Meenakshi Kilawat

Drama

3  

Meenakshi Kilawat

Drama

रूनुझूनु पैंजनाची

रूनुझूनु पैंजनाची

7 mins
54


सुमेधाच्या श्वासाची गती वाढली होती. अंग थरथरत होते, तिचे नेत्र डबडबले तिला खूप खूप रडायचे होते ,

आज एक वेगळाच विचार तिच्या मनात झंजावातासारखा घोंगावत होता.तरी तिने त्या मूक भावनांना दफन केले आणि पुन्हा आपल्या मनावर ताबा मिळविला. प्रशांतचा मोबाइल नंबर घेऊन दोघीही परतल्या.

सुमेधा सईला हळूच म्हणाली चल निघुया आता.आणि प्रशांतच्या आईला नमस्कार करून त्या दोघीही निघाल्या.

सुमेधाला खूप खूप रडायचे होते त्यासाठी तिला एकांत हवा होता . ती स्वत:शीच लढा देत होती .


सुमेधा घाबरतच सईला म्हणाली ..! थोडा वेळ आपण शेजारच्या मळ्यात जाऊया कां ? सई म्हणाली ! अगं आधिच उशिर झालेला आहे .मुलं वाट बघत असतिल.

माझे मिस्टर ही आले असतील, तू बैस थोडा वेळ मी निघते. तुझ्या संगतीत ना वेळेचा पत्ताच लागत नाही . उद्या भेटूया आपण म्हणून ती पटकन तिला बाय करून निघून गेली गावालगत जवळचा मळा होता त्यामुळे सुमेधानेही सईला जायची परवानगी दिली.....


आज तिला जुन्या आठवणीने वेढले होते .आता सुमेधा एकटीच होती, सुमेधा मळ्यात पोचली तेव्हा सूर्य मावळतीला लागलेला होता. लाल गुलाबी क्षितिज झाले होते . कितीतरी वेळ त्या सूर्याला आणि आकाशाला बघत होती, थोडक्यात तिला सत्य उमजलं होतं असंख्य शृंखला ती विचारांच्या धाग्यात जोडत राहिली आणि फेटाळत राहिली.


भूतकाळातल्या पूर्ण आठवणी तिच्यासमोर एखाद्या चलचित्रा सारख्या दिसू लागल्या त्या वलयात सुमेधा पूर्ण रममान झाली. नित्यनियमाने शाळेत जाणारी सुमेधा आणि प्रशांत सुमेधा पहिल्या वर्गात तर प्रशांत दुसऱ्या वर्गात होता. शनिवार रविवार सुट्ट्यामधे एकत्र असायचे. दोघेही कधी प्रशांतकडे किंवा सुमेधाकडे भावंडांसोबत खेळत राहायचे ,एकदाची गोष्ट एक दिवस सुमेधाला बरं नव्हतं म्हणून सुमेधा शाळेत गेली नाही तर प्रशांत पण शाळेत गेला नाही अनेक किस्से कहाण्या त्या दोघांच्या मैत्रीमध्ये गुंफल्या होत्या दोघांचेही मित्र-मैत्रिणी चिडवत सुद्धा होते पण दोघांनीही एकमेकाचा साथ सोडला नाही ,आणि हवीहवीशी वाटणारी निर्मळ पाण्याच्या धारेसारखी पवित्र मैत्री वाहत होती.ह्या पलीकडे त्यांच्या काहीच इच्छा नव्हत्या, म्हणतात ना काळ जायला काही वेळ लागत नाही भरभर वर्ष महिने दिवस जायला लागले, पाचवी झाली सातवी झाली, निरागस पणे खेळत हुंदडत त्यांचे दिवस गेले कुणी जर सुमेधाला काही बोललेलं प्रशांतला आवडायचं नाही तो लगेच भांडायला सुरुवात करायचा आणि तसेच जर का कुणी प्रशांतला काही म्हटलं तर सुमेधा भांडत असायची,त्या दोघांना बालपणापासूनच एकमेकाचा लळा लागलेला होता ,त्यांची मैत्री खूप पक्की आहे यांच्यामध्ये कोणी जाऊ नये हाच सानुग्रह सर्वांनी केला व नंतर त्यांच्या मध्ये कोणीच आलं नाही ...

 प्रशांतला सुमेधाची सवय तो सतत या ना त्या कारणाने तिच्या अवती भवती जास्तीत जास्त वेळ घालवायचा .त्याला तरूनपणाच्या तारून्यपिटीक यायला लागल्या होत्या ..त्याला तिच्या सानिध्यात रहायला बागडायला आवडायचं .. 


मुसमुसणारं नवतारुण्य आणि समोर सौंदर्याची खाण त्यात प्रशांतची अवस्था कशी असावी . तिचा कमनीय बांधा व गालावरची खळी अजून भर म्हणजे हणुवटीवर पडणारी खळी ,तिचे डौलदार अवयव,घणदाट केसांत गुंफलेली वेणी.तिचे हसणे बोलणे सुंदरतेच्या साऱ्या सिमा तिने काबिज केल्या होत्या.तश्या स्थितित स्वप्नाळू प्रशांतची अवस्था चलबिचल व्हायची, तो तारुण्याच्या उंबरठ्यावर काठोकाठ भरून वाहाणारा सागर होता. परंतु त्याने कधीही सीमा रेखा ओलांडल्या नाही .मेंघाच्या छायेसारखा आच्छादला पण पडला नाही...मनातल्या मनात सुमेधासोबत प्रेमाचे स्वप्न बघू लागला होता. त्याच्या आयुष्यातले एकमेव आकर्षीत करणारी सुमेधा होती.. जसा कळ्या फुलावर भ्रमर भाळतात त्याप्रमाने तो सुमेधाववर भाळला होता..


सुमेधाला सार सार आठवत होतं मी कधी प्रशांतच्या प्रेमाला समजू शकले नाही तो माझ्यावर आतोनात जीवापाड प्रेम करीत होता पण त्याने मला थांगपत्ता लागू दिला नाही आणि मी अशी भाबडी, वेडी होती कोणास ठाऊक मला का नाही समजले प्रशांतच्या मनातल्या भावना मला आता शंभर टक्के खात्री झाली की प्रशांत माझ्यावर प्रेम करीत होता.. ही तर खूप मोठी हिस्ट्री झाली तो किती तळमळत असेल माझा विवाह झाला तेव्हा त्याचा चेहरा किती उतरलेला होता मी खरच किती वेडी ,त्याने थोडीशीही त्याच्या प्रेमाची चाहूल लागू दिली नाही. मला जर थोडीही कल्पना असती तर मी राघवशी विवाह केला नसता मलाही त्याचा सहवास हवाहवासा वाटायचा पण मला ते प्रेम समजले नाही .

समोर चित्रपट सुरू असल्याचा भास तिला झाला एकेक करून प्रत्येक गोष्ट तिला आठवत गेली खरंच मी किती भयंकर चूक केली मला कसं कळलं नाही. परंतु ते प्रेमच होते ती आपुलकी ती भांडणं ती जवळिक ते रागावणे.हक्क गाजवणे हे सर्व काय होतं , परक्या माणसावर का कुणी एवढा हक्क गाजवतो ,रुसणे फुगणे करतो तो जवळ असला की मला किती मस्त वाटायचं व तो गावी गेला की मला किती चिडचिड व्हायची.हवाहवासा वाटणारी जवळिक एक धागा जुळला होता..

परक्या माणसावर का कुणी एवढा हक्क गाजवतो रुसणे फुगणे करतो तो जवळ असला की मला किती मस्त वाटायचं व तो गावी गेला की मला किती चिडचिड व्हायची.. मी किती रडकुंडीला यायची ,याला नासमझ, अबोध स्थिती कारणीभूत आहे आता मी प्रशांत साठी काही करू शकत नाही उलट त्याचीच मदत मला घ्यायची आहे आता मला माझा संसार आहे माझ्या मुली आहेत पती आहे मी एक सुसंस्कृत भारतीय महिला आहे,सभ्य समाजात वावरणारी महिला आहे. आता माझ्या मनात असं काही यायला नको त्याने माझं पावित्र्य भंग होईल आणि स्त्रीत्व नष्ट होईल.


आता माझ्या हातात पश्चाताप केल्याशिवाय काहिच उरले नाही ..ही कशी वेळ माझ्यावरती आलेली आहे. पण माझ्यामुळे प्रशांतच्या भविष्याची राखरांगोळी झालेली आहे..त्याला किती त्रास सहन करावा लागत आहे तो किती रडला असेल किती दुःखीकष्टी झाला असेल त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे .हा किती मोठा भार मी माझ्या माथी घेऊन जगणार आहे.


विचार करता करता बराच वेळ झाला बाहेर दाट काळोख पसरला तेव्हा तिने पटकन घराची वाट धरली आणि घरी परतली परंतू तिच्या अंतकरणात सतत विचारांच काहूर माजलं होतं ..


  प्रशांत पण दिसायला सर्वसाधारण सुंदर होता.त्याचे व्यक्तीत्व लोभस व सुरेख होते भारदस्त कुरळे केस, चमकदार डोळे,मुखावर पाणीदार तेज होते. उंच धिप्पाड त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळीच चमक दिसायची. तो मनमिळावू स्वभावाचा असल्यामुळे लहान, मोठ्यांचा लाडका होता. या नवयुवकाचे उमललेल्या भावनेतून प्रेमाचं प्रत्यारोपनं होवून त्यांचे विश्वच बदलले होते .तो तिच्याप्रती  पाण्याच्या धारेसारखा वहावत गेलाय. या प्रेमाचा मोहपाश अगदी डोळ्यावर झापड असल्यागत होता. नशेत धूंदावल्यासारखी अवस्था होती..या ना त्या कारणाने येता जाता बसता उठता तिचा अलवार रेशमी स्पर्श त्याला रोमांचित करीत होता ,आणि मनातच लाजायचा कधीकधी खेळताना धुंदीत सुमेधाला घट्ट मिठीत आवळायचा .कधी बळेच गालावर अलवार स्पर्श करायचा.कधी हळूच तिची वेणी ओढायचा अशी अनामिक गुलाबी रोमांच उभी करणारी कोवळी झुळूक त्याला आल्हाद देऊन जायची. तो वेगळ्याच दुनियेच विचरण करीत होता आणि हर्षाचा अनुभव करीत होता. 


परंतु प्रशांतला जी अनुभूती होती ती अनुभूती सुमेधाला आहे काय ही गोष्ट प्रशांतने जाणुन घेतली नाही. त्याचे अतोनात प्रेम होते सुमेधावर पण कधी त्याने प्रपोज केले नव्हते की कधी प्रेमाविषयी चर्चा केली नाही.त्यानं स्वप्नातही कल्पना केली नाही की सुमेधा या नात्याला काय व किती समजली आहे तिच्या मनात काय आहे. नेमकी चूक इथेच झाली होती.


सुमेधा निरागस होती तिला अशा आगळ्यावेगळ्या स्पर्शाची जाणीव नव्हती ती त्याला माया, प्रेम, जिव्हाळा समजायची तिने कधिच त्या नजरेने प्रशांतकडे पाहिले नव्हते . तसेच भर्रकन वर्ष उलटले, प्रशांत एस,एस,सी झाला .तो आता नवयुवक झाला होता .त्यांच्या वागण्या-बोलण्यात फरक आलेला होता.. दहावीनंतर प्रशांतला बाहेरगावी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्यात आले..

प्रत्येक शनिवारी-रविवारी तो गावी यायचा , तेव्हा पुर्णवेळ सुमेधा व तिचे भावंड गप्पा मारणे सोबत फिरणे, गेम्स खेळणे करत होती.


 त्यांना एकमेकाचा सहवास आवडायचा ,एखाद्यावेळी शनिवारी रविवारी आला नाही तर ती सारखी चातकासारखी त्याची वाट बघायची,अगदी रडकुंडीला यायची ,एकदा प्रशांत शनिवारी आलाच नाही, इकडे सुमेधाने तळमळत कितीतरी वेळा प्रशांतच्या घरी जाऊन चौकशी केली तेव्हा फोनची व्यवस्था नव्हती ती यावर्षी दहावीला होती पण तिचे चित्त अभ्यासात लागत नव्हते प्रशांत गेला तेव्हापासून हिरमुसलेली राहायची ,काहीतरी हरवल्यासारखी अवस्था व्हायची.. 

आणि आला की आधी मौन धारण व नंतर भांडन करायची. जेव्हा तो डोळ्यातून अश्रू पाडायचा तेव्हाच सुमेधाचा राग कमी व्हायचा तेव्हा एकदा प्रशांतने सुमेधाला म्हटलं तू जर म्हणत असशील नां तर मी शिकायला जाणारच नाही मलाही तसे तिकडे करमत नाही तुमच्याशिवाय मला कोणीच आवडत नाही मला सारखी चिडचिड होते इथली आठवण येते .मला उगीचच आई-बाबाने पाठवलं तेव्हा सुमेधाच्या लक्षात आलं प्रशांत हा टॉपर मुलगा आहे आणि तो इथे राहून काय करणार होता, आपण त्याला असं डीवचायला नको रागवायला नको नाही तर तो शिक्षण सोडून इथे येऊन जाईल आणि कधीच मोठा माणूस होणार नाही मी पण दहावी झाल्यावर पुढच्या वर्षी शहरात शिकायला जाणारच आहे .ही गोष्ट तिच्या लक्षात आली तेव्हापासून त्याला कधीच रागावली नाही ...

त्याला म्हणाली नाही तू तिकडेच बरा आहे आणि हो मन लावून अभ्यास कर खुप शिकायचं खूप मोठा माणूस व्हायचं या सर्व गोष्टीत आपुलकीची भावना होती .माया होती या व्यतिरीक्त तिच्या मनात काहिच भाव नव्हते ही सर्व लक्षणे प्रेमाची असुन देखिल तिकडे कधी लक्ष दिले नाही.किंवा यालाच प्रेम म्हणतात ही गोष्ट तिच्या मनात कधीच आली नाही .फक्त एकमेकाविषयी निस्वार्थ भावना होत्या आपुलकी होती. ही वस्तु हमखास मिळायला हवी अशी कोणतीच जिंद्द बाळगली नव्हती..

 त्या बहरलेल्या भावनेत वासनेचा लवलेशही नव्हता..तिला कधी हीच प्रेमाची लक्षण आहेत असे वाटले नाही.


निरागसपणे त्या मैत्रीला जपत होती प्रेम वगैरेची कबुली देणे घेणे प्रेमाची परिभाषाच तिला समजत नव्हती, कधी स्वप्नात देखिल प्रेमाविषयी कल्पना आली नव्हती..

 प्रशांत सुमेधापेक्षा मोठा व तल्लख होता त्याला जाणवत होती ती तरंगित स्वप्नाळू प्रेमाची परिभाषा, सुमेधाला त्याला सांगावयाचं होते बोलायचं होतं, त्याच्या हृदयात नेहमी खलबली असायची ,तो मनातच म्हणायचा सुमू मी तुझ्याशी खूप प्रेम करतो ,कोणीही कुणाशी केलं नसेल इतके तू समजून घे ना !..

सागराच्या तळाच्या खोलीचा पत्ता नसतो तसाच 

माझ्या प्रेमाच्या खोलीचा ही तुला पत्त लागणार नाही ..कस सांगू तुला की तू माझ्या हृदयातला प्राण आहेस...


 मनातल्या मनातच तो घुटमळत होता पण शब्द बाहेर पडायचे नाही .कधी सुमेधाचे अश्रू पुसणे ,लाडाने गालावर हात फिरवणे ,हातात हात घेणे ,असे अनेकवेळा सामिप्य मिळाला .त्यावेळी तरुण प्रशांत रोमांचित व्हायचा , पण सुमेधाला त्या गोष्टीचा थांगपत्ता नव्हता, प्रशांतला जरी समजत होते तरी त्याने कधी तसे जाहिर होऊ दिले नाही.


त्याला वाटायचं की आपलं प्रेम जर खरं आहे तर 

एक ना एक दिवस सुमेधाला ते नक्कीच कळेल आणि ती आपल्यावर प्रेम करेल,कधी सुमेधाला समजवून सांगण्याचा प्रयत्न त्याने केला नाही.आणि जे व्हायचे ते झाले.त्याच्या आयुष्यात तो दिवस कधी उजाडलाच नाही. सुमेधाला त्याच्या प्रेमाचा गंधही लागला नव्हता प्रशांत स्वतःचेच सांत्वन करायचा, आणि स्वतःलाच दिलासा द्यायचा. 


                            ......क्रमश:



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama