komal Dagade.

Classics Fantasy Inspirational

4.0  

komal Dagade.

Classics Fantasy Inspirational

रम्य प्रवास गावाचा

रम्य प्रवास गावाचा

5 mins
203


आज खूप दिवसांनी कामानिमित्त गावाला जाण्याचा प्रसंग आला. शंतनू आणि त्याचे मित्र खूप खुश होते. गावाकडील वाट लागली गर्द झाडी, रानातील हिरवी पिके, थंडगार हवेची झुळूक मनाला प्रसन्न करत होते. शंतनूला गावाकडील जीवनाचं पहिल्यापासूनच खूप आकर्षण होत. आज मित्राबरोबर कामानिमित्त का होईना आज गावाचं दर्शन झालं. नागमोडी वळणाची वाट पार करत हिरव्या झाडीत लपलेल्या गावाचं आज दर्शन घेत डोळ्यात साठवत प्रवास सुरु होता.


एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला गणपतीचं मंदिर पाहून शंतनू त्याच्या मित्र समीर इथं थांबवं गाडी मंदिरात जाऊ. मागे दोघे जण बसले होते.त्यातील दोघेजण शंतनूची खिल्ली उडवत होते. कोणत्या जमान्यात राहतो हा कोणत्या कामासाठी चालोय आणि याच काय मधेच....?दोघे हातावर टाळी देत खिल्ली उडवत म्हणाले. त्यांची पण काय चूक कधी गावाकडे येणे झालंच नव्हतं. ते शहरातील राहणारे. शंतनू मात्र लहानपणापासून मामाच्या गावाला जाईचा. मोठा झाल्यावर मात्र गावाचा आणि त्याचा संपर्क तुटला.


गणपतीचे मंदिर रस्त्याच्या कडेला मोकळ्या आवारात होते. आजबाजूला छोट्या छोट्या झोपड्यात लोक राहत होते.

त्यातील बरीचशी कुटुंब शेती करणारेच दिसत होती . मंदिरात पाया पडून झाले कीं जरा वेळ निवांत गप्पा मारत बसले. शांत वातावरणात खूप त्यांना बरं वाटत होते.


कोठूनतरी लांबून हवेच्या झुळूकबरोबर चुलीवरच्या बाजरीच्या भाकरीचा घमघमाट शंतनूच्या नाकात गेला,आणि त्याच्या आवडीची बाजरीची भाकरीच्या वासाने शंतनूला भाकरी खायची खूप इच्छा झाली.


ये चला इथं आजूबाजूचा परिसर पाहू, "शंतनू म्हणाला.थंडगार पाणी कुठे मिळतंय का पाहू...!


डोक्यावर चांगलंच ऊन आल होत.

शंतुनूचा मित्र त्याला दुजोरा देत सुधाकर म्हणाला,"मस्त आहे ना हिरवळ. हा गारवा मनाला शांतता देतोय .आपणही लोक कसे राहतात इथं ते पाहू. मलाही गाव खूप आवडत. शंतनू चल जाऊया.


शंतनू,"हो चला इथला परिसर पाहून मलाही तीच इच्छा आहे. आलोच आहोत तर सगळं पाहूनच जाऊया. सगळे तयार झाले. बाकी दोघे त्यांच्या मागे आले.


लहान लहान मुलं मातीत बागडताना दिसतं होती. कोणाच शेतात पाणी धरायचं चाललं होत. तर कोणी झाडाखाली मस्त ताणून दिली होती. बायका दुपारच जेवण चुलीवर बनवत होत्या. तर काही बायका रानात बेनत होत्या.गोठ्यातील गाई हंबरत होत्या. कुठे शेळ्या रानात चरत होत्या.


गावाकडील जीवन सर्वांनाच खूप आवडल. सगळीकडे शांतता.नाही कसलाच गाड्याचं घोघांवट, तर नाही प्रदूषण, आरोग्यदायी जीवन,


चालता चालता शंतनू त्यांचे मित्र मुलांना न्याहाळात होते. मुलं चिखलात लडबडले होते. आईवडील बेफिकीर मुलांकडे लक्ष ही नव्हते. "अरे यार हे पहा मुलं कशी उन्हात तापत, खाली चिखलात खेळतात. आपण किती काळजी करतो ना आपल्या मुलांची सतत हे करू नका ते करू नका. मुलांच स्वतंत्र हिरावून घेतो.



त्यातील एक जण म्हणत होता म्हणतात ना पडो जडो माल वाडो तेच खरे नाही का...?



अरे शंतनू ते पहा तिकडे काय करतोय हा, शंतनू झोपडीच्या बाहेर चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या एका स्त्रीशी बोलत होता.

शंतनू सुमाशी बोलणार होता जीं नुकतीच रानातून काम करून येऊन तिच्या घरातील चुलीवर स्वयंपाक करत होती. शंतनूला पाहुन ती आतमध्ये झोपलेल्या तिच्या नवऱ्याला म्हणाली.


आहो ऐकलत का...?बाहिर कोणीतरी पाहुण आलया . शहरकडचं वाटतंय बघता का....?


सुमाचा नवरा शरद बाहेर आला.


शरद, "राम राम पाहुण काय काम काढलत इकडं...?आम्ही कामानिमित्त आलोय. दुपारची वेळ आहे जवळ कुठे हॉटेल ही नाही. आम्हाला द्याल का जेवण...?," म्हणजे तुम्ही जे काय बनवलंय ते द्या. मी पैसे देईल त्यांचे. दुपार पण झाली आहे. आता जवळ कुठे हॉटेलही नाही ना...?


आहो पावणं राहूद्या पैकं पोटभर जेवा.लाजू नका.


शंतनू,नाही नाही तसं नको, पैसे घ्यावे लागतील तुम्हाला तसं नको भाऊ, "शंतनू म्हणाला.


शंतनूचे मित्रही म्हणाले.भाऊ फुकट नको हा..!


शरद,"पाहुणा देवाच रुप अस्तुया पैका घेणं परवडत नाही आम्हाला...! पोटभर जेवा...! काळजी करू नका.


शंतनू मनातून म्हणाला उगाच विचारलं असं झालं.उगाच एखाद्याला त्रास देईच. तो तरी काय करणार बाजरीच्या भाकरीच्या वासाने त्याला कधी जेवतोय असं झालं होत.


शरद," शंतूनच मन ओळखून म्हणाला, "पाहूणं मनात काय बी आणू नका. यात त्रास काही नाही बघा आम्हाला .जरा वेळ थांबा आमच्या सुमाला मी जेवण बनवायला सांगतो. जरा वेळ थांबा.


सुमा पाहुण्यांना जेवायला बनव. पाहुण शहरांतन आल्यात बघ.


सुमा,"हो हो लगेच बनवती,पाहुण्यांना थांबा म्हणावं, सुमा बोलून बिगीबिगी कामाला लागली.


घर लहान होत पण माणसाचं मन किती मोठ होत. क्षणभर विचार न करता सुमा बिगीबिगी कामाला लागली.


शरद,"पाहुणं वाट कुठं चुकलात म्हणायचं इकडं ,


शंतनू, कामासाठी आलो होतो, आलोच आहोत गावात तर सगळं पाहूनच जाऊया म्हंटल.


गाव खूप मस्त आहे हा काका.

खूप आवडल.शंतुनूचा मित्र म्हणाला.


शरद,आम्हालाबी गावाशिवाय करमत नाही कुठं . शहराकडे मन नाही लागत. माझ्या अक्कीकडे (बहिणीकडे) दोन दिवसाले जातो अधीमधी पण गाव बरं वाटत बघा .


घरातील काट्याकुट्यानी, शेणकुटाण चूल पेटवून यांच्या गप्पा होईपर्यंत सुमीचा स्वयंपाक उरकला. आहो पाहुण्यांना म्हणावं रांजनातले पाणी घेऊन हात धुवा म्हणावं .या जेवायला आत . ताट केल्याती पाहुण्यांना म्हणावं...!


शरदने त्यांना सांगितलं,


शंतनू आणि त्याच्या मित्रांना काही कळेना रांजन म्हणजे काय ...? आहो पाहुण हे बघा रांजन. त्यातील पाणी काढा हात धुवा आणि आत या.



किती छान आहे ना हे रांजन.आम्ही पण कधी पहिलं नाही शंतनू. रांजनामधील थंडगार पाण्याने हात,धुवून सगळ्यांना कडक उन्हात बरं वाटलं.


सगळे एकामाग एक झोपडीत गेले. एवढ्या कमी वेळात सुमाने तोंडाला पाणी सुटेल असाच स्वयंपाक बनवला होता.


सुमाने हिरव्या मिरचीच झिरकं , बाजरीची भाकरी, हिरव्या मिरचीच ठेचा, सोलकढी अगदी गावरान पद्धतीचं जेवण तेही चमचमीत त्यासोबत कांदा आणि लिंबूही ताटी लावलं होत.


कोणत्याही हॉटेल मध्ये पैसे देऊन असं जेवण चवदार जेवण मिळालं नसतं. पहिल्या घासातच सगळ्यांना जाणवले. पाहुण कसं वाटलं जेवण मंजी आवडलं ना तुम्हांला, सुमाच्या नवऱ्याने विचारले. हो हो आहो खूप छान जेवण बनवलंय. मन तृप्त केल जेवणानं.



सुमाचा नवरा म्हणाला,आहो चव आहे सुमाच्या हाताला. मन अगदी तृप्त होत लई कष्टाळू आहे बाई माझी आताच उन्हातून बेनून आली रानातने आणि चमचमीत जेवण बनवलं बघा . कामाला माग सरत नाही कधी.


शंतनू म्हणाला, ताई खूप छान जेवण बनवलं , लहानपणी मामाच्या गावाला खालेल्या भाकरीची आठवण झाली.


सुमाने सगळ्यांना सोलकढी चे ग्लास आणून दिले. थंडगार सोलकढी तेही उन्हाळाच्या दिवसात अप्रतिमच. सगळ्यांना पुन्हा रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं. शंतनू आणि त्याच्या मित्रांच्या चेहऱ्यावर तृप्तता दिसतं होती.


सुमाने घरातील आवरावर करून शरद आणि तिच्यासाठी जेवण बांधून घेतलं. त्याबरोबर रानामध्ये कामासाठी लागणार खुरप,खोरे कामाच्या वस्तूही घेतल्या.



शरद, सुमा चल झालं का तूझं, रानामध्ये जेवू आणि कामाला लागू. रानामध्ये लई काम बाकी आहे.


सुमाने नवऱ्याला दुजोरा देत हो हो धनी झालं. असं म्हणत जाण्याची तयारी केली.


शंतनूने त्यांचे बोलणं ऐकले स्वतः एवढे व्यस्त असूनही आज कोण, कुठले पण आज झोपडीत राहत असले तरी मन मात्र मोठं होते त्यांचे. अनोळखी असूनही पाहुण्यांचा पाहुणचारात कसलीही कमी त्यांनी ठेवली नव्हती. शंतनू पाचशेची नोट काकांना देत होता. पण त्यांनी घेतली नाही. शेवटी नाईलाजने शंतनूने माघार घेतली. हात जोडले दोघांना आणि निघाले.



शरद, "इकडे आला कीं येत जा या गरिबाकडे जाता जाता शरद म्हणाला , हो नक्कीच शंतनू त्यांचे मित्र म्हणाले.


सगळे झोपडीतून बाहेर पडले. झोपडी छोटी होती. पण त्यात आदर, प्रेम खूप मिळाला होता. सर्वजण गाडीत येऊन बसले. पण अजूनही जिभेवर भाकरीची चव मात्र आहे तशी होती. एका अन्नपूर्णेच्या हाताला वेगळीच चव असल्याचे जाणवले.



बाहेर भिजलेल्या मातीचा सुगंध, नवं चैतन्याने मंत्रमुग्ध करत होता.ग्रामीण भागातील जीवन उत्साह, ऊर्जा देत होत.

तोच उत्साह, नावीन्य डोळ्यात साठवत गाडी पुन्हा रस्त्याने धावू लागली.



कशी वाटली कथा नक्की सांगा, लाईक, कमेंट करायला विसरू नका.



समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics