मनवा
मनवा
राजीव दोन दिवसांनी मनू चा अठरावा वाढदिवस आहे.मला वाटते आता हीच वेळ योग्य आहे,तिला खर काय ते सांगण्याचे.
रागिणी,पण मनू याचा वेगळा अर्थ नाही का घेणार.? आपल्या बद्दल गैरसमज तर करून नाही घेणार?
नाही राजीव तशी मनवा लहान पना पासून समजूतदार आहे.आता ती मोठी पण झाली आहे.काही गोष्टी लवकर तिला समजल्या तरच चांगले आहे. ठीक आहे आपण बोलू मनू शी.वाढदिवस ही जंगी साजरा करू.हो आपली एकुलती एक लाडकी आहे मनू.सगळ्या तिच्या आवडी नुसार करू.
राजीव पेशाने डेंटिस्ट तर रागिणी स्त्रीरोग तज्ञ.दोघांचे लव मॅरेज झालेले. कशाची कमतरता नव्हती आयुष्यात फक्त एक गोष्ट सोडली तर. स्वताचे मुल नव्हते त्यांना.आई बाबा माझा वाढदिवस कुठे साजरा करायचा.सकाळी सकाळी डायनिंग टेबल पाशी येत मनवा ने विचारले.मनू तुला हवे त्या ठिकाणी आपण सेलिब्रेट करू .रागिणी म्हणाली.आई माझ्या सगळ्या फ्रेंड्स ना मी बोलणार आहेहो हो नक्की बोलव.राजीव तिला डोक्यावर थोपटत बोलला.खूप जंगी असा मनवाचा वाढदिवस साजरा झाला.खूप खुश होती ती.मनू तुझ्याशी थोड बोलायचे होते बेटा.राजीव म्हणाला.
बाबा कशा बद्दल बोलायचे आहे.मनू पण तू काही गैरसमज नको करून घेवू प्लीज.रागिणी म्हणाली.
आई बोल अस काय आहे ज्याने माझा गैरसमज होऊ शकतो?मनू तुझ्या जन्मा बद्दल बोलायचे होते.आता तू मोठी झाली आहेस.भल बुर सगळ तुला समजते म्हणून सांगते.प्लीज तुझ्या आई ला समजून घे.आई माझा विश्वास आहे तुझ्यावर.मनू ही तेव्हा ची गोष्ट आहे.जेव्हा माझं आणि राजीव च लग्न झालं,दोन वर्ष होऊन गेली होती पण मी आई झाले नव्हते.माझं काम,हॉस्पिटल पेशंट यात सगळा वेळ जायचा .कामाच्या व्यापात समजलेच नाही की आम्हाला बाळ हवे आहे.असेच अजून दोन वर्षे गेली.मग मात्र आम्ही बाळाचा विचार करू लागलो.पण काही साध्य होत नव्हते मला प्रेगंनसी राहत नव्हती.माझ्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या आणि त्यातून अस समजले की मी कधीच आई नाही होऊ शकणार.हा आमच्या साठी खूप मोठा धक्का होता.मी स्वतः एक स्त्रीरोग तज्ञ ,किती तरी जीव मी सुखरूप जन्माला आणले होते आणि देवाने माझ्या पदरात ते दान नाही टाकले.याचे खूप वाईट वाटत होते.
आई मग मी कशी काय तुमची मुलगी.? मध्येच मनवा बोलली. .
मनू तेच तर सांगते आहे.त्या दिवशी ओपिडी मध्ये एक बाई आली .ती तीन महिन्याची गरोदर होती .मी तिला चेक केले आणि औषधे लिहून दिली. तीच नाव मंगल होते. एका बाजूच्या गावातून आली होती.डॉकटर मला सांगू शकाल का की माझ्या पोटात मुलगा आहे की मुलगी.?मंगल हे काय बोलतेस अस चेक करणे कायद्याने गुन्हा आहे मी असल काही सांगत नाही .तुला कशाला जाणून घ्यायचे आहे? .मी रागात बोलले.मॅडम मला अगोदरच दोन मुली आहेत त्यांच्या नंतर तीन ॲबोर्शन झाली आहेत .म्हणूनच तू खूप अशक्त झाली आहेस.मॅडम माझी सासू आणि नवरा यांना मुलगाच पाहिजे आहे.मुलगा नाही झाला या खेपेला तर तोंड दाखवू नको म्हणालेत.मी काय करू मॅडम,माझ्या हातात हाय का हे?
मंगल तुझा नवरा आला आहे का सोबत तुझ्या,त्याला बोलव मी बोलते त्याच्याशी.नको मॅडम तो मलाच मरमर बदडून काढेल.हे बघ मंगल मी समजू शकते तुझी परिस्थिती,आता काहीच नको बोलू तू.घरात सांग डॉकटर नाही म्हणाले गर्भ तपासणी साठी.
मॅडम मग मला दुसरी कडे कुठ तरी नेवून तपासणी करतील.आणि परत मुलगी असल तर पाडायला लाव तील.खूप वाईट आहेत माझी सासरची लोक.
रागिणी विचार करू लागली की मंगल ची मदत कशी करता येईल.मंगल एक काम कर तू तुझ्या नवर्याला आणि सासू ला सांग की तुझ्या पोटात मुलगा आहे.अस खोटं कस सांगू मी आणि उद्या बांळत झाल्यावर मुलगी जन्माला आली तर आम्हा दोघीना मारून टाकतील.नाही मंगल अस काही होणार नाही.मी आहे तुझ्या सोबत.नको काळजी करू.मी बघेन काय करायचे आता तू औषधे घे आणि स्व ताची काळजी घे.चेकिंग ला येत जा.मंगल मग निघून गेली.
अधूनमधून चेकिंग ला येत राहिली.पण तिच्या मनात ही भीती कायम होती की जर मुलगी झाली तर काय? या भीती पोटी तिला खाल्लेले काही अंगी लागत नव्हते त्यात तीन ॲबोर्शन झाली होती तिची तब्येत नाजुकच होती. नऊ महिने भरले . मंगल ला कळा सुरू झाल्या होत्या म्हणून तिची सासू आणि नवरा तिला घेवून हॉस्पिटल ला आले.त्यांच्या चेहऱ्यावर मंगल ला या वेळेला मुलगा होणार हा आनंद दिसत होता.मंगल ऑपरेशन थिएरमध्ये होती.खूप अशक्त झाली होती.त्यातून हे गरोदरपण तिला झेपले नव्हते.कसे बसे तिने बाळाला जन्म दिला पण या वेळी पण तिला मुलगी च झाली.मंगल ला रक्तस्त्राव खूप झाला होता.तिचे बी पी सुद्धा लो झाले होते.मंगल तुला मुलगी झाली आहे.मी तिला सांगितले.मॅडम ते लोक मला जगू देणार नाहीत. मुली ला पण मारून टाकतील काहीतरी करा तुम्ही रडत ती बोलत होती.बोलताना तिला त्रास होत होता.आणि अचानक म्हणाली मला बघू दे माझी मुलगी डॉकटर..
मी मंगल ला दुपट्यात गुंडाळलेले बाळ दाखवले.आणि बाळाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला तिने ..मंगल ने डोळे मिटले.कायमसाठी.मंगल हे जग सोडून गेली होती.मला त्या क्षणी काय करावे हे सुचेना.मग नर्स ला थोडक्यात मंगल बद्दल सांगितले आणि बाळाला बाहेर अजिबात आणु नको अस सांगितले.रागिणी बाहेर आली तसा मंगल चा नवरा पुढे आला,डॉकटर झाली का डीलेव्हरी,मुलगा झाला का मंगल ला?नाही .मुलगी झाली पण ती जिवंत नाहीअस होय मुलगी मृत जन्माला आली हे ऐकून मंगल चा नवरा खुश झाला कारण त्याला मुलगी नको होती.मंगल कशी आहे डॉकटर.त्याने विचारले.मंगल पण वाचली नाही .गेली ती बिचारी . तीन गरोदर पण.दोन ॲबोर्शन कशी वाचणार होती ती.मंगल ची डेड बॉडी घेवून ते लोक निघून गेले.मी राजीव ला फोन केला आणि हॉस्पिटल ला बोलवून घेतले.राजीव आपण या मुलीला कायदेशीर रित्या आपली मुलगी करून घेतली तर..असे पण मी आई नाही होऊ शकत.मग या अनाथ मुलीचे आपण पालक बनू.रागिणी तू म्हणतेस ते बरोबर आहे.आपण डॉकटर आहोत,आपण लोकांना जीवदान देतो.तुझी इच्छा आहे तर या मुलीला आपण आपली मुलगी म्हणून सांभाळू.मग सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून तू आमची मुलगी झालीस मनू .रागिणी चे डोळे भरून आले.मनू च्या नजरें समोर आता पर्यंत चे सगळे आयुष्य दिसू लागले.तिला या दोघांनी कशाची च कमतरता भासू दिली नव्हती.मना पासून तिच्यावर प्रेम करत होते.कोणाला सांगून ही खरे वाटणारे नव्हते की मनू यांची मुलगी नाही.अगदी पोट च्या मुली सारखे मनू ला मोठे केले होते.आई बाबा मला तुमचा खूप अभिमान वाटतो.आय फिल सो प्रावुड .रागिणी ने पटकन मनू ला जवळ घेतले.मला माहित होते मनू तू नक्की आम्हा दोघांना समजून घेशील.
आई स्व ताच मूल कोणी ही वाढवत ग ..पण अस परक्याचे मुल मोठे करणे याला खूप मोठे मन लागते.मनू तू कोणा दुसऱ्याची नाही आहेस.तू आमची मुलगी आहेस आणि कायम असशिल राजीव म्हणाला.हो बाबा आई ने मला जरी जन्म नाही दिला तरी ती माझीच आई आहे.
(समाप्त)
