लग्न :एक प्रवास
लग्न :एक प्रवास
लग्न म्हणजे एक आयुष्यातील असा क्षण ज्यात मुलाचे आणि मुलीचे आयुष्य बदलून जाते. त्यामुळे तो क्षण घरातील सदस्य एक विस्मयकारक करण्याचा प्रयत्न करतात. पूर्वी लग्न ही कमी वयात होयची. खर्चही मर्यादित करायचे. काही ठिकाणी आर्थिकदृष्ट्या विचार करून देवळातही होईच. सध्याच्या काळात लग्ननंतर पोस्ट वेडडींग, प्रीवेडिंग अशा बऱ्याच नवीन संकल्पना आल्या आहेत. हौशी मंडळी, ज्यांच्याकडे पैशाची कमतरता नाही ते याचा पुरेपूर वापर करतात. माझ्या दृष्टीने हे पैसे असे एका दिवसात घालवण्यापेक्षा त्याचा वापर गरजूवंताना केले तर त्या पैशाचा वापर योग्य होईल. शुभआशीर्वाद ही नवरा- नवरीला नवीन आयुष्य सुरु करताना मिळेल. पण ज्याची त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते.
कोरोनाने खूप काही शिकवले. कोरोनाच्या काळात लग्न मोजक्या जेमतेम पन्नास लोकात होत होते. कसलीही वाद्य घोघांवाट, कोणतीही अतिरिक्त अमाप पैसे खर्च करता अगदी साध्या पद्धतीने लग्न झाले. कोरोनाने शिकवण दिली लग्न मोजक्या पैशात होऊ शकते. त्यामुळे मुलीच्या वडिलांच्या डोक्यावर कसलाही कर्जाचा भार आला नाही. कसलही ताण न घेता थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने लग्न पार पडले.
ही कथा आहे मीरा आणि विजयची. जिने प्रेमविवाह केला घरच्यांच्या विरोधात जाऊन. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस चांगले होते. मात्र जस परिस्थिती सुधारली. पैसा संपत्ती आली . तशी नवऱ्याची मनोवृत्ती पूर्ण बदलली. त्याला स्त्री म्हणजे पायपुसणं पुसनं वाटू लागलं.
मीरा विजयच्या संसार वेलीवर दोन कळ्या उमलल्या होत्या. त्यातील थोरल्या मुलीचं संजना, दुसरीच शिला. दोघी वयात आल्यावर दोघींचं लग्न एकाच मांडवात जगाला दाखवण्यासाठी व कमवलेला पैसा खर्च करण्यासाठी हे लग्न त्याला राजेशाही थाटात करायचं होत. विजय आज खूप खुश होता. दोन वयात आलेल्या मुलींचा बाबा फक्त म्हणायला पण मुली जन्माला आल्या, म्हणून त्याने कधीच मायेने जवळ घेतले नाही का प्रेमाने विचारले नाही .
विजयच लग्न लव्हमॅरेज झालं होत. तेही घरच्यांच्या विरोधात जाऊन दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. त्याची अर्धांगिनी मीरा. तिच्या पावलांनी विजयच्या आयुष्यात भरभराट झाली, मात्र जसा पैसा जास्त आला तसा विजयला माज ही आला. घरातील लक्ष्मीवर अन्याय चालू झाला.दोघांमध्ये कुरबुरीत वाढत चालल्या होत्या . त्याचं रूपांतर भांडणात होऊ लागल. आता तर मीराला तो मारुही लागला. तिला कोणाचाही आधार नसल्याचं लक्षात आले आणि त्यावरून त्याचा हिंसक वृतीत वाढत चालली होती.छोट्या छोट्या गोष्टीवरून त्याच्यात भांडणे होऊ लागली . कधी जेवणातील काही कमी,तर कधी घरातील अस्वच्छता. तर कधी संशयी वृत्तीमुळे चामड्याच्या पट्याने ने मारत.
मीराला माहेरकडील रस्ता बंद झाल्याने गपचूप सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. तिच्या पोटी जुळ्यां मुलीचा जन्म झाला. तिला वाटले विजय आतातरी सुधारेल पण तसं झालं नाही,तर तो मुली झाल्या म्हणून जास्तच हाणमार करू लागला. शारीरिक मानसिक त्रासाने कंटाळलेल्या मीराने एक दिवस न राहवून मीराने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. दोन मुलींना सोडून ती त्याच्या जाचातुन मुक्त झाली.
संजना,शिला दोघी हुशार मुली पण वडील त्यांच्यासाठी रावणाचच रुप होते. त्यामुळे दोघी खूप बाबांना भिऊन राहत. लहानपनापासून आईवर झालेला जाच, अत्याचार त्यांनी पाहिला होता. ते त्यांच्या मनावर पूर्ण बिंबले होते. बाबा घरी येताच शांत बसत. त्याच्याशी बोलण्याचा कधी प्रयत्न ही त्या करत नव्हत्या. त्या दोघींच्या कोणीही मित्र मैत्रिणी नव्हत्या. चार भिंतीत राहून आयुष्य जगत. दहावी पर्यंत शाळा झाली कीं मुलींना शाळा सोडायला लावली.
बाबांच्या भीतीच्या सावलीत दोघी वाढत होत्या. प्रत्येक गोष्टीत मन मारून जगत होत्या. शिकण्याची दोघींची इच्छा शिक्षण ही त्यांनी दोघींचं जेमतेमच केलं,कारण मुली म्हणजे परक्याचं धन म्हणून. दोघीही हुशार होत्या. बाबांसमोर तोंडाला कुलूप घालत. बाबांसमोर बोलण्याची हिंमत त्यांनी कधी केली नाही कारण खुंटीवर टांगलेला पट्टा कधीही आपल्यावर पडेल याची भीती दोघींना वाटत.
संजना,शिला वयात आल्यावर त्यांचं लग्न शेतकरी कुटुंबात लावून देईच तिच्या वडिलांनी ठरवलं . दोघींना स्थळं पाहायला सुरुवात केली. मुलींचं मत काय आहे, हे तिच्या बाबांनी जाणूनही घेतल नाही. शरद संजनाच्या नवऱ्याच नाव तर शिलाच्या नवऱ्याचं नाव सागर . दोघीच लग्न अगदी नव्या पद्धतीने करायचं ठरवलं.त्यासाठी त्यांच्या बाबांनी खूप खर्च केला होता.साड्या,लागणारे मेकअपचे सामान, ड्रेस यात कसलीही कमतरता नव्हती. निसर्गरम्य ठिकाणी त्यांचे छान शूट झाले. विजय खूप खर्च करत होता पण संजना, शिला मनातून अजिबात खुश नव्हत्या.कारण त्यांची अवस्था एका कठपुतली सारखी झाली होती.लग्न ठरले तरी दोघींना लग्नाआधी नवऱ्याशी बोलायला परवानगी नव्हती.
लग्नाचा दिवस उजाडला. दोघींचं लग्न एका भव्य दिव्य हौल मध्ये लग्न ठेवण्यात आल होत. विजय मुलींसाठी वारेमाप खर्च करत होता. जेवणाचे मेनू, नाश्त्याचे मेनू पाणीपुरी पासून, डिसर्ट, आईस्क्रीम, विविध नानाप्रकारचे जेवण ठेवण्यात आल होत. हॉलच डेकोरेशन फुलं आणि विविध लाईटने केल होत. नवरीच्या साड्या, शालू पाहून सगळीकडे चर्चा सुरु होती. संजनाला ,शिलाला वधू वेशात पाहून लोकांच्या नजरा हटत नव्हत्या. अस भव्यदिव्य लग्न पाहून काहीजणांची दातखिळी बसली,पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. विजयला तर मुलीचं काहीच पडलं नव्हतं, पण चारचौघात मोठेपणाचा देखावा करायचा होता.
लग्न विधीनुसार संपन्न झाले. संजना, शिला यांची बाबांना निरोप देण्याची वेळ आली. संजना, शिलाला सोडून जायचं दुःख जाणवत नव्हतं. उलट त्यांच्या बाबांच्या जाचातुन मुक्त झाल्याचं आनंद वाटत होता.त्या दोघी बाबांच्या म्हणजे विजयच्या पाया पडायला गेल्या आणि त्याच्या कानात संजना म्हणाली, बाबा आज तुम्ही आमच्यासाठी पहिल्यांदाच खूप केलं पण तेही लोकांना दाखवायला पण त्याएवजी तुमच्याकडून तुमच्या पोटच्या मुली म्हणून आम्हाला प्रेम, आपुलकी, माया मिळाली असती ना,तर आम्ही आज आमच्या बरोबर घेऊन गेलो असतो . आईशिवाय आम्ही पोरके झालो पण आज लग्न करून जाताना अनाथ ही झालो . दोघीही रडू लागल्या . कधीही तोंड न उघडणाऱ्या संजना एवढी बोलली. कारण ती ते घर सोडून चालली होती कायमची...!
विजयच्या डोळ्यातून खरे अश्रू निघत होते. त्याची काय चूक झाली हे त्याला वेळ निघून गेल्यावर समजले.आज त्याच्या आयुष्यात सगळं काही होत पण शेवटी तो एकटाच आयुष्य जगणार होता.
लग्नाच्या पद्धती जरी बदलत असल्या तरी काही ठिकाणी स्त्रीबद्दल असणाऱ्या मानसिकता त्याच आहेत.
कथा काल्पनिक आहे आवडल्यास लाईक करा. फॉल्लो करायला विसरू नका.
समाप्त.
