Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Ashutosh Purohit

Inspirational


2  

Ashutosh Purohit

Inspirational


Actually आत्ता कोणीच नकोय

Actually आत्ता कोणीच नकोय

2 mins 8.4K 2 mins 8.4K

Actually आत्ता कोणीच नकोय आजूबाजूला..

माणूस नावाचा प्राणी तर अजिबात नकोय.. निसर्ग चालेल एकवेळ.. त्याच्या अपेक्षा नसतात माझ्याकडून काहीच.. तो खरंच फक्त देत असतो.. आणि घ्यायचं असेल तर अगदी मोकळ्या मनाने, नागडे पणाने कसलाही आडपडदा न ठेवता माझ्याकडून काढून घेत असतो अनेक गोष्टी.. पण त्यात आत-बाहेर काही नाही.. सगळं पारदर्शक !

माणूस या गोष्टीचाच वीट आलाय आता मला.. त्याचे ते अपेक्षामय डोळे.. Ulterior Motives असणाऱ्या कृती.. नाहीतर संघर्षमय संवाद ! नकोय हे काहीच आता मला.. कंटाळा आला या सगळ्याचा... खरंच खूप खूप कंटाळा आला..

निरामय म्हणतात ना, तसं आयुष्य जगायचंय आता.. निसर्गासोबत राहायचंय.. किती साधा असतो तो.. सोप्पा असतो समजायला.. आणि मुख्य म्हणजे सरळ असतात त्याच्या सगळ्या कृती..

खरंच, माणूस का लांब जातो निसर्गापासून ? त्याच्या हव्यासापोटी किती आकर्षणं, किती भौतिक आकांक्षा अगदी अभिमानाने जपत असतो ! या सगळ्यातून finally काय हवं असतं त्याला ? Peace Of Mind च ना ? मग ते निसर्गजवळ, त्याच्या मूळ स्वरूपाजवळ भरपूर आहेच की ! मग का जातो माणूस त्याच्या खऱ्या आई-बापाला सोडून भलतीकडेच कुठेतरी ? काहीतरी नश्वर सुख मिळवण्यासाठी?

मी हा लेख लिहताना हा लिहणारा कर्सर कसा लुकलुकतोय ना, एकेक अक्षर लिहून झाल्यावर...

अगदी तसंच वाटतं, स्वार्थी माणसांशी बोलताना.. सतत अपेक्षा.. आणखीन काहीतरी त्यांना आपण देऊ याची... जशी या कर्सर ला आहे, मी आणखीन काहीतरी लिहीन याची...!!

पण आज आता खरंच थांबतो..

जरा स्वस्थ बसून माझ्यातला निसर्ग, माझं अंतर्मन, माझं मूळ स्वरूप शोधून बघतो..

तुम्हीही पहा !

निरामय आनंद गवसेल !


Rate this content
Log in

More marathi story from Ashutosh Purohit

Similar marathi story from Inspirational