Meenakshi Kilawat

Drama

3  

Meenakshi Kilawat

Drama

भाग27"रूनझून पैंजनाची"कादंबरी

भाग27"रूनझून पैंजनाची"कादंबरी

13 mins
218


डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले होते. राघवच्या ऑपरेशनची त्वरित तयारी करण्यात आली . सुमेधाने मनातल्या मनातच देवाला प्रार्थना केली .आपरेशन कठीण होते .राघवचे ऑपरेशन सक्सेस होऊ दे आणि लवकर बरा होऊ दे सुमेधाने अनेक साकडे घातले नवस बोलली..म्हणून कि काय तिची करून पुकार देवाने ऐकली आणि राघव बचावला किंवा त्याचे आयुष्य सरले नव्हते . तब्येत बरी झाली होती ...राघवला घरी आणले होते मद्यापासून दूर ठेवण्याचे डॉक्टरांनी निर्देश दिले होते...


 राघवणे ही अजिबात नशा न करण्याचा निर्णय घेतला होता आणि शपथ ही घेतली होती " ठेस लागताचं मनुष्य सुधारतो ही म्हण लागू झाली होती". काही दिवसातच राघव बरा झाला आणि आपल्या कामावर रुजू झाला....


परंतु नियतीने काही औरच मांडले होते तो पुन्हा कामावरून नशा करून येऊ लागला... घरची सर्व मंडळी चिंतेत पडली आता काय होईल, सगळ्यांनी राघवला खूप समजाविले.... पण त्याने कोणाचेच ऐकले नाही जे व्हायचे तेच झाले....


राघवच्या पोटात अग्नि भडकली सारख्या वेदना होऊ लागल्या,राघवला तुरंत हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले तो असहाय नेत्राने सुमेधा कडे बघत होता त्याने सुमेधाचे दोन्ही हात घट्ट पकडले व तो अडखळत बोलू लागला 

सुमेधाला वारंवार माफी मागत होता ,


राघव म्हणाला..!۔सुमेधा मी तुला खूप त्रास दिला परंतू यापुढे तुला कधीही त्रास देणार नाही .. 


 तोच सुमेधा म्हणाली.!۔डॉक्टर साहेब येत आहे तुम्ही शांत रहावे पण राघवला खूप काही सुमेधाशी बोलायचे होते. राघव म्हणाला ! सुमेधा आता मी नाही जगणार ग.

सुमेधा म्हणाली .!. अहो अस काही बोलू नका हो .

तुम्ही असं मन छोटं करू नका आणि घाबरू नका हिम्मत सोडू नका आणि हिम्मत खचू देऊ नका आम्ही सर्वच कुटुंबीय तुमच्या सोबत आहोत तुम्ही निश्चिंत रहा..


परंतु राघव म्हणाला.!. मला तुझ्याशी बोलायचं आहे खूप खूप बोलायचं आहे तू एकदा माझं ऐकून घे  

मी तुला खूप त्रास दिला आहे पण तू मला कधीही दूर केलेले नाही तू माझी धर्मपरायण पतिव्रता पत्नी आहे तू आपले पत्नीचे कर्तव्य पार पाडले पण मी नाही पाळू शकलो पतीचे कर्तव्य स्वत:ला नाही सांभाळू शकलो जीवनात खूप चुका करीत गेलो आणि तू मला असच माफ करीत गेली۔۔۔थोडं थांबून श्वास घेतले आणि पुन्हा बोलू लागला..

मला माहित आहे , प्रशांत तुझ्यावर जीवापाड प्रेम करतोय पण तू त्याच्या आहारी कधीच गेली नाही.. त्याचे प्रेम स्वीकार केले नाही..याचा मला सार्थ अभिमान वाटतो मला इतकी चांगली सहधर्मचारिणी मिळाली पण मी तुझी किंमत जाणली नाही...

सुमेधा म्हणाली .!.अहो पण तुम्ही का जाणून-बुजून केले माझ्यासोबत असा व्यवहार. तुम्ही काही एक बोलू नका मला सर्व हकीकत माहित आहे तुम्ही जे काही केलं ते तुम्हाला फसविल्या गेले होते... बस करा आता अजिबात बोलायचे नाही . तुम्ही हमखास बरे होवून घरी याल मी देवाला साकडे घातले आहे ते माझे जरूर ऐकतील..


अगं सुमेधा बोलू दे ना मला आज मी माझ्या मनातल

तुला सांगणार आहे.. माहित नाही कधी वेळ मिळेल का बोलायला,बैस ना माझ्याजवळ, सुमेधा मी माझ्या इंद्रिय वश मध्ये ठेवू शकलो नाही आणि तिच्या आहारी गेलो... आणि हीच खूप मोठी चूक मी माझ्या जीवनात केली गं त्याची सजा मला आज मिळते आहे जिवंत असेपर्यंत पश्चातापाने मी पोळत राहील. आणि स्वतःला दोष देत राहिल... 


तेवढ्यात स्ट्रेचर घेऊन नर्स आल्या आणि राघवला त्यावर नेत असता...सर्वांनी धीर दिला.. ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आले सर्व कुटुंबियांनी अश्रुपूर्ण नेत्रांनी निरोप दिला आणि हिंमत ठेवायला सांगितली...सुन्नपणे सुमेधा ऑपरेशन थिएटर च्या आत जात पर्यंत निर्विकार नेत्राने बघत होती आणि राघव पण सुमेधाला एकटक बघत होता.राघवने सुमेधाचा धरून ठेवलेला हात त्याला सोडावा लागला. राघवला घेऊन ऑपरेशन थिएटर मध्ये गेले.. संस्कारमय सुमेधा सोबतही सतत काहीतरी घडत होतं निमुटपणे ती सहन करीत होती.लहानपणापासूनच संस्काराचे धडे तिला मिळाले होते त्यानुसार ती आपलं सहचर्य जीवन व्यवस्थित होईल अशी आशा धरून वागत होती...


इकडे प्रशांत आपली विदेश यात्रा संपवून आला होता.. सर्वांसाठी काही गिफ्ट घेतले सुमेधा साठी पण भरपूर वस्तू त्याने खरेदी केल्या होत्या जरी त्याला माहीत होते की सुमेधा मला कधीही मिळणार नाही तरीपण त्याने मोठ्या प्रेमाने तिच्या आवडीच्या काही वस्तू खरेदी केल्या आणि परतीच्या मार्गाला लागला मुंबई गाठली आणि तडक घरी आला आई-बाबाशी भेट घेतली... आई-बाबा

चातका सारखी त्याची वाट पाहत होते...त्यांना खूप बरे वाटले.. आपला मुलगा सुखरूप आलेला आहे हे पाहून अत्यानंद झाला..

मुंबईला आल्यावर सईलापण फोन केला. सई कडूनच त्याला राघवच्या स्वास्थाबद्दल माहिती मिळाली पण प्रशांत काहीच करू शकला नाही त्यांच्या कुटुंबात तो दखल देऊ इच्छित नव्हता..तरीही प्रशांत फोन करायला गेला परंतु सुमेधाचा फोन बंद होता नंतर त्याची हिम्मतच झाली नाही तो तसाच तळमळत राहिला ..राजीवला फोन लावायची इच्छा झाली पण गैरसमज होईल म्हणून तो चुपचाप बसला..


सुमेधाची स्थिती ऐकून पुन्हा तो खूप उदास झाला त्याच्या मनात अनेक प्रकारचे विचार घोंगावू लागले दुसऱ्या दिवशी ऑफिसला न जाता तो तडक जंगलात बाबाला भेटायला निघाला.त्या वनात निसर्गाच्या सानिध्यात त्यास काही प्रमाणात शांती मिळाली ...


प्रशांतने बाबा साठी एक छानशी नक्षीदार काठी व सदरा गरम शॉल आणला होता .. बाबाने नको म्हटले तरी त्या वस्तू आग्रहाने दिल्या होत्या..प्रशांतची आपुलकी आणि प्रेम पाहून बाबाला मनातल्या मनात अतिशय आनंद झाला त्यांचे डोळे भरून आले..

प्रशांत म्हणाला۔۔!۔ मला आपला शिष्य करून घ्या मला आता स्वतः काहीवेळ समाजाला द्यायचा आहे.बाबांना अत्याधिक आनंद झाला ,बाबाच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसली..

बाबा म्हणाले.! मला याच गोष्टीची गरज होती ती वेळ येऊन पोचली मला माझा आवडता शिष्य मिळाला आता मला कशाचीही चिंता नाही मी माझे सर्व गुण देऊन तुला तरबेज करणार नंतर माझे डोळे मिटले तरी चालेल۔۔


सुमेधाला तुम्ही बरी केली तसेच अनेक रुग्ण तुमच्या औषधोपचाराने बरे होउ शकतात.अनेक रुग्ण दुःखाने पिडलेले आणि बेडवर खिळलेले आहेत तुमच्या आशीर्वादाने त्यांचे जीवन वाचू शकतात ही जीवनदायिनी अमृततुल्य औषध देऊन त्यांना पुन्हा उभे करता येईल...

बाबा म्हणाले .!۔ मला खूप आनंद वाटतोय माझे काही पुण्य असेल तेव्हाच तुझ्यासारखा निस्वार्थ भावनेने  प्रेरित होऊन कार्य करणारा शिष्य मला आज मिळाला ...

आहे मी हमखास आनंदाने निश्चिंत होऊन यापुढील आयुष्य जगणार आहे.. प्रशांत बाबाच्या पायाशी लोटांगण घातले बाबाने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि अनेक आशीर्वाद दिले..


बोलता-बोलता संध्याकाळ झाली आणि प्रशांत आपल्या सिटी कडे जातांना म्हणाला मी याच वेळेवर नित्य येत जाईल आणि तुमच्याकडुन ही विद्या शिकत जाईन..


प्रशांत आल्या वाटेने निघून गेला तिकडे आई बाबा वाट बघत होते आई बाबाला सगळी हकिकत त्याने सांगितली सुमेधाचा इलाज करणारे बाबा मला ही विद्या शिकवणार आहेत.बाबा म्हणाले अरे पण ऑफिसला कधी जाणार तू तुला वेळ तरी आहे का प्रशांत म्हणाला सध्या मी सुट्ट्या वाढवल्या आहेत बाबा काळजी करू नका.एवढे बोलून तो आपल्या रूममध्ये गेला आणि सुमेधा च्या आठवणीत बुडाला..


अनभिज्ञ ,निर्विकार ,बेफिकीर मन कुणाला कळेना कळे पण मनात धुमसणारे वारे हे वाहातच असतात .मनाच्या सुख संवेदना अन दुःखाच्या सूक्ष्म छटा विणत स्वप्न पाहणे व आंतरिक सुखाचा उपभोग करणे बाकी प्रियकरांच्या हातात काहीच नसते, ती स्वप्न कधी फुलतच नाही...त्या कळ्या कधी उमलतच नाहीत..हळुवार जपून ठेवलेले क्षण प्रशांतच्या जगण्याची आस ठरते, साठवून ठेवलेली आठवण, त्याच्यासाठी खास असते.. हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात आठवण नेहमी ताजी असते.. सुमेधाच्या आठवणी म्हणजे मोरपिसाचा हळूवार स्पर्श नकळत निर्माण होणारी सागरावरील लाट,शरीराने कितीही दूर गेली तरी, कधीकाळी झालेले अलवार स्पर्शाचे क्षण सुखावून हळुवार वाऱ्याची झुळूक शीतलता देऊन वेगळीच अनुभूती आणि त्या प्रेमाच्या जाळ्यातुन कधीच निघू शकत नाही त्याच्यासाठी तीच जगण्याची आस ठरते...

कितीतरी वेळ कितीतरी तास तो आठवणीत डुंबत राहतो, जीव कासाविस होतो ,एक वेळ तिला पाहण्यास,जवळ येण्यास,बोलण्यास आतूर प्रियकर युगे युगे वाट पाहतो,कित्येक संपते दिवस,कित्येक संपतात रात्री, नाही संपत तो विरह प्रवास....साठवलेली ही पण एक प्रेमाची नशाच असते ज्यास प्रेम रोगही म्हणतात ही नशेची धुंदी काही औरच असते...या धुंदीत कधी कधी आयुष्य ही कमी पडतं.

प्रत्येक क्षणाला स्वप्नांची माळ गुंफणे सुटत नाही. कारण ती गुंफण्यात एक आनंद येतो ..

 40 

   प्रशांत विदेशवारी करून आला होता...जेमतेम दोन दिवस झाले होते.. तोच सईचा फोन खणखणला.. तिने फोनवर राघवच्या तब्येतीबद्दल सर्व काही सांगितले. आणि सांगितले की मी आत्ताच निघणार आहे . राघव जिजू ला हॉस्पिटल मध्ये भरती केले आहे ऑपरेशन होणार आहे त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल असून तू पण जाऊन एकदा भेटून घे, बाकी तुझी इच्छा. मी पण आज निघणार आहे. इतके बोलून सईने फोन ठेवला...


 जराही वेळ वेस्ट न करता तो तडक निघाला, आणि हॉस्पिटल मध्ये पोहोचला तिथे राजीव आई-बाबा सुमेधा सर्वच होते . सर्वांचे चेहरे पडलेले कोमेजलेले होते.राजीवने प्रशांत दिसल्याबरोबर पुढे होऊन गळ्याला मिठी मारली खरोखरच त्याला थोडी हिम्मत आली होती .धीर आला होता. राजीव म्हणाला बरं झालं प्रशांतराव तुम्ही आले दादाच ऑपरेशन काही वेळातच होणार आहे आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले तो रडायला लागला होता . सुमेधा या दोघांचं भेटणं पाहून गलबलली काय बोलावे हे कुणालाच सुचेना आई बाबालाही भेटून प्रशांत ने नमस्कार केला नंतर सुमेधा जवळ जाऊन उभा राहिला तिला धीर देऊ लागला.


प्रशांत म्हणाला!! तू घाबरू नकोस सर्व व्यवस्थित होईल, हिंमतीने काम घे, ती सुमेधा सारखी रडत होती तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, प्रशांत अजून म्हणाला असं रडून काय बर होणार , तेवढ्यात ऑपरेशन थिएटर मधून डॉक्टर बाहेर आले तोच सर्व कुटुंब त्यांच्याकडे धावले आणि विचारपूस करायला लागले,म्हणाले राघव ठीक आहे ना ऑपरेशन सक्सेस झाले ना डॉक्टरांनी सांगितले की हो ऑपरेशन सक्सेस आहे परंतु सर्वकाही जीवदान देणे घेणे परमेश्वराच्या हाती आहे आम्ही कळ बाहुले आहोत यश देणे त्याच्याच हातात आहे आम्ही आमच्याकडून खूप प्रयत्न केला . चिंता करू नका टेन्शन घेऊ नका ,जे होईल ते बघण्याशिवाय आपल्याकडे काहीही इलाज नसतो तेवढ्यात नर्स धावत आली आणि म्हणाली पेशंटची तब्येत बिघडलेली आहे डॉक्टर चला! तशीच डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटर कडे धाव घेतली ऑक्सीजन लावले होते तरीपण त्याचे श्वास मंदावले होते. डॉक्टरांनी सर्वांकडे दयनीय दृष्टीने बघितले. नियतीपुढे आपण सर्व लाचार आहोत हीच परिस्थिती तेव्हा सर्वांना जाणवली होती..


जरी वरून सर्वजण शांत दिसत होते तरी सर्वांच्याच मनात आत मध्ये भरती-ओहोटी धुमसत होती विचारांचे काहूर माजले होते ... सर्वांना आता समजले होते की मोठ्या दुःखाचा सामना आपणास करावा लागेल आई-बाबाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वहात होते.. सर्वच जण आतून खचले होते.


प्रशांत मला तर काहीच सुचत नव्हते तरीपण त्याने कॅन्टीन मध्ये जाऊन सर्वांसाठी चहा आणि बिस्किटे आणून सर्वांना दिले, थोडी हालचाल झाली , सर्वांनी चहा बिस्कीट घेतले, तो सर्वांना दिलासा देणारा पण आज तो पुरता खचला होता, सुमेधा चे काय होईल त्याला ही एक मोठी चिंता सतावत होती. तो परवानगी घेऊन इतर डॉक्टरांशी संवाद ही करत होता सर्वांनी परिस्थिती सांगितली तेव्हा तो खूप घाबरला होता. आता त्याला पुरतं माहीत झाले होते की प्रशांत वाचणार नाही.


डॉक्टरांशी भेटून तो बाहेर आला तेव्हा सई पण आपल्या गावावरून आली होती , ती सर्वांशी बोलत होती आणि सर्वांना धीर देत होती सुमेधाशी गळाभेट घेऊन अश्रू पुसत होती, सई आल्याने सुमेधाला मोठा आधार वाटला होता, तिच्या हृदयात साठवलेली अश्रू भळभळून डोळ्यावाटे बाहेर पडत होते. बोलता-बोलता दुपारचे तीन वाजले वेळ काही जाता जाये ना, पुन्हा प्रशांत कॅन्टीनमध्ये गेला आणि काहीतरी अजून नाश्त्याचे प्रकार वेफर्स वगैरे घेऊन आला त्याला माहित होते जेवण कोणी करणार नाहीच हे तरी खाऊ शकतील. सर्वांनी आपल्या हातावर घेऊन तिथेच बसल्या बसल्या टाईमपास केला इकडच्या तिकडच्या गोष्टी मात्रा थोड्या कमी आवाजात सुरू झाल्या म्हणतात ना!!


" प्रथम सुख निरोगी काया" कधी हॉस्पिटल ला जाण्याची पाळी येऊ देऊ नये , जर का आलीस तर दैवभोग समजावे "आलिया भोगासी " हॉस्पिटल चे वातावरण बघणे आणि जर का आपल्या घरचा पेशंट असला तर काही दुःखाची सीमा नसते. तसेच कित्येक लोक रडवेला चेहरा करून तिथे वावरत असतात कधी कुणाच्या चेहर्यावर हास्य दिसत नाही मरणासन्न अवस्थेत आपापल्या पेशंटला घेऊन आलेले असतात कित्येक बाहेर निघतात. कित्येक शव पोस्टमार्टम करण्यासाठी शवागारात जातात . यंत्र मानवासारखे इकडून तिकडे तिकडून इकडे ये जा करणारे डॉक्टर जीवन वाचवण्याच्या प्रयत्नात पूर्ण डुबलेले असतात.पांढरे ड्रेस घालून नर्स कर्मचारी तटस्थ निर्विकार भावनेने कार्य करताना दिसतात. प्रशांत हे सर्व बघत होता उदास मनाने एकेक गोष्टीचे निरीक्षण करीत होता तसं पाहिल्या गेले तर सुमेधा च्या बिमारी च्या वेळेस त्याने खूप हॉस्पिटल पालथे घातले होते तरी पण एवढ्या बारीक नजरेने निक्षून कधी असे वातावरण बघितले नव्हते. पहिल्यांदाच इतका फावला वेळ त्याच मिळाला होता .. तो सारखा विचार करीत होता दुनियेत किती दुःखी लोकं असतात आपले दुःख त्यांच्या पुढे काहीच नसते तरीपण जो तो आपल्या दुःखाचे रडगाणे गात असतो.... त्याचे मन हे सर्व पाहून अति व दुःखाने ढवळून ढवळुन निघत होते...


तेवढ्यात डॉक्टर आय सी यु मधून बाहेर आले आणि म्हणाले राघवला होश आलेला आहे. एक एक जण जाऊन बोलून घ्या, आणि निर्विकार चेहऱ्याने बाहेर निघून गेले. आई बाबा आधी आत गेले. राघव ला हि समजले होते आपण आता वाचणार नाही त्यामुळे तो शांत होता.. जे काही बोलायचे ते आत्ताच बोलून घेतो नंतर मला वेळ मिळणार नाही असं त्याच्या मनात राहून राहून राहून विचार येत होते त्यामुळे राघव ने आई बाबाला सुमेधा ची आणि मुलींची काळजी घ्यायला सांगितली,


राघव म्हणाला!! तुम्हीच सुमेधा चे आई बाबा तुम्हीच माझा संसार सांभाळा आता सांभाळा आणि आपल्या मुलीप्रमाणे संसार वसवा सुमेधाचा आणि अजून काही गोष्टी त्याने आईबाबाला सांगितल्या मुलींकडे लक्ष द्यायला सांगितले आता मी सर्वांना सोडून जाणार आहे दुःख करून घेऊ नका. सुमेधा प्रशांतचे लग्न करून द्या.


आई-बाबा म्हणाले !! असं का बोलतोस राघवा पोरा तुला काहीच होणार नाही आहे तू अशा फालतू गोष्टी करू नकोस. सांभाळ स्वतःला हिम्मत धर असा धीर देऊन दोघही रडत रडत बाहेर निघाले. राजीव आत गेला त्यालाही काय म्हंटलं कुणास ठाऊक तो हि रडतच बाहेर निघाला. त्यानंतर सुमेधा आणि सई आत गेल्या. राघवने सुमेधाचा हात आपल्या हातात घेऊन शपथेवर वर तिला तिला काही गोष्टी सांगितल्या ..

राघव पुनश्च बोलला! आता मी माझ्या शेवटच्या प्रयानाला निघालो आहे. आणि म्हणाला सई माझ्या बोलण्याकडे लक्ष दे माझ्या सुमेधा चे दुःख दूर कर तिला मी खूप त्रास दिलेला आहे या पुढे त्रास होणार नाही सर्वजण दक्षता घ्यावी अशी माझी शेवटची इच्छा आहे....


सई सुमेधाला तुम्हा सर्वांच्या भरवशावर सोडून मी शांतीने मरू शकेन .तिच्या कडे लक्ष द्या तिने माझ्यासाठी खूप काही कष्ट भोगले आहेत . तिचे कष्ट दूर करायला मी नसणार तुम्हालाच करावे लागेल... आणि अति दयनीय दृष्टीने पाहून म्हणाला ! सई प्रशांत आला आहे काय?


सई म्हणाली हो जिजू मी त्याला फोन करून बोलविले आहे.


पुन्हा राघव म्हणाला मग मला भेटायला नाही का आत येणार तो?

साई म्हणाली! आत्ता घेऊन येते जिजू त्याला बाहेर आहे तो, आणि बाहेर निघाली.

प्रशांतला आवाज दिला आणि त्याचा हात धरून आत आय सी यू मध्ये घेऊन गेली.

राघव ने प्रशांतला बघितल्या बरोबर हात वर करुन हातात हात घेतला आणि आपल्या जवळ बसायचा इशारा केला.  

राघव म्हणाला !! हो बरं झालं प्रशांत मला भेटायला आला आता माझा शेवटचा प्रवास सुरू आहे ...तोच प्रशांतने राघवच्या तोंडावर बोट ठेवले आणि म्हणाला असं काही बोलू नका राघव तुम्हास काही होणार नाही सर्वांची प्रेयर दुवा तुझ्यासोबत आहे. तुम्ही खचू नका हिम्मत ठेवा असा धीर दिला. राघवणे स्मितहास्य केले आणि म्हणाला ! अरे नाही मित्रा आता कोणतीच प्रेयर दुवा काम करणार नाही मी माझ्या हातानेच आपले आयुष्य पणाला लावले आहे आता फक्त तु माझ्या परिवाराकडे लक्ष दे माझ्या पत्नीला आपली पत्नी बनवून तिच्या आयुष्याला काहीतरी जगण्याची उमेद दे तिला मी खूप दुःख दिले आहे हे दुःख तू सुखात बदल कर म्हणजे मला खूप शांती मिळेल मी खूप काही अन्याय तिच्यावर केले तू तिच्या सोबत न्याय कर मला वरती जाऊन खूप आनंद मिळेल , हीच माझी शेवटची इच्छा आहे . ही एक अभिलाषा ती पूर्ण कर नाही म्हणू नकोस नाहीतर मी असाच तळमळत राहील माझ्या मरणानंतर ही मला मुक्ती मिळणार नाही. इतके बोलून श्वास घेतला आणि 

सुमेधाला उद्देशून म्हणाला ! इकडे ये माझ्याजवळ सुमेधाला जवळ बोलावून तिचा हात आपल्या हातात घेऊन प्रशांतचा हात तिच्या हातात दिला आणि म्हणाला! 


तुम्ही दोघे आत्मसन्मानाने विवाह करून आपले वैवाहिक जीवन आनंदाने सोबत जगणार .आणि सुखाने या संसारातली वाटचाल पूर्ण कराल. माझ्या मुलींना आपल्या मुली समजून पालन पोषण करून माझ्यापेक्षाही जास्त माया प्रेम देणार अशी मी अपेक्षा करतो ... काही जन्मांतरीचे ऋणानुबंध कर्तव्य समजून  माझ्या कुटुंबाचा उद्धार कराल अशी मी अपेक्षा करतो. आणि सुखाने या जगाचा निरोप घेतो.

सुमेधा नुसती टुकुर टुकुर बघत होती तिच्या तोंडातून काहीच बोल फुटत नव्हता फक्त डोळ्यातून अश्रू वहात होते.

प्रशांत म्हणाला ! राघव हिमतीने जगायचं असतं अशी हार मानू नकोस! समोर जर का काही कमी-जास्त झालं तर मी तुझ्या कुटुंबाला सांभाळेल अशी हमी देतो. तसेच आई-बाबा आणि राजीव पण आहे सांभाळायला तू फिकीर चिंता करू नकोस आधी चांगला हो नंतर सर्व गोष्टी करू....

राघव म्हणाला! नाही मला आत्ताच हमी हवी मला तुझ्या वाचून कोणीच सुमेधा चे दुःख कमी करणारा दिसत नाही सुमेधा चे दुःख तूच कमी करू शकतोस मित्रा, नाही म्हणू नकोस माझी ही शेवटची इच्छा पूर्ण कर...

प्रशांतने याचक दृष्टीने सुमेधा कडे बघितले सुमेधा नुसती अश्रू ढाळत होती तोंडातून एक शब्दही निघाला नाही. तेव्हा प्रशांत काय बोलणार निशब्द झाला. 


तोच सई मध्ये आली आणि म्हणाली सुमेधाला उद्देशून अगं बोल ना काही तरी हो म्हण नाहीतर नाही म्हण जिजू तुझ्या बोलण्याची वाट बघत आहे बोल ना सुमेधा अशी अबोल होऊ नकोस .. तिच्या टच केल्याने सुमेधाने डोळे वर करून राघव कडे बघितले आणि राघवाच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली तुमची पूर्ण जीवनात मी सेवा केली आहे पुढेही आशिष करीन तुमच्या आदेशाच्या बाहेर मी जाणार तुम्ही म्हणाल तेच करेन आणि जर का माझ्या ने काही कमी-जास्त झाले तर मला माफ कराल... परंतु मी असा विचार करू शकत नाही.. आणि मोठे मन करून सांगते की जर तुम्हाला कमी-जास्त झाले तर मी तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.. राघवाच्या डोळ्यात आनंद दिसला. आणि राघव म्हणाला! आता मी या जगाचा निरोप आनंदाने घेऊ शकतोय आणि राघवने खूप प्रसन्न चेहऱ्याने तिचे उपकार मानले ,आभार मानले आणि प्रशांतचे पण आभार मानले ,सई कडे आभारी दृष्टीने पाहून स्मितहास्य केले.... तोच राघवला ठसका लागला,

... बघता बघता त्याची जीवन ज्योत मालवली होती त्याचे विस्फारित नेत्र त्याचे डोळे एकसारखे सुमेधाला बघत होते. प्रशांतने अलगद हाताने त्याचे डोळे बंद केले आणि म्हणाला ! "अलविदा मित्रा "


राघव आता अनंतात विलीन झालेला होता. तसेच सुमेधाने तोंडातून टाहो फोडला तिचा आवाज ऐकून .. आईबाबा, राजीवपण धावून आत आले सर्वांना जे समजायचं ते समजले आणि सर्व रडायला लागले.. सईने सुमेधाला धरून बाहेर काढले...ते हॉस्पिटल चे वातावरण होते त्यामुळे सर्वांनी एक दुसऱ्याला आधार देऊन बाहेर दूर पार्कमध्ये नेले...

राघवाचे शव मिळेपर्यंत राजीव आणि प्रशांत थांबला बाकी सर्वांना घरी जाण्यास सुचविले... सई सर्वांना घेऊन घरी गेली.. काही एक तास दीड तास लागला असेल राजीव आणि प्रशांत राघवाचे शव घेऊन घरी गेले....

सर्व सोपस्कार आटोपले...एक तारा पुन्हा अनंतात उमटला...

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama