Meenakshi Kilawat

Drama

3  

Meenakshi Kilawat

Drama

रूनझून पैंजनाची

रूनझून पैंजनाची

10 mins
36


भाग30" रूनझून पैंजनाची"कादंबरी


"जीवनात सुखासाठी मनुष्य फिरतो रानोमाळ,

 कुणास ठाऊक कुठे टपुन बसला काळ"


  सुमेधा प्रशांतला धीर देत होती परंतु आतून ती जाम घाबरली होती तिला तिच्या भविष्याबद्दल अनिश्चितता वाटत होती पुढे काय होणार याची तिला मनातून चिंता वाटत होती,


 तिच्या जीवनात बघायला गेले तर सुखाची कमतरताच होती परंतु ती दुःखाशी सामना करीत होती आणि तिने तसा प्रयत्नही केला आणि त्यातून निघाली परंतु आता काय अजून प्रशांतचा एक्सीडेंट झाला जीवनातील सुखदुःख दोघे जशा काही तिच्या सख्याच होत्या ,इतक्या मोठ्या दुःखातून ती निघाली होती तिचं आयुष्य पूर्णतया काळजी करण्यातच गेले होते, आधी सिया गेली नंतर राघव गेला मुलीची काळजी केली आणि आता कुठे तिला थोडं बरं वाटायला लागलं होतं तर प्रशांतचा एक्सीडेंट तिच्या जीवाला काळजी लावून गेला हे जीवन असंच असत संसारात कधी सुख कधी दुःख यातून सुटका होणे नाही. सुमेधा मनातल्या मनात तळमळत होती,

ईश्वराची प्रार्थना करत ती म्हणते;  

"भाजलेल्या काळजाला किती छिद्र आधीच होते अजून किती होणे बाकी कुणास ठाऊक"


"या प्रेमात माझ्या दुरावा येऊ देऊ नकोस देवा कधीच पुन्हा विरहाचा देवू नकोस ठेवा"


दिवस-रात्र क्षणाक्षणाला ती दक्षता घेत होती आणि प्रशांतचा इलाज करण्यात मग्न झाली होती , प्रशांत ची तब्येत बाकी ठणठणीत होती परंतु पायात पाहिजे तेवढी तरक्की दिसत नव्हती सुमेधा स्वतः प्रशांतच्या पायाची मालिश करायची,बाहेर व्हीलचेअर वर बसवून हॉस्पिटलच्या आवारात हिरवाईवर फिरवायची काठीच्या आधारे किंवा कदम कदम धरून चालवायची डॉक्टरांनी दिलेली एक्झरसाइज पूर्ण नेटाने लक्षपूर्वक करून घ्यायची किंवा स्वतः करायची,बोलून चालून प्रशांतला प्रसन्न ठेवण्याचा जीवापलीकडे प्रयत्न करायची..


प्रशांत निर्धास्त होता त्याला बरे होण्याची घाई नव्हती आता माझ्या जीवनात सुमेधा आहे.. आणि मी पटकन बरा झालो तर सुमेधा मजपासून दुरावेल मी सुमेधाच्या सानिध्यात काही दिवस तरी अजून इथेच हॉस्पिटलमध्ये रहावे लागले तरी चालेल,


  परंतु किती दिवस राहणार सर्वांचे सारखे रोज फोन येत होते प्रशांतचे आई बाबा पण आले आणि म्हणाले आमचा मुलगा देवाच्या कृपेने बचावला आहे त्याचे आयुष्य तुझ्यामुळे वाढले आहे त्याचे सर्व श्रेय सुमेधाला दिले अजून म्हणाले बघ आता आम्ही निश्चिंतपणे राहू.

तू प्रशांतचे जीवनात येणार आहे तुझ्या विरहात त्याने अख्खी जिंदगी गाळली म्हणून देवाने त्यास वाचविले आहे, आता प्रतिक्षा करण्याचे दिवस गेले आता तुम्ही दोघे साथीने जीवन जगावं अशीच आमची इच्छा आहे माझ्या मुलाच्या वणव्यात पावसाचा वर्षावा झालेला आहे ...

प्रशांतच्या डोक्यावर हात फिरवून बाबा म्हणाले! काळजी करू नकोस बेटा "जे होत ते चांगल्यासाठीच होत असते" तुम्हाला जवळ आणण्याचा कदाचित हा देवाचा प्रयत्न असेल,  आम्ही येतोय, एवढे बोलून आई-बाबा गावी जायला बाहेर निघाले , बाहेर निघाल्यावर दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले होते मुलासमोर त्यांनी अजिबात अश्रू येऊ दिले नाही सुमेधाच्या ही डोळ्यात पाणी तरळले यालाच वासल्य प्रेम म्हणतात....

येतो आम्ही स्वतःची पण काळजी घे आणि प्रशांत ची पण काळजी घे आता आम्ही निश्चिंत पणे गावाकडे निघतो

 तुझ्या देखरेखीत प्रशांत असल्यामुळे आम्ही दोघे निश्चिंत असतोय.

प्रशांतचे आई बाबा गावी गेले आणि सुमेधाला अजून काळजी वाटायला लागली ती एकटीच होती प्रशांतला जिवापाड जपण्याचा प्रयत्न करीत होती डॉक्टरांशी भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्ही पेशंटला घरी नेऊ शकता पण रोज एवढीच काळजी करावी लागेल ,


सुमेधा विचारात पडली की प्रशांतला त्याच्या घरी नेऊन मी तिथे राहू शकत नाही सध्या मी पूर्ण शुद्धीमध्ये आहे त्यामुळे इकडे खाई तिकडे पहाड अशी स्थिती झाली होती काय करू कुठे नेऊ

सुमेधा कशी जाणार अजून विवाह झालेला नव्हता म्हणून अजून काही दिवस राहण्याचा तीने मोठ्या मनाने निर्णय घेतला ..


रिया आणि नित्या घरी त्या दोघींची काळजी तिला वाटत होती सांभाळणारे जरी असले तरी पण लेकींची माया तिला विसरू देत नव्हती क्षणोक्षणी त्यांची सारखी आठवण होत होती.. या काही गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व दिवस छान गेले प्रशांत आणि सुमेधा एकमेकाच्या सहवासात गुंतून गेले....


 पंधरा दिवस झाले होते हे दिवस कसे गेले जाणवले नाही, प्रशांत ची तब्येत आता ठणठणीत झाली होती आता ते पुन्हा दूर होणार होते हॉस्पिटल मधून सुट्टी घ्यायचा विचार होता परंतु इच्छा नव्हती कितीतरी काळ विरहाच्या अग्नीत प्रशांत जळला होता आता तो अजिबात विरह वेदना भोगायला तयार नव्हता परंतु काय करणार प्रारब्धात जे काही असते ते भोगावच लागते, ती दोघे ही नवीन 

प्रियकर- प्रेयसी सारखे हातात हात घालून कित्तेक वेळ सोबत बसायचे मनातलं सर्व हितगुज करायचे.....


"बघितले तर प्रशांत आणि सुमेधा ही दोघे त्यांच्या दुनियेत एक विरह काव्य,कहानी होऊन बसले होते.... जीवनात असं काहीच नव्हतं परंतु निरनिराळे स्वप्न बघायचे आणि आठवणी जोपासायच्या , असे प्रगाढ प्रेम करणारे प्रेमवीर क्वचितच मिळतात".!!!

"एक प्यार का नगमा है "जिंदगी और कुछ भी नही तेरी मेरी कहानी है" हे गीत त्यांच्यावर हुबेहूब लागू होत होतं..... बारा पंधरा वर्षाचा काळ गेला नुसत्या आठवणी वर जगणं सुरू होतं, अजून भविष्यात काय होणार आहे हे अजून तरी त्यांना माहीत नव्हते 

भाग 48_" रूनझून पैंजनाची"..कादंबरी" 

सुमेधा स्वप्नात जरी रमली तरी तिला आपल्या मुलींचा तिला ध्यास असायचा ती त्यांना जरावेळ देखिल विसरू शकत नव्हती मध्येच तिला आपल्या दुडू दुडू धावणाऱ्या त्यांच्या पायातल्या पैंजनाची गोड रुणुझुणु धम्माल करणाऱ्या रिया,सियाची धम्मा चौकडी खेळणं बागडणं आठवत होती

 सुमेधाच्या नजरेसमोर चलचित्र सूरु होते आणि ती त्यात एवढी रममान झाली होती की तिला आजूबाजूचे काहीच भान नव्हते.आयुष्याच्या वाटेवर असे सुखद अनुभव देणारे प्रतिक्षेचे हे क्षण,खरं तर रोजच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देत असतात. ही प्रतिक्षा संपली तर आयुष्य कदाचित निरस होईल उद्याच्या पोटात काय दडलं आहे याची प्रतिक्षा करीत असतात हे उत्सुकत्तेचे क्षण जीवास हुरहूर लावतात,तितकिच गोडी ही निर्माण करतात पश्चिम दिशेच्या क्षितिजावर उभी असलेली व्याकुळ चंद्रकोर काहीशा गूढपणाने हसते . मनाची अवस्था तरी यापेक्षा वेगळी कुठे असते मन सैरभैर होत असते.

नुसत्या भेटीने तृप्त झालेले काही क्षण ओंजळीत असतात तर मिलनाची प्रतिक्षा करणारे कितीतरी अतृप्त क्षण वाटेवर उभे असतात.एक प्रेमकहाणी रात्रीच्या क्षितिजावर सूर छेडत असते नियती अशी नवीन कहाणी घडविण्यात दंग असते जीवन म्हणजे एक कहाणीच असते ना!!

सुमेधा आणि प्रशांतला ही अशिच प्रतिक्षा होती....

सुमेधा आपल्या भावी जीवनाचे स्वप्न बघत होती आणि प्रशांतला पण बरा होण्याची घाई झाली होती तो पण आपल्या भावी जीवनाचे स्वप्न रंगवत होता. या सर्व गोष्टी आयुष्यात होतच असतात आयुष्य म्हणजे रोजचं जगणं, तीच कामं, तेच दैनंदिन व्यवहार , मानव म्हणजे संघर्ष ज्या मानवाला संघर्ष नाही अश्या मानवांना जनावराची उपाधी देतात.

पण कधी कधी आयुष्य म्हणजे एक सुंदर स्वप्न, असंही म्हणता येत खरंतर स्वप्न ही संकल्पनाच किती मजेशीर असते! आपल्या कल्पनेतून आपल्याला हवं असलेलं सुंदर विश्व निर्माण करायचं स्वप्नातल्या या विश्वात मखमली रस्त्यावरून चालायचं अगदी नकळत्या वयापासून स्वप्नांची ओढ मनाला लागलेली असते, इवल्याश्या बाळाला देखिल झोपेत हसतांना गालावर गोड खळी दिसते ते बघून, त्याने एखादं गोड स्वप्न बघितलं आहे हे लगेच आपल्याला लक्षात येतं तेव्हा

नकळत वयासोबत स्वप्नांचं विश्व सुद्धा बदलत जाते. असंच हे स्वप्न कोवळ्या वयात जपलेलं, युवक युवती तारुण्यात येतात तेव्हा नक्कीच बघतात.तारुण्याचे हे दिवस म्हणजे फुलपाखरांसारखे रंगांनी रंगलेले,गंधाने माखलेले,प्रत्येकच गोष्ट काव्यमय वाटावी असे हे मंतरलेले गुलाबी दिवस,

असे हे स्वप्नांत गुंगणारे दिवस पुन्हा स्वप्नातच पोचवणारे कुणाची तरी स्वप्नात येण्याची दिवसरात्र वाट बघणारे पण सगळीच स्वप्नं खरी कुठे होतात ! खरं तर कुठलीच स्वप्न खरी होत नसतात किंवा ज्यांची स्वप्न खरी होतात त्यांनी स्वताला भाग्यवंत समजावं.

स्वप्नातल्या वाटा कितीही दूर जाणाऱ्या असल्या तरीही स्वप्न बघण्याचा मोह आपल्या मनाला मात्र काही सोडवत नाही. डोळ्यांच्या अथांग डोहात कितीतरी स्वप्न बुडालेली असतात. काही मागे पडलेली तर काही काळाच्या ओघात विस्मरणात गेलेली तर काही अप्राप्य बनलेली एखाद्या निवांत क्षणी डोळ्यातली ही स्वप्न पापण्यांच्या काठावर येतात. मनाचा वेध घेतात त्यातली काही स्वप्न अजूनही डोळ्यांना मनाला आणि आयुष्याला खुणावतच असतात. आभाळात दिसणाऱ्या चंद्रकोरी सारखी पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रापेक्षाही ही चंद्रकोर मनाला आकर्षून घेत असते कदाचित तिची भंगलेली अवस्था , आपल्या मनाची समजूत घालत असते आणि तसं पाहिलं तर स्वप्न प्रत्येक वयात आपली साथ देतात. पण तारुण्यातले स्वप्नं मात्र एक वेगळाच रंग घेऊन येतात. परी कहानीत रमणारं हे वय वास्तवा पासून दूर, स्वप्नांच्या जगात रममाण झालेलं असतं.  

सुमेधाला आपल्या जीवनात काय घडलंय तिला जुन्या आठवणी येत होत्या तीनं आपल्या लहान लहान मुलींना मोठं केलं त्यांच्या त्या गोड आठवणीत गूरफटली होती,किती सुंदर दिवस होते ते मुलींचे बाळ जीवन पुन्हा कधी बघावयास मिळणार आहे का ही कल्पनाच फक्त तिच्यासोबत आहे आता तर मुली आपल्या मोठ्या झाल्या आपलं जीवन सारं बदललेलं आहे कोणतीच गोष्ट आपल्या हातात नाही बघ कधी काय होईल कधीच सांगता येत नाही हे जीवन कसं होतं आणि कसं झालं आणि पुढे काय होणार हेही आपणास ठाउक नाही किंवा हे भाकीतही कुणी करू शकत नाही.स्वप्न ही चांदण्यासारखी असतात दुरून लुकलुकणारी त्यांना हातात घ्यायचा प्रयत्न कधीच करायचा नाही हातातून जर ती निखळून पडली तर, एका अनामिक भीतीने ती तळमळली तिला एकदम थरथरून घाम फुटला पण लगेच तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली मी इतके संघर्ष बघितले अजून कितीही संघर्ष येऊ देत मी लढा देणारच आहे त्यात मी स्वतःला जिंकूनच दाखवेन!!!!! त्यासाठी मला कितीही दुःख सहन करावं लागलं तरी मी मागे परतणार नाही मी मनापासून सामना करेन!!!


जेव्हापासून नित्याला माहीत झालं होते की आई प्रशांत काकाशी दुसरा विवाह करणार आहे तेव्हापासून नित्या हल्ली आईचा राग करायला लागली होती.....

वर वर बघितले तर रिया शांत दिसत होती तिच्या मनात काय होतं ते अजून तरी कळलेलं नव्हतं, पण नित्या बोलून दाखवत असे फटकळ स्वभावाची होती जे काही तिच्या मनात होतं ते पटकन बोलायची तेव्हा अजूनच सुमेधाला जास्त टेन्शन झाले होते मुलींच्या विरोधात जाऊन हा विवाह कसा होणार आहे याची पण तिला काळजी वाटत होती हा विवाह होणार किंवा नाही ही गोष्ट ही अनिश्चितच होती......!! 

46_

"बघितले तर प्रशांत आणि सुमेधा ही दोघे त्यांच्या दुनियेत एक विरह कथानक होऊन बसले होते.... 


जीवनात असं काहीच नव्हतं परंतु निरनिराळे स्वप्न बघायचे आणि आठवणी जोपासायच्या , असे प्रगाढ प्रेम करनारे प्रेमवीर क्वचितच मिळतात".


एकट्याने चालताना कंटाळवाणी वाटणारी वाट कुणाच्यातरी सोबतीने आनंदी वाटत असते, जीवनातील नीरसतेमुळे थांबलेली पावले कुणीतरी येऊन आपल्याला चालते करावे अशी अपेक्षा असते.

आयुष्यात आपण ठरवतो एक आणि होतं मात्र दुसरंच थोडक्यात काय तर आयुष्य म्हणजे एक रंगमंच यात कधी कोणता प्रसंग सामोर येईल हे कुणालाच सांगता येत नाही असे असले तरी मनात ठरवलेल्या काही गोष्टी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करितच असतो आणि मनाच्या एका कोपऱ्यात कायम स्वप्न मात्र जिवंत ठेवतो उराशी बाळगलेली काही स्वप्नं पूर्णत्वात न्यावयाचा प्रयत्न करित असतो....


विचारमग्न सुमेधा खिडकीतून बाहेरचे दृश्य बघत होती श्रावण सरी सारख्या पडत होत्या.बाहेर गार गार वारे वाहत होते आकाशात शामल ढगांची दाटी 

झाली होती असा अप्रतिम प्रकृतीचा सोहळा पाहून तिचे मन हळवे व्हायला लागले होते या सरींना काहीच बंधन नव्हते वाऱ्याच्या डौलाने बेधुंद पडत होत्या विचार करता सुमेधांला वाटले की निसर्ग किती भाग्यवान आहे जसं मनात आहे तसंच करतात पण मानवाला प्रत्येक गोष्टीत बंधन असतात,

 तिचे मनही उगाच हळवे हळवे होऊ लागले होते,कारण आता तिच्यासोबत प्रशांत होता तिच्या जीवनात प्रशांतची जवळीक तिला खूप सहारा देत होता," तनासोबत मनही भिजत होते मृदगंधात धुंद-धुंद होऊन दरवळत होते" भावनांच्या विविध रंगछटांचा मोहक इंद्रधनू अंतरी फुलत होता,

त्यातून सुमेधाचे होते कवी मन , मनातल्या मनात छान-छान कवितेचे बोल सुचत गेले,आणि गीत होऊन मधुर आवाजात गुनगुनायला लागली, रूमभर तो गोड स्वर प्रशांतच्या कानात जाउन त्याला धूंद करीत होता......

"आकाशाच्या मंडपाला होती कमान इंद्रधनुची  

आभाळ भरले ढगांनी वाहतो गार-वारा 

पावसाच्या लगबघिनं कोसळल्या धारा 

हिरव्या रानात नाचतो फुलवून मोर पिसारा निसर्गाचे रूप हजारो नाही त्याची गिनती,

देतो सहस्त्र हातांनी काय सांगावी त्याची महती".....

निसर्ग देखाव्यात सुमेधा तल्लीन होऊन गुनगुनत होती....

कुणीतरी आल्याचा भास झाला बघते तर काय ! आई बाबा दारात उभे होते ती वळली आणि म्हणाली कधी आली आईबाबा माझं लक्षच नव्हतं आई म्हणाली!! आत्ताच आलो ग सुमू म्हणून सुमेधाला आपल्या कवेत घेतले आणि म्हणाली..!! कशी आहेस तू आणि प्रशांत आम्हा सर्वांना तुमची खूप खूप चिंता व्हावयाला लागली होती.पाहिल्या खेरीज मन लागेना म्हणून निघालो दोघेही तुमच्या भेटीसाठी, कसा आहे प्रशांत बेटा?आई बाबा प्रशांत जवळ जाऊन बसले आणि विचारपूस करू लागले डोळ्यात माया,ममता दिसत होती, साश्रूनयनाने दोघे ही प्रशांतला म्हणाले!!

अजिबात काळजी करू नका प्रशांतराव लवकरच बरे व्हाल.. ‌‌....

प्रशांत म्हणाला!! काही दिवस कठीण आहे मग मी पूर्वीसारखाच होईल तुम्ही अजिबात काळजी करू नका ,परंतु आई बाबाला काळजी तर होणारच होती काही दिवसांनी त्यांचा लाडका जावई होणार होता ....


प्रशांतचा एक्सीडेंट झाला त्यामुळे त्यांचा पूर्ण कुटुंब परिवार चिंतीत होते, बरं झालं जीवावर बेतलं नाही कृपा आहे देवाची थोडक्यात बचावला आणि आज तो नीटनेटका दिसतोय यातच समाधान आहे....


गप्पागोष्टी झाल्या आई-बाबाची चिंता कमी झाली आई म्हणाली !! बेटा मी घरून टिफिन आणला आहे बघ ना तुला आवडेल हॉस्पिटलचे खाऊन खाऊन जीभ अळनी आणि बेचव होऊन जातं , सुमेधा खुप आनंदित झाली आणि म्हणाली खरंच का आई डब्बा आणला तू खूप दिवसांनी तुझ्या हातचे जेवण मिळणार आहे ....


आईने चार कंटेनर्सवाला टिफीन उघडला. एकात होत्या पोळ्या व परांठे, एकात टाॅमॅटो, बटाटा भाजी, एकात काकडीचे काप होते, मसाला भात आणि त्याच शेवटच्या कंटेनरमध्ये होती, एक छोटीशी डबी , आश्चर्य वाटून सुमेधा ने ती डबी उघडली, तर त्यात होतं लोणचं, कैरीचं लोणचं

   लोणचं बघून सुमेधाच्या तोंडाला पानी सूटले,,

कारण कुठलंही लोणचं तिला खूप आवडायचं...

तसा त्यांचा नाश्ता झाला होता, तरीपण तो दरवळ

लोणच्याचं फोडींना अच्छादून असलेला तो खार, ते लालसर असं किंचितसं सुटलेलं तेल, आणि त्या इवल्या डबीतून मुबलकपणे येणारा, लोणच्याचा सुवास,रूमभर पसरला होता....

आणि आपसुकच तिचं बोट लोणच्यात बुडून जिभेच्या टोकाला लागत, तिच्या तोंडून हलकासा चटऽऽचा आवाज आला. स्वादिष्ट होतं लोणचं चवीला.छान मिटक्या मारत आधी तिने खायला सुरवात केली,लोणच्याची डबी चाटून पुसून साफ करणारच होती त्याआधी तिने प्रशांत ला विचारले ,

तेव्हा तिचा पोरकटपणा आई बाबा बघत होते ही आपली बालिश सुमू आज किती दिवसानंतर बघायला मिळाली होती.....एका प्लेट मधे प्रशांत ला वाढून दिले , सुमेधाने प्रशांत ला विचारले तुला लोणचे देऊ का खूप सुंदर स्वादिष्ट आहे प्रशांत म्हणाला..!! अरे वा छान मला खुप आवडते लोणचं दे की.....संपूर्ण जेवणच सुंदर होतं आणि चटपटीत सुद्धा आज मस्त जेवण झाले होते.....


  इकडच्या तिकडच्या खूप गप्पा मारून झाल्या संध्याकाळचे पाच वाजले आई-बाबा म्हणाले आम्ही येतो ग पोरी संध्याकाळ होईल आता आम्हाला लगेच निघावं लागेल आमच्या होणाऱ्या जावया कडे लक्ष दे आणि लवकरच बरा झाल्यावर पटकन घरी घेऊन ये या बाबाच्या बोलण्यावर सुमेधा थोडी लाजली ...


प्रशांतला मनात खूप खंत होती की मी असा दवाखान्यात पडून आहे आणि सर्व आपल्याला बघायला येत आपल्यापासून सर्वांना त्रासच होत आहे वरवर पाहता तसं जाणवू देत नव्हता परंतु त्याला मनातून खूप ग्लानी होती पण त्याच्या हातात काहीच नव्हते होणारी घटना कधीही होऊ शकते त्याला कोणीच रोखू शकत नाही.....


सुमेधाचा साथ मिळाला होता एक्सीडेंट झाला तो मनातल्या मनातच विचार करू लागला देवाच्या मनात काय आहे कोणास ठाऊक मी सुमेधाला सुखी करायचं तर दुखी करत आहे माझ्यापासून तिला आनंद मिळायला हल होता परंतु ती आज अशी उदास आहे मी काय करू त्याची तळमळ त्यालाच माहीत होती आतल्या आत तो सारखा तळमळत होता.....


 परंतु काही दिवसाचाच त्रास आहे समजून त्याला दिवस काढणे गरजेचे होते त्यात त्याला हॉस्पिटलमध्ये सुमेधाचा साथ मिळाला यातच आनंद होता.....


क्रमशः


    



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama