Ashutosh Purohit

Others

1  

Ashutosh Purohit

Others

जिव्हाळ्याचा विषय

जिव्हाळ्याचा विषय

1 min
3.1K


एकूणच डायरी हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय...

त्यातली काही पानं खूप खास असतात आपल्यासाठी...

माझी रोजची डायरी लिहायला घेण्याआधी असंच एक खास पान उघडून वाचतो मी..

कोणतीही खूण घालून न ठेवता किंवा पान दुमडून न ठेवताही रोज बरोबर, तेच पान सुरुवातीला उघडलं जातं माझ्याकडून...

आणि रोज त्या पानावरचा मजकूर वाचण्याची तेवढीच तीव्र इच्छा असते हे त्याहून विशेष..

रोजचं पान लिहायला उत्साह मिळतो, त्या एका पानामुळे...

कधी लिहलं गेलं होतं हे पान..?

तारीख वारही आठवत नाही धड...

डायरीच्या अनुक्रमणिकेत त्या पानाची नोंद केली नाहीये मी...

मुद्दामच नाही केली...

अनुक्रमणिका वाचताना इतर सगळी पानं recognize होतात लोकांना...

ते एकंच असं आहे, जे अचानक येतं..

खिळवून ठेवतं...

आणि कायम साथ देतं....

मात्र डायरीच्या शेवटी त्या पानाची नोंद केल्ये मी अगदी आठवणीने, पान क्रमांकासहीत...

जेव्हा केव्हा मी ही डायरी सुरुवातीपासून वाचायला काढीन, तेव्हा नजरचुकीने राहिलं असेल ते पान वाचायचं, तर शेवटचं पान वाचून लक्षात येईल म्हणून लिहलंय...

तुमच्याही आयुष्यात कधीतरी असं एक पान येऊन गेलं असेलच ना...?

काय म्हणता..?


Rate this content
Log in