निसर्ग रम्य!अद्भूत प्रवास
निसर्ग रम्य!अद्भूत प्रवास
सायंकाळी पाचच्या सुमारास बारामती एस टी स्टॅन्ड वरून, गाडीने स्टार्टर घेतला शहरामधुन बाहेर पडे स्तोवर रखडत सुरू असलेल्या गाडीने काही वेळातच, अचानक वेग घेतला व वाऱ्याची थंडगार झुळुक सर्वांगावर फिरली खिडकीतून बाहेर डोकावण्याचा इशाराच जणू !सप्टेंबर सुरू आहे. दुपार केव्हाच टळून गेलीय, तरीही सुर्य पश्चिमेला कलायला राजी नाही.बहुतेक दोनेक महीने संततधार तर कधी उघडीप असा खेळ मांडलेल्या पावसाला रोखायचे आहे.राज्य परिवहनच्या ओपन बस मध्ये पहील्या रांगेत , माझ्या आवडत्या पहील्या सीटवर बसायला मिळालेल्या आनंदावर सूर्याने संध्याकाळच्या उंबरठ्यावर सुद्धा अगदी माथ्यावरून हटायचे नाही असे ठरवले की काय, कुणास ठाऊक ?प्रखर उन्हाच्या झळा नी काही वेळापूर्वीच थंडगार वारेही उन्हात मिसळून ऊष्ण होऊन घाम निथळवत लाहि लाही करीत होते अर्धा तास ऊलटून गेलाय बारामती शहर केव्हाच मागे पडले. पुण्याकडे सरकत असलेली एसटी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लयीत निघालीयं काळ्याभोर डांबरी मार्गावरून मध्यम गतीने मोकळ्या मार्गावरून राणी प्रमाणे थाटात ऐटीत जाणारी एस टी आणि तीच्या पहील्या रांगेत पहील्या सीटवर बसलेली मी वर आग ओकणारा सुर्य अगदी समोर बरोबर माझ्या नजरेच्या टप्प्यातुन चालत आहे.समोर वर पहायची सोय नाही काचेतुनही त्याच्या उग्र, ऊष्ण झळा भासत आहेत. स्वच्छ शुभ्र रखरखीत निळया पांढर्या ढगांच्या गोल,लंबगोलाकार, सपाट आकारांच्या आभाळातील प्रांगणात कोणितरी तेजाचा गोळा अलगद ठेवावा अगदी तसाच भासतोय सुर्य आता खाली पडेल की काय ?पुढे काही अंतरावरून गाडीने वेग कमी केला व पुन्हा एखादे गाव आलेय बहुदा.मी लीहीणयात मग्न !उन्हाच्या तीव्र भपकारा असह्य!पहील्या सीटवर बसण्याचा मोबदला मी आनंदाने स्वीकारत होते.असहय उष्णतेला सहनशीलता दीली ती हिरव्या गच्च रंगाने दुतर्फा उंच दाट हिरवीगार झाडे ,शेती, झुडपांच्या गर्द हिरव्या रंगाने कडक तीव्र आग ओकणाऱ्या सुर्याला आपल्या कोवळ्या हिरव्यागार गर्द छटांनी आव्हान दिलेय.दुतर्फा वसलेले हिरवळीचे साम्राज्य डोळयांना मनाला गारवा शांती शीतल थंडावा देत होते बहुधा उन्हाचे सामर्थ्य सहन करण्याचे बळ मला देत होते.मीही अगदी निश्चल तेने उन्हाला न जुमानता दोन्ही बाजुच्या गडद हिरवा परिसराला न्याहाळीत पुण्याकडे वाटचाल करीत होते.सोबत तप्त सुर्याभोवतालचे,पांढरे फीकट नीळे ढगांचे पुंजके होते मध्ये मध्ये सपाट तलम मऊशार आभाळ तर कुठे निळसर सावळा रंग मिश्रित ढगाच्या तुकड्याला आलेली रूपेरी कीनारही धावतीये मजसोबत, भोवतालची झाडे, दुरवरचे डोंगर, नी त्या पलयाड उतरलेले क्षितीजही धावतात आमच्यासोबत.काहीवेळ पाठलाग करूण मग दिसेनासे होतात तेव्हा फार गम्मत वाटते. आणि ऊदासही.जणु ते आतुरतेने विचारत आहेत पुन्हा भेट कधी?ही नागमोडी काळीभोर वाट, हे डोंगर, हे आकाशाचे फिकट नीळे शुभ्र पांढरे ,आणि रूपेरी कीनार असलेले सपाट आभाळ सुद्धा! हिरवीगार झाडे शेतं,ही हिरवळ काळीभोर सुपीक भीमा नदी काठी वसलेली ही माती,आणि डोंगरापलीकडच्या क्षितीजाची तुला साद आहे तू पून्हा ये! परतीच्या वाटेवर ,आम्ही स्वागत करू! वाट पाहू!मी मनातल्या मनात हो म्हणल!मग मान डोलावून भरल्या डोळ्यांची उघडझाप करून होय!मी म्हणलं जीवणात लिहीले असेल तुम्हाला भेटणं असेल तर नककीच परत येइन लवकरच! गाडीने आता चांगलाच वेग घेतला मागे व पुढे मोकळा काळाभोर स्वच्छ लख्ख डांबरी अगदी पट्टीने आखल्यासारखा रेखीव रेघ असलेल्या मऊशार पुणे बारामती मार्गाचा प्रवास आता हलका, सुखदायी भासु लागला सुर्याला बऱ्यापैकी ढगांनी व्यापले तरीही पांढर्या फिकट नीळया राखाडी आकाशात कुठे कुठे लख्ख रूपेरी किनार मधून अधून चकाकत होती उन्हं लोपली होती दूर दूर पश्चिमेस केशरी पिवळे फिकट नीळे, तांबुस राखाडी संमिश्र अशा निरनिराळ्या छटांनी आभाळात गर्दी केलीय आभाळात कसली अगदी, दूरवरच्या डोंगरावरच म्हणा ना!हो खरच आभाळ डोंगरावर ऊतरलेय हे चित्र कृत्रीम रंगाने काढलेल्या कोणा चित्रकाराचे नाही हे चित्र खऱ्याखुऱ्या निर्मात्याने सृष्टीतील अपार करूणामयी निर्माण कर्त्याच्या अलौकिक प्रतिभेने तरळलेले आहे.अगदी पश्चिमेसच माझा मार्ग असल्याने सांयकली साडेसहाच्या दरम्यानचा हा नयनरम्य लाजवाब अद्भुत अविष्कार मी तन्मयतेने जसा जमेल तसा डोळ्यातुन मनात व मनातून शब्दात ऊतरवित आहे. सासवड आलेसुदधा याचे भान राहीले नाही. माणसांचा गोगांट आलायं लिहीणे थांबवते. दहा मिनिटांनी सासवड गाव मागे मागे पडले तोच प्रश्न जो निसर्ग विचारतोय असा मघाचा भास या माणसांनी भरलेल्या गावाने केला असेल का?थोड हसु आलं!थोडे पुढे आल्यावर पुन्हा नजरेला निसर्गाने व्यापले. मात्र आता सांयकालची कोवळेपणाची चाहुल वाढली हवेत मंद गारव्याचा शिरकाव झालाय. पावणे सात वाजत आहेत बाहेर अंधूकस कडुस पडलयं सुर्य केव्हाच दूर दुर दुसर्या मुक्कामावर जात असेल की पोहोचले असेल?डोंगर आता काजळी धरू लागले.त्यावर फिकट नीळसर राखाडी व बरचसे काळवंडलेले ऊंच सखल सपाटी व्यापत वाढत चाललिये. डोंगरावर ऊतरलेल आभाळही मावळेल आता. अंधारून येइल क्षणाक्षणाला पश्चिमेला पाहुन मग चौफेर दृष्टीने मी शब्द शब्द टिपत आहे. कुठेतरीअजुनही रूपेरी लख्ख प्रकाशाची आजची शेवटची लख्ख लकेर दिमाखात आभाळाच्या काजळीला चिरून डोंगराला बळ देत आहे.......................हळू हळू डोंगराची काजळी, नीळे राखाडी मातकट, पिवळे केशरी संमिश्र ढग,ते डोंगरावरचे क्षितीज, तो तांबूस रंग विस्कटून पश्चिमभर पसरलेला रंगाचा पसारा दूरवर पाठलाग करूनही मागेच राहीला. बसने दिवे घाटात प्रवेश केला. दिवे घाट! ऊरात धडकी भरवणिरा घाट. हा घाट पार करणे येड्या गबाळ्याचे काम नव्हे.तसा पंधरा मिनीटाचा कालावधी घाट पार पंरतु काळजाचा ठोका चुकविणारी वळणे ऐकीकडे मोठमोठे कातळी डोंगरात रूतलेले मोठाले खडक दुसरीकडे खोल दरी पावसाळयाचे दिवस असल्याने हिरवीगार वृक्षांनी नटलेलं तीचे सौंदर्य अप्रतिम सुंदर खुललेले सकाळी घाट चढताना खिडकीतून जमेल तसा व तेव्हढा दरीचा हिरवा साज,दरीत ऊतरलेले नभ आणि अतिउच्च अरस्पानी सौंदर्याचा कळस म्हणजे चोहोबाजूंनी दाट झाडीने वेढलेला,पावसाळ्यात भरलेला व मस्तानी तलाव होय!छत्रसाल राजाची कन्या आणि बाजीरावाच्या पत्नी मस्तानी बाईसाहेब यांच्या नावाचा तलाव खिडकीतुन जमेल तितके वाकून डोकावून कॅमेरात कैद करण्याचा अटटाहास आधीच ठरविल्याप्रमाणे पुर्ण केला. दरीच्या तळाशी असलेले स्वर्गीय अनुभुती देणारे हे तळे भोवतालचा नयनरम्य परीसर, हिरवे डोंगर नीळ आभाळ दरीत ऊतरलेले काळेनीळया लगबगीने निघालेले ढगांचे जथ्थे भिरभिरणारे पक्षी आणि कहर म्हणजे भरारा दरीतून वेगाने येणारे वारे खीडकीतुन चेहेरयावर आदळत होते.ओढणी व केस कितीदा सावरावे लागले मला घाटमाथ्यावरून वर येताना सकाळी त्यात आता हा परतीचा प्रवास एकिकडे प्रचंड ऊभे डोंगराचे कातळ तर दूसरया बाजुला खोल दरी जिचा तळाचा अंदाज कठीण जाताना सकाळी पाहीलेला ऊन्हात चमचमणारा मस्तानी तलाव दरवर्षीप्रमाणेच पावसाने गच्च भरलेला अंधाराची चाहुल पहुडत चाललीय समोर पुढे पुढे नागमोडी वळणे डोंगराचे कडे आणि समोर प्रचंड दरीचा विस्तार बस मंद बेतानं नागमोडी वळणावरून अचानक येणार्या गाडीचा अंदाज घेत पुढे जात आहे मी मात्र त्या मस्तानी तलावात काही क्षणाच्या ओझरत्या दर्शनात आजच्या दिवसाचे शेवटचे सुर्याचे लालभडक प्रतिबिंब दिसले तलावात बुडलेला लालेलाल गोळा भोवताली पाण्यावर ऊठलेली केशरी आभा .......ते दृष्य शब्दात वर्णन नाही करता येणार मला घाट उतरल्यावर पुन्हा वर पाहीले गडद काळयानीळया ढगांनी भरून गेलेले आणि काळ्या गडद निळ्या रंगाच्या एकि छोट्या तुकड्यामागे सोनेरी गडद कीणार डोकवत होती.......... बसने हडपसरला प्रवेश केला नी पुन्हा मानवाच्या दुनियेत नाईलाजाणेच प्रवेश करावा लागला..
