Author Sangieta Devkar

Abstract Tragedy

3.3  

Author Sangieta Devkar

Abstract Tragedy

नमिता (भाग 3)

नमिता (भाग 3)

3 mins
41


तिच्या सुख दुःखाशी कोणाला काही देण घेणं नवहते. या घरात ती फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती.

दुसऱ्या दिवसा पासून नमिता एकटी भाड्याच्या घरात राहायला आली. हळूहळू गरजे पुरते सामान तिने घेतले. आता दोन दोन संसार तिला सांभाळायचा होता म्हणून संध्याकाळ चे शिकवणी चे वर्ग तिने सुरू केले. तीच लग्न हा विषय आता जवळजवळ संपलाच होता. थोड्या दिवसात उदय चे लग्न झाले. कॉलेज मधील प्रोफेसर रविंद्र याच्या सोबत नमु ची चांगली मैत्री होती. रविंद्र सोबत सगळं मनातलं नमिता शेयर करत असायची. तिच्या बद्दल त्याला वाईट ही वाटत असे. हळूहळू ते दोघे एकमेकांत गुंतत गेले. नमु चे वय आता 34 झाले होते. तिच्या मनाच्या आणि शरीराच्या गरजा आता रविंद्र कडून पूर्ण होत होत्या. रविंद्र चे लग्न झाले होते पण त्याने नमु ला कायम साथ देण्याचे वचन दिले होते. भले ही त्यांच्या नात्याला कुठले नाव नवहते पण एकमेकां बद्दल ओढ,प्रेम,काळजी होती. आणि कधी कधी काही नात्यांना नावाचे लेबल गरजेचे नसते.

"रवी,माझं आयुष्य पण कसे बघ,नेहमी मी दुसऱ्यां साठी राबत आले त्यात माझं,मला अस काहीच नवहते रे.


नमु तू इथे राहायला आली ते बरोबरच केलेस. पण तुझ्या आई वडिलांना तरी तुझं दुःख समजायला हवे होते.. रवी नमुचा हात आपल्या हातात घेत म्हणाला.

माझ्या नशिबा समोर ते तरी काय करणार ना?

ते पण आहे पण तुला अस नाही वाटत का की तुझा फक्त पैसा तुझ्या घरच्यांना हवा बाकी तुझ्या इच्छा,अपेक्षा याच त्याना काही घेणेदेणे नाही.

सगळं माहीत आहे रवी मला पण मी माझी जबाबदारी नाही झटकू शकत.

हम्मम,नमु मी आज इथेच राहणार आहे,बायको ला सांगितले आहे मित्रा कडे पार्टी आहे.

रवी तुला हवे तेव्हा इथे येत जा.मला ही समजून घेणार तुझ्या शिवाय आहे कोण?

रात्री जेवण मग गप्पा मारत ते दोघे एकमेकांच्या मिठीत विसावली होती. रवीच होता जिथे नमु जगाला जरा विसरून स्वतःचा शोध घेत असे. त्याच्या मिठीत निर्धास्तपणे विसावत असे. दुसरे पणाचे का असेना सुख उपभोगत होती. रविच होता ज्याच्या सहवासात तिला एक ठहराव मिळत होता.

सकाळी सकाळी बेल वाजली रवी आणि नमु नाष्टा करत होते. नमु ने दार उघडले दारात उदय होता. " आज सकाळी सकाळीच काय झाले?

ते सविता ची तब्येत जरा ठीक नाही. हॉस्पिटल ला जायचे होते.

आत ये नमु म्हणाली.

उदय ला बघून रवी उठला,नमिता मी निघतो आता कॉल करतो.

ठीक आहे. बाय

ताई,हा कोण होता आणि इतक्या सकाळी कशाला आला होता?

उदय ,तो माझा मित्र होता.काम होत म्हणून आला होता.

म्हणजे आम्ही बाहेरून ऐकत होतो तुझ्या बद्दल ते खरे आहे तर?

काय ऐकलेस उदय माझ्या बद्दल?

हेच की एका विवाहित माणसा सोबत तुझे संबंध आहेत.

हो आहेत . आज तुमच्या सगळ्यांची गरज भागवता भागवता माझं लग्नाचं वय निघून गेले याचा विचार तुम्ही कोणी केला का? बाबांची औषधे ,शोभाचे शिक्षण,तुझे शिक्षण,आता तुझी बायको सविता तिचा खर्च सगळं कुठवर मी जमवत राहायचे ? माझ्या काही इच्छा अपेक्षा नसतीलच ? मला मनच नसेल असाच विचार तुम्ही करत आलात. मी फक्त आईचा,तुझा संसार चालवणारी,सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे तुमच्या साठी.

ताई, तुला नसेल द्यायचे पैसे तर नको देऊ पण असलं काही लोक नाव ठेवतील अस वागू नकोस.

उदय मी माझं आयुष्य कसे जगायचे हे मला ठरवू दे. तुझं मत मला नको सांगूस आणि लोकांचा विचार मी करेन तू नको करू. हे घे पैसे आणि बायकोला दवाखान्यात ने. इथून पुढे माझ्याकडे नाही आलास तरी चालेल. आई ला सांग वेळेवर पैसे घरपोच होतील.

काही न बोलता उदय पैसे घेऊन निघाला. नमु ने त्याच्या माघारी दार लावून घेतले. अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract