तू गृहिणी आहेस
तू गृहिणी आहेस
सुनंदाच्या मुलीचे नुकतेच प्रीतीच सोळाव्या वर्षात प्रदार्पण झालं होत. त्यामुळे तिच्या नवऱ्याने दिपकने घरीच छोटीशी पार्टी अरेंज केली होती. त्यात प्रीतीचे मित्र मैत्रिणी, जवळचे नातेवाईक सर्वाना आमंत्रण दिलं होत.
सुनंदा अन्नपूर्णा असल्याने स्वतःच्या हाताने पंचपक्वनाचे जेवण तिने बनवलं होत. सुनंदाचा पूर्ण दिवस काम करण्यातच गेला होता. पार्टीच्या वेळेस तिला खूप थकल्यासारखं झालं होत. तरीही ती पाहुण्यांरावळ्यांची आदरतीथ्य अगदी छान हसून खेळून करत होती. तरीही तिथे बायकोला बघून दीपक आलाच, "अग हे काय गबाळ्यासारखी दिसतेस...! जा जरा नीट आवरून ये. तूला कळत नाही का...? आज घरात पार्टी आहे आणि कशी वावरतेस तू....?
सुनंदाच्या डोळ्यात अश्रू आलेले तिने तसेच गिळले,आणि ती नीट आवरायला गेली. पार्टीसाठी केलीली तयारी, डेकोरेशन हे तर राहिले बाजूलाच पण नीट ही बोलता आले नाही बायकोशी दिपकला ...!
सुनंदाची तरी काय चुकी उठल्यापासून मुलीच्या पार्टीची तयारी एकटी करत होती. तेही घरातील काम पाहत. चार पैसे वाचतील नवऱ्याचे म्हणून स्वयंपाक स्वतः पंचपक्वनाचा केला पण त्याची काही किंमत नव्हती. कारण ते काम फुकट झाले होते ना...!त्याची किंमत कशी असेल?
सुनंदा आवरून पुन्हा नव्याने पार्टीत हसतमुख वावरत होती. पार्टी झाली सगळी मंडळी आपापल्या घरी गेली.
प्रीतीने आईला घट्ट मिठी मारली."थँक्यू, आई आज तुझ्यामुळेच पार्टीला चारचांद लागले. सगळे तुझ्या जेवणाची खूप तारीफ करत होते. सुनंदाला ऐकून जरा बरं वाटलं ऐकून. रात्र झाली होती. सर्वजण झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सुनंदाची नेहमीप्रमाणे धावपळ जेवण, नाष्टा,घरातील साफसफाई, तेवढ्यात रूममधून तिच्या नवऱ्याचा आवाज आला. सुनंदा अग माझे रुमाल कुठं ठेवलाय ग...? काहीच आवाज न आल्याने दीपक किचनकडे बडबड करत आला.तिथंही ती नव्हती.सकाळी ही कुठे गेली तेही नं सांगता...?किती बेजबाबदारपणा हा...!
तोपर्यंत सुनंदा आली . आहो काय झालं...? पोहे आणायला गेले होते नाश्त्यासाठी...!
दीपक, "अग काय झालं काय विचारतेस माझा रुमाल दिसतं नाही आणि हे काय माझ्या ड्रेसला काल इस्त्री पण केली नाहीस. तुला दिवस भर तेवढही जमत नाही का..? काय काम असतं घरात तुला दिवसभर...?अशी कशी वागू शकतेस तू....?
सुनंदा शांत ऐकून घेत होती , द्या मी लगेच करून देते इस्त्री .
आदल्यादिवशीच्या धावपळीत तिला वेळेत मिळाला नव्हता.तिची काहीच चुकी नव्हती.
दीपक,"राहूदे आता मला उशीर होतोय.
दीपक तणतण करत निघून गेला.
आई आई इकडे ये, प्रीतीने आवाज दिला. माझा पिंक ड्रेस दिसत नाही. कुठे ठेवला आहेस,आणि किती वेळा सांगितलं माझ्या कपाटाला हात लावत जाऊ नकोस. माझं मी आवरत जाईन.
