोक्यात आले होते.दर तीन चार महिन्यांनी एकतर हिंदू नाहीतर मुसलमान भागात दंगली होतच होत्या.सरकारला पण हा भाग शांत होऊन चालणार नव्हता.त्यामुळे सतत अशांतीच्या सुरुंगावर हा देवाचा प्रदेश आपला जीव मुठीत घेऊन जगत होता ,आहे सुद्धा.

अब्बु,..

.......बोलो |

अब्बू मुझे आपसे कूछ कहना है |

हा बेटा बोलो, मै सून रहा हुं |

वो जो .............


वो जो लडका मारा आप लोगोने.....|

ए लडकी अपने आपे मे रह,फिर ऐसी बद्सलुखी की ,तो जुबान निकाल के हाथ में दुंगा |

अरे अरे क्या हूवा?क्यो हमेशा उसके पीछे पडे रहते हो तुम?

सकीना अपनी लाडली को चूप रहना सिखाओ, लडकी जात ने ज्यादा बात करना अच्छा नंही होता है |

क्यो अपने अब्बा के मुह लगती है ? उनको अगर गुस्सा आया ना तो काट डालेंगे तुम्हे..

अम्मी कटने दो मुझे , कल जो हुंवा उसके बाद मुझे जिंदा रहना ही नहीं है |

डोळे पुसत सकिना आत गेली.काय सांगणार होती ती आपल्या छोट्या लाडलीला की धर्माच्या नावाने हिंदू असो की मुसलमान सगळेच हैवान बनतात.

"आज दिवसभर मोर्चे निघाले पाहिजेत.आपण आधी सुरुवात करायची नाही ,पण त्यांना इतके चिडवायचे की त्यांनी दगड फेक केली पाहिजे.व्हिडिओ काढायला तयार रहा .आणि मग आपणही सुरुवात करायची."

"पण साहेब आता तर कुठे जरा खोऱ्यात शांतता आहे.कशाला उगाच परत सुरुवात करायची."

"गोपाळ भाऊ म्हातारे झालात तुम्ही आता.. एकतर घरी बसा.हरिहरी करत.नाहीतर तोंड उघडू नका. आम्हाला चांगले माहित आहे काय करायचे ते".

गुरुजी त्यांच्या लोकांबरोबर बाहेर पडल्यावर गोपाळ भाऊने डोळे पुसत आपल्या घरी जायला सुरुवात केली.


घरी आल्यावर ते बेचैन होते.त्यांना कळत नव्हते की माणूस का इतका बदलला.ह्या त्यांच्या काश्मीर मध्ये मुसलमान आणि हिंदू किती छान एकत्र राहत होते.अचानक कुणीतरी आले आणि सगळी ह्या खोऱ्याची शांतता घालवून दिली.त्यांना कळत होते की हे कधीही थांबणारे नाही.पण तरीही आपण काय करू शकतो ह्याचा ते सतत विचार करत असत.एक मात्र नक्की आज त्यांनी गुरुजींची साथ सोडायचे नक्की केले होते.

जमिल फार अस्वस्थ होता.मेलेला मुलगा कोण होता त्याला कळत नव्हते.पण मग ही अस्वस्थता का आहे हे समजतही नव्हते.

"या अल्ला ,बक्ष दे गर कोई तकलीफ शुदा हो |"

दारात आलेल्या फलक चे त्याच्या कडे लक्ष गेले.

"मिया,सब खैरियत..क्या हुआ? तबीयत तो ठीक है ना| "

"फलक कल जो कूच्छ भी हुवा, समज मे नही आ रहा,अजिबसी फिकर हो रही है,जैसे कोई अपना मुसिबत मे है|"

चेहऱ्यावरचे बदललेले भाव न दाखवता ती मागे वळून आत निघून गेली.डोळ्यातले अडवलेल पाणी तिचे न ऐकता वाहायला लागले.काय काय आणि कसं सहन करायचे.ही बेचैनी कशी कमी करायची..तिला कळत नव्हते.आपल्या बेचैनीचा उपाय तिने शोधला होता.

चटायी लेके वो नमाज पढने बैठ गयी.

जास्मिन घराच्या दारात बसून कुठेतरी शून्यात नजर लावून बसली होती.तिच्या नजरेसमोरून त्याचा मृत्यू जात नव्हता.त्याही पेक्षा त्याला ज्या प्रकारे मारले गेलं ते तिला अजिबात आवडले नव्हते.

मन्सूर दारातून आत आला.आणि त्याचे तिच्याकडे लक्ष गेलं.नाजूक सुंदर भावपूर्ण डोळे आणि सतत स्वप्नांत राहणारी आपली ही छोटी बहिण त्याला खूप प्रिय होती.

"नूर ए कश्मीर, जास्मीन मेरी जान क्या हुवा?क्यो इतनी बेचैन है आप | "

"नही नही भाईजान ,कूच भी तो नाही ,आप कही जा रहे हो,क्या मैं आपके साथ आ सकती हू|"

"नही , अब्बु की सख्त ताकीद है आप नही कही जा सकती हो |'

"अल्ला से डरो भाईजान क्यो मेरे जान के पीछे हो आप सब लोग...एक तो उसे मार डाला बडी बरेहेमी से.."

"जस्मिन.......….

भाई का बदला हुवा आवाज ...

उसकी रूह कांप उठी..

काहीही न बोलता ती आत निघून गेली.

आजच्या बातम्या..

काश्मीर च्या खोऱ्यात परत आज एका हिंदू मुलाचा अतिरेक्यांनी घात केला.एकोणीस वर्षांचा तो कोवळा बालक त्यांनी अतिशय निर्घृण रित्या त्याचा खून केला आहे.

पंतप्रधानांनी देशात शांतता राखा असे आवाहन केलं आहे.काश्मीर मध्ये सैन्याची नवी कुमक पाठवण्यात आली आहे.

आताच आलेल्या बातमी नुसार,हिंदूंनी काढलेल्या मुक मोर्चावर मुसलमानांनी दगड फेक केली.त्यामुळे दंगल उफाळून आली.खोऱ्यातले जीवन परत एकदा विस्कळीत झाले आहे.

सोशल मीडिया वर त्या व्हिडिओ ने धुमाकूळ घातला होता.सगळे जण जणू हातात शस्त्र घेऊन लढाईला निघाले होते.

गोपाळ भाऊ अस्वस्थ पणे सगळे बघत होते.त्यांनी कॉमेंट केली..की आधी जाणून घ्या काय नक्की झाले आहे आणि मगच react व्हा.उगीच खोऱ्यातील वातावरण बिघडू देऊ नका.आम्हाला शांत पणे जगू द्या.दुसऱ्या मिनिटाला त्यांची कॉमेंट डिलिट करण्यात आली होती.आणि त्यांचे फेसबुक page block करण्यात आले होते.आता ते जगासमोर खरी परिस्थिती आणू शकत नव्हते.

एक प्रकारची ग्लानी आली होती त्यांना.ह्या सगळ्या परिस्थितीत काय आणि कसे सावरायचे तेच त्यांना समजत नव्हते.दारावरच्या धडक्यानी त्यांना कळले..त्यांचा जीव धोक्यात आहे....


काय करावे हे त्यांना समजेना ..अचानक त्यांच्या लक्षात आले की मागच्या अंगणातून कुणी तरी उडी मारून आत आले आहे.सावध पणे ते पुढे गेले त्यांच्या लक्षात आले की शेजारचे सुलेमान चाचा त्यानं हळूच खुणावत होते.आवाज न करता ते बाहेर पडले आणि सुलेमांन चाच्याच्या अंगणात पोहोचतात न पोहोचतात त्यांना कसला तरी आवाज आला.मागे वळून न बघताही त्यांना आपल्या घराचा तोडलेला दरवाजा दिसला.तोंडात बोळा खुपसून आलेला हुंदका त्यांनी आता परतवला.सुलेमान चाचा घरात गेल्यावर त्यांना म्हणाले,"आज तो आप इधर सोना,अल्ला ताला की मेहेरबानी रही तो कल आप अपना घर देख पाओगे |

त्यांच्या आवाजातील भीती स्पष्ट दिसत होती.

"गोपाळ भाऊ काय दिवस आले आहेत ना, अपने कौन पराये कौन पता ही नही चलता |

"मिया,भगवान को सतलज मे बहाके सब लोग शैतानं को अपने आप मे पाल रहे हैं| तो यही होगा ना|"

गोपाळ भाऊंचे उत्तर ऐकून चाचा मान हलवत गप्प उभे राहिले. काल ज्यांच्या बरोबर चालत होतो तेच आज आपले घर जाळत आहेत.आपल्याला मारण्यासाठी शोधत आहेत.हे त्यांच्या आकलना बाहेर होते.


मन्सूर च्या मनातील बहिणीची ओढ जात नव्हती.आज अब्बांच्या मुळे आपण बहिणीला बाहेर फिरायला नेले नाही हे त्याला डाचत होते.

त्याने ठरवले की आज आपल्या बहिणीला बाहेर घेऊन जायचे.त्याने जस्मिनला सांगितले तसे तिने भाईजान असे म्हणत त्याला मीठी मारली.दोघेही शिकाऱ्यातून बाहेर पडले.आजूबाजूचे सुंदर जग ती जणूकाही आपल्या डोळ्यांनी पिऊन घेत होती.तिचे लक्ष आजूबाजूला कुठेच नव्हते.आणि मन्सूर आपल्या बहिणीकडे बघत तिला डोळ्यात साठवून ठेवत होता.

"भाईजान हम आज जमील चाचू के पास जा सकते है?"

"हा हा क्यो नाही..."

जमील कडे पोहोचताच ती धावत आत गेली फलक चाची च्या गळ्यात पडून रडत राहिली.

तिचे रडणे बघून फलक ने जमील कडे बघितले आणि ती कोसळली..जमील धावतच तिच्याकडे गेला..

चाचु चाचू..करत तिच्या कोवळ्या हाताने फलक ला पकडून ठेवायचा प्रयत्न करत तीही तिच्याबरोबर खाली बसली.

मन्सूर ला काहीही कळत नव्हते.जमील स्वतः ला सावरायचं प्रयत्न करत होता.

चाचू क्या मासला है,खुदा न खास्ता.. कुच्छ हुवा है क्या? बताव मुझे..क्या है जो मैं नही जानता और जस्मिन जानती है??

"तुम्हे याद है , पंधरा साल पहले जब बहोत बडा धमाका हुवा था,मुसलमान और हिंदू मे दंगल हुई थी,तब ताहीर मेरा बेटा चार साल का था|

हिन्दुओं ने चारो तरफ से मकान घेर लिया था, मैं फलक डर के मारे क्या करे क्या ना करे ये सोच रहे थे|तब पीछे वाले पंडत ने हमे अपने घर में शरण दी... हम ने उसे कहा की हमारे बेटे की जान बाचाओ..उसने मुझे कसम दि और बोला की आप अभी तो इधर मेरे घर पे रहो कल सुबाह बाहर निकलकर काही छुप जाओ.बेटा मेरे पास ही रहेगा. हम वहा से जिंदा बचकर तो आये लेकीन वापस कभी वहा जाके अपने बेटे को ला न सके.......


लेकीन दो साल पहले मुझे पता चला की वो पंडत अपने ही इलाके मे रहने आया है| हम जाकें मिल आये उसे, अपने बेटे को देख लीया,दिलं खूश कर दिया बच्चे ने हमारा |लेकीन पंडत बोला अभी ईसे मत लेके जाना, उसे मुसलमान धरम के साथ, हिंदू धरमको भी जानना है | हम अपने दोस्ती की एक नयी मिसाल दुनिया के सामने रखेंगे,उन्हे बतायेंगे की कश्मीर की वादी आज भी हिंदू मुस्लिम की दोस्ती पे चलती है,सरकार (भारत की हो या पाकिस्तान की) के हथकंडे दोनो को दूर करने के ,हम नही मानेंगे | उसके साथ एक हफ्ता कैसे बीता समझ में नहीं आया| पर जस्मिन ने हमे उसके साथ देखा था,फलक ने उसे बताया था| दोनोमे अच्छी दोस्ती हुईं थी | अचानक न जाने क्या हुवा.. और ये सब हो गया |

मन्सूर च्या चेहऱ्यावरचे उडणारे रंग बघून जस्मिन दोन मिनिट शांत राहिली.मग उठून म्हणाली,भाईजान चलो घर चले | खुदा हाफीज

चाचू, चाची.....

शिकाऱ्यातून जातानाही दोघे एक शब्द बोलले नाही एकमेकांशी.

मकान आल्यावर मन्सूर उठून निघून गेला जस्मिन बिचारी शिकाऱ्यात बसून विचार करत होती,तिने केले ते चूक होते की बरोबर...


आज आठवा दिवस होता, खोऱ्यात हिंसाचार हळू हळू कमी होत होता.

एक दिवस गोपाळभाऊंकडे एक पंडित लपून छपून आला.बराच वेळ ते एकेमकांशी बोलत बसले होते.दोन अडीच तासानंतर तो डोळे पुसत निघून गेला.आपल्याच घराच्या तुटलेल्या काचेत दिसणारे आपले प्रतिबिंब भाऊंना त्या काचांसारखेच तडे गेलेले वाटले.परिस्थितीने दाखवलेला हा नवा आरसा त्यांना असह्य झाला आणि ते आतल्या बाजूला वळले.

रात्रीच्या अंधारात ती व्यक्ती हळू चालत मुस्लिम समाजाच्या त्या भागात चालली होती.आपली पावले सुद्धा त्या बर्फात उमटू नये म्हणून ती अतिशय सावधगिरीने चालत होती.सतलज च्या मागच्या बाजूने ती चालत त्या घराजवळ पोहोचली. "जहांगीर..भाई जहांगीर," त्यांचा आवाज इतका हळू होता की एक क्षण त्यांना वाटले की आपल्यालाच न ऐकू आलेली ही हाक त्याला कशी ऐकू जाईल..

पण अचानक समोरचा दरवाजा आवाज न करता उघडला.

