'आपली आपली'
'आपली आपली'


ग्रांट रोड गेलं, मुंबई सेंट्रल गेलं आणि दादर स्टेशन आलं...
जरा गर्दीचा आभास निर्माण करतील इतकीच माणसं आत शिरली..
"काय लागतं एका माणसाला जगायला...?"
तिच्या डोक्यात विचार चालूच होते...
"अन्न, पाणी, आरोग्य, राहायला घर, बरा जॉब... मग नाती कशाला निर्माण करतो माणूस..? आणि मग दुःखी होत बसतो उगाचच... कारण नाती आली म्हणजे गुंतवणूक आली... गुंतवणूक आली की अपेक्षा आल्या... आणि अपेक्षा आल्या की साहजिकच......... असो...
त्याने तरी वेगळं काय केलं...?
'आपली आपली' म्हणवणारी माणसं सुद्धा असं वागतात, तिथं परक्यांची काय बात...! असो !"
तिनं शांतपणे मोबाईल काढून Whatsapp चाळायला सुरुवात केली........