STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Action Classics Inspirational

3  

Anjali Bhalshankar

Action Classics Inspirational

निसर्ग

निसर्ग

2 mins
158

रंग किती हे पाखरांचे गंध निर्मिले कोणी फुलांचे

आकाशाची निळाई कोणी होतं इतकी शाई


दर्यासागर नदी-नाले पर्वत कोणी बनवले

 हिरवी झाडे कोवळी पाने काय बरे पक्षी गुणगुणले


साद घालुनी वाऱ्याने मग आलाप जनु छेडले सांगा

खोदल्या दर्या कोणी इतक्या खोलवरी


समुद्राची गहराई मोजली का हो ?

आज वरी नेमाने येतो सूर्य घेऊन पिवळ्या उन्हाचे सडे


सांज होता सांगा जात असेल कुणीकडे

कातरवेळ येते शांतपणे जन्ममरणाचे गुपित उघडणे

मातीमोल हे जीवन सारे मातीतच शेवटी मिसळून जाणे


नव्या उद्याच्या स्वागताला रात्र शिंपते जणू चांदणे

सांगतेय आजच्या अंतात नव ऊदयाचे सुखद तराने

 

        निसर्गाचे हे वर्णन क्षणाक्षणाला आपले रूपडे बदलणारे चमत्कार दाखविणारे जे जे मानव कधीही निर्माण करू शकणार नाही व ज्याने मानवासह समस्त सृजणांना निर्माण केले तो निसर्ग त्याविषयी लिहिणं म्हणजेच रोमांचकारी अनुभव.ऊन पाऊस वारा वादळ नद्या नाले समुद्र निळ आभाळ जे अनंत आहे.निसर्ग तत्व ज्ञान सांगतो जगण्याच,मरणाचे नी त्या नंतरच्या नव्या जन्माच सुद्धा. निसर्ग गुरू आहे माता पिता नि मित्र सुद्धा आहे.उन्हाच्या काहीलिने हैराण झालेल्या धरणीला पहीला पाऊस सुगंधी अत्तराचे लेणे देतो तिच्या गर्भातून शोषलेल ओलेपण पुन्हा तिला बहाल करतो पावसाच्या रूपात येऊन अमृताचा वर्षाव करून तिला नव संजीवणी देऊन तृप्त करतो नि तिच्या कुशित विसावलेल्या अंकुराला पालवी फुटते.एक नवा जन्म घेते जन्माच गुपीत ऊलगडते संपुर्ण धरती हिरवागार शालु पांघरलेल्या नववधुसारखी दिसते. चैतन्याच तेज पांघरते.निळ विशाल विस्तीर्ण आभाळ आपल्याला भव्यता शिकवते आयुष्याला जगण्याला तटस्थ खंबीर बनवते.अचल राहुन विराट व आपले ध्येय अनंत ठेवावे याचे धडे देते. निळाभोर सागर तुफानाशी लढण्याचे सामर्थ्य देतो. लाख संकटे येवोत तु मागे सरून नको आयुष्यात कीतीही लाटा येतील दुःखाच्या मात्र त्या लाटेवर स्वार होऊन भवसागर पार कर तु हिम्मत हारू नको माणसा पुढे जा सदैव. आभाळ नि धरतीला जोडणारं इंद्रधनुष्य जस सप्तरंगी असते तसेच तर आहे ना जीवन राग लोभ द्वेष आनंद उत्साह दया क्षमा शांती असे कितीतरी रंग भरलेत ना जीवनात फक्त ते वापरताना संयम हवा. वारा चंचलता शिकवते वादळ निर्भयता शिकवते पर्वत तटस्थ रहायला शिकवतात जल जीवन देते नई वायु श्वास देऊन जीवणाला सजीवता देतो.टीपुर चांदण थकलेल्या जीवाला शांत शितल मंद अनुभूती देत चंद्राचा धवल प्रकाश रात्रीची भयानता जाणवु न देता सौंदर्याचं तेज डोळयात सामावायला सांगतो.नद्या नाले डोंगररांगा त्या भोवतालची हिरवळ सृष्टीच्या अप्रतीम सौंदर्याचा साक्षात्कार देतात.पिवळ्याधमक रानफुले श त्यावर कोवळ्या उन्हाचा अभिषेक करणारी सुर्य कीरणं मनाला मोहुन टाकतात.रापलेलं सरत्या वयान निसटुन गेलेल जन्माच सौख्य आपल्याला उद्युक्त करतात भरभरून जीवनाचा आनंद घेणयासाठी आणिक पुन्हा नव्याने जन्म घेण्यासाठी सुदधा!



Rate this content
Log in

Similar marathi story from Action