Author Sangieta Devkar

Abstract Tragedy

3.5  

Author Sangieta Devkar

Abstract Tragedy

नमिता (भाग 1)

नमिता (भाग 1)

2 mins
76


नमिता ,ते थोडे पैसे हवे होते .

किती हवेत आई ?

ते गावाला लग्न आहे आपल्या शकुच तेव्हा मामा मामी ला आहेर,शकू ला साडी द्यायला लागेल.

आई मी पाठवते उद्या पैसे. शकू च लग्न ठरले हे पण मला सांगावेसे नाही वाटले का?

नमु ते गावात उगाच चर्चा होणार तू आलीस तर ,म्हणून मामाच म्हणाला की नमुला काही बोलू नका.

बर आई पाठवते पैसे. नमु ने कॉल कट केला. आई ला भावाला फक्त पैसे हवे असेल तर नमिता आठवत असे. भाऊ खाजगी कंपनीत कामाला,पगार कमी घरात आई,बाबा,एक बहीण,वहिनी खाणारी पाच तोंड ! नमिता कोणाला घरी नको होती राहायला पण तिचा पगार मात्र त्यांना हवा असायचा. सोन्याची अंड देणारी कोंबडी होती नमिता.

नमिता ,मोठी अनिता, त्यांनतर भाऊ उदय लहान बहीण शोभा. वडील गिरणी कामगार चाळीतल्या छोट्या तीन रुम मध्ये रहात होते. पोटा पुरत कसे बसे नमिता चे वडील कमवायचे. आई पापड,लोणची करून अधूनमधून घराला हातभार लावत होती. अचानक ध्यानीमनी नसताना गिरण बंद पडली आणि सगळ्याच कामगारां वर दुःखाची कुऱ्हाड पडली. अनिता ची दहावी झाली होती. बाकी सगळे भावंड पाठोपाठ होतीच. अनिता अकरावीत गेली आणि एका मुलाच्या प्रेमात पडली. बारावी नापास झाली आणि पळून जाऊन लग्न केले. इथे घरात खाण्या पिण्याची मारामार होऊ लागली होती. नमिता बारावीत होती ,तिने मग पार्ट टाईम एक नोकरी बघितली आणि काम करत शिकत राहिली. बीए बीएड झाली नमिता आणि एका कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागली. तिच्या मुळे घरात जरा पैसा येऊ लागला पण वडील आजारी पडले. आई ही थकली होती. नमु चे लग्नाचे वय झाले होते. लग्न झाले तरी उदय आणि शोभा चे शिक्षण ,लग्न मी करेन ,घरा कडे ही लक्ष देईन असा शब्द नमु ने आई ला दिला कारण घरची गरीब परिस्थिती ती जाणून होती.


नमु ला स्थळ यायची पण कुठे काही जमत नवहते. नमु दिसायला ठीकठाक होती आणि चांगली नोकरी ही होती तरी लग्न जमत नवहते. एके ठिकाणी नमु ची पत्रिका दाखवली तर तिला कडक मंगळ होता. त्यामुळे तिचे लग्न जमत नवहते. तिला मंगळचाच मुलगा हवा पण तसे स्थळ काही येत नव्हते मग नमु ही कंटाळली आणि आई ने तर तिच्या लग्नाचा विषयच कट केला. घर नोकरी सांभाळत नमु दिवस काढत होती.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract