जयश्री पाऊस आणि कोको भाग 2
जयश्री पाऊस आणि कोको भाग 2
शुक्रवारी सकाळी ती निघाली ती वाईला राहत असल्यामुळे तिने जवळच्याच पर्यटन स्थळाला भेट द्यायचे ठरविले. वाई पासून महाबळेश्वर हे 32 किलोमीटर होते त्यामुळे तिने महाबळेश्वरला जायचे ठरवले. तिचा प्रवास सुरू झाला. तिचा एकटीचा तो पहिलाच प्रवास होता त्यामुळे तिला भीती वाटत होती पण तितकेच उत्सुकताही होती. जवळपास 13 किलोमीटर अंतर पार केल्यावर तिने जरा विश्रांती घ्यायचं ठरवलं आणि पाचगणीतील एका हॉटेलमध्ये जरा चहा घेतला.पाचगणीतील काही स्थळांना भेट दिली. खूप सारे फोटो, व्हिडिओ तयार केले आणि खूप मजा केली. घरच्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी बोलली. त्यांनाही निसर्ग दाखवला .तिने एका दिवसाचा प्रवास करायचं ठरवलं होतं त्यामुळे तिला वेळेचे व्यवस्थापन करणे गरजेच होतं.जवळपास तिन- साडेतीनला ती पाचगणी वरून निघाली. वाई ते महाबळेश्वर पाचगणी वरून जायचं तिने ठरवलं होतं. मग तिचा प्रवास पुन्हा सुरू झाला, तिच्यामध्ये आता जरा आत्मविश्वास जागा झाला होता. तिला आता वाटत होतं की हे सगळं खूप सोपं आहे. आपण करू शकतो साडेचारला ती महाबळेश्वरला पोहोचली महाबळेश्वरचं वातावरण तसं चांगलं.सुंदर निसर्ग, थंड वारा आणि हिरवीगार झाडी.अगदी मोहून टाकतात.मग तिने तिथल्या काही पर्यटन स्थळांना भेट दिली आणि परतीचा प्रवास करायला सुरुवात केली कारण रात्रीचे साडेसात वाजले होते आणि अंधार झाला होता आता जरा तिला भीती वाटत होती कारण सोबत कोणीच नव्हतं.
