Author Sangieta Devkar

Abstract

3  

Author Sangieta Devkar

Abstract

पाठवणी (भाग 1)

पाठवणी (भाग 1)

2 mins
234


सुमे ,अग अशी कशी मैत्रीण तू? मुलाच लग्न ठरलं तरी मला सांगावेसे नाही वाटले का तुला?.. फोनवर सीमा बोलत होती.

सीमा सांगणारच होते ग. अजून वेळ आहे.

पण तुझा आवाज का असा वाटतो आहे,तब्येत बरी आहे ना? सीमा ने विचारले.

हो काही नाही झाले बस मन जरा अशांत आहे ,तू ये घरी मग आपण बोलू.

बर येते उद्याच. माझ्या आवडी ची कोथिंबीर वडी करून ठेव. सीमा ने फोन ठेवला.

सुमन आपल्याच विचारात होती. दोन वर्षा पूर्वी लेकीचं नेहा च लग्न करून दिले तेव्हा खूप खुश होती. चांगला जावई ,चांगले घर मिळाले . नेहा ही आनंदात होती. शेखर सगळ्या बाबतीत नेहाच मत विचारात घेतो. सगळ्या गोष्टी एकमेकां सोबत शेयर करतात. चांगले आहे. असा जावई नशिबाने मिळतो. नेहा ची सासू शान्त आहे. सासरे गेल्या वर्षी आजारपणात गेले. त्या नेहाला काही सूचना देत बसत नाहीत तुला जमते तस कर म्हणतात. मग मी ही अस नेहाच्या सासू सारख आता अलिप्त राहायचे का? जमेल मला?


ये सीमा कशी आहेस? घरात आल्या आल्या सुमन ने विचारले.

मी मजेत आहे. मुलगा सून सगळं बघतात मी काही ही घरात लक्ष देत नाही . निवांत राहते.

तू बोल काय बोलायचे म्हणालीस ना काल? सीमा.

सीमा समीर आणि सावनी एकमेकांना अनुरूप आहेत. एकत्र काम करतात. सावनी हुशार,सुंदर आहे. सावनी सून म्हणून घरी येईल मग या घरात माझं स्थान काय?

म्हणजे नेमकं काय म्हणायचे तुला सुमन. सून येणार ही आनंदाची बाब आहे त्यात तुझं स्थान सासू म्हणूनच असेल ना?. सीमा.

सीमा ज्या समीर ला मी त्याच्या वडिलांच्या माघारी इतकं वर्ष सांभाळले. तो आता एका क्षणात त्याच्या बायको चा होणार. माझं स्थान मग डळमळीत नाही का होणार? हाच प्रश्न मला पडला आहे.

सुमन , अग नेहाच्या लग्ना वेळी हाच प्रश्न तुला का नाही पडला ?कारण ती मुलगी आहे,आज ना उद्या सासरी जाणार हे तू गृहीत धरून होतीस ना .

हो सीमा पण नेहा सासरी गेलीय ,जावई इथे नाही ना राहायला आला. इथे सून येणार आणि मी समीर ला तिच्या सोबत शेयर करायचं? हेच कुठेतरी खुपतय ग मनात...सुमन म्हणाली.

मग विचार कर सुमन, नेहा च्या सासू ला पण सेम हाच प्रश्न नसेल का पडला? खरं म्हटलं तर ज्यांना मुलगा आहे ती प्रत्येक बाई मुलाचे लग्न ठरते तेव्हा या अवस्थेतून जात असणारच. कसा विचार करत असेल प्रत्येक आई? ती भावनेला महत्व देते की वास्तवाला?



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract