Ashutosh Purohit

Abstract Inspirational

0.3  

Ashutosh Purohit

Abstract Inspirational

नात्यांचं मन *

नात्यांचं मन *

1 min
8.8K


          

पळतोय आपण फक्त.. सत्यापासून, जगापासून.. आज कोणाशीही काहीही मनातल बोलण करायचं झालं, तरी प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा व्हाट्सअप जवळ करतो आपण. एक बंद खोली आहे. त्यात ठासून भरलंय आपलं मन. त्या खोलीला एकच अरुंद फट आहे दरवाज्यापाशी. त्या फटीतून जे काही व्यक्त व्हायचं तेवढं व्हायचं.. वोट्सअपवर बोलताना हे अगदी असंच जाणवतं...

माणसांशी जेव्हा आपण समोरासमोर बसून बोलतो ना, तेव्हा त्या आपल्या बंद खोलीचं छतच फोडून मोकळं करून टाकतो आपलं अवकाश..

तो जो एक जडपणा आहे नं नात्यातला, तो त्रास द्यायला लागला की समजावं, आता हे नातं वेगळ्या पद्धतीनं हाताळण्याची गरज आहे.. नुसत्या वरवरच्या दिखाऊ प्रेमापेक्षा पेक्षा काहीतरी गहिरं घडत चाललंय.. आता बोलण्यापेक्षा अबोल्यानं समोरच्याला समजून घेणं आवश्यक आहे.. नात्याच्या याच पायरीवर फलंदाजी कशी करायची हे कळत नाही अनेकांना.. प्रत्येक चेंडूवर षटकार मारायची नसते.. किंबहुना मारुच शकत नाही आपण.. आजवर हसत खेळत असलेलं रंगीबेरंगी नातं अचानक अंतर्मुख होतं , आपल्यालाही अंतर्मुख करून जातं.. म्हणूनच कदाचित 'संसार' करण्यालासुद्धा कला म्हणत असावेत.. कारण इथं समोरून येणाऱ्या चेंडू ला आधी शांतपणे समजून घ्यायचं असतं आणि मग फलंदाजी असते.. सुरुवातीचे षटकार आणि चौकार यांचं आकर्षण आता संपलेलं असतं.. आता हवा असतो विचारी खेळ...! मग सगळे चेंडू वाया का जाईनात.. आपण मैदानावरवर तग धरून उभं राहणं महत्वाचं.. आपल्या साथीदारासाठी..!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract