ती एक रात्र... भयकथा
ती एक रात्र... भयकथा
“पुन्हा एकदा त्याच मार्गावर भयंकर अपघातात चार जण दगावले होते,आणि एक जण गंभीर जखमी झाला. रात्रीच्या अंधारी काळोखात लाल दिव्याची टिम टीम करत कर्कश आवाजात अम्बुलंसची गाडी भरधाव वेगाने धावत होती. पुढे येताच केके हॉस्पिटलच्या परिसरात क्षणात भयावह वातावरण तयार झाल. हॉस्पिटलमधील स्टाफची जखमी झालेल्या रुग्णाला पाहून धांदल उडाली. कारण जखमी झालेल्या रुग्णाची परिस्तिथी फारच भयानक झाली होती. डोक्याला प्रचंड मार बसला होता.काही ठिकाणी कोच पडलेल्या भागातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. तज्ञ डॉक्टर राघव यांना तातडीने बोलावण्यात आलं. डॉक्टर राघव नामांकित गाजलेले डॉक्टर अशा कितीतरी रुग्ण त्यांनी पाहिले ,आणि बरी केली होती. पण आज आलेल्या रुग्णाची फारच भयानक परिस्तिथी होती.ते पाहून तेही अस्वस्थ झाले. रुग्णाला पाहून त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत त्याच्यावर उपचार त्यांनी सुरु केले. आलेल्या रुग्णाची फक्त श्वासाची धगधग सुरु होती.बाकी शरीर निपचित पडले होते. दुखापतीने चेहऱ्यावर शरीरावर सूज आल्याने रुग्णाचे भयंकर रूप दिसत होते. डॉक्टरांना त्या रुग्णाला पाहुन त्याची जगण्याची इच्छा दिसत होती. कारण तो उपचाराला चांगला प्रतिसाद देत होता.डॉक्टर राघव त्याला चेक करून काही मेडीसीन आणि सलाईन नर्सला देइला सांगितली ,आणि ते आपल्या केबिनमध्ये जाऊन बसले. त्या रुग्णाची अवस्था पाहून त्याचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता. नेहमी सकारात्मक विचार करणारा राघव आज घाबरला होता. मी तुला वाचवेन अस आश्वासन ते त्याला देऊन आले पण त्याची परिस्तिथी खूप नाजूक वाटत होती. सोलटलेला चेहरा डोक्याला लागलेला मार त्यातून वाहणारे रक्त .गंभीर जखमी झालेले हात पाय राघवने डोळे मिटून घेऊन शांत बसला. दिवसभर पेशंट पाहून राघवला खूप थकवा आला होता. त्याच्या मनाने घरी जाण्याचा विचार केला . स्टाफला कळवून त्याने त्याची गाडी काढली आणि भरधाव वेगाने निघाला. मागून येणाऱ्या आवाजाचा त्याने कानोसाही घेतला नाही. पहारेकरी ओरडून सांगत होता, साहेब त्या दिशेने जाऊ नका त्याच रस्त्याने अपघात झाला आहे. राघव त्याच्याच विचाराच्या तंद्रीत असल्याने तो निघून गेला. गाडी हेडलाईटच्या प्रकाशात चालू होती.आमावस्या असल्याने रस्ता पूर्ण गहेर्या काळोखाने भरला होता. सामसूम रस्त्यावर कोणीही दिसत नव्हते. अचानक राघवचा फोन वाजला.त्याच्या बायकोचा कॉल होता.
‘अरे किती उशीर वाट बघतेय तुझी ...? किती उशीर झालाय बघितलास का...? त्यात अमाव्स्याची रात्र लवकर तरी निघायचे ना राघव...?
येतोय मी रस्त्यात आहे, घरी आल्यावर बोलू...!
कॉल कट करून राघव गाडी चालवू लागला.
अंधारात पुसटशी आकृती दिसत होती. एवढ्या अंधारात कोण आहे हा..? राघव मनाशी बोलू लागला. तेवढ्यात काचेवर कोणीतरी धाड्कन थाप टाकली. राघवने पुढे पाहिले तर त्याची वाचाच बसली.कारण तोच तो रुग्ण ज्याच्यावर राघवने उपचार केले. खोल गेलेले डोळे, पांढरा पडलेला चेहरा, चेहरा सोलाटून त्यावर गळणारे मास, डोक्यातून वाहणार रक्त पाहून क्षणात राघवने डोळे झाकले , डोळे उघडून पाहतोय तर काय ते दृश्य नाहीस झाल होत . राघव डोळे चोळत म्हणाला मला हे होतंय तरी काय...? घाम रुमालाने पुसत राघवने गाडी सुरु केली . हॉस्पिटलमधून फोन आला,”आता आलेला रुग्ण दगावल. राघवला धक्यावर धक्के बसत होते. राघवला पहिल्यांदाच अंधाराची भीती वाटत होती . गाडी भरधाव वेगाने सुरु होती. थंडगार वारा वाहत होता. पानाची सळसळ सुरु होती. थोडासाही आवाज राघवच्या मनाचा थरकाप उडवत होते. पुढे कोणी माणूस दोन्ही हात हलवून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होता.
इतक्या रात्री हा कोण?,आणि काय करतोय इथे...? राघवला मनाशीच प्रश्न पडला.
राघवने गाडी थांबवली.मला पुढील गावात सोडताल का..?तो माणूस म्हणाला.
एवढ्या रात्री कशाला जायचय तुम्हाला ...?बारा वाजून गेलेत,”राघव म्हणाला .
गावात मैत झालंय त्यामुळे जायचय.राघवच लक्ष आरशात गेल तर तो माणूस दिसतच नव्हता.राघवच आरशात दिसत होता. राघव थरथर कापू लागला.
गाडीच दार लावायला गेला तर त्या माणसाचे उलटे पाय राघवने बघितले. दार बंद करून गाडी सुसाट रस्त्यावरून घेतली.मागे तो माणूस जोरजोरात ओरडत होता. आता वाचलास पण तुझ मरण पक्क आहे ध्यानात ठेव. त्याच जोरात हसन पाहून राघवने आरशातून मागे पाहिले तर तो माणूस त्याच्या अक्राळविक्राळ रुपात बाहेर आला होता. राघवच तर हृदय बंद पडतंय काय अस त्याला वाटत होत.इतका भीतीने त्याचा थरकाप उडाला होता.आज झालेला अपघात याच रस्त्यावर झाल्याच राघवच्या लक्षात आलं. थोड्या अंतरावर चार जण मयत नेत होते. तिरडीवर कोणीच दिसत नव्हत.एक जण त्या सगळ्यांच्या पुढे दिसत होता.आणि तो माणूस हॉस्पिटलमध्ये मरण पावलेला रुग्ण होता. त्याने राघवालाही गाडीतून बाहेर काढून तिरडीवर झोपवले ,राघवला काहीच कळाले नाही हे काय चालय...? मला का नेत आहेत. राघवने बाजूला पाहिले तर ,त्याच्या गाडीत त्याचा देह रक्तबभाळ होऊन निपचित पडला होता. आता समजल का तुला प्रेत कोणाच नेणार आहे ते..? या रस्त्याने जो जातो तो घरी कधी जिवंत जात नाही. तुझ्या देहाने तर तुला कधीच सोडून दिलंय.
आज पुन्हा एक गाडी भरधाव वेगाने जात होती. सहा जण त्यावर लक्ष ठेऊन होते. त्यात राघव ही त्याच्या भक्षाची आतुरतेने वाट बघत होता.
....... समाप्त......

