STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

मनाचा तळ

मनाचा तळ

3 mins
326

दुपारचे रणरणीत ऊन, रस्त्यावर वर्दळ ही कमी होती. मानसी आपल्याच विचारात मग्न पाय ओढत चालली होती. रंकाळा एकदम शांत आणि सुस्त वाटत होता. दोन चार लोक सोडली तर तिथे कोणी नवहते. बागेचा वॉचमन आणि माळी तेवढे तिथे फिरत होते. मानसी ची आवडती जागा रंकाळा. आनंदी असो वा दुःखी असो आपलं गाऱ्हाण ती याच रंकाळया सोबत शेयर करायची. तिथे पायऱ्या जवळ बसली . समोर अथांग पसरलेला तलाव उन्हात चमचमत होता. पाण्यावर उन्हाचे तरंग रंगीबेरंगी रांगोळी काढत होते. आताचा हा निवांत रंकाळा संध्याकाळी मात्र लोकांच्या महापुराने ओसंडून जायचा. पण मानसीला निवात पणा हवा असायचा म्हणून दुपारी यायची ती इथे. आज तर तिचे तिलाच समजत नवहते की काय गमावले आणि काय कमवले. माहीत असूनही का मी वाहवत गेले? समोर भला मोठा खड्डा दिसत असताना मी स्वतः हुन त्यात उडी घेतली? कशा साठी तर या नश्वर शरीराची भूक कंट्रोल नाही झाली म्हणून? जे नात आज ना उद्या संपणार, याला स्थिरता नाही हे माहीत असून ही, का नको त्या नात्याला प्रेमाचं नाव दिल? खूप सारे प्रश्न मनात होते पण उत्तर काही सापडत नवहते. तसे बघायला गेले तर उत्तर समोरच होते पण तिला ते जाणून घ्यायचेच नवहते.  मनू माहीत नाही का तुझ्यात इतका गुंतत गेलो मी. पण खरच प्रेम करतो मी तुझ्या वर. तिला ही आवडला होता संग्राम मना पासून. दिसायला हँडसम,मनमिळावू,हसतमुख बोलणयात कायम मार्दव . तो स्वतः हुन अस बोलतो आहे म्हटल्यावर मानसी ला काय करू काय नको असं झाले. एकत्र काम आणि सहवास याने ती आधीच भारावली होती. वयाची पस्तिशी आली तरी लग्न जमत नवहते. कारण काय पत्रिकेत महा दोष आणि काही उपाय करून ही तो दोष निघेल याची शाश्वती नाही. प्रेमाला ,स्पर्शाला आतुर झालेले मन,संग्रामच्या बोलण्याने पाघळून गेले. भेटीगाठी होऊ लागल्या. चोरटा स्पर्श त्याचा अनुभवताना कधी शरीराने बंड केले आणि सर्वस्व तिने त्याला बहाल केले हे तिला ही नाही समजले. पण जे झाले ते तिच्या साठी स्वर्गीय सुखा हुन वेगळे नवहते. पहिल्यादा पुरुषी स्पर्श अमुभवत होती ती. संग्राम मला सोडून तर जाणार नाहीस ना ते एका हळवया क्षणी मानसी ने त्याला विचारले. का सोडून जाईन मनु माझं प्रेम आहे तुझ्या वर. संग्राम तू विवाहित आहेस आणि एका पाच वर्षांच्या मुलीचा बाप आहेस म्हणून विचारते. मनु माझी फॅमिली एका बाजूला आणि तू एका बाजूला. यात गल्लत नको करू. मनु मग अजूनच गाढ विश्वास संग्राम वर ठेवत गेली. प्रेमाच्या प्रवाहात दोघे आंधळे पणाने वाहत चालली होती. ज्याला सगळं काही दिले तोच संग्राम आज मनू ला म्हणाला,मनु आपण आता थांबुयात. इथून पुढे मला तुझ्याशी कसलेच संबंध नाही ठेवता येणार. इतकं सहज तो बोलून गेला. कारण त्याला आता त्याची फॅमिली आठवली. आणि इतके दिवस माझा वापर केला तेव्हा हा वेड पांघरूण बसला होता का? का मीच मूर्ख बनले ? मानसी रडत होती. का आपण विश्वास ठेवला त्याच्या वर ? का इतके प्रेम केले? का नाही ओळखु शकले त्याला? खूप रडली कारण चूक तिचीच होती . सगळं माहीत असून ही , पुढचे धोके दिसत असून ही ती पुढे गेली होती. क्षणिक सुखा साठी भरकटत गेले. कोणी कोणाचे नसते हे तिला आता पटले होते. ज्याला आपल्या पत्रिकेशी काही घेणं देणं नसेल असा कोणीतरी भेटेलच ना आपल्याला. मग का नाही आपण वाट पाहिली? असे बरेचसे प्रश्न ती स्वतःला विचारत राहिली. मग एक ठाम निर्णय घेऊन तिने डोळे पुसले. सगळ्याच चमकणाऱ्या गोष्टी सोन नसतात ते फक्त मृगजळ असते याची जाणीव झाली. थोडा वेळ तलावा कडे बघत अशांत झालेले मन ती शान्त करू लागली. झालं गेलं विसरून नव्याने सुरवात करायची. पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यायची. आधी स्वतःला सिद्ध करायचे . आपली किंमत आपणच करायची. आणि मुख्य म्हणजे स्वतःवर प्रेम करायचे. मग मनु च्या चेहऱ्यावर स्माईल आली. तलावात बाजूचे छोटे दगड उचलून टाकत बसली. ते पाण्यात उठणारे तरंग बघत राहिली. थोडावेळ हा खेळ खेळत राहिली. मन आता एकदम शान्त निवांत झाले होते अगदी त्या रंकाळा तलावा सारखे... त्या वर ही आनंदाचे हलके हलके तरंग उमटत होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract