भाग50"रूनुझूनुपैंजनाची"कादंबरी
भाग50"रूनुझूनुपैंजनाची"कादंबरी


भाग 50" रूनझून पैंजनाची"..कादंबरी"
किती छोट्या छोट्या गोष्टींनी खुश होतात माझ्या निरागस छकूल्या खरंतर हे खुश होणंच आपण विसरून तर नाही ना जात ...!! लहानांना मनाजोग मिळाले की मनमुराद हसतात,
सुमेधाला मुलींचे खूप कौतुक वाटले आणि खूप लाड करावासा वाटला तिघी पण एकमेकाशी लाडीक वागत होत्या या खुश होण्यामागे पण एक मजा असते कशे पंखासारखे मन हलकं होत आणि आनंदात समाधानात उडत असतं....
आयुष्य सगळ्यांना वेगवेगळे रंग दाखवते सर्व गोष्टी कितीही प्रयत्नांनी प्रामाणिकपणे पुर्ण केल्या तर अशक्य असं काहीच नाही हे जरी सत्य असले तरी त्या गोष्टींच्या कृतीच्या परिणाम म्हणुन मिळणारे यश १००% आपल्याला हवे तसेच मिळेल हे खात्रीपूर्वक नाही सांगता येत, सुमेधाच्या बाबतीतही असंच काही घडत होतं.....! अथक प्रयत्नांनंतर मिळणार्या यशासाठी तुम्हाला नशिबाने साथ दिली पाहिजे ..तेव्हाच तो आनंद मिळतो यासाठी प्रत्येक गोष्ट आधी तुमच्या नशीबात असावी लागते तरच प्रयत्नांना यश लाभते हेच सत्य आहे ...
मुलांचे मन कसे नाजूक रेशमी धाग्यासारखे कच्चे असतात थोडे ही शब्दांचे चूकामूक झाली तर त्यांचे मन तुटायला वेळ लागत नाही त्यांच्या मनात तीच गोष्ट ठाम बसून राहते आणि ते द्वेष करायलाही मागेपुढे बघत नाही आई असो वडील असो की कुणी प्रेमी प्रेमिका असो मनाचे शब्दबान जर उरी लागले तर ताडकन मडक फुटायला वेळ लागत नाही त्यामुळे सुमेधा त्या कोवळ्या वयाच्या कोमल मुलींना नेहमी जपत होती...!!
मुलींचे प्रेम टिकून राहावं म्हणून ती आटोकाट प्रयत्न करीत होती कधी तिने आपल्या सुखाचा विचार केला नाही
" नाती जोडायला कधी कधी एक क्षणही पुरतो तसेच नाती तोडायला काहीच वेळ लागत नाही, मात्र नाती टिकवून ठेवण्यासाठी वर्षानुवर्षे ती जपावी लागतात त्यांना प्रेमाचं खतपाणी घालावं लागतं...तरच ते झाड वृक्ष होते अन्यथा
ते झाड सुकायला वेळ लागत नाही...सुमेधाच्या बाबतीतही असंच काही होतं ती वरचेवर काळजी घेत होती म्हणून तिच्या मुली आजही तिच्यावर जिवापाड प्रेम करत होत्या ....!
मुलांप्रती पालकांचेही ही एक कल्पना विश्व असते काही वेगळे स्वप्न असतात त्यात राजकुमार,राजवाडा ,निसर्ग सगळे सगळे म्हणजे कल्पनेपलिकडचे विश्व असते..
मुलींच्या भविष्याबद्दल सुमेधा फार चिंतेत होती जोडीदार नव्हता आजी आजोबाचे विचारही आता जुने झाले होते मुलींच्या मनाप्रमाणे ते आपल्या परीने आपला साथीदार कसा असावा ? स्वप्न पाहत होत्या आणि आभासी विश्व निर्माण करीत गप्पा मारत आरामात आईच्या कुशीत आनंद उपभोगत होत्या तशिही कुशीची ऊब शांत करते मनाला...!!
सुमेधा मुलींचे बोलणे ऐकून म्हणाली ..."साथीदार कसा हवा आपल्या आयुष्यात शोधताना अशा व्यक्तीला शोधा, ज्याला फक्त तुम्ही हवे आहात, बाकी पैसा, नाव, इज्जत, हे सर्व ती आपोआपच मिळेल आणि हेच प्रेम आयुष्यभर सोबत राहिल त्याशिवाय साथीदार या शब्दाची व्याख्या ही अपुर्णच आहे असं मला वाटतं ..त्यावर रीया म्हणाली एकदम खरी बोलली आई मला तुझं म्हणणं पटलं....!!
शिक्षण ,घर ,संसार ,जबाबदारीत रमणारी सुमेधाने कधी स्वतःकडे लक्षच दिले नाही आणि तिच्याकडे कोणाचे लक्ष कुठे,पण काही भावनांची घुसमट आठवणींचे मळभ ,नात्याचे जोखड असताना तिला कुठे तरी एक अलवार अशी साद आली ,तिने दुर्लक्षित केले तरी वारंवार प्रतिध्वनी प्रमाणे तिचा पाठलाग होत होता ,अखेर तिच्या ही मनाने साद घातली होती....
पण तिच्या प्रेमाचे आयुष्य अपूर्णच राहील ही शंका वेळोवेळी तिच्या मनात पिंगा घालत असे, आता तर शक्यच नव्हते आधी मुलींचे बघायला हवे, तिला आपल्यापेक्षा प्रशांत चे खूप वाईट वाटत होते त्याला कधीच कुणाचे प्रेम मिळाले नव्हते तो एकटाच आला आणि एकटाच संपणार आहे की काय असं सुमेधा सारखा विचार करीत होती,तसा त्या दोघांना ही गरज होती एक अनुरागी सानिध्याची..!!
संवाद ,काळजी ,एकमेकांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची देवाणघेवाण ,चुकभुल सांगणारे नी अगदी लहान मुलासारखी काळजी घेणारा तिच्या ही आयुष्यात चालणाऱ्या क्षणांची माहिती काळजी आणि ह्यामुळे दोन नाजूक मने एक होत होती त्या वेड्या मनात अल्लड चाळे, लाडिक राग नी हक्काची विचारपूस,त्याच्या प्रत्येक संवादात आपले पण दिसत होते....
संवाद होता ज्यात दोघांचे एकच विश्व .....कधी भांडण नाही ... उगाच काही बोलणे नाही.... ठरवून काही मागणे नाही...…रुसणे किवा मनावणे नाही.... कधी मर्यादेचे दार ओलांडणे नाही.....फक्त गुंतलेले मन त्याच्यासाठी जगणे मरणे सततची हुरहुर...