Meenakshi Kilawat

Drama

3  

Meenakshi Kilawat

Drama

भाग28"रूनुझूनु पैंजनाची"कादंबर

भाग28"रूनुझूनु पैंजनाची"कादंबर

11 mins
126


राघव आता अनंतात विलीन झालेला होता. एक तारा पुन्हा अनंतात उमटला...तसेच सुमेधाने तोंडातून टाहो फोडला तिचा आवाज ऐकून .. आईबाबा, राजीवपण धावून आत आले सर्वांना जे समजायचं ते समजले आणि सर्व रडायला लागले.. सईने सुमेधाला धरून बाहेर काढले...ते हॉस्पिटल चे वातावरण होते त्यामुळे सर्वांनी एक दुसऱ्याला आधार देऊन बाहेर दूर पार्कमध्ये नेले...

राघवाचे शव मिळेपर्यंत राजीव आणि प्रशांत थांबला बाकी सर्वांना घरी जाण्यास सुचविले... सई सर्वांना घेऊन घरी गेली.. काही एक तास दीड तास लागला असेल राजीव आणि प्रशांत राघवाचे शव घेऊन घरी आले....

सर्व सोपस्कार आटोपले...

राघव गेला परंतु असंख्य आठवणी मागे सोडून, सगळे त्याच्या आठवणीत गुरफटले प्रेम करणाऱ्या घरात जीवन कसं महत्त्वपूर्ण असतं हे सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते दुःख करण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच उरलं नव्हतं किती ठिकाणी हादसे क्षणाक्षणात जीवन नाहीसे होतात पण कुणाला काहीच सोयरसुतक नसतं आणि जाणे-येणे ऋतू चक्राप्रमाणे सतत सुरू असते ही तर प्रकृतीची देन असते.


 सभ्य समाजात रितीरिवाज परंपरेनुसार काही नियम काटेकोर पाळल्या जातात किंवा लादल्या जातात ,छातीवर दगड ठेवून,दुःख बाजूला ठेवून अनौपचारिक दुनियादारी निभवावी लागते ,अग्नि दाह संस्कार झाल्यावरचे नियम अटी पाळण्यात पूर्ण दिवस दिवस जातात त्यानंतर तिसरा दिवस दहावा दिवस तेरावा दिवस चौदावा दिवस असे अनेक पूजा पाठ विधि नैवेद्द आपापल्या परीने करताना दिसतात .

या रूढी परंपरा निभावताना आपल्या प्रेमळ व्यक्तीच्या दुःखात जवळचे नातेवाईक तडफतात तरी देखील हे सोपस्कार करणे किती आवश्यक आहे , हे केल्याने पितर शांत होतात आणि  गेलेल्या व्यक्तीला मुक्ती मिळते ,

ते सर्वांना सर्व स्त्रियांना का म्हणून सर्व सोसणे आणि निभावणे स्त्रियांच्या माथी अनेक लोक खापर फोडणारे असतात वैधव्य म्हणजे त्यांना शापित आहे की काय आणि ती कुविचारी पद्धतीचा सामना करणे इच्छा असो वा नसो विधवा स्त्रीला भाग पाडणे ही संस्कृती संस्कार कोणी लावले कोणास ठाऊक सर्वांचे दुःख सर्वांच्या हृदयात स्थानापन्न होते सर्वे तळमळत होते पण बाकी प्रकांड प्रतिष्ठित लोक नियमावली सांगत होते असं करायचं तसं करायचं सगळे सोपस्कार होऊन अग्नी दिली.

या रूढी परंपरा निभावताना जवळचे प्रेमळ व्यक्ती कित्येकदा ढासळत असतात तरी पण केल्याशिवाय गत्यंतर नसते या रूढी परंपरा निभावताना आपल्या प्रेमळ व्यक्तीच्या दुःखात तडफतात तरी देखील हे सोपस्कार करणे किती आवश्यक आहे , हे केल्याने पितर शांत होतात आणि  गेलेल्या व्यक्तीला मुक्ती मिळते, ही गोष्ट ठाम पणे समाज निक्षून सांगत असतो,

त्यात भर म्हणजे पती गेला त्या विधवा स्त्रीचे तर हालच पहावत नाही तिला होणाऱ्या अतिशय आंतरिक वेदना तिच्या दुःखाला पारावार नसतो त्यापेक्षा आधीची जी पद्धती "सती प्रथा" होती ती एकदाची बरी होती एकदा उडी टाकली सरणात की संपलं सारं तिला एकदाच मरण पत्करावे लागायचं परंतु या सभ्य समाजात विधवा स्त्रीला वारंवार मरावं लागतं.

आणि त्या विधवा स्त्री च्या वेदनेला पती गेला या दुःखा व्यतिरिक्त कित्येक दा मरताना दिसतात सती प्रथा बरी होती आधीची पण ती बंद झाली तेव्हापासून कित्येकदा स्त्रियांना वैधव्य भोगावं लागतं दुःख सहन करावं लागतं काय स्त्रियांचा दोष असतो विधवा होणे म्हणजे पूर्वापार चालत असलेल्या मुलींना अशा वेळी सर्वच बढावा देत असतात.

मरणांकिंत वेदना भोगाव्या लागतात .

तिने आयुष्यात कितीही अडचणीवर मात केलेली असली तरीही विधवा झाल्यानंतर तिची किंमत कवडीमोल होत असते,

परिस्थितिनुसार अफाट दुःख पोटात घालून आपल्या संसारात वाटचाल करते परिस्थितीवर मात करून झुंज देत आपला संसार नीटनेटका करायचा प्रयत्न करते परंतु हा सभ्य समाज

शब्दाने तिला घायाळ करतात जसे काही तिच्या हातून खूप मोठे पाप झालेले आहे आणि ती आपल्या इच्छेने विधवा झालेली आहे,

अशा अनेक गोष्टींचा सामना तिला करावा लागतो , हक्काचा जोडीदार गमवून कुणीही आनंदी राहू शकत नाही पण समाजाला असं वाटतंय की आता ही बाई मोकळी झालेली आहे आणि तिच्या चारित्र्यावर अनेक प्रकारचे दोष लावून मोकळे होताना दिसतात अशा असंख्य गोष्टींचा सामना विधवा स्त्रियांना करावा लागतो . त्यात अनेक संधीसाधू लोक मुखवटा घालून विधवा स्त्रीचे भलं करण्याच्या प्रयत्नात असतात ,परंतू आत एक बाहेर एक खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात यांच्यावर विश्वास करून त्या बाईचे कधीच भलं होणार नसते ती पाखराप्रमाणे जाळ्यात अडकते आणि तिचे जीवन नेस्तनाबूत होते....

परंतु सुमेधा चे नशीब या बाबतीत खूप बलवत्तर होते तिला सर्वांचं खरं प्रेम मिळालं नातेवाईकांच भरपूर प्रेम मिळत गेलं आणि ती आपल्या परिवारात दुःख गिळुन आनंदी राहण्याचा प्रयत्न करू लागली ....

सर्व पाहुणे आपापल्या गावी परत गेले ती आपल्या मुलींना घेऊन राघवाच्या आई-बाबा जवळ राहू लागली मध्ये मध्ये सर्व नातेवाईक येऊन पाहून भेटून जायचे सगळे तिला सांत्वना देऊन जायचे तिची खूप काळजी करायचे असेच दोन महिने उलटले..


इकडे दिल राजीव गावी आला नोकरीवर रुजू झाला परंतु त्याचं मन काही लागेना वारंवार आपल्या दादा चे शब्द त्याच्या कानावर आदळायचे दादाने त्याच्याकडून खूप काही अपेक्षा बाळगल्या होत्या आणि त्या पूर्ण करायला मन धजावत नव्हतं तरी पण तो प्रयत्न करणार होता राघव दादाने त्याच्याशी वचन घेतले होते की सुमेधा आणि प्रशांतचे लग्न करून द्यायचं ही एक खूप मोठी जबाबदारी त्याच्यावर होती त्याच्या मनात सतत कालवाकालव चलबिचल व्हायची त्याला ही समाजाची भीती होती !! समाज काय म्हणेल!! सुमेधा वहिनीची वय जास्त नव्हत , एकटी सुमेधा यापुढे जीवन कशी जगणार, विवाह करायलाच पाहिजे अशी त्याची मनोमन इच्छा होती ,

त्यालाही सुमेधा वहिनीची खूप काळजी होती मुलींच्या भविष्याची पण काळजी होती ....

वहिनी रागवणार तर नाही ना एक नाही अनेक प्रश्न त्याच्या मनात पिंगा घालत असे राजीव ने या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्या पत्नीचा विचार घ्यायचं ठरवलं 



 42

इकडे राजीव गावी आला नोकरीवर रुजू झाला परंतु त्याचं मन काही लागेना वारंवार आपल्या दादा चे शब्द त्याच्या कानावर आदळायचे राघव दादाने त्याच्याकडून खूप काही अपेक्षा बाळगल्या होत्या आणि त्या पूर्ण करायला मन धजावत नव्हतं तरी पण तो प्रयत्न करणार होता राघव दादाने त्याच्याशी वचन घेतले होते की सुमेधा आणि प्रशांतचे लग्नाचे ही एक खूप मोठी जबाबदारी त्याच्यावर होती त्याच्या मनात सतत कालवाकालव व्हायची,बघितले तर ही गोष्ट योग्य होती सुमेधा वहिनीचे वयच काय होत, त्याला सुमेधा वहिनीची खूप काळजी होती मुलींच्या भविष्याची पण काळजी होती एकटी यापुढे जीवन कशी जगणार, विवाह करायलाच पाहिजे वर समाजाची भीती होती !! समाज काय म्हणेल !! परंतु राजीव ह्या गोष्टीला घाबरत नव्हता समाजाचं काय आहे समाज चांगल्याला ही नाव ठेवतो आणि वाईटाला ही ठेवतो समाज म्हंटलं तर हे सर्व आलंच त्याकडे दुर्लक्षच करायला पाहिजे आपल्याला जे हवं असतं तेच करायचं,

परंतु मी जर वहिनी ला विचारले आणि त्यांना वाईट वाटले तर एक नाही असंख्य प्रश्न राजीवच्या मनात रेंगाळत होते, तसे राजीव ने या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्या पत्नी संध्यांचा विचार घ्यायचं ठरवलं, राजीवने आपल्या पत्नीशी विचार विमर्श केला तेव्हा 

राजीवच्या पत्नीने म्हटले!! तुम्हाला राघव दादाने जाता जाता जवाबदारी दिली ती तुम्ही आपल्या मनापासून पूर्ण केली पाहिजे नसेल जमत तुमच्याशी तर मला सांगा मी बोलते वहिनीशी आणि लगेच प्रशांत भाऊजीसोबतच सईताईचा पण सल्ला घेऊ या की , दोघांनी मिळून विचार विमर्श केला आणि ठाम निर्णय घेतला

झालं एकदाच दोघांचाही एकच विचार होता पटकन दोघांनीही एक्शन घ्यायचे ठरवले आणि कामाला लागले,


जे काही करायचं ते पटकन केलं पाहिजे नाहीतर हातात आलेली वेळ निघून जाईल राजीव आणि संध्या ने गावी जायचा विचार केला तयारी केली लगेच निघाले गावी पोचल्यावर आई बाबांना नमस्कार करून गप्पागोष्टी केल्या राजीवने एकांत बघून आईबाबाशी चर्चा केली,

बाबा म्हणाले मलाही !! सुमेधा ची सारखी चिंता सतावते आहे आणि आईला पण तिच्या भविष्याबद्दल चिंता वाटत आहे,परंतु तिच्याशी बोलायला मन धजावत नाही .

राजीव म्हणाला !! तुम्ही बेफिकीर रहा मी संध्याला

याकामी लावले आहे.


 संध्याने वहिनीच्या जवळ जवळ राहून तिच्या मनाला चाचपडले परंतु वहिनीच्या मनात काय आहे संध्याला तरी पुरते समजले नव्हते वहिनीच्या मनाचा थांगपत्ता लागला नाही परंतु संध्या 

वहिनीच्या मनाचा भेद घेत राहिली अजून तरी तिला त्यात सक्सेस मिळाली नव्हती ती त्याच विवंचनेत होती तेवढ्यात तिला आठवले की आपल्या मुलाचा वाढदिवस येतो आहे ती मनातल्या मनात प्रसन्न झाली की आपल्याला काहीना काही प्रमाणात वाट गवसली आहे,संध्या ने राजीवशी या गोष्टीवर चर्चा केली.तेव्हा राजीव पण एकदम खूश झाला की थोडक्यात मार्ग सापडला आहे,

या विषयावर राजीवने आईबाबाशी चर्चा केली 

बाळूचा परवाचं वाढदिवस आहे आणि त्या निमित्त आपण पाहुणे बोलवायचे ,सर्वांनी हामी भरली ,मग काय त्यांनी कार्यक्रम आखला आणि यानिमित्ताने प्रशांतला गावी बोलवायचं आणि सईला पन बोलवायचं या वेळेस सईची आपल्याला खूपच गरज आहे, सई वहिनीची बालमैत्रीण आहे आणि बालपणापासून त्या दोघींची खूप छान मैत्री आहे सई वहिनीला पद्धतशीर समजावून सांगेल,रागा लोभाची परिस्थिती ती सांभाळून घेईल ,


ऐकून बाबालाही आनंद झाला तसेच राघव गेल्या पासून वातावरणात दुःखाचं सावट होते सर्वजन उदास रहायचे ,हे दुःखाचं सावट दूर होण्यासाठी काहीतरी पूजापाठ कार्यक्रम होणे जरुरी आहे.

मनातल्या मनात त्यानिमित्त त्यांनी पूजापाठ करण्याचे ठरविले .सर्वांना वाढदिवसाचे आमंत्रण निमंत्रण देण्यात आले, सर्वात आधी सई आणि प्रशांतला आमंत्रण देण्यात आले.

गावातल्या लोकांनाही जेवण करायला निमंत्रण दिले मित्रमंडळी, सगेसोयरे सर्वांनाच बोलवले.

  सर्वात आधी सई आली छान गप्पागोष्टी रंगल्या

राजीवने सईला राघव दादाच्या अंतिम इच्छेनुसार आपल्याला आता प्रशांत आणि सुमेधा वाहिनीचा विवाह करायचा आहे आणि वहिनीला विचारायची आमची हिंमत होत नाही तरीपण तू आम्हाला ह्या कामी मदत करू शकते ताई म्हणूनच हा कार्यक्रम आखला गेला आहे.

ही एक फार मोठी जबाबदारी आहे हा विचार करून करून मला झोप येत नाही मी दादा ची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयास करणार आहे पण त्यात तुझी मला मदत हवी आहे करशील ना सई म्हणाली वा वा मी नाही तर कोण करणार मी सुमेधाच्या मनाचा ठाव घेते , तिच्या मनात काय ते तुला मी काय घडले ते कार्यक्रम झाल्यानंतर सांगते.

दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता प्रशांत सकाळी आला कार्यक्रमाची तयारी धावपळ सुरू होती सर्वच पाहुणे मंडळी आलेली होती.घरीच अंगणात स्टेज लावला डेकोरेशन केले,

कार्यक्रमाला ज्यांना बोलावले ते सर्व आले खूप छान वाढदिवस साजरा करण्यात आला सुमेधा आणि इतर मंडळीने पण हसून खेळून भाग घेतला आणि सर्व ऍक्टिव्हिटी पूर्ण झाल्या, स्वयंपाक खूप सुंदर झाला होता वरण-भात मसाले भात भाजी पोळ्या गुलाबजाम कढी स्वयंपाक साधाच पण स्वादिष्ट सुरस झाला होता सर्वांनी यथेष्ट भोजन केले,संध्याकाळ झाली होती सर्व आपापल्या गावी परतले प्रशांत पण जायला निघाला होता परंतु त्याला सर्वांनी आग्रह करुन आज रात्रभर थांबवले आणि सईला पण त्या दिवशी कुणीच जाऊ दिले नाही.सर्वच रात्री निवांत झोपी गेले..

दोघी मैत्रिणी सुमेधाच्या रूम मध्ये झोपायला गेल्या आणि प्रशांत राजीव सोबत हॉल मध्ए सर्वांसोबत झोपला रात्री उशिरापर्यंत गप्पागोष्टी रंगल्या होत्या,

 रात्री गप्पागोष्टी रंगल्या खूप बोलायचं होतं फार दिवसानंतर त्यांची भेट झाली होती सईला आता घाई सुटली आणि तिने गप्पा गोष्टीला सुरुवात केली

तिथे दुसरं कोणीच नव्हतं त्यामुळे सईने बिंदास बोलायला सुरुवात केली इकडच्या तिकडच्या खूप गोष्टी केल्या आई कडे गेली होती का वगैरे विचारपूस केली आणि आता विषयालाच हात घातला...

सई म्हणाली !! सूमु तू कशी आहेस ग

सुमेधा म्हणाली खूप छान 

सई म्हणाली मला तुझ्या चेहऱ्यावर तो आधिचा खूप छान आनंद दिसत नाही गं ;;

सई म्हणाली !! बोल ना ग सूमु माझ्याशी आपल्या मनातलं सांग ना किती दिवस झाले आपली भेट नव्हती आत्ता कुठे आपल्याला थोडा वेळ मिळाला आहे , सावकाश बोलूया, आपण दोघी एकमेकांना आपले सुख दुःख सांगूया की,सुमेधा मला तुझी फारच काळजी वाटते गं , एवढे मोठे आयुष्य कसं काढशील तुझी वयच काय आहे सांग सुमेधा तुझं कसं होईल गं?

सुमेधा म्हणाली !! काय बोलू जे व्हायचं होतं ते तर झालं आता काही नाही उरलं जसं आहे तसं ठीकच आहे मी सुखी आहे आनंदी आहे आई-बाबांच्या सहवासात मला बरं वाटते सोबत मुली पण आहे .


सई म्हणाली !! मी आताचे म्हणत नाही तुझी वय बघ किती कमी आहे आणि पूर्ण आयुष्य तुझ्यासमोर आहे आणि उद्या चालून आई-बाबा नसल्यावर कोण कुणाचं आणि कोण तुला सहारा देणार,सगळे आपापल्या कुटुंबात गुंतून असतात, मुली पण सासरी जातील मग काय करणार , तू एकटी पडशील नां?

तेव्हा सुमेधा म्हणाली !! अगं एकटी कशी पडणार इतके मोठे कुटुंब आहे माझ्या मुली माझी चिंता करणार नाही काय?

 सई म्हणाली !! तुझ बरोबर आहे ग पण आपल्या मुली सासुरवाडीला सासू-सासर्‍यांची सेवा करतील तुझ ही करेल म्हणा मुलींचे ही कर्तव्यच आहे म्हणा आई बाबाच केलंच पाहिजे आजकाल मुलामुलींना समान हक्क आहे जर मुलगा नसला तर मुलींनाच करावं लागतं , परंतू तुला हक्काच नाही का कुणी हवं तुला राघव दादाने काय सांगितले होते त्यांची अंतिम इच्छा काय होती ती तू पूर्ण नाही का करणार, जाता जाता शेवटच्या श्वासापर्यंत तुला सांगितलं ना की तू  प्रशांतशी लग्न करशील पण तू ऐकत नाही किती दिवस उलटले आता वर्ष झाले आहे,

सुमेधा म्हणाली !! अगं किती काळजी करतेस माझी मी छान ठणठणीत आहे ना माझं कुणालाच करावं लागणार नाही मीच सर्वांची सेवा करेन आणि माझ्या आयुष्यात जे जे घडलं ते मीच भोगेन मी कुणाला त्रास देणार नाही.

सईने खूप गोष्टी केल्यानंतर मुखातून काही बोलण्यासाठी सुमेधाने तोंड उघडले तशी सई कुणालाच बोलू द्यायची नाही स्वतः बोलायची, परंतु आज सईने चुप्पी साधली ;सुमेधाला बोलायची संधी दिली,


 सुमेधा म्हणाली!! जर का मी प्रशांतची विवाह केला तर लोक काय म्हणतील आणि नातेवाईक काय म्हणतील या बाईला काय कमी होतं म्हणून दुसरा विवाह केला, मुली पण नाराज होतील या समाजात असं काही केलेलं आवडत नाही ग सई !

सई म्हणाली !! म्हणूनच म्हणते ना की मुली लहान आहेत निरागस आहेत करून घे लग्न त्या मोठ्या झाल्यावर का जावया समोर लग्न करणार आहेस केले तरी चालेल ,आपले जीवन आपण कसं जगायचं हे काही कुणी ठरवू शकत नाही मुलींचं काही नाही त्या लहान असो मोठ्या असो आपलं जीवन आपणच सांभाळायचं असतं

आणि प्रशांत तुझ्या मुलींना आनंदाने स्वीकार करेल आपल्या मुलींसारखंच प्रेम करेल आणि आई बाबांची ही जवाबदारी कमी होईल त्यांना म्हातारपणी कशाला टेन्शन देतेस तुला बघून त्यांना ही दुःख होत असते नां ,त्यांना त्यांच्या मुलाची आठवण येत असेल ना ,

सुमेधा शांत होऊन विचार करायला लागली होती आणि सईला झोप येत होती ती पटकन घोरायला लागली...

  तिकडे राजीव प्रशांत ही गप्पा मारत होते इकडच्या तिकडच्या गोष्टी केल्यानंतर विषयाला हात घातला तिथेच संध्या पण होती ह्या दोघांनी मिळून प्रशांतला आपल्या मनातील गोष्टी सांगितल्या आणि राघव दादाची अंतिम इच्छा काय होती त्याची पण आठवण दिली.

प्रशांत म्हणाला !! माझ्या नशिबात विवाहाची रेखाच नाही मुळी जी गोष्ट नाही होणार त्या गोष्टी मागे का लागावे ,

राजीव म्हणाला !! नशिबात नसल्या तरीही त्या खेचून आणाव्या लागतात, शुरविरांची किस्से नाही काय ऐकले पृथ्वीराज चव्हाणा ने संयोगिता ला आणले होते नां संध्या ने पण दुजोरा दिला,

राजीव म्हणाला !!  तिचं जीवन तिला तिच्या मनाप्रमाणे जगू द्या तिच्या इच्छेविरुद्ध मी कोणतेच कार्य करू इच्छित नाही.मी खरं प्रेम केलेलं आहे सुमेधाशी मी कोणत्याही गोष्टीत सुमेधाला दुखवू इच्छित नाही..आजीवन मी तिच्या आठवणीत राहून राहिलेले जीवन जगू शकतोय ; तिच्या खूप आठवणी माझ्या हृदयात संग्रही आहे ,

संध्या म्हणाली !! तुमचं ठीक आहे प्रशांत भाऊजी तुम्ही पुरुष जात पण एका स्त्रीचे कसे होईल तिने समाजात राहून कुणाकुणाशी हात मिळवणी करायची आणि दुःखात दिवस काढायचे 

 त्या गोष्टीवर प्रशांत अबोल राहिला आणि विचार करू लागला मनातल्या मनातच म्हणाला मी कुठे दुःख देऊ इच्छितो तिला तर मी माझ्या हृदयात बसवली आहे,

पुन्हा संध्या म्हणाली !! जर का सुमेधा ताईनी हो म्हटलं तर तुम्ही विवाहाला तयार व्हाल ना? प्रशांत काही क्षण अबोल राहिला जसे आकाशात झुल्यावर झुलत होता त्याला त्याच्या कानावर आलेल्या गोष्टी खरच वाटत नव्हत्या काय खरं असं होऊ शकते माझ्या जीवनात सुमेधा येऊ शकते, तरी हे सर्व ऐकुन तो डगमगला नाही हुरळून गेला नाही मनावर ताबा ठेवला आणि म्हणाला तसं जर झालं तर मी स्वताला भाग्यवानच समजेल राजीव दादा,,माझ्या जीवनात यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट आहे काय ?


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama