पाठवणी - भाग 2
पाठवणी - भाग 2
सुमन तुला का वाटते की तुझं स्थान डळमळीत होईल?
सीमा त्या दिवशी बैठक होती सावनी च्या घरी. सावनीची आई दोघांना बोलली की जरा बाहेर फिरून या. तर समीर लगेच उठून गेला पण . मला एका शब्दाने ही विचारले नाही ग.माझं मत तो विचारात घेणारच नाही का?
सुमन तू मागे मला बोलली होती की नेहा ची सासू नेहाला काही ही बोलत नाही. तिच्या पध्दतीने सगळं करते नेहा. मग मला सांग शेखर ही त्याच्या आई ला काहीच विचारत नसेल का ? किंवा त्यांचं मत विचारात घेत नसेल? का नेहा म्हणेल ती पूर्व दिशा? कस असत ना सुमन आपली लेक आणि जावई आनंदात असावेत अस प्रत्येक आई ला वाटते. तसंच सून आणि मुला बाबत आपण विचार करायला हवा. अग तू लग्न करून या घरी आली तेव्हा तुझ्या सासुच राज्य होत. प्रत्येक गोष्ट तिला विचारून करायची. मग हळूहळू या घरात तुझा जम बसू लागला मग कुठे तुझं राज्य सुरू झालं ते आत तागायत सुरू आहे.
सीमा तुझं बरोबर आहे पण परवा ची च गोष्ट बघ,मी बाल्कनीत बसले होते. शेजारचा अनय त्याच्या आई आणि बायको सोबत बाहेर निघालेला,अनय ने कार सुरू केली तर त्याची बायको पूजा पटकन अनय शेजारी जाऊन बसली. आई आपली गपचूप मागे बसली . आई चा चेहरा उतरला ,गाडीतील नव्हे तर आपल्या जीवनातील ही स्थान कोणीतरी हिरावून घेतले ही कल्पनाच दुखावणारी आहे.
सुमन हे सगळं तुझ्या मनाचे खेळ आहेत बाकी काही नाही. या उलट सावनी स्वभावाने छानच असेल सगळं तुला विचारून करेल. शेखर ही तुझं मत विचारात घेईल. जी गोष्ट अजून घडलीच नाही त्या बद्दल विचार करून का दुःखी होतेस सुमन?
सीमा अग काल पर्यंत आई ,कपडे तुझ्या पसंती ने घ्यायचे चल अस हट्ट करणारा मुलगा जेव्हा बायको च्या आवडीने कपडे घेतो तेव्हा त्रास होतो. आईच्या हातचाच एखादा पदार्थ हवा म्हणून हटून बसणारा मुलगा नावं न ठेवता सुनेच्या हाताचं खातो, तेव्हा जखम खोलवर होते.
सुमन तू खूप चुकीचा विचार करतेस. माझं बघ माझा मुलगा सून मला हवं नको सगळं बघतात. माझी काळजी घेतात. बस्स मला अजून काय हवे. मी सगळं त्या दोघांवर सोपवून मस्त राहते. तू ही तशी रहा. हे बघ मुलगा काय किंवा मुलगी काय लग्ना नंतर त्यांना एकमेकांना त्यांची "स्पेस" देणं जास्त गरजेचे असते. दोघांच्या ही संसारात आपण जास्त लुडबुड नाही करायची. आणि अस जमत नसेल तर मुलाला वेगळं राहायला सांग. अडीअडचणी ला ते मदतीला येतील. "दूरून डोंगर साजिरे" अशी वृत्ती ठेव.मुलाला आपल्या प्रेमात दुबळ,अपंग करण्या पेक्षा मुली सारखी त्याची ही "पाठवणी" कर. बघ विचार कर सुमन.
सीमा जे बोलली त्याचा सुमन मना पासून विचार करत राहिली.कुठेतरी तिला सीमाच पटलं होत.
(क्रमशः)
