STORYMIRROR

komal Dagade.

Abstract Classics Inspirational

3  

komal Dagade.

Abstract Classics Inspirational

मुलं वयात येताना

मुलं वयात येताना

5 mins
204

      "मुलं वयात येताना भावनिक त्याबरोबर शारीरिक बदल घडत असतं. कधी कधी मुलांमध्ये खूप राग येणे, कधी खूप उदास वाटणे,अचानक एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण, त्यामुळे मुलांना आपलेपणाची जाणीव करून देऊन त्यांच्याशी हितगुज साधने खूप गरजेचे असणे. कारण या वयात मुलांना आईवडिलांचं मत शकतो पटत नसते. त्यामुळे आईवडिलांनी त्यांना मित्र मैत्रीण बनून त्यांना समजावून सांगणे गरजेचे असते. या वयात एखादी वाईट घटना त्याच्यासोबत घडली त्या बालमनावर आयुष्यभर त्या आठवणीचा ठसा उमटतो.


            "सावी आवरलं का तूझं शाळेला जायचं नाही का...? उठ पटकन...! आईच्या आवाजाने सावी चटकन उठली आणि आवरायला पळाली.


"काय चालय या मुलीचं उशिर पर्यंत मोबाईल बघत बसायचं आणि हा असा कॉलेजला जायला उशीर करायचा, "रमा तिची आई म्हणाली.


"अग सकाळी सकाळी तू चिडतेस कशाला..?" उमेश सावीचे बाबा तिच्या आईला म्हणाले.


"तोपर्यंत सावी आवरून आली, ब्रेकफास्ट ठेवलेला तो ही न खाताच गेली.


"हे बघा नाष्टा ही या पोरीनं केला नाही. "अग जाऊदे खाईल काहीतरी कँटीन मध्ये काळजी नको करुस, उमेश म्हणाला.


दहावीमध्ये शिकत असणारी सावी खूप शांत, साधी राहणीमान.नुकतीच वयात आलेली कुमारी,दिसायला सुंदर, शांत, लाघवी स्वभावाची.


नववीमध्ये पहिला क्रमांक मिळवला म्हणून बाबांनी मोबाईल घेऊन दिला.


रमा, "मोबाईल घेऊन दिल्यापासून पोरीची सगळीच चिन्ह बदललेली आहेत .


रमा,"तरी मी तुम्हांला सांगत होते मोबाईल घेऊ नका,पण ऐकलं तर खरं. पोरीचं आहे जेवणावर, अभ्यासावर लक्ष सारखं चालूच असतं व्हाटअप, फेसबुक नवीन काय ते नवीन फ्याड ..!!


"अग चिडू नकोस...! "मी बघतो तिच्याकडे संध्यकाळी मी बोलतो तिच्याशी. असं म्हणून उमेश कामावर गेला.


रमा स्वयंपाक उरकून घर आवरत होती. कपड्याच्या घड्या नीट करून सावीच कपाट आवरू लागली. सगळं कपाट अस्ताव्यस्त पडलं होत. कपडे अक्षरशः चिद्या कोंबल्या सारख्या कोंबल्या होत्या. रमा तर वैतागलीच...!" काय हे कपाट असं, सावी आतापर्यंत अशी वागली नव्हती. नीटनेटकेपणा तिला आवडतो. लक्ष कुठे आहे तीच आजकाल काय माहित....?


कपाट आवरताना रमाला सावीच्या कपाटातून चिट्टी सापडली.


  रमाला तिच्या कपाटात चिट्ठी सापडली.राजची चिठी होती . कारण त्या चिठिवर तसा त्याचा उल्लेखही होतं. ते पाहून रमाला अक्षरशः राग डोक्यात गेला. "काय मुलांच वय हे काय चालंय.."

    

     तिने नवऱ्याला लगेच कॉल करून सांगितलं आणि रागानेच म्हणाली.तरी मी म्हणत होते कीं हिला मोबाईल देऊ नका पण तुम्ही ऐकलत का माझं...? काय त्याचा दुष्परिणाम झालाय पाहताय ना...?


"अग तू किती रागावतेस...!"अग हे वय असतं नाही कळत मुलांना, एका प्रकारचं आकर्षण हे बघ तू शांत हो मी बघतो आल्यावर. तू काही झालय दाखवू नकोस, नाहीतर ती सगळ्या गोष्टी लपवून ठेवेल तिला तुझी गरज आहे. एक मैत्रीण म्हूणन समजावून सांग. ती नक्कीच ऐकेल मला माहितेय सावी समजून घेईल. तिच्या शाळेतही बोलावलं आहे, तिच्या मॅडमचा कॉल आला होता.जाऊन येईन मी वेळ मिळाला कीं....!"


रमा,"हा तिच्या शाळेत जाऊन या. आणि तुम्ही म्हणताय तसं करेन. नाही रागवत तिच्यावर तुम्ही आल्यावर बोलू तिच्याशी दोघं.


मी फोन ठेवते. आल्यावर बोलू.


रमाने कॉल ठेवला. आहे तसं कपाट तीच ठेवलं. जेणेकरून तिला सगळं कळलंय हे तिला दाखवायचं नव्हतं.


"संध्याकाळी सावी आली. रमाने तिच्या आवडीची पावभाजी आणि गुलाबजाम बनवले होते.


रमा," सावी आलीस तू...? चहा देऊ कीं कॉफी.


सावी, आई मला कॉफी दे.


रमा, "आज कसा दिवस गेला बाळा..?


सावी,"आई खूप छान गेला...!


बोलतानाही सावीच्या हातात मोबाईल होता. तो पाहत ती आईशी गप्पा मारत होती.


तोपर्यंत सावीचे बाबाही घरी आले.


बाबा,"सावी कधी आलीस तू..?


 सावी,आताच आले बाबा..!


उमेश फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर बसले.


बाबा, सावी अभ्यास कसा चालाय...?


सावी, छान चालाय बाबा..


रमा, "सावी आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. चल आज गप्पा मारूया.

आधी फोन ठेव हातातून.


सावी, ok


रमा,  लहानपणी सावी सावी करता करता अगदी दमून जायचे. एवढीशी सावी मोठी झालीय दोघांनाही कळलंच नाही ग...!


तू जे म्हणशील ते आम्ही देत असे. एकुलती एक म्हणून खूप लाडाकोडात वाढवलं तुला. आज अशा गोष्टी लक्षात आल्या कीं,ज्यामुळे तुझ्याशी बोलतोय. हा खूप महत्वाचा तुझ्या आयुष्यातील टप्पा आहे असं वाटलं.ज्यात काही वेळा आईबाबा चुकीचे वाटतात. तुला एक सांगतो सावी.आज आम्ही आईबाबा नाही तर तुझे मित्र मैत्रीण आहोत.


रमा बोलू लागली,बाळा हे वय खूप नाजूक असतं. ह्यात काही चुका झाल्या तर आयुष्य खराब होऊ शकतं. यात आपल्याला बाह्य जग खूप सुंदर दिसत, पण त्याचं भयंकर रूपही आहे. ह्या वयात कोणीतरी आवडणे, कोणाविषयी प्रेम वाटणं पण ते असतं एक आकर्षण पण त्या प्रेमाला आकर्षणाला अंत नाही. आयुष्य भुलवणारं प्रेम.त्याचा खड्डा पार करणच गरजेचे आहे. कारण त्या खड्यात पडलो तर ध्येयाला मुकलो. या मार्गात जे अडकलं जातात ना त्याचं आयुष्य फसतं. या अडथळायला पार करणं गरजेचे आहे.


"तुला काय व्हायचं आहे सावी... बाबांनी विचारलं


"मला डॉक्टर होईच आहे बाबा,"सावी म्हणाली.


सावी तुझा निकालाविषयी बोलण्याकरिता तुझ्या मॅडम ने शाळेत बोलावलं होत. तुझा निकाल पाहून मला धक्काचं बसला सावी...!

पहिला नंबर काढणारी सावी आज काटावर पास झाली. सावी काय झालं काय कारण आहे...? "तुला वाटय का हे मार्क असेच राहिले तर तू डॉक्टर होशील...? तुला ऍडमिशन मिळेल का या गुणवत्तेवर भविष्यात...?


सावी रडू लागली आईबाबा मी चुकले. सावीने कपाटातून चिट्टी आणून दाखवली. आईबाबा मला राज आवडतो.


रमा, बाळा पण या गोष्टीला अंत आहे का...?


रमा,आवडतो तर पुढं काय...?


सावी, माहित नाही.


रमा, बाळा हे आकर्षण असतं या वयात यातून सगळे जातात. हे वय खूप लहान आहे ग सावी.यात अडकायचं नाही बाळा . पुढं आयुष्य पडलंय तुझ्या.असं भरकटू देऊ नकोस बाळा.तुमचं वय काय बाळा..! हा मार्ग निवडलास तर ध्येयाला मुकावं लागेल.


बाबा, यातून सावी तुला बाहेर पडावंच लागेल. ह्यात सावधान सतर्क राहून प्रवास करणं गरजेचे आहे.


सावी, आईबाबा मी खूप चुकीचे वागले. शाळेतील इतर मुलींना बघून त्याच्या सारखं अनुकरण करत होते मी पण मला तुम्ही माफ करा. मी यातून लवकर बाहेर येईन. बोर्ड परीक्षेत चांगले मार्क मिळवीन. तुम्ही आहात ना माझ्या सोबत...!


रमा ,सावीचा हात हातात घेत,"बाळा आम्ही नेहमी तुझ्या सोबत असू. तू काळजी करू नकोस.


"बाबा सावीच्या डोक्यावरून हात फिरवत. बाळा तुला जीवनात कसलाही अडथळा येऊ दे. आईबाबा तुझ्यासोबत आहेत.


साविला आज मनमोकळ्या गप्पांनी तीही मनातलं सगळं सांगून मोकळी झाली होती. तिलाही खूप हलक झाल्यासारखं वाटत होत. तिच्या आईबाबाना पण समजलं काम तर रोजचच पण मुलांना वेळ देणं, मनमोकळ्या गप्पा मारणही किती महत्वाचं आहे.


   मुलं वयात येताना, त्यांची राग राग चिडचिड होत असंते. शरीरातील हार्मोनल बदल, त्यामुळे मूड ही बदलत असतो. पण त्यावेळी मुलांना विश्वासात घेऊन त्यांना बोलत केल पाहिजे. त्या काळात आईबाबा मुलांचे मित्र होऊन त्यांचे शंकाचे निरसन केले पाहिजे. जर या वयात त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं तर त्यांचं आयुष्य भरकटल जात.


समाप्त....


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract