फोटो (अलक)
फोटो (अलक)
1 min
25
घरातील भिंतीवर असणारा एक माझा आणि एक आईचा फोटो.जागा कमी असल्याने त्या मधला एक फोटो आई आज कमी करणार होती कारण घरात नविन सदस्य आला होता म्हणजे माझा भाऊ .
आता आईला त्याचा फोटो घरातील भिंतीवर लावायचा होता मग मला वाटलं की आता माझाच फोटो घरातील भिंतीवरून कमी होतो की काय?
पण ती आई आहे तीने तीचाच फोटो कमी केला.आणि माझ्या कडे बघून हळूच हसली आणि मला म्हणाली काय रे कसला विचार करतोस? म्हणतात ना की आईच मन कुणाला च कळू शकत नाही......
