मनातला भूत
मनातला भूत
एक दिवस काय झालं मी रात्री पार्टी वरुन एकच्या दरम्यान मित्रासोबत येत होतो. चालताना माझ्या घराकडे जायचे सोडून मित्रासोबत त्याच्या मागेमागे जायला लागलो. पार्टी बरीच अंगात आली होती. दोघेही मुड मध्ये गप्पा गोष्टीमध्ये रंगत बरळत पायीच येत होतो.
धन्या बन्याला म्हणाला !
पाहात पाहात चालत रहा रास्त्यात काही घबाड भेटले तर आपली मजा होईल, तसे आपले नसीबच खोटे आहे.
आपल्याला कधीच काही भेटत नाही.
बन्या धन्याला म्हणाला ! अबे धन्या तुझी नजर कधीही आयत्यावरच राहाते फुकटच भेटल तर उदोउदो नाहीतर नशिब खोटे म्हणतो:
तसाच धन्या बन्याला म्हणतो , एखादा अलादीनचा चिराग भेटला पाहिजे,मग कोणत्याच वस्तुची कमी होणार नाही .आपण दोघे मित्र खूब मजा करू! धन्या बन्याच्या
गोष्टी काही संपेच ना,बन्या त्याच्या वाटेने वळला.धन्या पण पडत झडत कसेतरी डोलत डोलत घरी पोहचले .
आल्याबरोबर धन्याने आपले अक्षरत: अंग बेडवर आदळले व लगेच खर्राटे वाजू लागले.
बन्याला रात्री भूत दिसला. तसाच तो घामाघूम होऊन घाबरून गेला या आधी भूत-प्रेताच्या खुप गोष्टी करायचा परंतु पाहिले पहिल्यादाच होते. भूत कसे असतात ते फक्त कथेत ऐकले होते किंवा पुस्तकात वाचले होते. त्याने नीरनीराळ्या प्रकारच्या भूताच्या कथा ऐकल्या होत्या. सिनेमे बघीतले होते त्यावरून भूत कसे असतात
याची कल्पना होती.
भूताला म्हणे पाय नसतात ती जमिनीवर पाय टेकवत नाही ती हवेत उडतात विरुद्ध दिशेने मागे मागे वळतात अशा अनेक भ्रामक गोष्टी ऐकल्या होत्या परंतु आज त्यासमोर साक्षात भूत उभा होता. त्याने सांगितल्या प्रमाणे तो स्वतःला भूत म्हणून आपली ओळख करून देत होता.भूत म्हंटल्यावर धन्याची अक्षरश: घाबरगुंडी उडालेली होती तो झोपेतच थरथर कापत असताना म्हणे वाचवा भूत भूत करून सारखा नारा देत होता परंतू ती शब्द कुणालाच ऐकायला जात नव्हती. धन्याला सळो की पळो झाले होते.परंतू हातपाय खिळले होते दातकडी बसली होती तो लटालटा झाडासारखा कापत होता. बाहेर भयंकर सांयसांय करत वादळ वारे सुटले होते धोधो मुसळधार पाऊस पडत होता.
तो भूत धन्याला म्हणाला! तू मुळीच घाबरू नकोस डोळे उघड मी तुला काहीच अपाय करणार नाही तेव्हा धन्याला थोडा धीर आला म्हणे,छातीची धड़धड़ कमी झाली होती मोठी हिम्मत करून त्याने किलकिले करून डोळे उघडले. एक मानसाकृती पाहून तो दचकला अरेच्च्या भूत असा आपल्या सारखाच असतोय का ,खालून वरपर्यंत दृष्टि फिरविली आणि भूत त्याच्याशी छान वार्तालापही करीत होता म्हणे तो अगदी माणसासारखाच दिसत होता.
तो भूत धन्याला म्हणाला!
तू मला मुळीच वाईट भूत समजू नकोस .मी एक चांगला भुत आहे म्हणुन तुला सांगतोय तू ऐकून घे भूत भविष्यात जर तुला विश्वास असेल तर तुला माझं ऐकून घ्यायलाच हवे आहे. भूत म्हणजे भूतकाळात त
ू सरू नकोस तू जिवंत आहे हा तुझा वर्तमान काळ आहे. जेव्हा तू वर्तमान काळात चांगले कर्म करशील तेंव्हा तू माणव समजल्या जाशील तुझ्या पिढ्या तुझे नाव घेतील अन्यथा तू वाईट कर्म करशिल तर माझ्यासारखा भूत होशिल, वाईट मार्गावर वाईट गती चांगल्या मार्गावर चांगली गती होईल. एवढी एकच गोष्ट लक्षात ठेव आणि आपल्या जीवनकाळात चांगुलपणाची पुंजी जमा करून आपले भविष्यकाळात सुखसमाधान मिळव. तुझी चांगुलपणाची पुंजी हीच खरी कमाई समज आणि जर का तुला भूत व्हायचं असेल तर वाईट कामे करून खरोखरचा भूत बनायला सज्ज हो.माझ्यासारखा सतत रात्री-बेरात्री लोकांना झोपेतून उठवून त्रास द्यायचा व आपल्या नशिबाचे भोग म्हणत मुक्तीसाठी फिरत रहा.
मी पण तुझ्यासारखा माणूसच होतो मी माझ्या जीवनात खूप वाईट कामे केली आहेत म्हणून मला आज भुताची उपाधी मिळालेली आहे आणि आतापर्यंत मी सारखा भटकत असतो मला अनेक व्यसन होते मी अनेक लोकांचे जीव घेतले होते.माझी अनेक स्त्रीयांवर वासनापुर्तीसाठी वाईट नजर होती.कित्येक वाईट मार्गाने धन कमाविले.शेवटी माझ्या परिवाराला नातेवाईकांना मी नकोसा झालेलो होतो. तेव्हापासून मी भटकतोच आहे.
माझ्या दुष्कृत्याने मी कधी कुणाच्या समोर जाऊ शकत नाही.लोक मला पाहून हरड,चकवा,राक्षस,भूत मानतात. मला पाहून दूर पळतात आणि मी मानवाच्या जवळ यायचा प्रयत्न करीत असतो पण मला कुणीच आसरा देत नाही किंवा कुणीच मला प्रेम देत नाही "जैसा करेगा वैसा भरेगा" ही म्हण खरोखरच लागू होत असते
परंतु तू घाबरू नकोस मी माझी कथा तुला सांगितली आहे तुझ्या मनात असंख्य विचार येत असतील मला माहित आहे की तू पण व्यसनाच्या आहारी जातो आहेस मी मुद्दाम तुझे हृदय परिवर्तन करण्याकरीता तुला जागवायला आलो आहे. जसे जसे तुझे विकार वाढतील तसा मी तुझ्या जवळ येत राहणार आहे.
व्यसनाधिन होऊन तु कमजोर होणार आहेस तसेतसे तुला रोज भूत दिसतील जर का तुला भूत नसेल बघायचा तर तू आपली दिनचर्या बदलव तुझा आहार-विहार आचरण शुद्ध ठेव आपले स्वास्थ सुदृढ बनवून पारिवारिक कर्तव्याला निभावण्याची तयारी ठेव समाजात गरजूंची सेवा कर, तेंव्हा कोणताही भूत तुझे काहीच बिघडणार नाही आणि तुला दिसणार पण नाही एवढे सांगून तो भूत नाहीसा झाला व धन्या झोपेतून खाडकन जागा झाला. मला नेमकी माझी परिस्थिती दृष्टीस आणुन दिली. मी काय करावे आणि काय नको हे मला त्या भूताने पद्धतशीर सांगितले होते मी कानाला खडा लावला तेंव्हापासून व्यसन काय वाईट गोष्टी खोटे बोलणे, निंदा करणे सोडून दिले रोज सकाळी उठून योगा व्यायाम करून स्वतःला सुदृढ बनवले. व आरोग्य जपले ,समाजात मान पान यश किर्ती सर्वकाही मिळविले कश्याचीही कमी नाही .जीवनात फक्त आनंदाचा भोग घेतोय. जीवनात भूत कशाला म्हणतात त्याची मला पूर्ण परीने जाणीव झाली. तो तर माझ्या मनातला भूत होता. मला त्यानंतर कधीच भूत दिसला नाही मी त्या भुताचे मनोमनी खूप आभार मानले.