Meenakshi Kilawat

Drama

3  

Meenakshi Kilawat

Drama

रूनुझूनु पैंजनाची

रूनुझूनु पैंजनाची

13 mins
165


भाग26


सई म्हणाली मावशी अशी रडत बसण्यापेक्षा सुमेधाला सांगा की तिकडे मुंबईला जाऊन चांगली ठणठणीत बरी हो .तिथे किती तरी तज्ञ डॉक्टर आहेत की, ती करतील ना सुमनला बरी....सुमेधाची बालमैत्रीण सई सारखी सुमेधाला समजावत होती पण ती काही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती, आज सई जरा जास्तच चिडलेली होती ...


सई अजून चिडून म्हणाली..! 

स्वतःहूनच सुमेधाने आपला नाश केला त्याचा काय फायदा झाला ....

सई सारखी बोलत होती ,बरं झालं प्रशांत मुंबईत राहतो म्हणून सर्व त्याच्यावर सोपवून राघव भाऊजी सावकाश घरी बसले आणि आता तरी आहे का काळजी त्यांना..!

आई म्हणाली...! जाऊ दे बस पुरे झाले आता नको इतका त्रागा करून घेऊस बेटा सई ...


सई म्हणाली...! तुला माहित आहे का मावशी माझ्या सुमूला भाऊजी मुळे किती त्रास सहन करावा लागला आहे..

आईनं दीर्घ सुस्कारा टाकला आणि म्हणाली...! काय सांगू माझ्या सुमूच्या नशिबात नियतीने काय लिहून ठेवले आहे अजून काय काय पहावे लागेल कुणास ठाऊक...


सई पुन्हा सुमेधा कडे पाहून म्हणाली....! सांग ना सुमू तू जातेस का मुंबईला सुमेधा खाली मान घालून टुकूरटुकूर पाहत होती आणि हळूच उठून आपल्या रूमच्या आत जाऊन तिने आतून दरवाजा लावून घेतला थोडावेळ एकदम स्तब्धता पसरली...शांत वातावरणात कुणालाच काही कळेनासे झाले होते काय करावे काय नको सर्वांची मनस्थिती स्थितप्रज्ञा सारखी झालेली होती तितक्यात प्रशांत पटकन उठला आणि म्हणाला...! मी येतो आई मला निघायचं आहे सईकडे बघून प्रशांत म्हणाला..!

येतो सई.... सई बाहेर सोडायला आली आणि म्हणाली...! प्रशांत असा त्रागा करून घेऊ नकोस समजुतीने काम घे उद्याच्या दिवस थांब , काय होते ते नंतर बघू ...नंतर मी तुला नाही थांबवणार ......

प्रशांतच्या डोळ्यात अश्रू आले होते पण त्यांनी ते गिळले, आणि चुपचाप गाडीत बसून निघून गेला......


प्रशांत घरी गेला आणि आपल्याला एकांतात कोंडून घेतले आणि सुमेधाच्या प्रत्येक क्षणाक्षणाची आठवण काढून तो कितीतरी वेळ एकाच जागी सागर लाटेच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात राहिला.. 

" आयुष्यात मला कधी जे पाहिजे होतं ते मिळालं नाही तरीसुद्धा माझा हा श्वास प्रेमासाठीच चालू असावा कदाचित .. तिचे भले करण्यासाठीच माझे आयुष्य उरलेले आहे ,नाहीतर आत्ता पर्यंत मी शेवटचा श्वास ही सोडला असता...हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात उमलत्या कळीप्रमाणे सुमूची आठवण कशी ताजीच भासते आहे.. जरी शरीराने कितीही दूर गेली तरी हृदयात अजूनही ती माझीच आहे...असाच विचार करता करता प्रशांतला कधी झोप लागली ते कळलं सुद्धा नाही.....


इकडे सई पण घरी आली आणि सारखा विचार करू लागली सुमूचे हे वागणे कोड्यात टाकण्यासारखे आहे..तिच प्रश्न विचारत होती आणि उत्तर पण स्वतःच देत होती....सुमूवर आधीपासूनच अन्याय झालेला आहे आणि तो तिने सहज स्वीकार केलेला दिसतो ...इतकी सुशिक्षित सुसंस्कृत असून देखील पुरातन काळातील

स्त्रीयांसारखी सहन करीत आहे ...

आंतरिक वेदना भोगणारी सुमेधा सईच्या मनाला अजिबात पटलेली नव्हती आजच्या आधुनिक युगात 50 टक्के आरक्षण महिलांना मिळालेले आहे पण त्याचा अजून तरी काही फायदा झालेला दिसत नाही 

पुरुषप्रधान देशात हे आरक्षण म्हणजे भ्रामक समजुतीला सत्य समजून घेण्यातच आम्ही महिला स्वतःला धन्य मानत असतो, हे चित्र संपूर्णपणे कधी बदलेल आणि स्त्रियांची मानसिकता कधी बदलेल कोणास ठाऊक......


सईची सारखी बडबड सुरूच होती ह्या असल्या सोशिक स्त्रियांचं काय करावं. म्हणूनच समाजात रोजच अश्या असंख्य असंख्य नविन नविन घटना घडत असतात... सर्व वर्तमानपत्रात ठळक मथळ्यात लिहून येतात ... 


कुणी पुरुषाने आपल्या वकील बायकोला रॉकेल टाकून जिवंत जाळले ,पाकिस्तानामध्ये महिलांवर ऍसिड हल्ले होतात.. त्या ऍसिड हल्ल्यामध्ये कित्येक महिला दगावतात देखिल .. या सृष्टीवर महिलांच्या पदरी काही कमी दुःख नाही त्यांना अतोनात दुख भोगाव लागलं... कित्येक अशिक्षित निराश्रित महिलांना नरकयातनेतून जावं लागलं .बरे झाले सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा जन्म झाला ..यांनी महिला स्त्रियांसाठी किती प्रयत्न केले शाळा काढल्या त्यांचा अक्षराशी परिचय करवला आणि त्यांना शिक्षण देण्यासाठी जिवाची परवा केली नाही...सावित्रीबाईच्या अथक प्रयासाने आजच्या युगात स्त्रिया स्वतंत्र झालेल्या आहेत.परंतू "स्त्री-मुक्त कशी होणार" आजची सावित्री ही खुप कष्टातून सावरली आहे. प्रगतीपुर्ण विचाराचे समर्थन करणारी आहेत.व कर्तुत्व दाखविण्यासाठी नेहमी सज्ज असणारी आहे. सावित्रीबाईच्या परोपकारी भावना, स्त्रीजाती विषयी प्रेम आणि कर्तव्य समजून अथक प्रवास करून स्त्रियांचे भविष्य घडविण्याचा अट्टाहास केला. व नवी शैक्षणीक दिशा देवुन आजच्या सावित्रीला दृढ केले. तिच प्रेरणा प्रत्येक स्त्रीमध्ये रूढ आहे. तिच्या पुण्याईने आजची स्त्री कुठल्याही क्षेत्रात मागे नाही, आतातरी सुधारण्यात सर्व यंत्रणा उपलब्ध आहेत सज्ज आहेत....


परंतु एक गोष्ट तितकीच सत्य आहे स्त्रियांच्या जाचाला समाज आणि घरचे कुटुंबीयच जास्त कारणिभूत असतात घरच्यां लोकांचा जास्तीत जास्त हात असतो.. म्हणतात ना कधी मालमत्तेवरून प्रेम प्रकरणातून लैंगिक संबंधातून कधी तिच्या छोटे कपड्यांवरून किंवा हुंडापद्धती ,या स्त्रियांना खेळणे बाहुले करून टाकलेली पिढी अंधश्रद्धेत गुरफटलेली, पायातिल चपलेपेक्षा कमी किमत समजणारी पुरुष प्रधान संस्कृती होती ....


 परंतु सुमेधाच्या बाबतीत मात्र असले भोग नव्हते तिला असल्या गोष्टीत आईबाबा आणि माहेर-सासर दोन्हीही खूप प्रेम करणारे मिळाले होते...तरीपण राघवची एक चूक तिच्या जीवन-मरणाचा प्रश्न ठरला तिने आपलं आयुष्य शर्यतीत लावल्यासारखं लावलं आहे...तिला अन्यायाविरुद्ध उभे राहायला पाहिजे न्यायासाठी लढा दिला पाहिजे ,तिला जर कोणती गोष्ट नाही आवडली नाही पटली तर तिने आवाज उठवला पाहिजे....


सुमू अशी का वागत आहे हे एक खूपच मोठं कोड आहे पण मी समजले तिच्या मनातल्या भावना तिला आपला संसार खूप प्रिय आहे आणि ती आपल्या मुलींसाठी काहीही करायला तयार आहे ती प्रशांतचे प्रेम ही अस्वीकार करीत आहे....


सई रागातच म्हणाली ....!

तिच्या जागेवर जर मी असते ना तर कधीच नवऱ्याला सोडून गेले असते... मी एवढे दुःख भोगल्यावर कुणाचीच पर्वा केली नसती...इतक्यातच पणती आणि अभी कोणत्यातरी गोष्टीवरून भांडण करीत होते आणि तू तु मै मै करीत होते...


सईचे तिकडे लक्ष गेले आणि ती म्हणाली काय झालं तुम्हा दोघांना भांडायला...?

पनती म्हणाली....! मी पप्पाला नाव सांगणार आहे अभी दादाचे...

सई म्हणाली ....! काय केले अभिनय तू ..?


पनती म्हणाली....!मम्मी मला म्हणतोय कसा अभी दादा मम्मी पप्पा माझे अन फक्त माझेच आहे.... आणि प्रत्येक गोष्ट माझीच ऐकतात आणि मला जे पाहिजे ते पण घेऊन देतात...


अरेच्या असा का बोलतो आहेस अभी तू .., मोठा आहे म्हणून तुझं ऐकतात पप्पा ... समजले ना ..? की देवू एक पाठीवरती धपाटा....

बिचारी पणतीच्या मागे लागला होतास काय अभीनय म्हणाला ....अगं आई गंमत करीत होतो ना हिची ... बस रडून-भडून खरे करते ही आपलं... 

सई म्हणाली ....! चला चला लागा आपल्या कामाला अभ्यास करा...मुलं आपापल्या रूममध्ये निघून गेले....


सईला जरा वेळ अजून शांतता मिळाली आणि ती पुन्हा विचार करू लागली म्हणाली....माझ्या घरट्यात सारखा चिवचिवाट सुरू असतो , माझी ही दोन लेकरं माझ्या संसाराच्या वेलीवरची गोंडस फुले आहेत ....माझ्या मुलांपासून मी दूर राहू शकत नाही ....या दोघांना काही कमी-जास्त झालं तर मी जगूच शकणार नाही.....

आणि माझी मुलं माझ्यापासून दुरावली तर तिच्या छातीत कळच उभी राहिली आणि ह्यावेळी या एका विचाराने ती पुरती अर्धमेली झाली आपल्यातच घाबरली म्हणाली.... नाही हे तर निरागस मुलं जरा डोळ्याआड झाली तरी सहन होत नाही..

या गोष्टीने तिच्या डोक्यात प्रकाश पडला म्हणाली ...ही माया ममता वात्सल्य स्त्रीजातीला जन्मताच मिळालेली आहे ती आपल्या मुलांना आणि कुटुंबियांना सोडू शकत नाही....


सई मनातच म्हणाली ....! तिच्या जागेवर मी असती तर मी काय केले असते पतीला आणि मुलांना सोडून प्रेमाच्या आहारी गेले असते काय ?..नाही नाही हा मी काय विचार करीत आहे , नाही अस होणं तर शक्य नाही... असा घृणीत विचार मनात येणे म्हणजे आमच्या स्त्रियाच्या संस्काराच्या विरुद्ध आहे....आम्ही स्त्रिया या गोष्टीला एक प्रकारचे खूप मोठे पाप ..अतिशय दुर्दम्य पातक आपल्या हातून घडलं आहे अशी जाणीव होऊन 

पश्चातापाच्या अग्नीत जाळून स्वाहा होऊ...


मग मी सुमेधाशी अशी अपेक्षा कशी करू शकते,मी किती मंदबुद्धी आणि नासमज आहे.... आजवर मला तिच्या मनाच्या भावना का कळल्या नाही...


सुमेधा सर्व सोडून आणि प्रशांतच्या प्रेमाला कबूल करणे म्हणजे .,तिचा नीटनेटका संसार तिच्या सोन्यासारख्या छकुल्या बाकी सर्व कुंटूबिय तिच्यावर जीवापाड प्रेम करणारे आहेत ..


त्यांना सोडून असा विचारसुद्धा कशी करणार .. म्हणून ती अशी वागत होती तर.... अग बाई सई आत्ता

खरं बोलली तू,असं म्हणून स्वतःच्या डोक्यावर चापट मारली मीच पागल आहे जे अप्राप्य आहे ते प्राप्त कसं होणार सुमेधा जे करते आहे ना ते बरोबर आहे बर का सई ......आज मी तिला शाबासकी देणार आणि म्हणणार " यु आर ग्रेट" 


लगेच जाते मी सुमेधाला भेटायला आणि सई लगबगीने निघाली सुमेधा कडे ,, धडक मोर्चा दिला तिने घरी गेल्यावर सुमू सुमू म्हणून आवाज दिला अन सुमेधाला गच्च मिठी मारली.... आणि म्हणाली सुमू कशी आहेस तू , तुला मी पूर्णपणे ओळखले नव्हते गं माफ कर मला चुकलेच माझे , यु आर ग्रेट यु आर टू ग्रेट 

म्हणुन तिचा लाड करू लागली.... सुमेधा टुकूर टुकूर पाहतच राहिली....

सई म्हणाली.....! तू खूप बुद्धिमान आहेस ग सुमू संसाराचे गणित तू बरोबर सोडवले तू स्वतःला त्रास देऊन चटके सहन केलं.. आपल्या संसारा करिता किती सहन करीत आहे आणि आपल्या मनाला किती मारत आहे...तू इतकी छान का बर आहेस गं सुमू ?..  


तुला जेव्हापासून प्रेमाचा साक्षात्कार झाला आहे तेव्हापासूनच तू चिंता करीत आहे ..प्रशांतचे आयुष्य तुझ्या प्रेमात वाया गेले म्हणून तुला अतिशय खंत आहे...

प्रशांतच्या उपकाराची परतफेड तू आपल्या कडून आपला देह झिजवून व्यथा घेतल्या आहे ....वेदनां घेऊन कष्ट साहून प्रशांतला श्रद्धासुमने अर्पण करणार आहेस ना तू...? परंतु तू त्याचे प्रेम कबूल करणार नाही आणि आपल्या कुटुंबियांना सोडणार नाही..हाच तुझा हेतू होता ना..?

सुमू तू एका दृष्टीने प्रशांतच्या उपकाराची परतफेड करीत आहे .... तू त्याच्या प्रेमाच्या बदल्यात तु आपला देह जाळती आहेस ना सुमू ..?.आणि व्यथा वेदनां घेऊन प्रशांतला या देहाचे श्रद्धासुमने अर्पण करणार आहेस ना तू...? सईच्या डोळ्यातून सारखे अश्रु वाहत होते आणि ती सतत बोलत होती ..आणि हमसून हमसून रडत होती...


 सुमेधाच्या पायाजवळ बसून सईने मांडीवर डोके ठेवले होते..तेवढ्यातच सईच्या केसांवर पाण्याचे थेंब पडत असल्याचे तिला जाणवले,आणि सईने मान उंचावून सुमेधा कडे बघितले सुमेधाच्या डोळ्यातून अविरत धारा वाहत असल्याचे सईने पाहिले आणि तक्षण सईने सुमेधाला कवटाळले आणि दोघी ही हमसाहमशी रडू लागल्या.. सुमेधाने पण तितक्याच वेगाने सईला आपल्या आलिंगनात घेतले होते आणि सईचे अश्रू पुसू लागली...


आणि सुमेधा सईला म्हणाली....! "हे काय येडाबाई किती रडतेस आणि मलाही रडवतेस"...सई आवाक होऊन सुमेधा कडे बघतच राहिली आणि जरा वेळ विचारच करीत राहिली, आणि म्हणाली....मी स्वप्न तर बघत नाही ना..? मी झोपेत तर नाही ना सुमू ...?तू माझ्याशी बोलत आहे तिने लगेच स्वतःला चिमटा घेतला, हे काय मी स्वप्नात नाहीतर मला तर चिमटा जाणवत आहे नंतर सुमेधाला ही चिमटा घेऊन बघितला सुमेधा लगेच म्हणाली....! अग सई तू स्वप्नात नाहीस गं...आणि मी पण स्वप्नात नाही ...


सई चांगली ताठ होऊन उठून बसली आणि सुमेधाला म्हणाली .....! तू खरच बोलत आहेस ना माझ्याशी सुमू...?


सुमेधा म्हणाली....! सई किती जिद्दी आहेस ग तू,

तुझी तपश्चर्या पूर्ण झाली तू मला शेवटी बोलते केलेच...


खरेच गं तू माझे सारे मर्मबंध तोडले आहेस आज , तुझा प्रयत्न सफल झालेला आहे तुझा ध्यास तुझी तगमग पाहून मला नाही राहवलं माझ्या वेदनेवर फुंकर घालणारी मला समजणारी तू एकटी होतीस ....आणि तुझी तळमळ तुझे कष्ट पाहून माझे मन द्रवले आहे ....मी तुझी मेहनत कशी वाया जाऊ देणार होते...! 


सुमेधा पुनश्च म्हणाली....! मी माझे हृदय पाषाणा पेक्षाही कठोर केलेले होते पण तुझ्या पुढे काहीच चालले नाही माझे.... तू त्या दगडालाही पाझर फोडला तू एकमेव असली कोहिनूर हिऱ्यासारखी माझी प्रिय सखी आहे...!


 मला प्रेम म्हणजे काय आहे ते उलगडले आहे... या पाषाणाला ही तू पाझर फुटला आहे...! सुमेधाने सईला पुनश्च आपल्या हृदयाशी कवटाळले आणि सईचा लाड करू लागली अश्रुंची बरसात होतच राहिली ,कितीतरी वेळ दोघेही त्यात भिजत होत्या....तो आगळावेगळा मिलाप बघायला त्या दोघी व्यतिरिक्त तिथे कुणीच नव्हतं दोघींच्याही मनात आनंदाचा बहर फुटला होता, दोघि ही स्वर्गात विचरण करीत असल्याचा भास त्या अनुभवत होत्या....

सुमेधा पुनश्च म्हणाली....! सई तू माझ्या तपश्चर्येत विघ्न आणले आहेस. आता तूच सांग मला मी काय करू..?


इकडे राघव पूर्ण मद्याच्या आहारी गेलेला होता घरचे सर्व चिंतेत होते परोपरीने सर्वांनी राघवाचे व्यसन सुटावे म्हणून खूप प्रयत्न केले परंतू राघवला खंत होती दुःख होते...

सुमेधाला दुःख वेदना दिल्याची जाणीव त्याला स्वस्थ बसू देत नव्हती त्याचे मन त्याला खात होते... तसेच राघवचे पण सुमेधा वर खरोखरच खुप प्रेम होते ... पण त्याच्या उभ्या संसाराला दृष्ट लागली होती त्यात त्याचे अस्तित्व पुर्णतया नष्ट व्हायच्या मार्गावर होते....तो तडफडत होता पंख तुटलेल्या पक्ष्यासारखी त्याची अवस्था होती...वखवखलेल्या उन्हात तो व्याकूळ होऊन तडफडत होता... काळजाच्या कपारीत कोरलेल्या भूतकाळाच्या काळोखात तो खोलवर रुजला होता त्याच्या जीवनातल्या काट्यांना तो नाही काढू शकला आणि आपले अस्तित्व मातीमोल करून टाकले होते....

आणि सुमेधाचे जीवनही मातीमोल करून टाकले होते.. तिच्या हातावरची मेहंदी स्वतःच पुसली अन त्या जागेवर काळा रंग फासला होता... तिचे प्रेमाचे घरटे तोडून टाकले होते आणि राघव वेड्यासारखा जगत होता ,त्याला जगणेही जमले नाही अन मरणेही जमले नाही , यशअपयशाच्या खाचखळग्यातून गटांगळ्या खात होता....

38 

सुमेधाला दुःख वेदना दिल्याची जाणीव राघवला स्वस्थ बसू देत नव्हते त्याचे मन त्याला धिक्कारत होते... तसे राघवचेपण सुमेधावर अतिशय प्रेम होत.. पण त्याच्या उभ्या संसाराला दृष्ट लागली होती त्यात त्याचे अस्तित्व पुर्णतया नष्ट व्हायच्या मार्गावर होते.


इकडे सुमेधा आणि सई दोन तास उलटले तरी बाहेर आल्या नाही म्हणुन आई म्हणाली ,इतका वेळ ह्या दोघी काय करीत आहे ..त्यांना काही हवं-नको पाहिजे का म्हणून सुमेधाच्या रूममध्ये डोकाविते, तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला.. विस्मित नेत्राने सुमेधा आणि सईचे हसणे बोलणे बघत होती ती कितीतरी वेळ दारातच उभी होती... आई भानावर आली आणि म्हणाली ....अगं बाई मी हे काय बघते आहे..सुमू माझी सुमू बोलत आहे तू अगदी स्वस्थ आहेस ठणठणीत आहे माझा माझ्या डोळ्यावरती विश्वासच बसत नाही असं म्हणत आई सुमेधाच्या जवळ आली आणि तिला आपल्या आलिंगनात घेतले, माय लेकीचे आनंदाश्रृ वाहात होते...आईचा मायेच्या स्पर्शाने दोघीही चिंब झाल्या होत्या...आईच्या कुशीत येऊन हसत होत्या....


सई म्हणाली असे विस्मित होऊ नकोस ग मावशी आता आपली सुमू एकदम ठणठणीत झालेली आहे आणि तिला भूक देखील लागलेली आहे... आई बावरल्या सारखी कधी सुमूकडे तर कधी सई कडे बघत होती... आणि दोघिंच्या ही डोक्यावरून पाठीवरून सारखा लाडाने हात फिरवत होती....


 क्षितिजापार गेलेले रानपाखराचे इवले इवले पिल्लू जेव्हा उंच भरारी घेऊन उत्साहात जमिनीवर माघारी येतात तेव्हा त्या पाखरांना जसा हर्ष होतो. काहिशी तशीच स्थिती आता आईची होती ....

... सुमेधाची आई आनंदात सैरावैरा धावून उत्साहित होऊन बाहेर आली,, आणि काय करू काय नको कुणाला सांगू कुणाला नको..ही बातमी सर्व घरच्यांना सांगितली , सर्वांनाच खूप आनंद झाला होता की आपली सुमू आता बरी झालेली आहे .. सई पण म्हणाली मी पण सर्वांना कळविते.. सुमेधाने लगेच सईचा हात धरून तिला असं करण्यास मनाई केली.....

सई म्हणाली..!.असं का करतेस आमच्या आनंदावर विरजण कां घालतेस .तू आता बरी झाली आहेस मी पण सगळ्यांना सांगणार आहे...

सुमेधा म्हणाली..!. तू वेडी आहेस का .? हा केलेला त्याग 

वाया घालवशिल काय ..?.. पुन्हा माझ्या आयुष्यात अांधार होईल ना..! प्रशांतला तर मुळीच काही सांगू नकोस तुला माझी शपत आहे.... नाहीतर मी पुन्हा तुझ्याशी बोलणार नाही...


सई म्हणाली...!. मी प्रशांतला कधीच सांगणार नाही तू निश्चिंत रहा आणि आपला संसार व्यवस्थित कर तुझा पूर्णजन्म झालेला आहे त्याचा फायदा घे , आपल्या नवर्‍याला वठणीवर आणून आणि आपल्या रिया नव्याला चांगले शिक्षण देऊन कर्तृत्ववान बनव.तुम्हा मायलेकिचे जन्मजन्मांतरीचे ऋणानुबंध आहेत .त्यात दुरावा येता कामा नये , काळजी घे वेडाबाई स्वतःची येते मी ,

आणि सई आनंदाने आपल्या घरी गेली .....


इकडे प्रशांतचे मन काही थाऱ्यावर नव्हते तेव्हा तो ऑफिस मधून लांब रजा घेऊन कुठेतरी पांडवां सारखा अज्ञातवासात निघून गेला होता..

 त्याच्या आई-बाबांनी खूप विचारले की तू कुठे निघाला परंतु त्याने स्थळ सांगितले नाही तो म्हणाला मी जिथे जाईल तिथून फोन करीन काऴजी करू नका, मी काही दिवसात परत येईन ,,


 तो जेव्हा निघाला त्याला स्वतःला सुद्धा माहित नव्हते की तो कुठे जाणार आहे विजा पासपोर्ट तयारच होता . ज्या विमानात सीट होती त्या विमानाने तो प्रवास करायचा बारा वर्षाचा वनवास भोगलेला प्रशांत आता अज्ञात वासात होता .त्याच्या विमानाने आकाशात उंच भरारी घेतली आणि तो अंमेरीकेला पोहोचला होता ...


सध्या तो कॅनडा मध्ये त्याचे बस्थान होते , आणि तिकडचे सगळे प्रेक्षणीय स्थळ त्याने बघितले परंतू मनात उदासिनतेने घर केले होते ..

हेलिकॉप्टरने आकाशातून तिथले वाटरफॉल्स बघितले. नायगरा फॉल्स चे दृश्य सर्वांसाठी रोमांचित करणारे होते पण प्रशांत साठी फक्त भटकंती होती कॅनडाच्या रॉकी मौंटन पर्वतरांगा जणूकाही खुल्या हाताने देवाने नैसर्गिक सौंदर्य वाटले होते , कॅनडाच्या पश्चिम दिशेकडून तर पूर्ण पूर्व दिशे पर्यंत निसर्गाची कृती अप्रतिम होती...

जास्पर बँफ, लेक लुईस, रॉकीज मधली सर्वात निसर्गरम्य ठिकाणे त्याने बघितली एडमाॅन्टन शहरात सर्वात मोठे शॉपिंग मॉल बघितले भव्यदिव्य वाटर पार्क हॉटेल्स ,नॅशनल पार्क बघितले , सभोवताल पसरलेल्या पर्वतरांगा स्वच्छ निळी लेक , बर्फाळ नदी आणि वरून पडणारे अनेक धबधबे , फुलांचे रंगीबेरंगी ताटवे, भरपूर नैसर्गिक सौंदर्य , परंतू प्रशांतच्या मनात काळाकुट्ट अांधार पसरला होता , कर्मशियल जगापासून दूर असलेला प्रशांत फक्त एकच चेहरा बघत होता आणि तो चेहरा सुमेधाचा होता सोबतची सर्व मंडळी एका कुटुंबासारखी वागत होती नवीन मित्र मैत्रिणी सर्वांना आपल्या वयानुसार मिळाले होते खरच ते स्वप्नासारखे स्वर्गीय अभास देणारे रोमांचित करणारे होते .सर्व आपली पिकनिक मनोरम कशी होईल याकडे सर्वांचा कल होता...


हायकिंग, कॅनोईंग हॉर्स बॅक रायडींग फिशिंग माऊंटन,बायकिंग, अशा एडवेंचर एक्सपीरियंस सर्वांनी घेतले होते सर्व सोबत प्रशांत पण ह्या एडवेंचर मध्ये गुरफटला होता स्कीईंग उत्तम स्लोप, स्नो शुईंग, डॉग स्लेज, स्लाइड्स ,स्नोट्युन, अश्या सर्व विंटर ऍक्टिव्हिटीज मजा सर्वांनी घेतली होती परंतु प्रशांतच्या मनात फक्त सुमेधा बसली होती आणि तो एक सेकंद ही तिला विसरू शकला नाही ..त्याच्या हृदयात त्या जखमा फुलासारख्या गोंजारून ठेवलेल्या होत्या,  ऊन वादळात ,पांढऱ्या बर्फात तो त्याच्या प्रेमाला शोधत होता.. सर्वस्व देऊनही त्याला काही मिळवता आलेले नाही. कमीत कमी एक दिलासा हवा होता .पण तो ही नाही.."


इकडे सुमेधा आपल्या घरी गेली .तिचा संसार तिची चातकासारखी वाट बघत होता .रिया नित्या तर आनंदाने नाचू लागल्या होत्या, सासू-सासरे ,राजीव संध्या सर्व आंनदात होते ... राघवला ही सुमेधा परत आल्याचे समाधान होते...राघव सुमेधा पासून दूरच राहायचा त्याला सर्वांची काळजी होती पण त्याच्या बस मध्ये आता काहीच उरलं नव्हतं...


सुमेधाच्या जीवनात दु:खाने स्थान बणवले होते, जसे काही दु:खच घेऊन आलेली होती , सुमेधा आता नविन संघर्षमय जीवन जगणार होती.. राघव मद्य घ्यायला लागला होता, तो मद्यावाचून जगू शकत नव्हता जर का त्याने मद्य घेतले नाही तर त्याचे हात पाय लटपटायला लागायचे शक्तीहिन झाल्या सारखे त्याला वाटत होते . 

सुमेधा राघवची सेवा करायची त्याला काही गोष्टी प्रेमाने समजवायची आपल्या दोन मुलींचा वास्ता द्यायची परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही,दिवसेेंदिवस  कमजोर होऊन कसातरी आपल्या संसाराचा गाडा रेटू लागला होता कालचक्र फिरत होते दिन मान बोलता-बोलता दिवस सरत होते.रिया दहाव्या वर्गात आणि नित्या सातव्या वर्गात गेल्या सिया असती तर ती पण बारावीला असती..

तिची आठवण सुमेधा क्षणोक्षणी करीत होती आणि

अश्रु गाळत होती ...

राजीव संध्याचा मुलगा पण त्याच्यापाठोपाठ सहाव्या वर्गात शिकत होता तिघे पण अभ्यासात चांगलेच हुशार होते राजीव चा मुलगा सुमेधाजवळ शिकायला होता या तिघांच्या शाळेच्या ट्युशनच्या वेळा ठरलेल्या होत्या सुमेधाने पण मुलांच्या प्रगतीसाठी स्वतःला झोकून दिले होते एरवी राघवची तब्येत बिघडत राहायची . टेस्ट वगैरे केल्या गेल्या असता लिव्हर संमधी बिमारी असल्याचे निष्पन्न झाले, राघवला औषधी खाण्याचा कंटाळा होता त्यामुळे सुमेधाचे कार्य अजून वाढले होते ...राघवच्या तोंडात औषध गोळ्या टाकण्यापासून सर्व काम सुमेधा निमूटपणे करीत होती आताशी राघवची तब्येत खूप खालावली होती...

कामावर जाणे बंद झाले होते. परिस्थिती नाजूक होती..पूर्ण जबाबदारी राजीवच्या खांद्यावर आली होती...


राजीवची जवाबदारी वाढली होती .सुमेधा स्वतःला पंगू समजत होती.. संसारात काळोख भरला होता . पराधीनता आली होती. जीवन जगणे असह्य वाटत होते तरीपण जगणे आवश्यक असल्यामुळे सर्व सहन करून जगत होती...


रियाला बाहेर सिटीमधे शिकायला ठेवले होते ती सध्या होस्टेलमध्ये राहत होती खर्च पण बराच वाढलेला होता, राघव अर्धे दिवस कामावर जात नसे कारण तब्येत खूपच खालावली होती चाचण्या केल्या गेल्या ऑपरेशनची तयारी झाली होती पण काही फायदा होणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले कारण आतून लिव्हर खराब झालेले होते परंतु सुमेधाचे सतत प्रयत्न सूरू होते तिने कधिही धीर सोडला नाही.....


क्रमशः






Rate this content
Log in

Similar marathi story from Drama