Meenakshi Kilawat

Drama Tragedy

4  

Meenakshi Kilawat

Drama Tragedy

भाग31रूनुझूनु पैंजनाची"कादंबरी

भाग31रूनुझूनु पैंजनाची"कादंबरी

5 mins
264


भाग 31रूनुझूनु पैंजनाची"कादंबरी  


  इकडच्या तिकडच्या खूप गप्पा मारून झाल्या संध्याकाळचे पाच वाजले आई-बाबा म्हणाले आम्ही येतो ग पोरी संध्याकाळ होईल आता आम्हाला लगेच निघावं लागेल आमच्या होणाऱ्या जावया कडे लक्ष दे आणि लवकरच बरा झाल्यावर पटकन घरी घेऊन ये या बाबाच्या बोलण्यावर सुमेधा थोडी लाजली ...


प्रशांतला मनात खूप खंत होती की मी असा दवाखान्यात पडून आहे आणि सर्व आपल्याला बघायला येत आपल्यापासून सर्वांना त्रासच होत आहे वरवर पाहता तसं जाणवू देत नव्हता परंतु त्याला मनातून खूप ग्लानी होती पण त्याच्या हातात काहीच नव्हते होणारी घटना कधीही होऊ शकते त्याला कोणीच रोखू शकत नाही.....


सुमेधाचा साथ मिळाला होता एक्सीडेंट झाला तो मनातल्या मनातच विचार करू लागला देवाच्या मनात काय आहे कोणास ठाऊक मी सुमेधाला सुखी करायचं तर दुखी करत आहे माझ्यापासून तिला आनंद मिळायला हवा होता परंतु ती आज अशी उदास आहे मी काय करू त्याची तळमळ त्यालाच माहीत होती आतल्या आत तो सारखा तळमळत होता.....


 परंतु काही दिवसाचाच त्रास आहे समजून त्याला दिवस काढणे गरजेचे होते त्यात त्याला हॉस्पिटलमध्ये सुमेधाचा साथ मिळाला यातच आनंद होता.....


आई बाबा गावी गेल्यावर सुमेधा त्यांच्या माहेरच्या आणि काही गोष्टी आठवून खिडकी बाहेर बघत गर्क झाली. कोणतीही स्त्री माहेर विसरू शकत नाही आणि भावंड यांना तर कधीच नाही,त्यांचा सारा जीव जिथेच गुंतलेला असतो...


घरी पोचल्यावर आईच्या गळ्यात पडणं पाठीवरून हात फिरवून घेताना बाबांच्या ओथंबलेल्या नजरेतूनच त्यांच सार प्रेम देणे हे आपल्यासाठीच आहे ही समजूत असणे,आणि भावंडांना आपल्यापेक्षा कमी प्रेम करतात ही समजूत ही मनात असते.....

 माहेरी जायचं ठरलं की अंगात वेगळाच उत्साह संचारतो....आई सर्व तिच्या आवडीचे निरनिराळे पदार्थ बनवून तिला खायला घालते..कामे करून रात्री उशिरापर्यंत कुटुंबासह गप्पा मारणे....

ज्याच्या आठवणीने हृदयात गलबलतं आणि डोळ्यांच्या कडा नकळतपणे ओलावतात....किती ममत्व दडलय या नात्यात बघा,सुमेधाने असे कित्येक क्षण आपल्या ओंजळीत लपवून ठेवले होते...ओंजळीत सामावलेले असे कृतार्थ क्षण ही या वाटेवर जमा केलेली संपत्ती असते....

आयुष्यातले कितीतरी क्षण प्रतिक्षा करण्याचेच असतात..ही प्रतिक्षा कधी जीवाला ओढ लावते तर कधी स्वप्नांच्या राज्यात घेऊन जात असते.....


कोणास ठाऊक आपल्या जीवनात कधी काय होईल सुमेधा आणि प्रशांत सुखाचे स्वप्न बघतच होते की हा एक्सीडेंट झाला त्यातून सुखरूप बचावला हेच खूप काही कमावल्यासारखं आहे  

ही एकमेव समजूत जगण्याचा मार्ग प्रशस्त करीत होते...

परंतु त्यांच्या प्रेमात काहीच कमी आलेली नाही हे दोघेही आपल्या सुरेख स्वप्नाळू जीवनात धन्यता मानत आहेत, बस अजून काही दिवस प्रतीक्षा करायची आहे नंतर आपण दोघे एक होऊ या अतिशय सुरेख स्वप्नात रमत आहे....

खूप वेळा अशा अस्वस्थतेत आयुष्याचा कितीतरी काळ निघून जात असतो. प्रतिक्षेचे हे क्षण कधी संपणार याचं उत्तर सापडत नाही .मात्र हा काळ कधी अपेक्षित तर कधी अनपेक्षित अशा क्षणी संपत असतो. कसा असतो हा क्षण नेमका ?साफल्याचा की समाधानाचा! कधी हा क्षण रिते पणाचा सुध्दा असू शकतो ना!

आयुष्याच्या वाटेवर असे सुखद अनुभव देणारे प्रतिक्षेचे हे क्षण,खरं तर रोजच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देत असतात. ही प्रतिक्षा संपली तर आयुष्य कदाचित निरस होईल उद्याच्या पोटात काय दडलं आहे याची प्रतिक्षा करत असते हे उत्सुकत्तेचे क्षण जीवास हुरहूर लावतात,तितकिच गोडी ही निर्माण करतात. पश्चिम दिशेच्या क्षितिजावर उभी असलेली व्याकुळ चंद्रकोर काहीशा गूढपणाने हसते . मनाची अवस्था तरी यापेक्षा वेगळी कुठे असते मन सैरभैर होते .

नुसत्या भेटीने तृप्त झालेले काही क्षण ओंजळीत असतात तर मिलनाची प्रतिक्षा करणारे कितीतरी अतृप्त क्षण वाटेवर उभे असतात.एक प्रेमकहाणी रात्रीच्या क्षितिजावर सूर छेडत जात असते.

सुमेधा आणि प्रशांतला ही अशिच प्रतिक्षा होती....


भाग 48_" रूनझून पैंजनाची"..कादंबरी" 


सुमेधा स्वप्नात जरी रमली तरी तिला आपल्या मुलींचा तिला ध्यास असायचा ती त्यांना जरावेळ देखिल विसरू शकत नव्हती मध्येच तिला आपल्या दुडू दुडू धावणाऱ्या त्यांच्या पायातल्या पैंजनाची गोड रुणुझुणु धम्माल करणाऱ्या रिया,सियाची धम्मा चौकडी खेळणं बागडणं आठवत होती

 सुमेधाच्या नजरेसमोर चलचित्र सूरु होते आणि ती त्यात एवढी रममान झाली होती की तिला आजूबाजूचे काहीच भान नव्हते.आयुष्याच्या वाटेवर असे सुखद अनुभव देणारे प्रतिक्षेचे हे क्षण,खरं तर रोजच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देत असतात. ही प्रतिक्षा संपली तर आयुष्य कदाचित निरस होईल उद्याच्या पोटात काय दडलं आहे याची प्रतिक्षा करीत असतात हे उत्सुकत्तेचे क्षण जीवास हुरहूर लावतात,तितकिच गोडी ही निर्माण करतात पश्चिम दिशेच्या क्षितिजावर उभी असलेली व्याकुळ चंद्रकोर काहीशा गूढपणाने हसते . मनाची अवस्था तरी यापेक्षा वेगळी कुठे असते मन सैरभैर होत असते.

नुसत्या भेटीने तृप्त झालेले काही क्षण ओंजळीत असतात तर मिलनाची प्रतिक्षा करणारे कितीतरी अतृप्त क्षण वाटेवर उभे असतात.एक प्रेमकहाणी रात्रीच्या क्षितिजावर सूर छेडत असते नियती अशी नवीन कहाणी घडविण्यात दंग असते जीवन म्हणजे एक कहाणीच असते ना!!

सुमेधा आणि प्रशांतला ही अशिच प्रतिक्षा होती....

सुमेधा आपल्या भावी जीवनाचे स्वप्न बघत होती आणि प्रशांतला पण बरा होण्याची घाई झाली होती तो पण आपल्या भावी जीवनाचे स्वप्न रंगवत होता. या सर्व गोष्टी आयुष्यात होतच असतात आयुष्य म्हणजे रोजचं जगणं, तीच कामं, तेच दैनंदिन व्यवहार , मानव म्हणजे संघर्ष ज्या मानवाला संघर्ष नाही अश्या मानवांना जनावराची उपाधी देतात.

पण कधी कधी आयुष्य म्हणजे एक सुंदर स्वप्न, असंही म्हणता येत खरंतर स्वप्न ही संकल्पनाच किती मजेशीर असते! आपल्या कल्पनेतून आपल्याला हवं असलेलं सुंदर विश्व निर्माण करायचं स्वप्नातल्या या विश्वात मखमली रस्त्यावरून चालायचं अगदी नकळत्या वयापासून स्वप्नांची ओढ मनाला लागलेली असते, इवल्याश्या बाळाला देखिल झोपेत हसतांना गालावर गोड खळी दिसते ते बघून, त्याने एखादं गोड स्वप्न बघितलं आहे हे लगेच आपल्याला लक्षात येतं तेव्हा

नकळत वयासोबत स्वप्नांचं विश्व सुद्धा बदलत जाते. असंच हे स्वप्न कोवळ्या वयात जपलेलं, युवक युवती तारुण्यात येतात तेव्हा नक्कीच बघतात.तारुण्याचे हे दिवस म्हणजे फुलपाखरांसारखे रंगांनी रंगलेले,गंधाने माखलेले,प्रत्येकच गोष्ट काव्यमय वाटावी असे हे मंतरलेले गुलाबी दिवस,

असे हे स्वप्नांत गुंगणारे दिवस पुन्हा स्वप्नातच पोचवणारे कुणाची तरी स्वप्नात येण्याची दिवसरात्र वाट बघणारे पण सगळीच स्वप्नं खरी कुठे होतात ! खरं तर कुठलीच स्वप्न खरी होत नसतात किंवा ज्यांची स्वप्न खरी होतात त्यांनी स्वताला भाग्यवंत समजावं.

स्वप्नातल्या वाटा कितीही दूर जाणाऱ्या असल्या तरीही स्वप्न बघण्याचा मोह आपल्या मनाला मात्र काही सोडवत नाही. डोळ्यांच्या अथांग डोहात कितीतरी स्वप्न बुडालेली असतात. काही मागे पडलेली तर काही काळाच्या ओघात विस्मरणात गेलेली तर काही अप्राप्य बनलेली एखाद्या निवांत क्षणी डोळ्यातली ही स्वप्न पापण्यांच्या काठावर येतात. मनाचा वेध घेतात त्यातली काही स्वप्न अजूनही डोळ्यांना मनाला आणि आयुष्याला खुणावतच असतात. आभाळात दिसणाऱ्या चंद्रकोरी सारखी पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रापेक्षाही ही चंद्रकोर मनाला आकर्षून घेत असते कदाचित तिची भंगलेली अवस्था , आपल्या मनाची समजूत घालत असते आणि तसं पाहिलं तर स्वप्न प्रत्येक वयात आपली साथ देतात. पण तारुण्यातले स्वप्नं मात्र एक वेगळाच रंग घेऊन येतात. परी कहानीत रमणारं हे वय वास्तवा पासून दूर, स्वप्नांच्या जगात रममाण झालेलं असतं.  

सुमेधाला आपल्या जीवनात काय घडलंय तिला जुन्या आठवणी येत होत्या तीनं आपल्या लहान लहान मुलींना मोठं केलं त्यांच्या त्या गोड आठवणीत गूरफटली होती,किती सुंदर दिवस होते ते मुलींचे बाळ जीवन पुन्हा कधी बघावयास मिळणार आहे का ही कल्पनाच फक्त तिच्यासोबत आहे आता तर मुली आपल्या मोठ्या झाल्या आपलं जीवन सारं बदललेलं आहे कोणतीच गोष्ट आपल्या हातात नाही बघ कधी काय होईल कधीच सांगता येत नाही हे जीवन कसं होतं आणि कसं झालं आणि पुढे काय होणार हेही आपणास ठाउक नाही किंवा हे भाकीतही कुणी करू शकत नाही.स्वप्न ही चांदण्यासारखी असतात दुरून लुकलुकणारी त्यांना हातात घ्यायचा प्रयत्न कधीच करायचा नाही हातातून जर ती निखळून पडली तर, एका अनामिक भीतीने ती तळमळली तिला एकदम थरथरून घाम फुटला पण लगेच तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली मी इतके संघर्ष बघितले अजून कितीही संघर्ष येऊ देत मी लढा देणारच आहे त्यात मी स्वतःला जिंकूनच दाखवेन!!!!! त्यासाठी मला कितीही दुःख सहन करावं लागलं तरी मी मागे परतणार नाही मी मनापासून सामना करेन!!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama