Meenakshi Kilawat

Drama

3  

Meenakshi Kilawat

Drama

भाग 24रुनुझूनु पैंजनाचीकादंबरी

भाग 24रुनुझूनु पैंजनाचीकादंबरी

7 mins
8



भाग 24 रुनुझूनु पैंजनाची (कादंबरी)


राजीव थोडा बिझीच होता, न्यायाधीशाने आपला निकाल दिला होता, न्याय मिळाला थोडं समाधान लाभलं पण गेलेला जीव परत येणार नव्हता तेव्हा तो आनंद काही जीवनात फारसा बदल करू शकला नाही ..अजून राघवदादाची सुटका झाली ही गोष्ट पण फार मोठी होती पंरतू कुणाच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता ...

सुमेधा वहिनी ही कोमातून सुखरूप बाहेर आली होती. परंतु तब्येत तेवढी ठणठणीत नव्हती . तिकडे वैद्य बाबानी सात दिवसाच्या औषधी दिल्या होत्या गेल्या चार दिवस काही घटना चांगल्या घडत होत्या ,ही गोष्ट अतिशय सुख देणारी होती आणि राघवमधे खूप बदल झालेला होता ही गोष्ट फारच चांगली होती या चार दिवसात तरी पण कुणाच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता एक अनामिक भीती आणि घोंगावणारे वादळाचे सावट काही केल्या मनातून जाईना...

तेव्हा नित्यनियमाप्रमाणे राजीवने प्रशांतला फोन लावला सुमेधा वहिनीची आरोग्याची चौकशी केली.आणि राजीव म्हणाला..!प्रशांत तुम्ही जो प्रयत्न करीत आहात वहिणीच्या आरोग्यासाठी त्याने आमच्या इच्छा-आकांक्षा बळावल्या आहे आशेचा किरण तेवतो आहे.. तुमच्या यशस्वी प्रयत्नाने आमच्या आशा बळावल्या आहेत.... जर वहिनीच्या आरोग्यात पूर्णपणे सुधारणा झाली असेल तर आदेश द्यावे आम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करू....

प्रशांत म्हणाला.!. ठीक आहे काही दिवस अजून तुम्हाला थांबावे लागेल बाबांचे औषधे कम्प्लीट झाली आणि पूर्ण आराम झाला की मी तुम्हाला लगेच कळवतो..

जेव्हापासून सुमेधा कोमातून बाहेर निघाली तेव्हा प्रशांतचा आनंद गगनात मावेना त्याला मनातून खूप आनंद झाला होता...परंतु ती काहीच बोलत नव्हती...तेव्हा तो क्षणात हिरमुसला घाबरला आणि अजुन वैद्यबाबाकडे गेला त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या सुमेधाची तब्येत ठणठणीत व्हायला किती वेळ लागेल असंही विचारलं वैद्यबाबा म्हणाले...!

इतक्या मोठ्या बिमारीतुन पोरगी बरी झाली आहे आता तिला काही दिवस बरे व्हायासाठी लागेलच ना बेटा....

 तेव्हा प्रशांत ने बाबाच्या पायावर डोकं ठेवलं हो बाबा आणि ते ही तुमच्या कृपेमुळे झालं तुमचा इलाज तुमची औषध संजीवनी बुटी सारखी जीवदान देणारी ठरली.. सुमेधाला दुसरा जन्म मिळाला आणि तिला यातनेतून मुक्त केले... परंतु ती आधी सारखी हसत नाही बोलत नाही.तेव्हा माझा जीव तळमळत असतो...

तेव्हा बाबा म्हणाले..! पोरा तू तिच्याशी सतत संभाषण करीत जा ,तिला एकांत देऊ नकोस ,संपर्कात रहा, तिच्याशी बोलत चला तिचा विरंगुळा करत चला तिला फिरायला नेत चला तुमच्या प्रयत्नांना जरूर यश येईल तुमची मेहनत वाया जाणार नाही पोरा आणि बाबाने त्याला अनेक प्रकाराने खूपच हिंमत दिली....आणि अजून पुन्हा काहीतरी औषध दिली .ऍलोपॅथी औषध पण सुरू ठेवा आणि ही पण द्या त्यांच्याही प्रयत्नांमुळे आज सुमेधा बरी झाली असेल कदाचित, दोन्ही औषधी मिळून तिच्या अंगात जीव आला असेल कदाचित ,काहीच सांगता येतं नाही सर्व वरच्याची कुरपा हाय...

तरी पण माझा हा प्रयोग हमखास 100% बरा करणारा आहे.हा इलम मला माझ्या गुरुजीने दिला होता.आता ते या जगात नाही....

प्रशांत म्हणाला ..!

तुम्ही तो इलम कुणाला दिला बाबा तुमचा कोण शिष्य आहे तुमच्यामागे तो इलम कुणाला तरी तुम्ही दिलाच असेल ना.?

वैद्यबाबा म्हणाले...!

कोणी मिळाला नाही अजून तसा विश्वासू शिष्य मला अजून पावेतो ..

प्रशांतने अजून बाबाशी खूप काही चर्चा केली आणि म्हणाला बाबा तुम्ही ही विद्या कोणाला तरी देऊन जा आता तुम्ही इथे एकटेच असता तेव्हा आपण आज आहो उद्या नाही, इतका मोठा गुण आपण आपल्या पोटात घेऊन वरती जायचे का..?

बाबा म्हणाले ...! प्रशांत बेटा मी तोच विचार करत आहे पण योग्य माणसालाच तो गुण देऊ शकतो ..आता कोणी मानुस मला जर मिळाला तर मी त्याला हमखास ही विद्या देणार हाय..काही वेळाने बाबा हात वर करून म्हणाले ...सापडला तो शिष्य मला आज..

प्रशांत आवासून बघतच राहिला आणि म्हणाला ..! कुठे कुठे आहे बाबा तो..

बाबा म्हणाले.!. इथच माह्या नजरेसमोर ,तुच हाय पोरा माह्या शिष्य हो मी तुलाच माही इद्या देणार हाय..हो मी तुलाच देऊ शकतो, तू हाय का घ्यायला तयार पोरा....

प्रशांत म्हणाला..!

मला कुठे वेळ मिळतो बाबा , आणि मी काही वैद्य किंवा डॉक्टर नाही मला गुण असेल तरी माझ्याकडे कोण येणार ...

बाबा म्हणाले ..! नोकरी किती दिवस हाय.! रिटायर झाल्यावर तू या विद्येचा प्रसार कर, निशुल्क सेवा कर, प्रशांतला ही गोष्ट पटली त्याने म्हंटले.! हो बाबा तुमचं खरं आहे माझे जीवन अगदी फालतू असल्यासारखं आहे.. मला देवाने रूप सौंदर्य पैसा सर्व काही दिले आहे पण शांती नाही दिली आणि जे मला हव आहे ते ही मला मिळालं नाही .. माझा जन्म निरर्थक असल्यासारखा वाटतो त्यामुळे मी हा सेवेचा धर्म स्वीकार करू शकतोय.

माझा हा जन्म असाच रिता जाणार आहे त्यापेक्षा रुग्णांची सेवा करुन का नाही मी जगू शकणार तशी माझी जगण्यातवरची इच्छाच संपलेली आहे पण हा वसा जर मी घेतला आणि सेवा कार्यात मग्न झालो तर चार दिवस अजून माझे आयुष्य वाढेल आणि मी लोकोपयोगी समाजाची सेवा करू शकेन त्यांच्या आनंदात आनंद माणून घेईन हा एक ईश्वराचा वरदान समजून मी हे शिष्यत्व पत्करले पाहिजे..

प्रशांत ने काहीतरी मनोमनी विचार केला आणि बाबाला म्हणाला ..!

बाबा येतो मी औषध घेतली आणि तो गाडीत बसून तडक गावी आला. जितका वेळ मिळतो तितका वेळ तो सुमेधाला देत होता तिच्याशी बोलत होता संभाषण करीत होता सुमेधा मात्र डोळ्यातून अश्रू गाळत असायची .तिला काहीतरी आंतरीक शल्य बोचत असावे..

प्रशांतचे हात हातात घेऊन मूकपणे चुपचाप त्याला बघत होती पण काहीच बोलत नव्हती अशा परिस्थितीत ही तो आपले दुःख न दाखवता तिच्याजवळ हसत मुखाने बसून राहायचा...

आज त्याने वैद्य बाबाशी झालेला संंवाद तिला सांगितला,

तू चल ना माझ्याबरोबर बाबाच्या झोपडीवर त्या वनात निसर्गाच्या सानिध्यात बर वाटेल तुला खूप उल्हास येईल तुला निश्चितच शांती मिळेल.... आणि हो उद्या आपण बाबाकडे जायचे ना नक्की.....

आता तू बरी झाली आहे आहेस तुला न्यायला तुझा पती राघव आणि राजीव येणार आहेत तुला आपल्या गावाला तुला घेऊन जाणार आहे... आपल्या संसारात रममाण होऊन आपला संसार नीटनेटका करावा हीच माझी आंतरिक इच्छा आहे....तरी ती निथेष्ठ पडून राहिली तिला कोणत्याच गोष्टीचा आनंद वा दुःख तिच्या चेहर्‍यावर दिसला नाहीत...निर्विकार डोळ्यांनी ती बघत राहायची...आई-बाबा सासू-सासरे आणि तुझ्या नव्या आणि रिया वाट बघत असेल तुझं तपश्चर्या पूर्ण झाली आहे आता तू आपल्या सासरी जाऊन आपला संसार करावा हीच माझी आंतरिक इच्छा आहे.. काही कमी-जास्त झालं तर मी आहे ना तुझ्या पाठीशी तू बिनधास्तपणे राहशिल ..ती शांत तशीच पडून होती प्रशांत नाना तऱ्हेने गोष्टी करून तिचा विरंगुळा करीत होता

दुसरा दिवस उजाडला तेव्हा प्रशांत ने सिस्टरला सांगितले की सुमेधाला आज बाहेर जायचे आहे तिला तयार करा? ज्यूस औषध देऊन तयारी केली،. ती आपल्या पायावर चालत होती पण निर्जीवा सारखीच होती हळूहळू पावले टाकत तिला प्रशांतने आधार दिला आणि दोघेही गाडीत बसले....

गाडी गेटच्या बाहेर निघाली आणि आपल्या मार्गावर लागली, प्रशांत सुमेधाला म्हणाला कोणतं गाणं ऐकणार आहेस कोणतं लावू सांग ना ! आज तुझ्या आवडीचं गाणं आपण ऐकूया सुमेधा काहीच बोलली नाही , त्याने आपल्या मनाने त्याच्या आवडीचे गीत लावले.. त्या शांत एकांत वातावरणात बेधुंद करणारे संगीत सुरू होते गाडी चालवता चालवता त्याला असं वाटलं की ही गाडी नेहमी अशीच चालत राहावी आणि सुमेधा त्याच्याजवळ अशीच नेहमी बसून राहावी, परंतु काही वेळाने प्रवास संपला बाबाची झोपडी आली,सुमेधाला आधार देवूनच उतरवले आणि बाबाच्या झोपडीत नेले....

बाबा म्हणाले.! अरे वा आज आपल्या पायावर चालत आली पोरगी खूप छान तब्येतीत सुधारणा आहे अशीच चांगली ठणठणीत हो पोरी , तुला सासरी जायचे आहे ना,तुझ्या पोरी वाट बघत असतिल प्रशांतने त्यांना सांगितले की सुमेधाला न्यायला दोन दिवसात राजीव आणि राघव येणार आहेत ती आता आपल्याजवळून नेहमीसाठी जाणार आहे ..

प्रशांत सुमेधाला वनात फिरायला घेऊन गेला तिथे प्रशस्त तलाव होता असंख्य कासव आत बाहेर करत होते खूप सुंदर वातावरण आणि खूप देखन पशु पक्षाचं जीवन वनचरी आपले सोयरे म्हणतात ना ते खरं आहे इथे आलं की असं वाटतं आपण त्यांचे नातेवाईक आहोत आणि ती आपले सगेसोयरे आहेत...

आपण विनाकारणच जंगलात येउन प्राणीमात्रांना त्रास देतो.. आपण आपल्या स्वार्थासाठी त्यांचे जीवन धोक्यात आणत असतो.. नाही का ग सुमू खरं आहे ना मी खरं बोलतोय ना तुला पटतंय ना माझं बोलणं.

माणूस श्रेष्ठ की प्राणी हा मुद्दाच नाही. दोघंही श्रेष्ठ आहेत आणि माणसाला जेवढे हक्क आहेत तितकेच हक्क त्या

प्राणी, पक्षी, वनसंपत्तीलाही मिळायला पाहिजे ही सर्व एकमेकांच्या भरवशावर अवलंबून असतात. माणूस हा बुद्धिजिवी असल्याने निसर्गातील प्रत्येक घटकांचा समतोल राखणे कसे आवश्यक आहे, हे त्याला कळले आहे. पृथ्वीतलावर जे जीव जिवंत आहेत, त्या प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. त्या प्रत्येकावर एकमेकांना जगवण्याचीही जबाबदारी आहेच. जे काही जिवंत असते, ते एक दिवस नष्टही होतच असते, हे एक सत्य आहे. ते नष्ट होत असतानाच त्यात नव्या जीवाचीही भर पडत असते. कुणाचे आयुष्य किती, हे त्याच्या जगण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते.

पृथ्वीवर माणूस एकटा सत्ता गाजवू शकत नाही. त्याच्या सोबत इतरही पशूपक्षी आहेत. त्यामुळे त्यांच्या हक्काचाही विचार करावा लागायला हवा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, तुम्ही त्यांची जंगलं तोडली, त्यांचा अधिवास धोक्यात आणलात,आपल्या स्वार्थासाठी तुम्ही त्यांना धोक्यात आणलंत, मग माणसाला जेवढे हक्क आहेत तितकेच हक्क त्याना ही मिळायला हवी आहे ना सुमू ...

कित्येक गोष्टी प्रशांतने सुमेधाला सांगितल्या पशुपक्षी कसे राहतात काय खातात यांची दिनचर्या कशी असते एखाद्या लहान मुलांना गुरुजी शिकवत असतात त्याप्रमाणे प्रशांत सांगत होता आणि ती एखाद्या विद्यार्थ्या सारखी निमुटपणे प्रशांतचं बोलणं ऐकत होती पण त्यावर ती काहीच ॲक्टिविटी हावभाव जाहीर करीत नव्हती त्यामुळे प्रशांत आतून खूप दुखी होता पण चेहऱ्यावर तसा भाव न आणता तिच्याशी सारख्या गप्पागोष्टी करत होता सोनू आता तु जाणार आहे ना आपल्या सासरी मग माझ्याशी बोल ना काहीतरी! तुला नाही वाटत का की आपला बालपणीचा मित्र आनंदात जगला पाहिजे.... प्रशांतच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या होत्या...

कोणास ठाऊक सुमेधाच्या आत कोणते बवंडर सुरु होते ती काहीच कशी बोलत नव्हती की जाणून-बुजून अबोल झाली होती आता तीच्या जाण्याची ही वेळ जवळ आली होती प्रशांत आधी ही जगतच होता आताही जगणार होता.. कदाचित तिच्या बोलण्याने प्रशांतला तिची आशा लागेल म्हणूनही सुमेधा बोलत नव्हती की काय..


,,,,,,,क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama