भयानरात्र...भयकथा
भयानरात्र...भयकथा
थंडीचे दिवस होते. वाटवातावरणात चांगलाच गारवा जाणवत होता.दिवस लहान झाल्याने सध्याकाली लवकरच काळोख दाटत आला होता.सहा वाजले होतें. ऑफिसमध्ये चहाचे घोट घेत रीया काम उरकण्याचा प्रयत्न करत होती. रीयाचा बॉस सुमित खूप खडूस होता.नेहमीच्या बॉसच्या खडूस स्वभावाला रीया घाबरूनच राहत असे. आज काम उरकले नाही तर, उद्या पुन्हा कामाचा लोड येणार. आज उशीर झाला तरी चालेल रियाने काम पूर्ण करूनच घरी जायचं ठरवलं.
रियाने खिडकीतून बाहेर पाहिलं तर,चिमण्या आपल्या घरट्यात परतत होत्या. अंधार पडायला सुरवात झाली होती. वातावरणात गारवा जाणवत होता. लक्ष हटवत रीया पुन्हा कामाला लागली.काम उरकून फेरीवाले, भाजीवाले, आपल्या मार्गाने घरी परतत होते.
ती मनातूनच पुटपुटत होती. आज काही खरं नाही माझं. देवच वाचवेल मला आता. चेहरा रडकुंडी करत तिने काम आटपण्याचा खटाटोप केला.
आठ वाजत आले होतें. आज दहा वाजणार असा अंदाज रियाने मनाशी बांधलाच. ऑफिस मधील बाकीचे एम्प्लॉयी निघून गेले होतें. दहाच्या सुमारास तिचा बॉस सुमित बाहेर आला.
सुमित, "मिस रिया तुम्ही अजून गेला नाहीत. उशीर झाला आहे खूप. घड्याळ्यात पहिलं नाही का तुम्ही...?
रीया,"सर ते मी आय मिन माझं काम थोडंसं बाकी आहे. ते झाले की मी जाईन.
सुमित,"नक्की ना...!नाहीतर मी माझ्या कार ने तुम्हाला घरी सोडतो.
रीया, इट्स ओके सर," मी जाईन माझं काम झाल्यावर डोन्टवरी.
सुमित, ओके चला तर मी निघतो.
ओके सर म्हणून रीया पुन्हा कामाला लागली.
"अकरा वाजता रियाच काम आवरलं.तिने पटकन तिचं सामान भरून पर्स उचलली. उबदार जॅकेट घालून ती निघाली.
रस्ता सामसूम होता. एकही वाहन दिसत नव्हतं, कीं चिटपाखरू नजरेस पडत नव्हतं.शेवटी तिने चालत जाण्याचं ठरवले. काळोखात रस्त्यावरच्या मिनमिनत्या लाईटमध्ये ती त्या भीतीदायक रोड पाहून पाऊले तिची झपझप पडत होती. रस्ता मात्र संपत नव्हता. रस्त्यावर मिनमिनत्या लाईट सोबत करत होत्या . त्याच्या प्रकाशात सगळं अंधुक दिसतं होत.
चालता चालता तिने घडाळ्यात पाहिले तर पाऊणे बारा वाजले होतें. एवढा उशीर पाहून तिच्या अंगावर सरकन काटा आला. मनात भीतीच काहूर माजल होत. ह्या रस्तावरील तिने खूप भीतीदायक घटना ऐकल्या होत्या. तिचा फोन स्वीच ऑफ होत आला होता.
ती तिच्याच तंद्रीत चालत होती. पुढे रस्त्यावरील काही लाईट गेल्या होत्या. तिला कोणीतरी तिच्याबरोबर चालण्याचा आवाज येऊ लागला.थंडीने हात गार पडले होते. ती हाताचे तळवे घासून उबदार करण्याच प्रयत्न करत होती.ती चालत होती पण तिच्या पाऊलांबरोबर कोणाची तरी पाऊल पडत असल्याचे तिला जाणवले. तिने त्याकडे दुर्लक्ष करत तिच्या पाऊलांचा वेग वाढला. त्याही पाऊलांचा वेग वाढल्याच तीला जाणवलं. तिने मागे पाहिले अंधारात तिला काहीच दिसतं नव्हते. तो आवाज बंद झाला.
पुन्हा ती झपझप पाऊले टाकत चालू लागली. पुन्हा तो आवाज तिला खूपच जवळ जाणवला. तो आवाज तिच्या जवळ आल्याचं पाहून ती खूप घाबरली. अंधारात या कड्याकाच्या थंडीत तिला घाम फुटला. हा वेगळाच प्रकार असल्याचे तिला जाणवले.
तिने शांतपणे विचार केला. तिला बाप्पाचे लॉकेट पर्समधील आठवले.तिने पटकन गणपती बाप्पाचे लॉकेट पर्स मधून बाहेर काढले. त्यातील बाप्पाचा फोटो पाहून तिने मंत्र म्हणायला सुरुवात केली, आणि स्वतःच्या पाऊलांचा वेग वाढवला तसा तो आवाज पुसट होऊ लागला. तरी तीने मंत्रौपचार म्हणायचे थांबवले नव्हते.
बाप्पाला आठवत ती मेन रोडवर कधी आली तिला समजलंच नाही. तिथं आल्यावर एक कारवाला म्हणाला, " बहीणजी कहा जाना हे आपको ..? तिला तो देवासारखाच धावून आल्यासारखा वाटला.तिने घराचा ऍड्रेस सांगितला. कार घराच्या दिशेने धावू लागली.
तिने कारच्या खिडकीतून मागे पाहिले तर,एक अमानवी चेहरा तिच्याकडे बघून अक्राळविक्राळ हसत होता.डोळे त्याचे रक्ताळलेले,चेहरा निस्तेज,सुळे बाहेर आलेले,हातापायांची नखें धारदार, तो भक्ष्याच्या शोधात बाहेर पडलेला. तो मोठयाने बोलला आज वाचलीस पुन्हा सापडशील.... हा हा हा...हसत होता.
तिने पटकन खिडकीच्या काचा लावून घेतल्या. ती खूप घाबरली.
बहीणजी घबराणा मत मै हू आपके साथ...!इस रास्ते फिर कभी आणा मत.... ये खतरनाक जगा हे.
ड्राइव्हरच्या रूपात देवच तिच्या हाकेला धावून आला होता.यापुढे रात्रीचा प्रवास टाळायचा.तिने आज मनोमन ठरवले.
***********समाप्त **********

