STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Inspirational Others

4  

Kavita Sachin Rohane

Inspirational Others

लेखणी

लेखणी

1 min
14


लेखणी माझी  सखी
             लहानपणापासूनच एक नातं आहे तुझ्यासोबत. मनातील गोष्टी कागदावर उतरवायची सवय तुझ्यामुळेच लागली. तसं बघितलं तर एक लेखिका म्हणून तुझ्याशी नातं आहेच पण जस जस वय वाढत जातं आणि जबाबदाऱ्या कमी होत जातात तस तशी तुझी ओढ वाढत जाते .
     एका मैत्रिणीसारखी तू माझ्या मनातील भाव ओळखतेस.माझी सगळी सुखदुःखे वाटून घेतेस. तुझ्याशिवाय आयुष्य अपूर्णच वाटतं .कधी कधी डोक्यात चाललेले असंख्य विचार तुझ्यामुळेच बाहेर पडतात आणि मगच डोकं शांत होतं. खरंच जादू आहे तुझ्यात कधी कधी वाटतं की तू नसलीस तर काय झालं असतं?     शाळा कॉलेज नोकरी म्हातारपण प्रत्येक पायरीवर तू माझ्यासोबत आहेस अगदी माझ्या जिवलग सखी सारखी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational