जयश्री पाऊस आणि कोको भाग 4
जयश्री पाऊस आणि कोको भाग 4
ती कार ड्राईव्ह करत होती तितक्यात तिला गाडीच्या स्क्रीनवर घरचा कॉल आलेला दिसला. एका सेकंदासाठी तिने स्क्रीन कडे बघितले तितक्यातच एक मांजर तिच्या कार पुढे आलं म्हणजे त्या मांजरानी जणू गाडी पुढे उडीच घेतली. तिने खूप जोरात कारचा ब्रेक दाबला नशीब की मागे कुठलीही वाहने नव्हती आणि लगेच कार थांबून कार पुढे आलेल्या मांजराला बघायला गेली तिला वाटलं की मांजर वाचलं नसेल म्हणून ती जरा दुःखी झाली आणि भर पावसात कार मधून उतरून कार पुढे आलेल्या मांजराला बघायला गेली तिला दिसले की मांजर म्याऊ, म्याऊ करत होते आणि तिच्या पायाला थोडे लागलं होतं हे बघून तिला दुःख तर होत होतं पण मांजर वाचलं याचा आनंदही होता तिने लगेच त्या मांजराला उचललं, गाडीत ठेवलं पावसामुळे मांजर आणि ती दोघेही ओलेचिंब झाले होते. पण आता तिला त्या मांजराला दवाखान्यात न्यायचं होतं त्यामुळे लगेच ती कार मध्ये बसली आणि पुन्हा परतीच्या प्रवास सुरू केला. मोबाईल वरती तीने जवळपास असलेल्या पेट रुग्णालयाची माहिती काढली. वाईपासून एक किलोमीटर आधी तिला रुग्णालय भेटले. प्रवासादरम्यान ती मांजरीशी बोलत होती काळजी करू नको, तू ठीक होशील, आपण लवकरच पोहचू इत्यादी आणि शेवटी रुग्णालयात पोहोचून तिने मांजरीचा जीव वाचवला. डॉक्टरांनी सांगितले की खूप काही काळजी करायची गरज नाही. थोडं पायाला लागला आहे. काही दिवसात ती पूर्णपणे बरी होईल. पाऊस अजून सुरूच होता मग तिने विचार केला की या मांजरीला आपण आपल्या सोबतच घेऊन जावं कारण तो ही एक जीवच आहे. तिला अजून चालता येत नव्हतं. तसा तो तिच्यासाठी एक थरारक अनुभवच होता अजून घरी पोहोचायला एक किलोमीटर अंतर पूर्ण करायचे होते मग तिने मांजरीला सोबत घेतले आणि घरी जायला निघाली. घरच्यांना कॉल करून तिने कळविले. पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता शेवटी ती घरी पोहोचली,मांजरीलाही तिने घरी आणलं.तिच्यासाठी हा प्रवास एक एडवेंचर् ठरला. घरी आल्यावर तिने आधी देवाला नमस्कार केला, जरा शांत बसली नंतर तिने त्या मांजरीला तिच्या घरीच ठेवले. तिला नाव दिल “कोको”
त्या एका पावसाळी रात्री मुळे तिला कोको भेटली. जीवनाच्या वळणावर कुणाला कोण कुठे भेटेल सांगू श.कत नाही.
म्हणतात ना जीवन हे अ काल्पनिक आहे आणि हे खरंच आहे तो पाऊस, जयश्रीचा प्रवास आणि कोको..