भाऊंचे बोलणे संपले आणि "या अल्ला खैरीयत,हमे माफ करना एक मुस्लिम का पाक खून हमने बहाया है |गुस्ताखी माफ करना मेरे हुजुर | असे ओरडत

जहांगीर एखाद्या जखमी वाघासारखा फेऱ्या मारायला लागला.

आपल्या हातून झालेल्या चुकीची आपण कशी भरपाई करणार आहोत.फलक आणि जमील ला आपण तोंड कसे दाखवणार आहोत?त्याला काहीच कळत नव्हते.

इतक्या रात्री देखील जस्मिन जागी होती.आपल्या बरोबर इतका मोठा माणूस आहे म्हणजे अब्बु आता नक्की ऐकतील आणि सगळ्यांची माफी मागतील अशी त्या अश्राप जीवाला आशा होती.

हळूहळू सगळीकडे कुजबुज वाढू लागली...मारलेला मुलगा हिंदू नसून मुसलमान होता.सगळीकडे अस्वस्थता वाढत होती.सरकार ,सैन्य कुणालाच ह्या परिस्थितीला कसे हाताळायचे ते कळत नव्हते........


भाऊ, टीव्ही लावा पटकन.


साकिना, जहांगीर,मन्सूर,जस्मिन सब टीव्ही के सामने बैठे थे|


आजच्या ठळक बातम्या...

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार,खोऱ्यात मारला गेलेला मुलगा हा हिंदू नसून मुसलमान होता हे सिद्ध झाले आहे.ज्या हिंदू माणसाने त्याला सांभाळले ,वाढवले ,त्याचा खून करून तो पळून चालला होता. त्याच्या बॅग मध्ये आरडीएक्स मिळाले.लहान मुलांकडून दंगली आणि दहशत पसरवून खोऱ्यात वातावरण अशांत ठेवण्याचा पाकिस्तानचा डाव भारतीय सैन्याने हाणून पाडला आहे.गोपाळ नावाचा हिंदू असोसिएशन चा माणूस त्यांना मिळाला होता त्याचाही सैन्याने खात्मा केला आहे. आशा आहे आता खोऱ्यामध्ये शांतता प्रस्थापित होईल.


जस्मिन च्या डोळ्यातले अश्रू सुकून गेले होते. सकिना आपल्या ह्या लाडलीचे आयुष्य परत कधी उभे राहील का ? ह्या विचारात गढून गेली होती.जहांगीर,मन्सूर आलेली मरगळ टाकून नव्याने सुडाने पेटून उठत सीमे पलीकडे फोन करून आणखी अतिरेक्यांची कुमक मागवत होते....


गुरुजी, गोपाळभाऊ च्या श्रद्धांजली मध्ये काय बोलायचे ते लिहीत होते.त्यांच्या लाडक्या हरीश ला ते आज उत्तराधिकारी म्हणून घोषित करणार होते.त्यानी स्वतः ला सिध्द केले होते...


सैन्याचा तो मोठा अधिकारी हताश होऊन आपल्या आक्रंदणाऱ्या मनाला सावरायंचा निष्फळ प्रयत्न करत होता.


भारतीय सरकार आपली पाठ थोपटून घेत होते.


पाकिस्तान सरकार नव्याने अतिरेक्यांची कुमक पाठवण्याची तयारी करत होते.


सतलजच्या पात्रात पंडित आणि गोपाळ चे शव एकमेकांचे हात हातात घेऊन शांतपणे वाहत होते.त्यांच्या चेहऱ्यावरचे फसवणुकीचे,अविश्वासाचे,आणि निराशेचे भाव मात्र बघणाऱ्याच्या मनाचा ठाव घेत होते..


हरिशच्या डोळ्यासमोरून पंडित आणि गोपाळ भाऊंचे निष्पाप चेहरे हलत नव्हते.आपण केले ते बरोबर की चूक त्याला कळत नव्हते.पण एक मात्र नक्की ,एका सामान्य माणसाचे एका मोठ्या नेत्यांमध्ये परावर्तन झाले होते..


ह्यात कोण जिंकले कोण हरले हे मला नकोच आहे .ते ठरवणारे आपण कोण?

आपण फक्त उघड्या डोळ्यांनी एकच प्रश्न आपल्या अंतर्मनाला विचारायचा....आणखी किती दिवस आपण धर्माची ढाल करून असेच माणुसकीला चिरडत रहाणार.....

विकसित अविकसित देशांमध्ये हेच चालू आहे.आपण पुढच्या पिढीला ह्यातून बाहेर काढून विज्ञानाची कास पकडायला शिकवले तरच ह्या माणुसकीचा होणारा ऱ्हास आपण थांबवू शकतो.वेळ लागेल नक्कीच पण एक छोटे पाऊल उचलून नवीन वाट तयार करूया..


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract