जयश्री, पाऊस आणि कोको भाग ३
जयश्री, पाऊस आणि कोको भाग ३
रात्री ड्रायव्हिंग करून जायचं होतं पण तिने हिम्मत हारले नाही. परतीच्या प्रवासाला सुरुवात केली पण अचानक आभाळ भरून आले ,पाऊस सुरू झाला महाबळेश्वर भागात केव्हा पाऊस येईल काही सांगू शकत नाही त्यामुळे हे थोडेफार तिला अपेक्षित होतंच. जवळपास आठ वाजता पाऊस सुरू झाला तिला घरी पोहोचायला अजून एक दीड तास तरी लागणार होता पावसाचा वेग वाढत चाललेला होता त्यामुळे तिने गाडीची गती जरा कमीच ठेवली होती. तिच्या मनाची द्विधा परिस्थिती झाली होती पावसाची मजा घ्यायची की पडलेल्या अंधाराला घाबरायचं! काय करायचं तिला कळत नव्हतं पण शेवटी तिने हिंमत न हारता पावसाची मजा घेत प्रवास सुरू ठेवला पण अचानक असं काही घडलं की तिला त्याची अपेक्षा नव्हती.
