Deepali Thete-Rao

Abstract

3.4  

Deepali Thete-Rao

Abstract

मुलगी

मुलगी

2 mins
335


     सारंगच्या बायकोने मुलीला जन्म दिला. तिला शहरातील नामवंत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सारंग आणि त्याच्या कुटुंबीयांना फारच आशा होती की मुलगाच होईल.निसाच्या त्या गोड बातमीनंतर किती खुश होते सगळेच. तान्हा बाळकृष्ण जन्माला येईल, घरभर रांगेल... किती काळजी घेत होते सगळेच निसाची. जरा इकडच तिकडे होऊ देत नव्हते. सारंग तर हवेतच तरंगत होता जणू. बाबांचं मिठाईच दुकान... आता तोच बघत होता हो... खूप शिकलेला असला तरी. कॉलेजमध्येच भेटली निसा. लव्ह मॅरेज घरच्यांच्या भितीने अॅरेंज्ड करवलेलं. प्रेमळ पण थोडे ऑर्थोडॉक्स... घरातले सगळे. मग काय करणार. पण फॅमिली एकदम झक्कास. जीव तोडून माया करणारी. मिठाईवालेच शेवटी. जिलेबी पाकात घोळणारच. सगळं कसं गोडम् गोड. परंतु नियतीच्या मनात काय दडलय कोण ओळखू शकणार? मुलगी जन्मली आणि त्यांचे फुललेले चेहरे निराश झाले. सारंग तर इतका निराश झाला की प्रसुतिनंतर, गेलाच नाही पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी रुग्णालयात.


सारंग एका फॅक्टरीत अभियंता म्हणून काम करीत होता. त्या दिवशी तो ऑफिसमधे बसला होता. त्याच्या हाताखाली काम करणारा राजीव त्याला भेटायला आला.

 "बायको आजारी आहे साहेब आणि घरी कोणी दुसरे काळजी घेणारेही नाही."

"अहो पण तुमचा मुलगा आहे ना? आणि माझ्या माहितीप्रमाणे मागच्या वर्षीच त्याचं लग्न झालं. हो ना? म्हणजेच सूनही आहे घरी. तरीही म्हणता कोणी काळजी घेणारे नाही. सुट्टीसाठी कारण पाहिजे काहीतरी तुम्हाला"

"नाही नाही सर. खरंच तसं नाही हो. काय सांगू तुम्हाला? अहो मुलगा हवा म्हणून किती नवस-सायास केले. हा झाला तेव्हा पेढे वाटले सगळ्या गल्लीत. 

रक्ताचं पाणी करून याला शिकवलं, मोठं केलं. त्याचं बदललेलं वागणं हळूहळू लक्षात येत होतं लग्न ठरल्यापासूनच, पण आम्ही दुर्लक्ष करत होतो. लग्न झाल्यावर काही दिवसात मात्र पूर्ण बदलला. तो आणि त्याची बायको दोघांनी वेगळं घर केलं. कधीतरी येतात. बघितल्यासारखं करतात आणि जातात 

त्या शब्दात ना माया ना प्रेम. तेव्हापासून मी आणि बायको. एकमेकांसाठी जगतो. सध्या फारच आजारी आहे ती. मी असायलाच हवं तिच्याबरोबर

देवानं या मुलाऐवजी एखादी मुलगी दिली असती तर बर झाल असतं. सासरी गेली असती तरीही माहेरची ओढ तशीच जपून ठेवली असती तिनं. 

खरंच एक मुलगी हवीच होती."


राजीव डोळ्यात पाणी आणून बोलत होता. एकीकडे मुलगी जन्माला आली म्हणून सारंग खूश नव्हता तर दुसरीकडे राजीवला मुलगी नसल्याची खंत होती. सारंगऩे त्याच्या रजेचा अर्ज मंजूर केला आणि भराभरा काम आटोपून हॉस्पिटलच्या दिशेने चालू लागला, त्याच्या लेकीकडे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract