पैसा सोबत येत नाही..
पैसा सोबत येत नाही..
आयुष्यभर कमावलेली धनसंपत्ती त्याने रस्त्यावर उधळायला लावली
आणि दाखवून दिलं की पैसा कोणीच सोबत नेत नाही.
सारं इथंच टाकून जावं लागतं,
मरताना तो सांगून गेला की, संपत्ती कामाची नाही,
जीव अनमोल आहे.
लोकांना लुटू नका, त्यांना जीवदान द्या.गोरगरीबांना मदत करा.
माणूस वाचला पाहिजे.
ऑक्सिजन शिवाय माणसांना मरण्याची वेळ आली,हा वृक्षारोपणाचा भयानक निसर्ग संदेश आहे.
पण एवढ्यावर सुधारतो तो माणूस कसला..?
स्मशानात न्यायला माणूस मिळत नाही आणि मेल्यावर बघायला कोणी जवळ येत नाही.
ही काय वेळ आली..
कुटूंबच्या कुटुंब उध्वस्त झाली, यंत्रणा सगळीच हातभल झाली.
विज्ञानाने किती जरी प्रगती केली तरी मरणातून नाही मुक्ती झाली.
मरण प्रत्येकालाच आहे ते चुकणार नाही म्हणून जगा नी जगू द्या.माणुस म्हणून जगा हैवान होऊ नका.आज माणूस हैवान झालाय.
माणसा जागा हो, ही शिकवण आहे काळाची, महाभयानक कोरोनाची नी निसर्गाची.
माणसं मारून जगता येत नाही, माणसं वाचवा.लुटू नका, मदत करा, देव, देव नको ,कर्म चांगले करा.सावध व्हा,अंत जवळ येतोय.ऊतू नका,मातू नका.
निसर्गाने दाखवून दिले की प्रत्येकाला मरायचे आहे पण मरण देखील चांगले यावे.माणसा सावध हो, हैवान नको माणूस हो.लई अगाध आहे निसर्ग लिला,घडोघडी समजावतोय तुला,का रे तू हैवान झाला..
अंत जवळ येतोय,पाप अती होतोय.करु नये ते करतोस
सारं काही भोगतोस.सावध हो .अंत जवळ आलाय सावध हो.. माणसा सावध व्हो...!
तूच तुझे कर्म जाणं.
आहे शेवटी मरणं...
