Meenakshi Kilawat

Drama

3  

Meenakshi Kilawat

Drama

भाग25 रूनझून पैंजनाची"कादंबरी

भाग25 रूनझून पैंजनाची"कादंबरी

19 mins
126


सईने प्रशांतला बोलवले त्याचा काही फायदा व्हायला हवा म्हणून ती आपल्या जिवाचा आटापिटा करीत होती.....सुमेधा साठी जे काही होईल ते करायची तिची इच्छा होती तिने पूर्ण आपली शक्ती पणाला लावली होती..परंतु उपड्या घड्यावर पाणी सर्व काही व्यर्थ कुठेच काही यश दिसत नव्हते.... सुमेधाच्या मुखातून एक शब्द ऐकायला जीव कासावीस झाला होता....

पण तिने मनस्वी निर्धार केला असावा ...जन्मभर साधू सारखी मौनात राहणार....

कशीतरी सईने आपल्या मनाची समजूत घातली आणि मोठे मन करून म्हणाली आपण मळ्यात जाऊया तिथे तुला बरं वाटेल....चार वाजले छान गार वारा सुटला आहे ...चला आपण मळ्यातच जाऊया ते तिघेही मळ्यात गेले पण प्रशांतचे डोके विचारांच्या वादळात गुंतलेले होते ...निसर्गरम्य वातावरण हिरवी झाडे झुडपे पक्ष्यांचा कलरव सर्व ओळखीचाच नाद होता ,पण त्याकडे प्रंशातचे लक्ष नव्हते हृदयातील रुदन आणि शब्दांचा भडिमार सारखा डोक्यात घोंगावत होता....


जसा जंगलास वणवा स्वाहा करतो आणि ही हिरवी सृष्टी गिळंकृत करतो ..त्याप्रमाणे प्रशांतची मनबुद्धी चतुरपणा नष्ट होण्याच्या मार्गावर होती. तसे अनेक ऱ्हास होऊन तो आतून खंगत चालला होता....


तेवढ्यात प्रशांतला ठेच लागली आणि तो खाली पडणारच होता तोच सुमेधाने त्याला सावरले होते आणि प्रशांत तसाच वाकून सुमेधाकडे टक लावुन बघत होता आणि सुमेधा पण त्याच्या डोळ्याला डोळा लावून बघत होती आणि त्याचे दोन्ही हात घट्ट पकडून थोडी वाकलेल्या अवस्थेत उभी होती तशिच नजरानजर झाली ..क्षणभर दोघांच्या ह्रदयातली धडधड वाढली आणि ते दोघे भान विसरले .. इतके जवळ आले होते की त्या दोघाच्या श्वासांचा आवाज त्यांना जाणवत होता...

काही वेळ दोघेही तशाच स्थितीत होते....प्रशांतने स्वतःला सावरले आणि तटस्थ उभा राहिला सुमेधाच्या तक्षण तोंडातून अस्फुट स्वर बाहेर पडला तो शब्द प~प~ प्रशांत कसा पडलास आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला... 

आणि समोर जाऊन उभी झाली .सई दुरून बघत होती तिला काही लांबून काय झालं काही समजले नव्हते... सईला सुमेधाचे ओठ हलताना दिसत होते म्हणजे सुमेधा बोलत आहे म्हणून ती अजून थोडी जवळ आली परंतू दोघांच्या मध्ये जाणे योग्य होईल का हाच विचार ती करीत होती , 


सई तिथेच थबकली जाणून बुजून त्या दोघांच्या मदतीला आली नाही पण सुमेधाचे ओठ उघडझाप करताना तिने बघितले हळूहळू ती जवळ यायला लागली. सईच्या चेहऱ्यावरती एक रहस्यमय मुस्कान होती...


मनातल्या मनातच तिने निश्चय केला की आता सुमेधाचे बरे होण्याचे दिवस सुरू झालेले आहेत ती देवाला धन्यवाद द्यायला लागली आणि म्हणाली बरं झालं देवा तू मला बुद्धी दिली आणि मी प्रशांतला बोलावून घेतले नाहीतर मी एकटीने काय केले असते सुमेधा जवळ जाऊन उभी राहिली आणि म्हणाली आज मला एक गोष्ट   

माहित झालेली आहे .... तुला काय सांगू मला किती आनंद झाला आहे , आज की नाही माझी सखी बोलायला लागली आहे....खरंच ग सुमू तुला सांगते आज ना मी अतिशय खुश आहे.....


सुमेधा खाली मान टाकून चुपचाप मळ्यातल्या झोपडीत आली व खाटल्यावर येऊन बसली....सई पुन्हा तिच्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली ....तुला प्रशांत सोबत बोलताना मी बघितले आहे.. माझ्याशी ही बोल ना सुमू ..! मी तुझा आवाज ऐकण्यासाठी किती तडपती आहे ...आधी आपण किती बोलायचो नाही का? सई काकुळतीच्या स्वरात तिची अार्जव करीत होती.. तरीपण सुमेधा एक शब्दही बोलली नाही ....! 


सईने सुमेधाला पाणी पाजले आणि प्रशांत तिच्या दुसऱ्या बाजूला खालीच बसला दोघांनीही तिच्यावर प्रश्नाचा भडिमार केला परंतु सुमेधा काही न बोलता घरच्या वाटेला लागली मागोमाग सई आणि प्रशांतला पण जावे लागले...तिघेही आपआपल्या घरट्यात परतले होते....


घरी जाताच सई सुरेशला घटित घटना सांगू लागली सुरेश मनाला जर अश्या घटना रोज घडल्या तर सुमेधा पुन्हा बोलू लागेल तिला रोज कुठेतरी फिरवायला नेत जा.ती नक्कीच बरी होईल धीर सोडू नकोस, तू जिद्द ठेव तू तिला बोलते करून दाखवशीलच मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ...


तिच्या मनात द्वंद स्थिती आहे तिला प्रशांतचा सहवास जितका मिळेल तितकीच ती खुलेल आणि पूर्वीसारखी होऊ शकेल एखाद्या मानसोपचाराचा सल्ला घ्यावा लागेल... सुमेधाच्या डोक्यात काय चाललं आहे त्याचा थांगपत्ता आपण लावू शकत नाही त्यामुळे अडचणी येऊ शकतात ....उद्या आपण सुमेधाला डॉक्टरांना दाखवायचं का..?


सई म्हणाली..! पहिले मला प्रशांतला विचारून घेऊ द्या मी आत्ताच त्याला फोन करते सईने प्रशांतला फोन लावला तिकडे प्रशांत हॅलो म्हणाला.तेव्हा सई ने  

सुरेशलाशी बोलायला सांगितले ..आणि सुरेशला फोन दिला .. ती स्वयंपाक घरात निघून गेली सुरेश आणि प्रशांत दहा-पंधरा मिनिट फोनवर बोलत होते सई काम आटोपून बाहेर आली आणि म्हणाली...!

काय ठरलं काय म्हणाला प्रशांत

सुरेश म्हणाला...! तो तयार आहे उद्या सकाळी आठ वाजता इकडे येणार आहे. प्रशांतच्याच गाडीने जायचे आहे .मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतोय, तू सकाळी सुमेधाला इकडे घेऊन यायचं आणि अभी पणूला पण सोबत घेऊन जाऊया .. भरपूर दिवस झाले मुलांना कुठेच नेलं नाही त्यामुळे आपण घेऊन जाऊ या त्यांना आणि निवांत जेवण करून झोपी गेलेत....


चैतन्यमयी पहाट झाली धरतीवर सूर्य येण्याच्या तयारीत होता आभाळभर लाली पसरली होती जशी काही नवीन नवरी नटून-थटून मंडपात येती आहे..

अशी निसर्गाची अलभ्य अप्रतिम रचना क्षितिजाला अजुन खूलवत होती... सईने भरभर काम आटोपले, नाश्ता बनवला आणि दुपारच्या जेवणाचा डबा तयार केला मुलांनाही उठवून लगेच तयार व्हायला सांगितले, सुरेश पण सईला हेल्प करीत होता...सईने पटकन आवराआवर केली आणि सुमेधाला आणायला तिच्या घरीपण गेली....तिला तयार करून घेऊन पण आली...


तितक्यात प्रशांतच्या गाडीचा आवाज आला ..

सईने प्रशांत करिता ही नाश्ता तयार ठेवला होता तो आल्याबरोबर त्याला नाश्ता दिला सर्वांनी पोटभर नाष्टा केला होता....खाण्यापिण्याची चिंता तीन तास तरी नव्हती... सुमेधाला घेऊन सर्व गंतव्य स्थानाकडे निघाले होते..


प्रशांतच्या बाजूला समोरच्या सीटवर सुरेश बसला आणि सुमेधा सई मुलं मधल्या सीटवर बसले ... प्रवासाला सुरुवात झाली... प्रशांत ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी चालवत होता त्याच्या मागे सीटवर सुमेधा बसली होती प्रशांतला आरशात सुमेधा दिसत होती तो मध्ये मध्ये तिच्याकडे बघत होता ती निर्विकार चेहरा करून बसलेली होती.... आणि कशाचा तरी विचार करताना दिसत होती....


अभी आणि पणू म्हणाली...!पप्पा पप्पा आम्हाला समोर बसायचं आहे तेव्हा प्रशांत म्हाणाला ...

 प्रशांत म्हणाला.. मी पण थकलोय गाडी चालवून आणि .. सुरेशला म्हणाला..! तू गाडी चालवतोस का मुलांना समोर बसू दे त्यांना मजा येईल.....आणि तो मागे येऊन बसला , सुमेधा मधातच अडकली बाहुलीसारखी आखडून बसली आज मुलांना खूप आनंद झाला होता ..

एक दिवस का नाही त्या अभ्यासाच्या कचाट्यातून बाहेर आले होते....


अभी आणि पणू त्या दोघांना पण सुमेधा विषयी सर्व गोष्टी सांगितल्या होत्या सईने..त्यानुसार सुमेधा मावशीला बोलते करायचे होते . म्हणून ते दोघे पण आता जोक्स वगैरे सांगायचे सर्व खळाळून हसायचे पण सुमेधा चेहरा निर्विकार करून बसून राहायची तिचा चेहरा निर्विकार मूर्ती सारखा स्थिर वाटायचा....


ठिकान आलेले होते जिल्ह्याच्या ठिकाणी गाड़ी येऊन पोहोचली .. सुरेशने डॉक्टरांची फोनवर आपायमेंट आधिच घेतली होती....

सुरेश म्हणाला ...! अभी पणू पहिले सुमेधा मावशीला डॉक्टरकडे घेऊन जाऊया नंतर तुम्हाला इथल्या पार्कला आणि किल्ल्यावर घेऊन जाऊ त्यानंतर काही मार्केटिंग वगैरे करायची झाल्यास करा मुलांनी होकार दिला..


सई म्हणाली ....! तोपर्यंत तुम्ही शांत बसा गोंधळ घालू नका आणि तुम्ही दोघ गाडीतच बसून राहायचं आहे...तेवढ्यातच डॉक्टर चव्हाण यांचा दवाखाना आला गाडीतून सर्व उतरले ...डॉक्टरांचे केबिन वरच्या माळ्यावर होती... वरती जिन्यावरून जात असता सुमेधाचा तोल गेला ती पडणारच होती .सुमेधा कमजोर असल्यामुळे हळूहळू पायऱ्या चढत होती प्रशांतचे लक्ष सुमेधाकडेच होते .तसाच तो सुमेधाच्या मदतीला धावला...

लगेच तिचे दोन्ही हात धरून तिला खांद्यावर घेतली आणि सर्रसर्र पायर्‍या चढू लागला तिने काहीच विरोध केला नाही ... प्रशांत वरती जाऊन गॅलरीमध्येच थांबला.

सुमेधाला अलगद खाली उतरवले आणि हळूच सोफ्यावर बसवले सईने वॉटर बॅग मधले पाणी पाजले सुमेधा खाली मान टाकून बसली होती....


कंपाउंडरचा आवाज आला तुमचा नंबर आहे साहेब, तिघेही जण सुमेधाला घेऊन केबिनमध्ये गेले डॉक्टरांनी या म्हणून म्हंटलं आणि सुमेधाची पूर्ण हिस्टरी जाणून घेतली आणि सुमेधाला एकांतात काही प्रश्न विचारायचे म्हणून सर्वांना बाहेर थांबायला सांगितले सुमेधाला सोडून सर्व बाहेर आले डॉक्टरांनी सुमेधाला काय विचारले काय नाही बाहेर कुणालाच समजले नाही तब्बल अर्धा तासानंतर डॉक्टरांनी बेल वाजवून कंपाउंडरला आत बोलविले आणि कंपाउंडर ने बाहेर येऊन सांगितले पेशंटला घेऊन या बाहेर आणि तुम्ही डॉक्टर साहेबांशी भेटून घ्या...

सईने लगेच जाऊन सुमेधाला बाहेर आणले आणि सुरेश व प्रशांत डॉक्टरला भेटण्याकरीता आत गेले डॉक्टर चव्हाण म्हणाले या बसा आपण पेशंटचे कोण आहात सुरेश आणि प्रशांतने आपला परिचय देऊन आपले नाते सांगितले डॉक्टर म्हणाले.....


पेशंटच्या घरचे कोणीच नाही का आले , सुरेश ने डॉक्टरांना पूर्ण कल्पना दिली की ती आत्ता माहेरी आलेली आहे आणि आम्ही तिला तुमच्याकडे घेऊन आलो आहे आणि बारीक-सारीक सर्व गोष्टी सांगितल्या डॉक्टर म्हणाले पेशंटला काहीही झालेले नाही फक्त तिला कमजोरी आहे आणि ती पूर्ण स्वस्त आहे प्रशांत म्हणाला डॉक्टर काय सुमेधा आपल्याशी बोलली....


डॉक्टर म्हणाले..! 

होय सुमेधा बोलू शकते ती माझ्याशी बोलली , पण तिला मी उत्तर देताना संभ्रमात पाहिले तिच्या मनावर काहीतरी खूप मोठे दडपण आहे आणि ते गुपित ती कुणालाही सांगू इच्छित नाही हे तिलाच ठाऊक आहे... तिच्या मनातलं गुढ उघडण्याचा मी प्रयत्न केला पण एका भेटीत ते शक्य नाही.... महिन्यातून चार वेळा तरी सुमेधाला घेऊन यावे लागेल , काही औषधे लिहून देतो ती सुमेधाला देत राहा त्याने तिचा आत्मविश्वास वाढेल आणि विशेष म्हणजे तिच्या जेवणाकडे लक्ष द्या...


सर्व गाडीजवळ येऊन थांबले सुरेशने किल्ल्याकडे गाडी घेतली, मुलांना तिथे खेळायला खूप ऐसपैस जागा मिळाली खाली-वर खूप मज्जा केली..आणि मुलं खेळण्यात दंग झाली इकडे तिकडे धावण्यात त्यांना मजा यायला लागली..


सई म्हणाली ..! किल्ल्याच्या पायथ्याशी आपण आधी जेवण उरकून घेऊया, हा बघा शिवाजीराजांनी किती सुंदर किल्ला इथे उभारला आहे इतक्या उंच डोंगरावर जनतेला सुरक्षित करण्यासाठी त्यांनी विचार केला .कित्येक दुष्मन मोगलकाळात राज्य गिळंकृत करायला तयार होते ,म्हणुन शिवाजीराजांनी अश्या दुर्गम भागात किल्ले उभारले .इथे शस्त्रसाठा करून ठेवायचे.

अश्या पद्धतीने अापले राज्य सुरक्षित केले..


बोलता-बोलता जेवण आटोपले आणि मुलं पुन्हा खेळण्यात दंग झाली.. सुरेश आणि सई पण एकमेकांच्या सहवासात आपापल्या प्रेमाची देवाण-घेवाण करीत होते....फिरता फिरता पूर्ण किल्ला बघून झाला.....सुमेधा थकलेली दिसत होती.सईने तिला पानी दिले आणि तिला एका प्रशस्त दगडावर बसायला सांगितले... सुमेधा चुपचाप बसली होती सर्व व्यस्त असल्यामुळे प्रशांत सुमेधा जवळ जाऊन बसला सुमेधाशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता...


प्रशांतने सुमेधाला किल्ल्याच्या काठावरून फिरवायचे ठरवले .त्याने सुमेधाचा अलगद हात पकडला आणि तिला म्हंटले चल इकडे फिरून येऊ या ती बाहुलीसारखी त्याच्या मागे मागे जावू लागली दोघांनीही किल्ल्यावरून खाली बघितले..


खाली बघता भव्य दिव्य निळ्या रंगाचा सरोवर दिसला.. ते नयनरम्य सुंदर दृश्य पाहताच बघतच राहिले... त्यात काही पक्षी बगळे राजहंस बागडत होते..जलक्रीडा करीत होते सुमेधा ते दृश्य बघून तिच्या चेहर्‍यावर थोडे मिश्किल हास्य दिसले आणि प्रशांतच्या मनाला आनंद झाला तो हर्षित होऊन अजून तिला विश्लेषण करून त्या जागेचे महत्त्व सांगत होता ..तिथूनच बाकीचे स्थळाबद्दल माहिती देत बोटाने दाखवत होता....प्रशांतचे मन उल्हासाने भरले होते आणि आपण लहान मुलांना सांगतो त्याप्रमाणे तो तिला सांगत होता ..सुमेधाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या ती वेळ तशिच थांबून राहावी आणि आपण सुमेधाजवळ बसून गोष्टी करीत रहावे असे त्याला वाटत होते.....


तिथे मोटर बोटही सूरू होती ते पक्षी राजहंस त्या बोटीच्या आजूबाजूला खेळत होते ते विहंगम दृश्य बघतच राहावे असं वाटत होतं प्रशांत सुमेधाला म्हणाला आपण मुलांना घेऊन तिथे जाऊ या तिथे मोटर बोट मध्ये सैर करूया...ते दृश्य मनाला आल्हाद देऊन गेले प्रशांतच्या दर्दी व्यक्तित्वाला ही उत्साहाची भरती आली होती तो क्षणापुरता स्वतःला विसरला होता आणि सो क्युट~~~ म्हणून ओरडला۔۔


प्रशांतने सर्वांना आवाज दिला आणि म्हणाला..!

तिथे मोटर बोट मध्ये सैर करूया चला खाली उतरा पटकन. मुलांनाही ते दृश्य तिथूनच त्याने दाखवले तेव्हा मुलं आनंदाने नाचू लागले आणि खूप खुशीत येऊन म्हणाले आम्हाला मोटर बोट मध्ये बसायचे आहे काका घेऊन चला नां तिकडे लवकर ....


प्रशांत म्हणाला..जाऊया बेटा चला...

सर्वजण किल्ल्याच्या खाली उतरले आणि गाडीत बसले जरी ते सरोवर वरून अगदी जवळ भासत होता तरी त्या डोंगराला वेढा मारून तीथ पर्यंत पोहोचायला त्यांना दीड तासाचा अवधी लागला...


तिथे पोहोचल्यावर त्यांनी मोटर बोट बुक केली आणि त्यात बसले सुमेधाला ही हळूच हात धरून त्यांनी व्यवस्थित बसवले. ते पक्षीराज हंस बदके जवळ येऊन दूर अजून दूर पळायचे हे दृश्य सर्वांना खूप आवडलं आणि सागरातील निळेशार स्वच्छ पाणी बघून साऱ्यांचे मन हर्षित झाले सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला आजची ट्रिप लक्षात ठेवण्याजोगी होती आज सर्वांनाच काही ना काही मिळाले होते ते आनंदाचे क्षण सर्वांनीच टिपले होते फक्त सुमेधाचे काही सांगता येत नव्हते तिला काय वाटत होते तिच्या मनात आनंद होता वा दुःख होते काहीच सांगता येईना ती निर्विकार चेहरा करून होती....


सर्वांचे मन खूप प्रसन्न झाले होते कित्येक वर्षात आजचा असा हा दिवस उगवला होता सर्वांनी हा दिवस खूप एन्जॉय केला मुलांनी पण खूप धमाल मज्जा केली.....


संध्याकाळ होणार होती आपल्या घरी परतणार तेव्हा सई म्हणाली.... अहो मला काही खरेदी करायची आहे मार्केट कडे गाडी घेता का..! जशी आज्ञा म्हणून۔۔ सुरेशने मार्केट कडे गाडी वळवली सईने काही कपडे मुलांचे ड्रेसेस वगैरे खरेदी केले....


प्रशांतने पण काहीतरी लेडीज कपडे घेतले..

बहुतेक सुमेधा साठी काही घेतले असावे त्याच्या मनातल्या भावना अजून जिवंत होत्या तो सुमेधा बद्दल खूप विचार करायचा त्याच्या आत्म्यात वास करणारी त्याची ती दुर्मिल अमूल्य वस्तु होती तो सतत तिच्या बद्दलच विचार करीत असायचा....


सईने म्हणाली... चला पटकन संध्याकाळ संपली , रात्र झालेली आहे आपल्याला जायला ही वेळ लागेल तिकडे सुमेधाच्या आईचाही फोन आला होता त्यांना मुलीची काळजी होते आहे , मी त्यांना सांगितले की सगळे सुखरूप आहोत आणि रस्त्यातच आहोत.. चला आता त्वरा करा निघा पटकन,


  उशीर होण्याचे कारण ही सईच होती ..परंतु तिला कोणी काही म्हणायची हिंमत नव्हती तशी ती खूप स्ट्राँग होती तिचा पत्ती सुरेश तिला खूप मान देत होता ती जे काही करते ते आपल्याच साठी करते आणि भल्यासाठी करते म्हणून तिच्या चुकांकडे कोणी लक्ष देत नव्हते....

चला म्हणून सगळ्यांना ती घाई करायला लागली. गाडी मार्गाला लागली प्रशांत मनातच विचार करू लागला गाडी गंतव्य स्थळावर येऊन पोहोचली....


गाडीखाली सर्व उत्तरले प्रशांतने सुमेधाला हात दिला परंतु त्याचा हात तिने झिडकारला आणि स्वतःचं उतरली. सुमेधाची भकास नजर पाहून प्रशांत पुरता हादरुन गेला.तिच्या अशा वागण्याने तो पुरता आतून दुःखी झाला तळमळला त्याचे सुख नियतीला बघवत नव्हते ज्या सुखा साठी तो तळमळत होता ते सुख हाती येता येता हरवत होते... विस्कटलेली मनाची स्थिती सावरण्याचा तो प्रयत्न करू लागला कुठल्याही गोष्टीला अंत असतोच नां, सुमेधाची सुंदरता तरतरी उत्साह सर्व संपल्यागत दिसत होती..

"परंतू प्रेम करणाऱ्या प्रेमवीरांना उपरी सौंदर्याशी काय देणे घेणे".. जसा दगडालाही पाझर फुटतो पण सुमेधाला कुठलाही पाझर फुटला नाही... तिचे हृदय पाषाणा पेक्षाही कठोर वाटत होते.... तिच्या अशा वागण्याने तो पुरता आतून दुःखी झाला कळवला तळमळला

तरी तो अजून पूर्ण खचला नव्हता ...आशेचा दीप तेवत होता....

.

सुरेश सुमेधाला तिच्या घरी पोहोचवायला तिच्या घरी गेला होता....


प्रशांत तोपर्यंत बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला गेला अन जाऊन मनसोक्त ढसाढसा रडला ..त्याचे हृदय भरलेलेचं होते..

सईने पटकन खिचडी आणि पिठले बनवले आणि सर्वांना जेवण करण्याची वार्निंग दिली ...जरी प्रशांतची इच्छा नव्हती जेवणावर तरीही सईच्या आग्रहाने दोन घास घेतले..


प्रशांत सईला म्हणाला सई मी उद्या सकाळी निघतो आहे मुंबईला...सई म्हणाली तु चार दिवसाकरीता आला नां ... आणि दोनच दिवसात जायला निघाला काय... तू असा कसा मध्येच जाणार ..

प्रशांत म्हणाला... आता नाही सहन होत ग सई तसेच इथे राहून मी काय करणार माझ्या हृदयाचे बाकी राहिलेले तुकडे ही राखेत बदलणार बघ....मी सर्वांचा विचार करतो पण माझ्या मनाचा कोणीच विचार करीत नाही...अन काय करणार मी इथे राहून तू बघतेच आहेस 

सुमेधाचे वागणे ती माझ्याशी कशी वागते आहे ..तिच्या मनात काय आहे कोणास ठाऊक, पण ती अशी ती माझ्या पासून रोज थोडी थोडी दूर जात आहे..जिला मी इतके प्रेम केले त्या प्रेमात नफरत मी नाही बघू शकणार तिच्या डोळ्यात आज-काल मला माझ्यासाठी राग दिसतो आहे..तिला मी नकोसा झालेलो आहे.. मला असंच वाटतं आहे

~~ एक दीर्घ उसासा त्यांने टाकला ....


सई म्हणाली ...मी काय बोलू मला ही काही समजत नाही ती दिवसेंदिवस डिप्रेशन मध्ये जात आहे डॉक्टरच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे तिला आठ दिवसात एकदा तरी घेऊन जावे लागेल ..

प्रशांत म्हणाला ...ती स्वतःचीच दुश्मन झाली असेल आणि सारं समजून उमजून आपल्या आयुष्याची राख रंगोळी करीत असेल तर दुसरे कोण काय करणार आहे...सई तू ऐक माझे तू पण तुझ्या संसारात सुखी आहे तू तुझे काम कर मी माझे करतो ..तसेच

तिला जीवनात सर्वेच प्रेम करणारे मिळाले आहे यापेक्षा अधिक आयुष्य जगायला काय पाहिजे ۔۔۔


सई म्हणाली۔۔۔ खरंच ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे

सुमू या गोष्टीत खूप भाग्यवान आहे तिला सगळे प्रेम करणारेच मिळाले आहे तरी पण तिच्या आयुष्यात तिला खरं प्रेम नसेल मिळाले तर ~~ सईच्या तोंडून हे एक वाक्य नकळत निघालं आणि खूप मोठ्या घातपाताचा सुगावा लागतो त्या प्रमाणे प्रशांतला आनंद झालेला होता ...

...प्रशांतला तिच्या तोंडून निघणारे हे वाक्य इतके जवळचे वाटले की तो आवासून तिला बघतच राहिला आणि हातावर हात ठेवून म्हणाला खरच सई नेमका या एका गोष्टीचा संबंध असला पाहिजे...

हीच गोष्ट सत्य आहे हीच एक गोष्ट तिच्या मनाला खात आहे आणि ती स्वतःला दोषी मानत आहे आणि ती स्वतःला नष्ट करायला तयार आहे... त्यामागचा उद्देश असाच असू शकतो...जरी त्या प्रेमाची ती भुकेली आहे पण तिला आपला संसार जास्त प्रिय आहे....त्यामुळे ती त्यांना सोडू शकत नाही आणि आपल्या प्रेमाला दुजोराही देऊ शकत नाही... हमखास शंभर टक्के हीच गोष्ट आहे.. सई तू मोठ्या पत्त्याची गोष्ट बोलली आहेस ...आणि 

अनमोल वस्तू हरवल्यावर त्या गोष्टीला मिळवण्यासाठी जसा क्ल्यू मिळतो शोध लागतो तसा आनंद आज प्रशांतला झालेला होता.... आज तिच्या मौनव्रताचा छडा लागलेला आहे....

 हमखास शंभर टक्के हाच संबंध असला पाहिजे ..वारंवार तो एकच शब्द उच्चारत होता.. प्रशांतच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती....

आजच्या दिवशी सई आणि प्रशांतला मोठा खजिना मिळाल्याचा आनंद झालेला होता....

 आणि बाय-बाय गुड नाईट म्हणून तो घरी गेला....

 36  

अनमोल वस्तू हरवल्यावर त्या गोष्टीचा जसा छडा लागतो शोध लागतो तसा आनंद आज प्रशांतला झालेला होता त्या गोष्टीला मिळवण्यासाठी आज आजच्या दिवशी सही आणि प्रशांतला मोठा खजाना मिळाल्याचा आभास होता प्रशांत खुशी खुशीतच घरी जायला निघाला आणि सई ला म्हणाला मी उद्या आठ वाजता ईकडे येतोय.... सई गमतीने म्हणाली.. अरे पण तू उद्या सकाळी गावाला जाणार होता ना.... प्रशांत मिस्कील हसला आणि म्हणाला नाही थांब जरा दोन दिवस अजून थांबतोय.


प्रशांतने सईचे खूप खूप धन्यवाद मानले आणि म्हणाला सई तू खूप चतुर बुद्धिमान आहेस ...

सई हसूनच म्हणाली... मग काय तर, तुला काय मी वेंधळी दिसते....

प्रशांत म्हणाला.....मानावं लागेल तुला तू मर्मभेदी मनकवडा आहेस आता मला काय करायचे तेवढेच सांग पाहू ,,

सई म्हणाली ....उद्याच्या दिवस थांब बघू ,,आणि 

गावाला जायचं म्हणून सुमेधाच्या घरी निरोप घ्यायला जा आणि विदाई घे, आणि घरी जाऊन सर्वांशी भेट. सर्वांना सांग की गावाला जातो आहे....

नंतर बघ सर्वांची प्रतिक्रिया काय होते ते खास करून सुमेधाची प्रतिक्रिया मला बघायची आहे... परंतु खरंच तू गावाला जाऊ नकोस हं, मी निक्षून सांगून ठेवते तुला..

बस तूला इतकेच करायचे आहे....


प्रशांत म्हणाला... ठीक आहे आज मी चार वाजता जाईन त्याआधी मी सुमेधा कडे जाईल सर्वांची भेट घेईन काय होते ते तुला कॉल वर सांगतोय मग ,,,सईने ओके म्हणाले आणि फोन ठेवला...


अगबाई राघवला फोन लावायचे विसरलेच होते मी ,म्हणत सईने राघवला फोन लावला सविस्तर 2 दिवसात काय घडलं इथे त्या घटना सविस्तर सांगितल्या.. डॉक्टर कडे नेल्याचे ही सांगितले डॉक्टरांनी तिला पुन्हा आठ दिवसात यायला सांगितलं आहे....


राघव म्हणाला .... बहुतेक मला असं वाटते की तुम्ही सुमेधाला तिथेच ठेवायला पाहिजे , 

सई पुन्हा म्हणाली... असं काही नाही जिजू तिथूनही येणे-जाणे होउ शकते... जर तुम्ही म्हणत असाल तर मी पोहोचवते सुमेधाला तिकडे..

राघव म्हणाला ...मी काय बोलू माझी तर ड्युटी असते मग तिला कोण आणने नेणे करणार आहे... निदान पंधरा दिवसात तरी हे काम शक्य झाले असते....


हे राघवचे बोलणे ऐकून सई जे समजायचं ते समजली,

राघव आपली जवाबदारी दुसऱ्यांवर टाकू पाहतो त्याची बिलकुल इच्छा नाही की सुमेधाला तिथून नेणे आणणे करावे..

 अशा बेजबाबदारपणे वागून सुमेधाचे जीवन त्यांनी वेदनेते बुडविले....


सई मनातच चरफडली , आणि म्हणाली... जेव्हा चांगली होती तेव्हा खूप उपभोग घेतला त्या बिचारीचा आणि आत्ता ह्यांना बहाणे मिळत आहे .... या लोकांमुळेच माझ्या सुमेधाची अशी हेळसांड झाली आहे....


तशीच रागाने चरफडत तिने प्रशांतला फोन लावला.... आणि राघवशी जे बोलणे झाले ते सर्व सांगितले आणि 2, 4 राघवला शिव्या पण देऊन टाकल्या.. तिच्या मनातला गुबारा राग प्रशांत समोर तिने मनसोक्त काढला तेव्हा कूठे सईचा राग थोडा शांत झाला....राघवची मनस्थिती ऐकून प्रशांतला ही पेचात टाकले..


प्रशांत म्हणाला... तूच सांग मी काय करावं ?.. 

सई म्हणाली.... सुमूची तब्येत बरी करण्याला हातभार लावावा व प्रयत्न करावा....त्यासाठी काही दिवस तू इथेच रहावे ...

प्रशांत म्हणाला....जशी तुझी इच्छा आहे तसं मी करायला तयार आहे...

सई म्हणाली...

नाहीतर तू असं करतोस काय प्रशांत , सुमेधाला कुठेतरी हिल स्टेशन वर फिरायला घेऊन जातोस काय....


प्रशांत म्हणाला.... ए ~~ सई काय बोलतेस तू..

अस काही तरी भलतेसलते विचार मनात आणू नकोस..

सई म्हणाली....अरे असं का बोलतोस प्रशांत इतके दिवस ती होतीस ना तुझ्याकडे एकटी मग आता का बरं नको म्हणतो ....

प्रशांत म्हणाला ....अगं तेव्हा ती कोमात होती ना. आता ती चालती फिरती आहे ....

लोक काय म्हणेल , राघव काय म्हणेल , बाकीचे नातेवाईक काय म्हणतील ,

सई म्हणाली....अरे प्रशांत तू त्या सर्वांची चिंता कशाला करतोस....आणि त्यांना सुमेधाची एवढीच काळजी आहे तर ते का नाही तिला वेळ देत... त्यांना जर काळजी असती ना ,तर स्वतः तिच्यासोबत सावलीसारखे राहिले असते ना, पण त्यांनी आपली जबाबदारी समजून घेतली काय , सुमेधाच्या भावनांची कदर केली काय....


सई पुन्हा म्हणाली.... फक्त तू एकटाच तिच्यासाठी राबतो आहे .... तू एकमेव तिचा आधारस्तंभ आहे ....

विचारी सुमेधाला सहन करण्यापलीकडे तिच्या हाती काहीच नाही ....ती सभ्य समाजात वावरणारी एक 

सुसंस्कारी , कर्तव्य पारायण स्त्री आहे आणि तिला आपला संसार आपले घर आपली मुलं ह्या व्यतिरिक्त तिने कोणताच विचार केलेला नाही....तिच्या संसारातले सर्वच व्यक्ति विशेष आहे प्रिय आहे या व्यतिरिक्त ती काहीच विचार करू शकत नाही ...


आणि हे बघ प्रशांत एक गोष्ट तितकीच खरी आहे की सुमेधाला तुझे सच्चे प्रेम समजले आहे..


सई पुन्हा म्हणाली.... राघव जेव्हा साजणीच्या कचाट्यात अडकला तेव्हा त्याला कसा काढायचा... या गोष्टीसाठी तुझी मदत घ्यायला व तुझा फोन नंबर घ्यायला घरी गेलो होतो...

जेव्हा आम्ही तुमच्या घरी गेलो ..तेव्हाच तुमच्या प्रेमाचा सुगावा लागला होता...

तुझ्या आईशी जेव्हा वार्तालाप झाला , आम्हाला अनेक गोष्टीचा उलगडा झाला आयुष्यात तू अविवाहित राहणार आहे आणि कुणाच्या तरी प्रेमात पडला आहे....  

परंतू आईलाच माहित नव्हतं की ती मुलगी सुमेधाच आहे म्हणून ....


तू विवाह न करण्याचे कारण वगैरे आम्हाला तिथेच समजले आणि सुमेधा तर आतून थरथरतच होती जेव्हा तिला माहीत झाले की तू आजीवन अविवाहित राहणार आहे , तेव्हा ती वेदनेने बेभान झाली होती ...सुमेधाला जशीच तुझ्या प्रेमाची जाणीव झाली होती ती आतिशय दुखी कष्टी व विचलित झालेली होती....

प्रशांत म्हणाला... तिच्या डोळ्यात दिसतं ग मला माझ्यासाठी प्रेम परंतु आता ते भाव जाउन तिच्या डोळ्यात फक्त मला वेदना दिसतात..."तिच्या प्रेमळ डोळ्यात बघुन मी जगतच होतो ना ...! पण आता तिच्या वेदना बघून मी संपतो आहे..."

"आधी मला तेच प्रेम बळ देत होते आता तेच प्रेम मला शल्य देत आहेत "आणि प्रशांतचा आवाज अचानक बदलला रडवेला झाला त्याचे हृदय भरून आले होते, आणि त्याला खूप खूप रडायचे होते ....

सई म्हणाली .....प्रशांत तू असा दुःखी होऊ नकोस आणि रडू नकोस मर्दा सारखा पुरुषार्थ कर आणि सुमेधा साठी जे काही करता येईल ते करून दाखव...

ठेवते मी फोन ,सई ने फोन ठेवला परंतु ती विचार करू लागली ,की आता प्रशांत जरूर रडत असेल....

तिचा अंदाज अगदी खरा होता प्रशांत कितीतरी वेळ शोकसागरात बुडाला होता..... आठवणीतली भाग्न मूर्ति कोरत होता... पूर्ण लेणीतच भेगा पडल्या होत्या, कधीकाळी त्याने विणलेले प्रेमाचे घरटे पूर्णतया विस्कटलेल्या स्थितीत दिसत होते..


सुमेधाच्या स्वागतात अंगणात फुलांचा सडा टाकण्याचे स्वप्न बघितले होते,परंतु आज त्याचा अंगणात पिसांचा सडा पडलेला होता आणि त्याच्या भावनेच्या 

भोवर्यात असंख्य पक्षीपंख पिसे उडत होती..... त्याच्या भावनांचा नांग्या ठेचुन मनसोक्त चुरगाळून फेकल्या होत्या.... आपल्या राहिलेल्या भग्न अस्तित्वासाठी लढण्याचा निर्धार करून जागायला लावणारा मानकवडा आकर्षित करीत होता.... त्या प्रीतीच्या रखरखत्या उन्हात स्वतःला झोकून तो चालत होता..पायाखाली वाळवंट तुडवत होता एखादा वाळवंटी घोडा प्रदर्शनार्थ शर्यतीत जिवाची बाजी लावीत असतो.अशासारखे तो आपले आयुष्य जगत होता.....


तरीपण त्याने मनाशी समझोता केला होता की ही न मिळणारी अप्राप्य गोष्ट त्याला प्राप्त करायचीच नाही...

हा सर्व नियतीचा खेळ असावा असे म्हणत तो जागेवरून उठून उभा झाला होता आणि आपल्या कामाला लागला नियतीशी मला नाही लढायचे जे नशिबात असेल तेच होईल त्यासाठी मी तयार आहे..... 


तिकडे रिया नित्या आईची रोज आठवण करीत होत्या आपला शाळा अभ्यास करीत होत्या, राघव सुमेधाचा स्वास्थ्यामुळे थोड़ा चिंतेत राहायचा , त्यामुळे हल्ली तो रोज दारू प्यायला लागला होता....ना बोलणारा कोणी टोकणारा नव्हता......


राजीव आणि संध्या आठवड्यात तरी राघव कडे येत जात असे आई-बाबाही राघवकडेच राहायचे, त्या दोघींना पण आजी-आजोबाचा चांगलाच लळा लागलेला होता....

सुमेधाची तब्येत बिघडली तेव्हापासून आजी-आजोबांनी पूर्ण जबाबदारी आपल्या अंगावर घेतली आणि त्या दोन निरागस मुलींचा प्रेम मायेचा आधार बणले....


राजीवला वेळ मिळत नव्हता त्याला त्याच्या कामाचा मोबदला म्हणुन " कृषिभूषण पुरस्कार " मिळाला होता त्याला नेहमी कार्यशाळेला भेटी घ्याव्या लागायच्या ۔۔۔۔निसर्ग शेतीवरती ही तो भाष्य करायचा , निसर्ग शेतीचे महत्त्व व पर्यावरण तसेच विषमुक्त अन्नधान्य निर्मिती कशी आवश्यक आहे याची पूर्ण माहिती तो गावोगावी फिरून द्यायचा मेळावा मेळाव्यामध्ये जाऊन पाणी माती, अमृतखत ,गो संजीवकांचे प्रात्यक्षिक करायचा सेंद्रिय शेतीचा मालाचे प्रमाणीकरण कसे करावे या सर्व बाबीवर मार्गदर्शन खूप महत्त्वाचे असतात , 

कुशल कृषी विषयक सल्ला देणाऱ्या मध्ये राजीवच्या नावाची प्रसिद्धी झाली होती..


परंतु तो राघव दादाच्या कर्तृत्वामुळे मनात विषाद वाटतं राहायचा.. राहून राहून त्याला दादाच्या गोष्टी आठवायच्या आणि सुमेधा वहिनीची आठवण यायची,

 वाटतं राहायचा त्या निरागस वहिनीची अवहेलना झाली होती पण तो काहीच करू शकत नव्हता त्याला तेव्हा यांच्या दोघांमधल्या गोष्टी माहीत पण नव्हत्या....


त्याची पत्नी संध्या पण सोशिक आणि संयमी ॲक्टिव्ह होती ती नेहमी राजीवला समजवायची तिच्या प्रयत्नाने तो या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करायचा तिच्या समजुतदारपणाने दुःख पचवायला त्याला मदत व्हायची..


इकडे संध्याकाळचे पाच वाजले होते प्रशांतने सईला फोन करून सांगितले थोड्याच वेळात सुमेधा कडे पोहोचतो आहे ... सई म्हणाली मी पण येते लागलीच तिकडे, आणि फोन ठेवला....


प्रशांत सुमेधा कडे गेला होता पण त्याच्या मनात असंख्य विचारांचे काहूर धूमसत होते... सुमेधाचे आई-बाबा समोरच अंगणात बसलेले दिसले, पाया पडून दोघांना नमस्कार केला....

आई म्हणाली...! अरे प्रशांत तू दोन दिवस झाले यायला आणि आमची आठवण आता आली तुला?..


प्रशांत गटपटला आणि म्हणाला..! आई सई ने मला तिकडेच बोलवले कारण सुमेधाच्या तब्येतीबद्दल चर्चा करायची होती आणि तिकडूनच तिने मला हॉस्पिटलला नेले ...आधी सुमेधा....म्हंटलं आज गावाला जायचे आई बाबाची भेट घेतल्या शिवाय कसा जाणार होतो मी... कितीही अर्जंट काम असलं तरी आईबाबा तुमची भेट घेणे जरुरी असते...आणि प्रवीण , पराग , सुमेधाचीही भेट घेणे जरुरी होते...म्हणून आधी इकडेच आलो ... 


बाबा म्हणाले..... आल्यासारखा राहायचे असते ना दोन चार दिवस तुझ्याबद्दल खूप आपुलकी,माया वाटते

आम्हा सर्वांना.... तू सुमेधासाठी खूप काही केलेलं आहे आणि करतोच आहे तुझ्यासारखा देव माणूस माणुसकी जाणणारा कुठे दिसत नाही...

असं परक्यासारखं का स्तुति करता आहात बाबा...


प्रशांत म्हणाला..! बाबा प्रवीण, पराग ,सुमेधा कुठे गेले दिसत नाहीत..

 आई म्हणाली ....प्रवीण सध्या इथे कुठे आहे तो तर सोलापुरात शिकतोय आणि पराग शेतात गेलेला आहे... सुमेधा तिच्या रूम मध्ये असेल... तोच आईने सुमेधाला आवाज दिला सुमू बेटा बाहेर ये ना बघ ना कोण आलेलं आहे...

प्रशांत आलेला आहे तुला भेटायला तो गावाला जाणार आहे सुमेधा रुमच्या बाहेर आली आणि एका खुर्चीवर चुपचाप बसली...

आई म्हणाली....तू बैस मी ना प्रशांतसाठी चहा बणवते , तोपर्यंत तू बोल त्याच्याशी .....

आई स्वयंपाक घरात निघून गेली बाबा अंगणातच बसून होते......

प्रशांत म्हणाला कशी आहेस सुमू ..? ठीक आहे ना..? सुमेधा अबोलच मौन राहाली मी मुंबईला निघतो आहे म्हणून पुन्हा एकदा भेटीसाठी आलो इकडे सर्वांच्या भेटी घ्याव्या म्हणतोय मग पुन्हा कधी येणे होईल माहित नाही... तू चलतेस का मुंबईला माझ्याबरोबर तसे डॉक्टरांनी तुला आठ दिवसात बोलविलेच आहे एकदा दाखवून दे आपली तब्येत तेवढ्यात सई पण आली आणि प्रशांत बोलने उचलून धरले आणि म्हणाली....


का नाही येणार सुमू मुंबईला तिला काय ठणठणीत बरं नाही व्हायचे तिकडे मुली वाट बघत आहेत....

सुमेधा चुपचाप ऐकत होती आता सईची टकळी सारखी सुरू झाली होती प्रशांतला थोडं समाधान वाटलं आणि मनात प्रशांत म्हणाला बरं झालं लवकर आली नाहीस तर अबोल वातावरणात मी किती वेळ बसलो असतो आणि काय बोललो असतो मला तर शब्द सुचतच नाही पुन्हा सई म्हणाली ...

सुमेधा जाणार आहेस का मुंबईला बोल ना तू जातेस का मुंबईला अग तुला तिथे बरं वाटेल बघ तू मागे कोमात होती ना तशा स्थितीतही प्रशांतने तुला कुठे कुठे नाही फिरवलं खूप कष्ट घतलेत गं तुला बरं करण्याकरीता... 


परंतू तू पहिले सारखी कुठे झालीस म्हणून म्हणते, तिथे तुला मोकळ्या वातावरणात मोकळा श्वास घेता येईल तू बरी झाली तर आपल्या रिया नित्या किती खुश होतील ...

हो ना गं मावशी एवढ्यात आई चहा घेऊन आलेली होती 


आई म्हणाली...

मी काय सांगू मुली जीव तुटतोय ग सुमूसाठी माझ्या पोटचा गोळा माय लेकीची आभाळमाया किती उत्तुंग असते ..त्याला कोणतीच तोडं नाही ती माया आईचे हृदय उघडून ही दिसत नाही.....


आभाळापेक्षा मोठी असते 

माझी सुमू माझ्या काळजाचा तुकडा आहे आणि अशी ती कोमेजलेल्या फुलासारखी सुकत चाललेली मला तर

नाही बघवत आता आणि आईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या .....


सई म्हणाली मावशी अशी रडत बसण्यापेक्षा सुमेधाला सांगा की तिकडे मुंबईला कितीतरी मोठे डॉक्टर साहेब ते करतील ना सुमनला बरी 

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama