Meenakshi Kilawat

Drama

3  

Meenakshi Kilawat

Drama

भाग29"रूनझून पैंजनाची"कादंबरी

भाग29"रूनझून पैंजनाची"कादंबरी

14 mins
176


   संध्या म्हणाली !! जर का सुमेधा ताईनी हो म्हटलं तर तुम्ही विवाहाला तयार व्हाल ना? प्रशांत काही क्षण अबोल राहिला त्याला वाटत होते की आपण निळ्या निळ्या आकाशात विचरण करीत आहो आणि झुल्यावीना झुलत आहोत त्याला त्याच्या कानावर विश्वासच बसेना खरच वाटत नव्हत् ,मनाशीच म्हणाला ! काय असं होऊ शकते माझ्या जीवनात सुमेधा येऊ शकते,त्याने मोठ्या धीराने मनावर ताबा ठेवला हे सर्व ऐकुन तो डगमगला नाही हुरळून गेला नाही आणि म्हणाला ! तसं जर झालं तर मी स्वताला भाग्यवानच समजेल आणि म्हणाला राजीव दादा,,माझ्या जीवनात यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट आहे काय ?

 इकडे सईचा प्रयत्न सफल झाला होता ,रात्रभर सुमेधा विचार करीत राहिली तिला सत्य परिस्थितीचा आरसा तिच्या मैत्रिणीने दाखवला मनोमन तिने सईचे धन्यवाद केले आणि म्हणाली तू म्हणतेस ते बरोबर आहे तुझे उपकार मी या जन्मी विसरणार नाही,


तिकडे राजीवने आणि संध्याने प्रशांतला राजी केले होते मग काय सकाळी उठून दोघे ही बातमी ध्यायला आई-बाबा कडे गेले आई बाबाला ऐकून अतीशय आनंद झाला,

सई सकाळी सकाळी उठली तेव्हा सुमेधा तिच्याकडे बघत होती आणि डोळ्यात प्रेम वात्सल्य तरळत होते, सई दचकून उठली आणि म्हणाली !अगं तुला काय झाले तू का बर अशी माझ्याकडे बघत आहे मला दृष्ट लावते की काय मी एवढी सुंदर आहे की काय सुमेधा च्या चेहर्‍यावर एक शांत स्मितहास्य होते आणि ती आज फारच सुंदर दिसत होती तिने हळूच सईचे दोन्ही हात धरले आणि म्हणाली ! तू मला जीवनाचा अतिशय बहुमूल्य उपहार दिला आहे माझ्या डोळ्यावरची झापड उघडून नवीन आरसा दाखवला तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही, तू म्हणते ते मला पटलं आहे मी प्रशांत सोबत लग्न करायला तयार आहे,

तेव्हा सईला खुप आंनंद झाला आणि सई जोर जोरांनी टाळ्या वाजवायला लागली टाळ्यांचा आवाज खाली गेला तेव्हा धावतच संध्या रूम मध्ये आली आणि असं काय घडलं म्हणून बघू लागली तेव्हा तिला दोन्ही मैत्रिणीची गळाभेट होत आहे आलिंगन देऊन दोन्ही हसत आहेत असं दृश्य दिसलं जे समजायचं ते समजली संध्या ने आवाज दिला अग सई आणि वहिनी काय झाल तुम्ही का बरं सकाळी सकाळी एवढ्या मोठ्याने हसत आहात?

सई म्हणाली !! अगं खूप आनंदाची गोष्ट आहे सुमेधा ने लग्नास होकार दिला आहे ,

संध्या म्हणाली !! खरच की ही गोष्ट अतिशय आनंदाची आहे,ही बातमी ऐकायला आमचे कान केव्हाचेच आतुर झाले होते ,ही गोष्ट मी बाहेर जाऊन राजीवला सांगते ,

सई म्हणाली !! थांब संध्या मी पण तुझ्याबरोबर 

येते आपण दोघी मिळून ही गोष्ट आई बाबाला सांगायची आहे. आधी मला थोडा वेळ दे मी माझ्या मैत्रिणीची दृष्ट काढणार आहे कोणतीच अडचण येऊ नये म्हणून आणि लगबगीने सई उठली,आणि किचन मध्ये गेली आणि दृष्ट काढण्याचा साहित्य घेऊन आली आणि खरंच सुमेधा ची तिने दृष्ट काढली संध्या म्हणाली मला पण दे थोडं सामान मी पण प्रशांत भाऊजी ची दृष्ट काढणार आहे आज खूप आनंदाचा दिवस आहे प्रशांत भाऊजी ने पण होकार दिला आहे, आत्ता काय खूप मजा करूया आपण, सुमेधा आतून गलबलली मनातच म्हणाली माझ्या सासरचे सर्व लोक माझ्यावर किती प्रेम करतात माझ्या सुखासाठी कितीतरी प्रयत्न करीत आहेत आत्ता लगेच आईला फोन लावते आणि ही गोष्ट सांगते परंतु मी कशी सांगू राहू दे आई-बाबा करतील फोन,

सई म्हणाली!! सुमू चल माझ्यासोबत सर्वात आधी तुला प्रशांतबरोबर चर्चा करायला हवी तुम्ही दोघे आमने-सामने बसून चर्चा कराल तेव्हाच पुढील कार्यवाही करण्यात येईल आणि तुमच्या दोघांच्या लग्नाबद्दल विचार केल्या जाईल, तुमच्या दोघांच्या मनात काय आहे ते तुम्ही एक दुसऱ्यावर जाहीर कराल ,नाही तर बसशिल भांडण करत आधी सारखी ;;

सुमेधा म्हणाली !! सई थांब ना थोडा वेळ आधी चहापाणी नाश्ता होऊदे नंतर बोलू या कि सावकाश,

खट्याळ सई काही ना काही गंमत करीत होती तिच्या मिस्किल स्वभावात एक अनोखी रंगत होती मैफिल गाजवण्याची तिची कला खूप प्रभाव टाकणारी होती ती पुढील व्यक्तीला आपलंसं करून घेत असे आणि कितीही आतली गोष्ट असेल तरी ती पण उगाळून घेत असे,वेळ प्रसंगी कठोर बोलण्यासही घाबरत नसे , मदतीची भावना त्यामुळे प्रत्येकाला तिची मैफिल हवीहवीशी असायची,

  सई म्हणाली मला आज गावी जायचं आहे माझी मुलं वाट बघत असतील मी त्यांना एकटे सोडून आले आहे.

चहापाणी नाश्ता व सर्वांचे स्नान ही आटोपले बाबाने प्रशांतला जवळ बोलवले आणि त्यांनी त्याला विचारपूस केली , त्याच्या होकाराची प्रशंसा केली आणि म्हणाले !! सुमेधा आमची सून नाही मुलगी आहे आता तिचे कन्यादान आम्हीच करणार तू आम्हाला आमच्या मुलासारखाच आहे तू राघवची जागा भरून काढशील असा मला ठाम विश्वास आहे.

आम्ही सर्व तुझ्याशी कधीही दुजाभाव करणार नाही ,जसा आमचा राघव राजीव तसाच तू आमच्यासाठी , माझ्या सुमेधाला तु जिवापाड प्रेम करतेस हे आम्ही जाणतो,असच तुम्हा दोघांचे आजीवन प्रेम बहरत राहो आणि तुमचा संसार सुखाचा होवो हीच प्रार्थना मी सदैव देवाजवळ करील,

प्रशांतने आई बाबाला चरण स्पर्श करून नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतला .आणि म्हणाला बाबा तुम्ही काही पण काळजी करू नका मी सदैव सुमेधाच्या पाठीशी उभा राहील मलाही खूप नातेवाईक नाहीत मला आपल्यासारखे छान प्रेमळ आई-बाबा मिळाले यात अजूनच आनंद आहे,

तेवढ्यात सई हॉल मध्ये आली आणि म्हणाली प्रशांत थोडं काम आहे ये माझ्याबरोबर 

  प्रशांत म्हणाला चल सई येतोय ती तडक पायऱ्या वरून वरती जायला लागली प्रशांत पण तिच्या मागे गेला वरती आधीच सुमेधा येऊन रूम मध्ये बसली होती प्रशांत आणि सुमेधा ची नजरानजर झाली तशिच दोघांनीही आपल्या नजरा खाली वळवल्या तशीच सई म्हणाली!!

मी येते बर का तुम्ही सावकाश बोला

प्रशांत म्हणाला !! कशी आहेस ?

सुमेधा म्हणाली !! मी बरी आहे,तू कसा आहे प्रशांत?

प्रशांत म्हणाला !! मी ठीक आहे,आणि दोघंही इकडे तिकडे बघायला लागले मोठ्या प्रयासाने हिम्मत करून प्रशांतने सुमेधाला विचारले!! मी जे ऐकतो आहे ते खरं आहे ना सुमेधा;  

सुमेधा म्हणाली !! काय ऐकत आहे तू ;

प्रशांत म्हणाला !! अगं आपल्या दोघांच्या लग्नाबद्दल चर्चा चालू आहे ,

सुमेधा म्हणाली !! आपल्या विवाह बद्दल जी चर्चा होत आहे ती एकदम खरी आहे , आपल्या विवाहाला आधीच खूप उशीर झालेला आहे , मी माझा होकार कळवला आहे;;

सुमेधा म्हणाली !! तू तुझ सांग तू लग्न करायला तयार आहे ना माझ्याशी ? 

प्रशांत म्हणाला !! हे काय विचारते तू सुमेधा मी सदैव तुझा अन तुझाच होतो आणि जन्मोजन्मी तुझाच राहीन , आंधळ्याला काय हवं डोळे पण तू प्रकाश दिलेला आहे..

प्रशांत म्हणाला !! सुमेधा तू आपल्या लग्नासाठी होकार दिला तो मनापासून होकार दिला ना की कुणाचे ऐकून किंवा कुणाच्या दबावाखाली हा निर्णय तर घेतला नाही ना घेतला?

सुमेधा म्हणाली !! मनापासूनच होकार दिला मी जेव्हा मी कोमामध्ये होते त्यावेळेस तू माझ्याकरीता दिवस-रात्र एक करून खूप काही सेवा केली माझी, तुझ्या पायीच नवीन जन्म मिळाला मला,मी खोटं नाही बोलणार त्या वेळेसच मला तुझ्याशी प्रेम झालेलं होतं परंतु संस्कार आडवे आले आणि मी माझ्या कुटुंबाला तेवढच प्रेम करत होते त्यामुळे मी आपल्या प्रेमाबद्दल काहीच बोलली नाही तस दर्शवल सुद्धा नाही .

तुझी तळमळ मला दिसत होती ,परंतु मी काहीच करूं शकले नाही, माझ्यावर तू कित्तेक वर्षापासून प्रेम करीत होता पण मला माहीत नव्हते माझ्या लग्नानंतर जेव्हा मी तुझ्या आईला भेटायला गेले तेव्हा मला तुझ्या प्रेमाची महत्ता कळली, जर का आधी सांगितलं असतं तर मी हे लग्न केलं नसतं,

मला तेवढं काही समजतही नव्हतं जेव्हा समजलं तेव्हा फार उशीर झाला होता मला माझ्या तीन मुली आणि मोठ कुटुंब होते ,

आता मला असं वाटते की आई बाबाला माझ्या चिंतेतुन मुक्त करावे माझ्यापासून कोणाला त्रास नको, तसंच माझं कुटुंब मला खूप प्रेम करते त्यांना माझा कधीच त्रास होणार नाही तरीपण मी माझी जबाबदारी त्यांच्यावर लादू इच्छित नाही जर का मला प्रेम करणारा हक्काचा पती मिळातो आहे तर मी का बरं होकार द्यायचा नाही , आणि आज तो दिवस येऊन ठेपला तशी तजवीज झाली आणि सर्वांच्या मनातच आपल्या विवाहाबद्दल इच्छा जागृत झाल्या यापेक्षा अजून काय हवं मला, माझ्या मुलींना प्रेम करणारा बाबा मिळेल, 

पुन्हा सुमेधा म्हणाली !! मिळेल ना प्रशांत ?

माझ्या मुलींचा तुला त्रास तर होणार नाही ना ; तश्या त्या काही दिवस आजी आजोबा कडे आणि काही दिवस आपल्याकडे राहतील त्यांच्या शिक्षणाची जवाबदारी आजोबा-आजी सांभाळतील, 

प्रशांत म्हणाला !! तुझा माझ्यावर विश्वास आहे ना पूर्ण भरोसा आहे ना मग या अशा गोष्टी का बर करत आहे तू ? मला परका झाल्यासारखं वाटत आहे सुमेधा ,मी काय दूर गेलो म्हणून काही इतका परका झालो काय ? माझ आधीपासूनच प्रेम आहे की मुलीवर जर मी लग्न केलं असतं आधी तर मलाही एवढ्याच निरागस मुली असत्या तेव्हा तू असं दुजाभाव करू नकोस मी जिवापाड सांभाळीन माझ्या मुलीच त्यां सर्व आनंदाने करेल..जोपर्यंत मी जीवंत आहे तोपर्यंत सर्व करण्याची हमी माझी आहे तू कदापि टेन्शन घेऊ नको काळजी करू नको आई-बाबाला जरी त्रास होत नसेल तरी म्हातारपणी आपण का बरं त्यांना त्रास द्यायचा आपण आपल्या मुलींना छान सांभाळू या आणि त्यांचं भविष्य घडवू या ,

 आनंदाने सुमेधाने प्रशांतचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली मला तुझ्यावर आधीपासूनच भरोसा आहे तू आपल्या मनात किती झुरला झिजला मला पूर्ण कल्पना आहे तू कधीच कोणाला कसलाच धोका देणार नाही आणि कोणाचाही विश्वास घात करणार नाही,मला तुझ्या बद्दल पूर्णतया खात्री आहे.तेवढ्यात सईचा आवाज आला ती म्हणत होती चला खाली जेवण करायला स्वयंपाक तयार आहे;


प्रशांत म्हणाला !! काळजी घे स्वतःची आणि आपल्या मुलींची पुन्हा भेटू या लवकरच;


44

आनंदाने सुमेधाने प्रशांतचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली मला तुझ्यावर आधीपासूनच भरोसा आहे तू आपल्या मनात किती झुरला झिजला मला पूर्ण कल्पना आहे तू कधीच कोणाला कसल्याच प्रकारचा धोका देणार नाही आणि कोणाचाही विश्वास घात करणार नाही,मला तुझ्या बद्दल पूर्णतया खात्री आहे.तेवढ्यात सईचा आवाज आला ती म्हणत होती चला खाली जेवण करायला स्वयंपाक तयार आहे ;

प्रशांत म्हणाला !! काळजी घे स्वतःची पुन्हा भेटू या लवकरच ;


सर्वांशी बोलून प्रशांत गावी जायला निघाला  

राजीव आपल्या गाडीने बस स्टँड वर सोडायला गेला ट्रैवल्स बस लागली होती प्रशांतला बसमध्ये बसवून दिले लग्नाची तारीख ठरविल्यानंतर तुम्हा कळवतो ,इतके बोलून राजीव ने टाटा बाय-बाय केला, प्रशांत आपल्या मनात असंख्य स्वप्न रंगवत प्रवास करीत होता, त्याला सुमेधा सोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत होते हृदयात बसवून देखील अजून पर्यंत सुमेधा त्याला मिळाली नव्हती माहित नाही अजूनही नशिबात काय आहे मनातल्या मनात त्याला सतत भीती वाटत होती,

हा संसार इतका सोपा नाही हे त्याला पूर्णतया ठाऊक होते आपुलकीच्या माणसांसाठी सहार्यासाठी इथे प्रत्येक क्षण झटावे लागत असते, सर्व जवळ असून सुद्धा प्रेमाला मुकणारा मी दुनियेत काय एकमेव प्राणी आहे, माझ्या भावनांना असा इमानदारीचा रोग का बरं लागावा ?

माझा मित्र आहे सत्या कित्तेक प्रेमिका बदलून झाल्या दोन लग्नही झाले तरी त्याला कसं काहीच वाटत नाही परमेश्वराने त्याला कशाप्रकारचे हृदय दिले आहे कोणास ठाऊक आणि मी एक वेडा माझ्यासोबत असं का व्हावं मला असं प्रेमाचं वेड का लागावं ही मोठी हास्यास्पद गोष्ट आहे,

 तरी पन मी आज जाम आनंदी आहे " मनापासून प्रेम करणाऱ्याला कधी ना कधी तरी प्रेम मिळतच असते" ईश्वराची माझ्यावर पुरेपूर कृपा असावी म्हणूनच आज सगळ्यांचे मन बदलून मला सुमेधा मिळणार आहे , माझ्या पूर्ण इच्छा-आकांक्षा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे ही अप्रतिम सुंदर भेट कितीतरी तपश्चर्या केल्यानंतर मला मिळणार आहे यातच मला समाधान आहे,

अशा प्रकारच्या मनातल्या मनात गोष्टी करीत प्रशांतचा प्रवास सुरू होता तो एक प्रकारच्या नशेत असल्यासारखा गोड तंद्रीतच होता तो झोपला नव्हता तरी डोळे बंद करून मनातल्या मनात गोड स्वप्न बघत होता .


तेवढ्यातच काहीतरी मोठा आभाळ गडगडल्यासारखा तो आवाज होता त्वरित बसला जोरदार झटका लागला ,बसमधली माणसे एकमेकावर आदळत आडवीतिडवी झाली होती काहीच समजेनासे झाले गाडीत बसलेले लोकं जोरजोरात आवाज करीत होती. मेलो रे बाप्पा ;अरेरे ; क्षणात हाहाकार माजला, अनेक प्रकारचे आवाज येत होते, विव्हळण्याचा दारून आवाज येत होते, प्रशांत जाम घाबरला होता त्याला काहीच कळत नव्हतं आपण कुठे कुठल्या स्थितीत आहोत त्याने हे बघितलं हात हलत होते चारही कडे अंधार होता ,परंतु त्याला इकडेतिकडे सरकता आले नाही, प्रशांत ही सीट खाली पडलेला होता आणि त्याच्या अंगावर काहीतरी दडपण होते त्याला हलता ही येत नव्हते आणि उठता ही येत नव्हते त्याची स्थिती त्यालाच समजली नाही,

बाहेर ॲम्बुलन्स चा आवाज , स्ट्रेचरचा आवाज येत होता , मदत करणारे आले असावे, कुणीतरी सारखी वार्निंग देत होता आणि प्रत्येकाला सांगत होता घाई करू नका जिथे आहे तिथेच पडून राहा, तुम्ही आत्ता सुरक्षित आहात घाबरू नका आम्ही सर्वांना सुरक्षित जागेवर हलवीत आहोत ,लोकं जिवाचा आटापिटा करून हेल्प मागत होते , प्रशांतच्या अंगावर भलेमोठे काही तरी जड वजन पडले होते म्हणून तो निपचीत पडून राहिला, त्याला अजिबात हलता आले नाही पण डोकं शाबूत होते इकडे तिकडे पाहून तो अंदाज लावीत होता त्यास कल्पना आली होती की बाहेर काय झाले असेल,


 भरपूर लोकांना बाहेर काढले प्रशांतला ही नेण्यात आले स्‍ट्रेचरवर निजवले प्रशांतने हात पाय हलवायचा प्रयत्न केला परंतु पाय बिलकूलच हलले नाही तो मनातून घाबरला ,तरीपण त्याने पेशन्स ठेवला अरेच्या आता तर माझ्या पायावर वजन नाही मी मोकळ्या स्‍ट्रेचरवर आहे मग माझे पाय का बर उचलत नाही ,जशा स्थितीत होता तसाच तो पडून राहिला थोड्या वेळाने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा त्याने खिशात फोन चाचपडला पण तो तिथे नव्हता सिस्टरला विचारले माझे सामान कुठे आहे माझा फोन मिळेल का ? 

हो मिळेल ना तुम्ही आराम करा सर्व सुरक्षित आहे,सिस्टर ने प्रशांतला लगेच इंजेक्शन लावले, बोलता बोलताच त्याची शुद्ध हरपली.


प्रशांतला जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्याच्या समोर राजीव आणि सुमेधा दोघे ही होती , तो भानावर येऊन तडफडला राजीवला उद्देशून म्हणाला ! मला काय झाले तुम्ही दोघे कसे काय आलात तुम्हाला कोणी कळवले ? 

राजीव म्हणाला ! मोबाईल मध्ये आमचा नंबर वरतीच असल्यामुळे आम्हाला आधी सुचवलं , तसेच मी वहिनीला घेऊन त्वरितच निघालो ,

प्रशांत म्हणाला! मी ठिक तर आहे ना माझे पाय हलत नाही काय झाले ? 

राजीव म्हणाला ! प्रशांत तुम्हाला काही देखील झाले नाही सर्वात भाग्यवान ठरले बाकी डोक्याला किरकोळ मार लागलेला आहे ढोपरे खरचटले आहे  पायाला देखील थोडी जखम झालेली आहे खूप वेळ तुमच्या पायावर वजन होते म्हणून तुमचे पाय कार्य करीत नाही घाबरायचे कारण नाही एकदोन दिवसात ते व्यवस्थित आधी सारखे होईल;

 बसचा एक्सीडेंट खूप भीषण होता ,थोडक्यात तुम्ही सर्व बचावले अन्यथा काहीही होऊ शकत होते पाच जण जागेवरच मृत्यू पावले ट्रकने धडक दिली होती सध्या तुम्ही सिटी हॉस्पिटल मध्ये भरती आहात इथे डॉक्टर्स नर्स भरपूर स्टॉप आहे सर्वे मनापासूनच पेशंटची सेवा करीत आहे त्यांनी मोबाईल बॅग शोधून व्यवस्थित ठेवली आहे आणि ।

तुमच्या घरी आई बाबा दोघांना ही कळवले नाही ती दोघे घाबरून जातील ना म्हणून!

तेवढ्यात सिस्टर आली राजीवला उद्देशून म्हणाली !

आपणास डॉक्टर बोलवत आहे चौकशीकरिता होय आलोच; राजीव उठून आत गेला ,तेव्हा सुमेधा प्रशांतच्या बेडवर बसून डोळ्यातून अश्रू पाडत होती, तिचे दोन्ही हात धरून प्रशांत म्हणाला माहित नाही नियतीला काय मंजूर आहे, मला काय झाले सुमेधा माझे पाय तर साबूत आहे ना! तशीच सुमेधा कळवळून म्हणाली ! अरे प्रशांत घाबरू नकोस तू एकदम ठणठणीत आहेस मला त्यातच आनंद आहेत तुझे पाय ठीक आहे सर्व व्यवस्थित आहे, ईश्वरा तुझे माझ्यावर अनंत अनंत उपकार आहेत तू एवढ्या मोठ्या एक्सीडेंट मधूनच प्रशांतला वाचवले मी तुझी जीवनभर आभारी राहील ...

प्रशांतच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या त्याने सुमेधाचे दोन्ही हात घट्ट पकडले 

डॉक्टरच्या केबिनमधून राजीव बाहेर आला आणि म्हणाला !आपल्याला इथेच थांबावे लागेल जोपर्यंत प्रशांत बरा होत नाही,

सुमेधा म्हणाली ! सर्व ठीक आहे ना काही काळजी करण्यालायक बातमी नाही ना !

राजीव म्हणाला हो सर्व ठीक आहे पण पायावर वजन असल्यामुळे पाय सध्या चालण्या लायक नाही,म्हणून डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की जर तुमची इच्छा असेल तर पेशंटला तुम्ही ठेवू शकता किंवा घेऊन जाऊ शकता त्यांची काहीच मनाई नाही तरीपण प्रिकाशन्स म्हणून दोन-तीन दिवस तरी इथे थांबावे म्हणतो!

राजीव आणि सुमेधा रात्रभर प्रशांत जवळ बसून होते काय पाहिजे काय नाही ते बघत होते वेळोवेळी औषधी पण देत होते ती काळ रात्र संपली दुसरा दिवस उजाडला तेव्हा सर्वीकडे वातावरण बरे दिसले , सर्वांचाच बर्‍यापैकी उपचार झाला होता , राजीवला डॉक्टरांनी सांगितले की प्रशांतचे पाय सुन्न झालेले आहे त्याला तुमची गरज आहे त्याच्या पायाला रोज मालिश करून एक्झरसाइज करून पाय ताळ्यावर आणता येईल या सर्व गोष्टीसाठी वेळ लागेल त्यासाठी तुम्हाला दवाखान्यात ठेवने   अति आवश्यक आहे.


राजीव म्हणाला ! ठीक आहे डॉक्टर साहेब मी बोलतो घरच्यांशी!

बाहेर येऊन सुमेधाशी विचार विमर्श केला,

सुमेधा म्हणाली! तिथे मुंबईला प्रशांत जवळ कोणीच नाही तिकडे आई बाबाला माहीतच नाही काय करावं प्रशांतचाच सल्ला घेउया ,

प्रशांत म्हणाला! मला इथेच दवाखान्यात राहू द्या आणि तुम्ही दोघेही गावी निघून जा इथे स्टॉप बरा दिसतो आहे ,हे करतील माझी मदत त्याचे म्हणणे ऐकून दोघेही विचारात पडले आणि म्हणाले!

असं परक्यासारखं का बरं बोलतो प्रशांत आम्ही का तुमचे कोणीच नाही का आम्ही तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही एवढे लक्षात ठेवा ;;

आम्ही दोघेही इथे तुमच्याजवळ राहू कितीही दिवस लागू देत.. 

प्रशांत म्हणाला! परंतु राजीव तुम्हाला भरपूर कामे असतात तुमच्यावर सर्वांच्या जबाबदाऱ्या आहे तुम्ही एवढ्या साठी अडकणे योग्य नाही म्हणून मी म्हंटले , बाकी काही नाही जशी तुमची इच्छा;


तेव्हा सुमेधा म्हणाली ! प्रशांतचे म्हणणे बरोबर आहे तुमचे इथे राहून चालणार नाही राजीव भाऊजी तिकडे तुम्हाला खूप जबाबदाऱ्या सांभाळव्या लागतात म्हणून तुम्ही गावी निघून जा मी राहिन इथे प्रशांत जवळ ,

आई-बाबा मुलींचं बघून घेतील चार-पाच दिवस राहावे लागेल मला इथे,

राजीव म्हणाला ! खरं आहे वहिनी तुमचं तुम्ही असल्यावर मला काळजी करायची गरज नाही तुम्ही सांभाळून घ्याल माझे गावी जाणे आवश्यक आहे मी निघतो , प्रशांत ही काही बोलू शकला नाही राजीव लगेच निघाला प्रशांतच्या ऑफिसात सुट्टी साठी अर्ज वगैरे करून राजीव आपल्या गावी गेला इकडे सुमेधा मनापासून प्रशांतची सेवा करण्यात मग्न झाली..

जेव्हा सुमेधा कोमात गेली होती तेव्हा प्रशांत ने तिची मनापासून कित्येक महीने दिवस-रात्र सेवा केली होती, कितीतरी काळ ती कोमामध्ये होती तेव्हा प्रशांत ने तिला मुंबईला त्याच्या घरी नेऊन ठेवले होते तिच्यासाठी अनेक नाना प्रकारचे उपचार शोधून काढले होते वेड्यागत नवस केले होते तिच्यासाठी वनवन भटकला होता, त्याचे उपकार तर इतके आहे की ते जन्मभर फेडू शकणार नाही,

मग आता मला काहीतरी त्याच्यासाठी करायचे भाग्य लाभले आहे तो मी आनंदाने स्वीकारणार आहे, आणि ते माझे कर्तव्य समजून निभावणार आहे माझ्या जीवाला थोडे तरी समाधान लाभेल

    मला खरंच प्रशांतशी प्रेम झालेले आहे मी त्याच्याशिवाय राहू शकणार नाही मी प्रशांत सोबत सुरक्षित जीवन जगू इच्छिते आम्ही दोघांनी आधीच खूप दुःख पचवले आहे आत्ता नको देवा, नको रे आता बस कर फार झाल्यात परीक्षा ,आमचा विवाह सुख रूप होऊ दे आता फक्त आमच्या जीवनात आनंद भरून वाहू दे प्रशांतची तपश्चर्या फळाला येउ दे, आणि प्रशांत च्या पायावर ती हात फिरवू लागली.

तेव्हाच सुमेधाला बाबाची आठवण झाली, ती प्रशांत जवळ बसली होती प्रशांतला बाबाबद्दल माहिती विचारलीबाबा सध्या कुठे आहे प्रशांत त्यांच्यामुळे मी बरी झाली होती मला त्यांची नेहमी आठवण येत असते त्यांच्या औषधी मुळेच मी पूर्णतया बरी झाली होती, आठवते ना तुला तू नेहमी बाबाला घरी आणायचा ते कशे आहेत सध्या  प्रशांत म्हणाला!इतक्यात मी गेलो नाही मला वेळच मिळाला नाही,जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा त्यांनी मला नवीन नवीन भरपूर औषधीची माहिती दिली

जेव्हा मी खूप उदास असतो तेव्हा मी बाबा कडे जंगलात जायचो , मला इतक्यात ऑफिसच्या कामामुळे वेळच मिळत नाही.

सुमेधा म्हणाली! मग केला का कुणावर त्याचा प्रयोग 

प्रशांत म्हणाला ! ऑफिसात दोन-चार वेळा काम पडले होते एकाला चक्कर आली होती त्याचा इलाज मी तिथेच त्वरित केला होता एकाला उन लागून नाकातून रक्त वहात होते एकाला फिट आली होती, तिथे जवळच एक छोटेसे गाव आहे तिथे कुपोषित बालक असतात तिथे मी त्यांना प्रोटिन्स विटामिन्स घेऊन जातो आणि त्यांना काही औषध वगैरे पण देत असतो,

सुमेधा म्हणाली! छान वर्क अशिच सेवा घडू दे,

बघ बरं तुला आताच पुण्य केल्याचे फळ मिळाले, ईश्वर तुझ्या पाठीशी आहे म्हणूनच तुला त्याने वाचवले,बाबाचे हे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत,

खूप दिवस झाले मला पण बाबाची आठवण येते आहे,तुला थोडं बरं वाटायला लागले आराम झाला की आपण जाऊ भेटायला.. तू सावकाशपणे काही दिवस आराम कर तसेच तुला जराही वेळ मिळत नाही,हिमतीने

  सुमेधा प्रशांतला धीर देत होती परंतु आतून ती जाम घाबरली होती तिला तिच्या भविष्याबद्दल अनिश्चितता वाटत होती पुढे काय होणार याची तिला मनातून चिंता वाटत होती,

इतक्या मोठ्या दुःखातून ती निघाली होती तिचं आयुष्य पूर्णतया काळजी करण्यातच गेले होते, आधी राघवची काळजी केली आणि आता कुठे तिला थोडं बरं वाटायला लागलं होतं तर प्रशांतचा एक्सीडेंट तिच्या जीवाला काळजी लावून गेला हे जीवन असंच असत संसारात कधी सुख कधी दुःख यातून सुटका होणे नाही 


,,,, क्रमशः




Rate this content
Log in

Similar marathi story from Drama