Shraddha Kandalgaonkar

Abstract Thriller

4.0  

Shraddha Kandalgaonkar

Abstract Thriller

2070sci fi

2070sci fi

2 mins
205



2070

मिनी आणि विनी घरात शिरल्या त्याच धापा टाकत.घर म्हणजे भट्टी झाली होती.आतल्या उष्णतेने त्यांना एकदम चक्कर आल्यासारखे झाले.घरात शिरल्यावर मिनिने A/C चालू केला .आणि विनी कडे न बघताच म्हणाली ,खिडकी उघड म्हणजे जरा 

आतली गरम हवा बाहेर जाईल". विनीने तिच्याकडे विचित्र नजरेनं बघितले त्यामुळे ती पटकन जीभ चावत आत निघून गेली.विनी उदास चेहऱ्याने बाहेर बघत होती .रस्तेच रस्ते त्यावर पुल, पुलावर पूल रस्त्याखाली पुल आणि त्यावर अव्याहतपणे वाहणारी वाहने ..त्यातून उडणारी धूळ.सगळीकडे फक्त एक भयाण पोकळी होती जी कशाने भरून निघेल तिला कळत नव्हते.अचानक मोटरचा आवाज आला.पुन्हा एक मोठा धुळीचा लोट उठला.आणि ती खाली बसायच्या आधीच घराचा दरवाजा उघडत सनी आत शिरला.इतका घाबरलेला आणि बेचैन दिसत होता तो त्यांनी अचानक विनीला हाक मारली आणि म्हणाला, "अगं ये पटकन ".त्याच्या लक्षात आलं की त्यांनी मास्क बाहेर बाजूला काढला होता ,त्यामुळे त्याचा श्वास एकदम कोंडला गेला काहीही न बोलता त्याने पटकन आपल्या तोंडावर मास्क लावला .किती वेळ तरी तो शांत बसला होता आणि मग सगळेजण एकत्र जेवायला बसले आज दिवसभराच्या दगदगीने तो फारच चिडला होता म्हणाला ,"कंटाळा आलाय मला उकडलेल्या भाज्या खायचा, उकडलेले चिकन मासे मला काहीतरी....." अचानक त्याला परत बेचैन वाटायला लागले.लक्षात आल्यावर तो शांत झाला.आणि काहीही न बोलता सगळ्यांनी आपले जेवण पूर्ण केले.

रात्री बेडवर झोपल्यावर त्याच्या डोळ्यासमोरून त्याचा भूतकाळ जाऊ लागला.लहानपणी त्याच्या गावात झाडे,नद्या ,पक्षी,प्राणी आणि निसर्ग होता .थंडीत थंडी असायची .पावसात भिजायला मजा यायची .निसर्गात जाता यायचे.मुलांशी खेळणे व्हायचे.आईतर इतकी मोठ्यांनी हसायची .सतत माणसांचा राबता असायचा.तो पाच वर्षांचा होता तरी त्याला ते सगळे आठवत होते.आणि अचानक सार्वभौम राष्ट्र ही संकल्पना पुढे आली.लोक झपाटल्यासारखी त्याच्या मागे लागली.निसर्ग ,प्राणी ,झाडे,पाणी वाचवा असे म्हणत जेव्हा लोक मोर्चा काढायचे तेव्हा लहान मुले त्यांच्या मागेमागे फिरत, इतर लोक नाक मुरडत.प्रगतीच्या आड येणारे असे हिणावत. ज्यांना पटायचे त्यांच्या हातात काही नव्हते.इतक्या झटपट आणि वेगाने प्रगती झाली.प्रगतीच्या आड येणारी माणसे ,निसर्ग सगळे नष्ट होत गेले.आणि सगळे उघड्या डोळ्यांनी ते बघत राहिले.

आज एकही झाड नाही त्यामुळे ऑक्सीजन च्या नळ्या घ्याव्या लागतात.त्यामुळे बोलणे हसणे खेळणे बंद.बाहेर जाणे बंद.प्रत्येक घरात एक खोली शाळेची असणे बंधनकारक झाले ऑनलाईन शाळा त्याची पुस्तके ,प्रॅक्टिकल चे सामान आणि मोठा स्क्रीन .मुलांना खेळणे मित्रंशी बोलणे माहित नाही.बाहेर फिरणे नाही त्यामुळे तेलकट तुपकट,चमचमीत काहीही खाणे नाही.उकडून खाल्लेले पचते.रस्त्यावर ज्या गाड्या दिसतात त्या इमर्जन्सीच्या आणि ऑनलाईन सर्व्हिस देणाऱ्या .त्या पण मशीन वर चालणाऱ्या.माणूस गेला तर सरकारला कळवायचे.ते येऊन घेऊन जाऊन इलेक्ट्रिक मध्ये जाळून टाकतात.माणसे आयुष्य खूप जगतात कारण विज्ञान तंत्रज्ञान प्रगत झाले आहे .पण हे जगणे आता ओझे झाले आहे.त्याला आपल्या बाबांची आठवण झाली जे वयाच्या चाळीसाव्या वर्षी गेले.त्याला त्यांचा विलक्षण हेवा वाटला.कारण आज तो सत्तर वर्षांचा आहे तरीही काम करत आहे पूर्ण क्षमतेने.

कधीतरी विचार करताना त्याचा डोळा लागला.

पहाटे दूध घेऊन आलेला रोबोट बघून त्याच्या चेहऱ्यावर परत एकदा उदास भाव आले. एक उसासा टाकत तो दार उघडायला गेला .


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract