Ashutosh Purohit

Romance

0  

Ashutosh Purohit

Romance

तुझी भीती

तुझी भीती

1 min
1.9K


ती - .... तुला असं नाही वाटत, आपण फार पटपट पुढे चाललोय?

तो - हे विचारायला बोलावलंयस तू मला इथे?

ती- तू असं का बोलतोयस माझ्याशी ?

तो- मग मगापासून तू सारखं Negative च बोलत्येस..

ती- तसं नाहीये, तुला कळत नाहीये, माझं काय होतंय आत ते...

तो- ठीके ना, मला तुझ्या आत काय होतंय ते कळत नाहीये, आणि तुला मला ते विश्वासाने सांगायचं नाहीये... मग जाऊ दे ना ! राहिलं !

ती- असं प्रत्येक वेळी म्हटलं की झालं का ?

तो- मग तू बघ ना कशी वागत्येस ते.. चर्चगेट ला उतरल्यापासून इथे नरिमन ला येईपर्यंत काय बोलत्येस तू माझ्याशी..?

"आपण नक्की पुढे जाऊया ना? "

"आपल्याला सगळं जमणारे ना?"

"आपल्याला काही problem नाही ना येणार?"

"आपण योग्य निर्णय घेतोय ना ?"

काय चाललंय हे ? इतकी का भीती वाटत्ये तुला? आणि कसली वाटत्ये भीती इतकी ?

ती- खरं सांगू ?

तुझी.......

तुझी भीती वाटत्ये मला.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance