ऑर्किड
ऑर्किड
नेहमीप्रमाणे रमा आज सकाळी ऑफिसला जायला निघाली. जातांना रस्त्याच्या एका कडेला तिला एक नवीन फुलाचे दुकान दिसले. तिने तिथे गाडी थांबवली आणि त्या दुकानात गेली .तिथे असलेल्या विविध रंगांच्या फुलांकडे ती बघत होती कारण तिला फुलांची खूप आवड. अचानक तिची नजर गुलाबी रंगाच्या ऑर्किड च्या फुलांकडे गेली. ती स्तब्ध होऊन त्या ऑर्किडच्या फुलांकडे बघत बसली. तितक्यात तिच्या कानावर एक आवाज आला, "दादा, या मॅडमला ही ऑर्किडची फुले द्या त्यांना ती खूप आवडतात ,हे शब्द ऐकताच तिने मागे वळून बघितलं तर तिथे तिला कुणीही दिसलं नाही. मग तिने हळूच तिचा हात डोक्यावर मारला आणि हसली. तिला आवडणारी ऑर्किडची फुले तिने घेतली आणि निघून गेली.
