Author Sangieta Devkar

Abstract Tragedy

3.9  

Author Sangieta Devkar

Abstract Tragedy

नमिता (भाग 2)

नमिता (भाग 2)

2 mins
306


आई ने तर तिच्या लग्नाचा विषयच कट केला. घर नोकरी सांभाळत नमु दिवस काढत होती.

उदय चे शिक्षण पूर्ण झाले त्याला एका खाजगी कंपनीत नोकरी लागली. शोभा कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होती. उदय चे लग्नाचे वय झाले होते. आई त्याच्या साठी स्थळ बघत होती. असे ही नमूचे लग्न जमत नवहते. तिच्या साठी उदय ला थांबवून ठेवणे आई ला शक्य नवहते. नमिता ही म्हणाली की,माझं लग्न होईल तेव्हा होईल त्या साठी उदयच लग्न लांबवू नका. नमु च्या पगारावर घरखर्च,वडिलांची औषधे,शोभाच शिक्षण सगळं सुरळीत चालू होतं अशात तीच लग्न झालं आणि नमु सासरी गेली तर हा खर्च कोण बघणार हा प्रश्न होताच.

त्यामुळे नमुच लग्न जितकं लांबेल तितके बरेच होते.

उदय ला बरीच स्थळ आली पण मोठी बहीण अजून बिन लग्नाची घरात आहे या कारणाने त्याच लग्न जमत नवहते. नमु ला घरा बाहेर रहा म्हणणे आई च्या जीवावर आले होते. उदय मात्र लग्न जमत नाही म्हणून चिडचिड करत असे. नमिता शी तो नीट बोलत ही नवहता. नमिताच्या लक्षात सगळ्या गोष्टी आल्या. एक दिवस कामा वरून आल्यावर सगळे जण घरात असताना,नमिता म्हणाली, "आई मी माझ्या कॉलेज जवळ एक दोन रूम चे घर भाड्याने बघितले आहे,मी उद्या पासून तिकडेच राहायला जाईन."


नमु पण तुला इथे राहू नको अस कोणी ही बोलले नाही. आई

आई,कोणी बोले पर्यंत वाट बघू का? बाहेरची लोक तर बोलतातच की ? माझ्या मुळे उदय च लग्न जमत नाही म्हणून मी हे घर सोडून जाते.

ताई मग माझं शिक्षणाचे काय? मला कोण शिकवणार? शोभा बोलली

शोभा ,त्याची काळजी नको करू. या आधी जस घर चाललं होतं ते तसच चालेल . मी घर खर्चाचे,औषधाचे पैसे सगळं देत राहीन.

नमिता अस बोलली तेव्हा कुठे सगळ्याना बरे वाटले. उदय ही मनातून खुश झाला. त्याच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला होता आणि बाकीचे कसले टेन्शन ही नवहते. नमु ने आपली जबाबदारी झटकली नव्हती.

जेवण करून नमिता अंथरुणावर पडली. आपोआप तिच्या डोळ्यात पाणी आले. तिच्या साठी,तिच्या बाजुने विचार करणार कोणी नवहते. तिच्या सुख दुःखाशी कोणाला काही देण घेणं नवहते. या घरात ती फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती


क्रमश। (फोटो गुगल साभार)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract