STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

पैसा सर्व काही नाही

पैसा सर्व काही नाही

2 mins
181


पैशावर टिकणारी नाती ही नाती नसतात तो तर एक बाजार असतो....

 स्वार्थाच्या पलिकडे जे नाते असते तेच खरे नाते असते...

दिवस पालटले की जी नाती बदलतात ती खरी नाती नसतात...

दुःखात या सारे

सुखात सर्व दूर व्हा रे

हे कधीच नाही बरे...

आज असलेले नाते उद्या राहातं नसेल तर ते किती तकलादू असेल...

रक्ताच्या नात्यांप्रमाणेच मैत्रीचे नाते सुध्दा पवित्र असते...

जो साथ देत नाही तो आपला कधीच नसतो...

आपला कुणाला म्हणावे हे ही कळणे अवघड च असते...

जवळचे दूर नी दूर चे जवळ येत असतील तर काही चुकतंय का याचा नेहमी विचार करावा...

गोड बोलणे चांगले का वाईट हेच मला समजले नाही,घात देखील लोक गोड बोलूनच करतात...

चांगला माणूस नेहमी फसत जातो पण त्याची किंमत लोकांना थोडी उशिरा कळते...

कसं वागावं हे कळून ही लोकं निट वागत नाहीत,

स्वतः निट जगत नाहीत दुसऱ्याला निट जगू देत नाहीत...

दुसऱ्या ला हसणाऱ्या ने आपल्या ला कोणी हसणार नाही याचं तरी थोडं भान ठेवावे..

  आपण स्वतःबद्दल जसा विचार करतो, तसा दुसऱ्यांबद्दल ही विचार करावा..

दुसऱ्याचे वाटोळे करण्यात स्वतःचे कधीच वाटोळे करून घेऊ नये...

पैसा आहे जीवन, पैसा आहे मरण

सर्व काही नाही पैसा, याची थोडी ठेवा जाण...

स्वतःला शहाणे समजणारे लोक कधीच शहाणे नसतात,

दुनियेला वेडे समजतात, ते किती वेडे असतात...


मुळीच कधी कुणाचा

कुणा वाटू नये हेवा,

कुठलाही निर्णय घेताना

जरा विचार करुन घ्यावा..

देवाला मागायची असेल तर थोडी सद्बुद्धी मागा..

तुम्ही जगाशी कसे वागता

तसेच जगही तुमच्याशी वागेल..

मी किती चांगला आहे हे कधीच दाखवण्याचा प्रयत्न करु नये...

स्वतःला स्वतःची चूक समजली तर माणूस नक्कीच सुधारेल...

केलेली मदत कधीच वाया जात नसते.

वाईट केल्याने भले होत नसते..

आपल्याच हाताने नको आपले मरण,

स्वतःच करावे स्वतःचे संकट निवारण...

लाभले बुध्दीचे वरदान

म्हणून माणूस आहे महान,

का व्हावे हैवान,..

लुटून कितीही जगाला

खावं लागतं

सोडून सारं जावं लागतं...


हापापल्या मनाला अंत मुळीच नाही,

केलं कितीही पाप खंत मुळीच नाही..

नशीब देत नसतं साथ,

जातो अंधार ही लयाला,

नसावा मुळीच गर्व माणसाला...



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract