इतक्यात तिच्या msg
इतक्यात तिच्या msg
ती- शी:... काय बातम्या असतात हल्ली पेपर मधे... सगळ्या एकदम निराशावादी.. जगणं खूप असुरक्षित आहे वगैरे असा depressing फील येतो त्यामुळे... Pch....
बाबा- म्हणून मी बालमित्र वाचतो...!! एकदम फ्रेश ! आनंदी ! निरागस ! खेळकर वातावरण !
ती- (हसत) अवघडे तुमचं....
बाबा- तुला एक गंमत सांगतो, मला नं खूप आधीपासून आवड आहे, हे असं बालमित्र, लहान मुलांच्या गोष्टी वगैरे वाचायची... तर आमचं लग्न ठरलं, आणि जेव्हा तुझ्या आईला हे कळलं ना, की मला हे असं सगळं वाचायला आवडतं, तेव्हा ती खूप चिडली होती... ती म्हणायची, अहो जरा बातम्या बघा... आजूबाजूच्या जगाचं भान येतं... वगैरे वगैरे....
पण
आता झाली सवय तिलाही...
ती- हो ? आई बोलली नव्हती मला हे कधी !!! पण एक मात्र आहे हा बाबा तुमच्या पिढीचं.. आपला जोडीदार कसाही असला तरी त्याच्याशी जुळवून घ्यायची capacity होती तुमच्यात.. म्हणजे, सवयी, आवडीनिवडी नाही जुळल्या, तरी त्या माणसाला आपलंसं करून घ्यायची ताकद होती तुमच्या पिढीत...
बाबा- तेव्हा पर्याय नव्हते फार आता एवढे... आता कसं, फेसबुक, whatsapp मुळं connectivity वाढल्ये, आणि आपल्या माणसाशी जरा पटेनासं झालं, की त्याच्याशी तोडून टाकण्याची सोय झाल्ये, नाही का !
ती - खरंय.....
इतक्यात तिच्या msg ची tune वाजते....
तो- Hii.... Ajun ragavlyes ka.....?