विस्कळीत झालंय सगळं..
विस्कळीत झालंय सगळं..
विस्कळीत झालंय सगळं..
रडायचंय पण उन्मळून येत नाही.. बुद्धीला माहित्ये.. पण मन तिसरीकडे धावतं पटकन.. रडण्यासाठीसुद्धा concentration लागतं.. पटपट सोडून देतंय मन कुठलीही गोष्ट.. कशाचा लोभ नाही, दुःख नाही, मोह नाही की राग नाही... याला emotionless पणा म्हणायचं का? की sorted आयुष्य म्हणायचं?
मी फक्त पाहत राहतो तटस्थपणे आतल्या या खेळाकडे.. माझ्यावर आलटून पालटून अधिराज्य गाजवतं मन आणि बुद्धी.. सारखं मिळवायचंय काहीतरी दोघांनाही.. धावतायत दोघंही.. पण काय मिळवायचंय हे कोणालाच नक्की ठाऊक नाही.. पण स्थिरही कोणालाच थांबायचं नाही.. सारखं 'पुढे चला.. पुढे चला..'
पण पुढे म्हणजे कुठे चला...?
खूप साठा पडलाय खरंतर विचारांचा.. पण कोणत्याच विचाराला पूर्ण न्याय नाही देऊ शकत मी.. हा 'पुढे चला' मंत्र अस्वस्थता आणतो मग... कारण गवसत काहीच नाही त्यातून..! सिस्टम मध्ये हा व्हायरस शिरलाय.. चंचलता नावाचा.. किंवा 'असमाधानाचा'... एक लेखही पूर्ण होत नाही त्यामुळे नीट...
विस्कळीत झालंय सगळं...