मंजुळा - भाग १
मंजुळा - भाग १
एक आटपाट नगर होत शिवापूर नावाचं. निसर्गाच्या कुशीत वसलेले ,हिरवाईने नटलेले समृद्ध गाव. या गावात लग्न करून आलेली होती मंजुळा! .सावळी नाके डोळी रेखीव वय अवघे एकोणीस एकदम हसतमुख . आठवी पर्यंत शिकलेली ,राम्या सोबत लग्न झालं होतं तीच. राम्या लोकांच्या शेतात ऊस तोड,कापणी अशी रोजंदारी वर काम करत होता. मंजू , सगळे तिला मंजूच बोलायचे . मंजू चार घरी कपडे भांडी चे काम करून संसाराला हातभार लावत होती. घरात सासू आणि ही दोघे असे राहत होती. सगळं नीट नेटके सुरू होते पण एकच खंत होती,मंजू च्या लग्नाला आता तीन वर्षे होत आली तरी तिला दिवस जात नवहते. या वरून सासू तिला सारख बोलायची. "तुला दिस नाय जात तर राम्याच दुसरं लगीन करते " अस बोलत राहायची.नेहमी प्रमाणे कुंदा ताई कडे मंजू कामाला आली. आज ही सकाळी सकाळी सासू तिला मुल होत नाही म्हणून बडबडत होती. त्यामुळे मंजू जर गप गपच होती." काय ग मंजू आज खूपच शान्त दिसतेस बोलणं नाही बडबड नाही काय झाले?" कुंदा ने विचारले.
" ताई माझ्या लग्नाला तीन वर्षे होतील पर अजून मला दिवस नाही गेले म्हणून सासू सारख माज्या नवऱ्याच दुसरं लग्न करते अस बोलत असते".मंजू मग तू कुठल्या डॉक्टर कडे का नाही गेलीस आज पर्यंत?
मला वाटलं होईल वर्ष दोन वर्षांनी पण नाहीच अजून काही... मंजूताई मी तुमच्या हॉस्पिटलात येऊ काय? तुम्ही माझी तपासणी करा.. मंजू म्हणाली.हो तू ये माझ्या कडे मी करते चेक तुला ...कुंदा गावातल्या सरकारी दवाखान्यात डॉक्टर म्हणून काम करत होती. बदली वर इथे आली होती.उद्याच ये सकाळी अकरा वाजता ,नाहीतर अस कर बाकीची काम लवकर आटपून ये इथे,माझं काम झालं की माज्या सोबतच चल.
हो ताई तसच करते. सासू ला काही नाही सांगत पण नवऱ्याला सांगून येते. मंजू बोलली.ठरल्याप्रमाणे मंजू काम आवरून कुंदा कडे आली तिच्या घरचे काम उरकून दोघी हॉस्पिटलमध्ये आल्या.कुंदा ने मंजू चे चेकिंग केले. मासिक पाळी सुद्धा तिची व्यवस्थित होती. सोनोग्राफी करून सगळी तपासणी केली. बावीस वर्षाची मंजुळा अगदी धडधाकट होती. तिच्यात कोणता ही प्रॉब्लेम नवहता. मग तिला का दिवस जात नवहते ? याचा अर्थ तिच्या नवऱ्यात काही दोष नक्की असणार. असा विचार डॉ. कुंदा करत होती.ताई काही अडचण आहे का? मला का नाही दिवस जात?मंजू ने विचारले.मंजू हे बघ तुझी सगळी तपासणी मी केली पण तुझ्यात काहीच दोष नाही..मग ताई दिवस का जात नाहीत मला. यंदा लग्नाला तीन वर्षे पूर्ण होतील.मंजू मला वाटत तुझ्या नवऱ्यातच काही दोष असणार म्हणून तुला दिवस जात नाहीत.पण ताई माझा नवरा हॉस्पिटलात चेकिंग ला नाही जायचा,तो बापय माणूस त्याला हे सहन पण नाही व्हायचा.
हो मंजू त्यात इथे गावात अस पुरुष कोणी स्वतःकडे दोष आहे हे मान्य पण नाही करणार. आणि ही गोष्ट त्याला सांगणं म्हणजे आगीत तेल ओतल्या सारख असणार.ताई मग यावर उपाय काय ? मंजू ने काळजीयुक्त स्वरात विचारले.मंजू तुझा नवरा काही स्वतःची तपासणी नाही करून घेणार आणि असेल काही दोष तर ट्रीटमेंट ही नाही करून घेणार कारण त्याचा पुरुषी अहंकार त्याला तस करून नाही देणार. आज ही जग इतकं सुधारलेले आहे पण मुल होत नाही हा सर्वस्वी बाई चाच दोष अस मानलं जातं. जी बाई मूल जन्माला घालू शकत नाही ती बायको म्हणून ही नालायक ठरते.ताई मग मी काय करायचे आता. मंजूकाही नाही मंजू तू फक्त वाट बघायची आणि प्रार्थना करायची जर त्या देवालाच तुझी दया आली तर तुला मुल होईल ते ही तुझ्या नवऱ्यात काही दोष नसेल तर.. कुंदा म्हणाली.मंजू मग घरी आली . खरच राम्या मधेय काही दोष असेल का? पण त्याला कस सांगू की तू तुझी तपासणी करून घे म्हणून. सासू ला हे समजलं तर आकांडतांडव करेल ती आणि मला घरा बाहेर हाकलून देईल. ताई बोलल्या तसे मुल झालं नाही तर सगळा दोष बाई चाच असतो का? तिला आठवले तिच्या माहेरी राहणारी पार्वती तिला पण मुलबाळ झाले नाही म्हणून तिला हाकलून दिले आणि तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले पण तरी त्याला अजून मुल नाही झाले मग यात त्या पार्वतीचा दोष नव्हताच तसे नसते तर तिच्या सवती ला मुल झालीच असती की म्हणजे त्याच्यातच दोष होता पण हे लोकांना कोण सांगणार.? जिथं तिथं सगळ्या गोष्टीला बाईलाच जबाबदार धरले जाते.मंजू विचार करत राहिली.
(क्रमशः)

