उत्तरं तिथेच येऊन मिळतात
उत्तरं तिथेच येऊन मिळतात


कशीही सुरुवात केली तरी सगळी उत्तरं तिथेच येऊन मिळतात.
गर्दीच्या अथांग कोलाहलात स्वतःचा सूर ओळखण्याची धडपड करत असतो माणूस.
प्रत्येकाची पट्टीच वेगवेगळी असते खरंतर त्या गर्दीत.. तरीही प्रत्येक जण दुसऱ्याच्या सुरांशी साधर्म्य साधायला जातो आणि निराश होत बसतो...
"माझं" म्हणून या गर्दीपेक्षा वेगळं असं काहीतरी माझ्याकडे आहे, हे स्वतःसमोर देखील मान्य करायला का लाजतो माणूस..?
इतका का पगडा आहे आपल्यावर साच्यात जगणाऱ्या माणसांचा..?
आपल्यातल्या जाणिवांना, त्यांना हवं तसं बहरू देण्याऐवजी "त्या समाजाच्या ठोकताळ्यात बसतायत का ?" याचीच काळजी मरेपर्यंत करत राहतो माणूस...
काय कमावलंत तुम्ही शेवटी??
"Build your own dreams rather than just building a home" असं म्हणतात..
स्वप्नांनाही साच्यात बांधून त्यांचं सृजनच हिसकावून घेतलं आपण त्यांच्याकडून....!
कशी फुलणार-बहरणार ती स्वप्न, त्या जाणिवा..?
असो... खूप बोललो आज....
म्हणूनच नाटक लागतं मला...
इतकं भडभडून येत नाही मग....
कशीही सुरुवात केली तरी सगळी उत्तरं तिथेच येऊन मिळतात..... खरंच आहे....