सुनंदाने कपाटात हात घालताच तिच्या हाताला ड्रेस लागला, कारण तिने प्रीतीच्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या होत्या. मुलीचं बोलणं बघून सुनंदा तिला काही न बोलताच काम करायला निघून गेली.
सुनंदा पोहे वाढत होती, दीपक, प्रीती नाष्टा करायला बसले होते.
प्रीती, आई काय ग,हे रोज रोज तेच नाश्त्याचे पदार्थ पाहून कंटाळा आलय. घरात असतेस तर शिकत जा ना जरा चाई निझ, पिझ्झा असे पदार्थ तुला काय काम असतं नाहीतरी दिवस भर...?मुलीचं बोलणं बघून सुनंदाला खूप राग आला होता.तरीही सकाळी कटकट नको म्हणून ती शांत बसली.
दीपक,"लगेच प्रीतीची बाजू घेत बरोबर बोलतीये.
नवऱ्याचं बोलणं बघून तिला राग आणखीनच असाह्य होत होता. तरीही तिने तो गिळला. आणि कामाला लागली.
दोघांचं बोलणं पाहून सुनंदाला आता खूप वाईट वाटतं होत.
संध्याकाळी जेवताना सुनंदाने दोघाना सांगितलं.उद्यापासून स्वतःची काम स्वतः करा . ऑफिसला जाताना काय लागत ते तुम्ही बघायचं, आणि प्रीती तुही तू मोठी झाली आहेस.तुला जे पाहिजे ते तूझं तू बनवत जा. मला जे आवडल ते मी करेन. मला जे वाटेल तेच मी करेन. माझी अपेक्षा ठेवू नका.
सकाळी सुनंदाने उपमा केला. ती नाष्टा करत डायनिंग टेबलवर बसली. शेजारीच उपम्याची डिश नवऱ्यासाठी ठेवली. दिपकने काही नं बोलता गपचूप खाल्ला .त्याने आज स्वतःच्या हाताने स्वतः वस्तू घेतल्या होत्या. बायकोच वागणं त्याला चांगलंच खटकत होत.प्रीतीला कॉलेजला जायचं होत. आई माझा नाष्टा...?
सुनंदा, "हे बघ करून ठेवलंय तुला आवडत नसेल तर हाताने बनवून खा. माझी काही हरकत नाही.
प्रीतीने उपमा हाताने घेऊन गपचूप खात बसली.
प्रीती कॉलेजला निघून गेली.
नवरा ही काही न बोलताच निघून गेला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रीती कॉलेजमधून आली. तिच्याबरोबर तिच्या काही मैत्रिणीही होत्या. प्रीतीच्या कपड्याच्या कपाटाकडे लक्ष जाताच त्यातील एक जण म्हणाली, "प्रीती किती अस्ताव्यस्त तूझं कपाट ग....! माझ्या घरात माझ्या आईबाबांना नाही जमत असा गलिचपणा...!
प्रीतीला कळून चुकलं होत ती आईला किती चुकीचं बोलली. मैत्रिणींसमोर तिला लाजल्यासारखं झालं होत.
सुनंदा नुकतीच बाहेरून बारशाचा कार्यक्रम आटपून आली होती. त्यामुळे तिलाही कंटाळा आला होता. फ्रेश होऊन सुनंदा बाहेर आली तर प्रीतीच्या मैत्रीना होत्या. त्यांच्याकडे पाहून तीही हसली, आणि किचनकडे गेली.
प्रीती, आई माझ्या फ्रेंड्ससाठी काहीतरी बनव ना...!
सुनंदा, बरं बनवते. सुनंदा हसत म्हणाली.
सुनंदाने छान दडपे पोहे आणि चहा बनवला .कारण संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी तिला करायची होती. कारण प्रवासामुळे तिलाही थकवा आला होता.
सुनंदा दडपे पोहे आणि चहा त्यांना घेऊन गेली.
ते पाहून प्रीतीची मैत्रीण शैला म्हणाली, हे काय प्रीती तू तर म्हणाली माझी आई अन्नपूर्णा आहे. हे काय दडपे पोहे बनवलेत. मला काहीतरी छान चटपटीत वेस्टर्न फूड खायच होत.
ते ऐकून प्रीतीला राग आला, आई किती वेळा सांगितले तुला दुसरेही पदार्थ शिक. घरात बसून तुला तेवढंही होत नाही का....? तूच खा हे आम्हाला नको,चला आपण बाहेरच काहीतरी खाऊ काहीतरी ...!
सगळा मूड गेला.
असं म्हणत प्रीती रागातच बाहेर पडणार तोच सुनंदाने थांबवलं.
थांब माझं ही ऐकून घे,
प्रीती मीही बाहेरून प्रवास करून आले आताच. मलाही थकल्यासारखं झालं आहे. तू मला म्हणत असते घरात तर असतेस पण हा त्याग मी फक्त तुझ्यासाठीच केलाय.
प्रीती मी सिविल इंजिनीर आहे. मला त्या काळी भक्कम पगारही होता. पण तू पोटात वाढत होतीस आणि डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितली. मला नाईलाजस्तव नोकरीं सोडावी लागली. तुझ्या येण्याने मी खूप आनंदात होते. तुझा जन्म झाला आणि माझ्यातील मी ला हरवले. तुझी काळजी डोळ्यात तेल घालून घेत होते. कोणाच्या भरोशावर मला तुला ठेवायचं नव्हतं. मीच तुझी जन्मदात्री दिवस रात्र तुझ्या संगोपनात घालवले. तुला वाढताना बघताना जगाचा विसर पडला. मी मलाच विसरले. तू आजारी पडलीस कीं दिवसरात्र तुझ्यापाशी जागून काढले. खोकला आला तर काढा, तर कधी ताप आला तर गार पाण्याच्या पट्या असं करत तुला मोठ केलं. तुला काय आवडत, नाही आवडत करत, " मला काय आवडत हेच मी विसरून गेले. हो मी स्वीकारलं गृहिणीपद ज्यात फक्त त्याग असतो. मला लाज वाटते माझी मी तुझ्यासारख्या मुलीसाठी त्याग केला. जीला आईची काही किंमत नाही. मी घरात असते म्हणून माझ्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा..., "मी मात्र अपेक्षा मात्र कोणाकडून काही करायच्या नाहीत. तुला वाटत ना मला घरात काम काय असतं,"तर उद्या सगळी काम तू करायची. आज मला पच्छाताप होतोय. त्यावेळी मी खूप चुकीचा निर्णय घेतला. सुनंदा रडत होती. रागामध्ये ती खूप काही बोलून गेली.
दिपकही हे सगळं ऐकत होता. त्यालाही त्याच्या बायकोची किंमत कळाली. घरात बसल्यावर त्याच्याही नजरेत तिची किंमत कमी झाली होती.
प्रीतीला आईचं बोलणं ऐकून खूप रडायला आले. प्रीतीने आईचे पाय धरले, मैत्रिणींसमोर आई माफ कर.माझं खूप चुकलं...!
माफी नको वागूस माझी एकदा विचार कर. मीही एक माणूसच आहे. तुम्हाला जशा माझ्याकडून अपेक्षा आहेत मलाही आहेत ना. सगळं करून जर माझी किंमत शून्य असेल तर माझ्या मनाला किती वाईट वाटत असेल प्रीती...!
प्रीतीने सगळ्या मैत्रिणींना घरी जायला सांगितलं. दिपकही सुनंदा जवळ आला. त्यानेही तिला सॉरी बोलले. संध्याकाळी सर्वांनी मिळून काम केलं.
आज सुनंदा आनंदात होती. कारण खूप दिवसापासून मनात ठसठसत असणारं दुःख आज निघून गेलं होत.
समाप्त
