Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Sangieta Devkar

Abstract Inspirational


3  

Sangieta Devkar

Abstract Inspirational


मिस इंडिया

मिस इंडिया

6 mins 146 6 mins 146

आज सकाळी सकाळी पेपर वाचतान टीकटॉक सुपर स्टार समीर गायकवाड़ ची मन हेलावनारी बातमी वाचली. ख़ुप वाईट वाटले इतका फेमस आणि दिसायला स्मार्ट, हसरा चेहरा या मुलाने इतक्या लहान वयात का आत्महत्या केली असेल? असले कोणते दुख त्याच्या वाटयाला आले की त्याने आपल्या आई वडिलांचा ही विचार केला नसेल का? कसल्या नैराश्यने त्याला घेरले होते? मनात ख़ुप सारे प्रश्न येत होते आणि समोरच्या बातमी वर विश्वास बसतच नव्हता. पुण्या सारख्या सांस्कृतिक शहरात अशा घटना घडू शकतात हे मनाला पटत नव्हते. दिवसभर समीर चा विचार डोक्यात होता. त्याला कोणा जवळ मन हलके करावे असे वाटले नसेल का? की त्याला कोणी समजून घेऊ शकले नसते म्हणून त्याने आपले जीवनच संपवले.


उदासीनता, नैराश्य इतक भयानक असू शकते का? मनात विचार आला की आपण काही करू शकू का या बाबत? अशा निराशेने ग्रस्त असणाऱ्या लोकांना आपण मदत करू शकतो का? त्यांना मन मोकळे करायला भाग पाडू शकतो का? या विचारातच झोपी गेले. मला सकाळी जाग आली पण मी माज्या घरात नवहते. कुठे आले मी म्हणून डोळे चोळत नीट पाहिले एक मंदिर होते तिथे . आणि कोण ही मुलगी अशी एकटी का बसली आहे. म्हणून मी तिच्या जवळ गेले तर ती रडत होती. मी तिला हात लावून हलवले काय ग का रडतेस आणि कोण तू? ती अजूनच रडू लागली . बोल नको रडू नाव काय तुझे? मी रिया कॉलेज स्टुडंट आहे. माझं एका मुलावर खूप प्रेम आहे पण त्याला मी आता आवडत नाही. त्याच दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे म्हणतो. आम्ही तीन वर्षे एकत्र होतो मला त्याची सवय झाली आहे मी नाही जगू शकणार त्याच्या शिवाय. मी मरून जाईन मग तर त्याला माझे प्रेम समजेल ना? अरे वेडी आहेस का तू? हे वय तुझं चांगले शिक्षण घेऊन आई बाबा चे नाव मोठे करण्याचे आहे .प्रेम करायला पूर्ण आयुष्य पडले आहे आणि असे कोणाची सवय वैगरे होत नसते. मग सांग तुला त्याची सवय झाली आहेस म्हणतेस मग तुज्या आई बाबांना तुझी पण सवय झाली असेलच ना इतक्या वर्षात? मग तूच असा अविचार करून स्वतःच्या जीवाचं काही बर वाईट करून घेतलेस तर त्यांनी काय करायचे सांग? त्या मुलाला तुझी कदर नाही त्याला दुसरी मुलगी मिळेलही पण तुझ्या आई बाबांना तू नाही ना परत मिळणार.


हो काकू तुम्ही बरोबर बोलत आहात.माझे चुकले मी नाही आता चुकीचा विचार करणार. आई बाबा माझे सर्वस्व आहेत. थँक्स काकू ती बोलली. माझ्याकडे पाहिले तिने आणि काकू अहो काकू कुठे आहात अचानक कुठे गायब झालात? मी तिथेच होते हे काय मी तुज्या जवळ तर उभी आहे. नाही काकू तुम्ही आता दिसत च नाही आहात. काय मी तुला दिसत नाही. नाही काकू म्हणत ती मुलगी घाबरून निघून गेली. म्हणजे मी अदृश्य झाले की काय ? चला मग बरे झाले आता मी मस्त मनसोक्त फिरून घेणार . मला पाहिजे ते खाणार खूप खूप एन्जॉय करणार. बघू तर मी मिसेस इंडिया होऊन काय काय करू शकते. स्वतः शी बोलत मी तिथून निघाले. भूक लागली होती म्हणून एका हॉटेलमध्ये गेले तिथले हवे ते पदार्थ घेतले आणि मस्त पोट भर खाऊन घेतले. गरम गरम चहा ही घेतला. मला भारी मजा येत होती. मी लोकांना दिसत नवहते पण मी त्यांना बघू शकत होते. हॉटेल च्या बाहेर आले तर एक आजी आणि आजोबा भीक मागत उभे होते. लोक त्यांना बघून पण न बघितल्या सारखे करत निघून जात होते. मला खूप वाईट वाटले मी मग परत हॉटेलमध्ये गेले आणि तिथले पदार्थ घेऊन आले आणि त्या आजी आजोबांना दिले. बर झालं मुली तू खायला दिलेस काल पासून उपाशी फिरत आहोत . अजून काही पाहिजे सांगा आजी मी देते म्हणाले. बास नको आता काही . म्हणत ते दोघे एका बाजूला बसून खात राहिले.


काय रे तुम्हाला इतके कोणी खायला कसे काय दिले काय चोरी केली का हॉटेलमध्ये एक माणूस त्यांना विचारत होता. नाही नाही चोरी नाही केली साहेब त्या बघा ताई त्यांनी आणून दिले अस म्हणत ते माझ्याकडे हात दाखवत होते . कुठे आहे कोण ? कोणीच दिसत नाही इथे तो माणूस म्हणाला. गेल्या वाटत अस आजी म्हणाल्या. पण मी तिथेच होते म्हणजे मी अदृश्य होते पण कोणाला मदत हवी असेल तर तेवढ्या पुरते मी दिसत होते .बाप रे अशी गंमत आहे तर. चला मग तर खूप गरजू लोकांना आपली मदत होईल. अस मनात बोलून मी निघाले.मी मग एका बागेत आले. तिथे एका बाका वर एक आजोबा बसले होते खूप काळजीत आणि चिंतेत दिसत होते. मी त्यांच्या जवळ गेले. आजोबा मी इथे बसू का? हो बस ना. आजोबा काही टेंशन आहे का? तुम्ही बोलू शकता माझ्याशी. नाही मुली काही नाही . अहो आजोबा बोला तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे टेंशन. मुली काय सांगू माझी पत्नी मला सोडून गेली आता वर्ष होईल बघ. पण तिची आठवण काही मनातून जात नाही. त्यात मुलगा आणि सून यांना माझी अडचण होते. सुनेपुढे मुलगा मूग गिळून गप्प राहतो. एक नातू आहे त्याचात जीव अडकला आहे . पण सून खूप घालून पाडुन बोलत असते त्रास होतो ग मला फार. मग आजोबा तुम्ही त्यांना घरा बाहेर जायला सांगा आणि एकटे निवांत रहा. नाही ते घर मुलाने गोड बोलून स्वतःच्या नावा वर करून घेतले. मी काय करू समजत नाही.


आजोबा इतका त्रास सहन करण्या पेक्षा एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात जा राहायला. तिथे तुमच्या वयाचे खूप मित्र भेटतील . तुमचे छंद कला गुण पुन्हा नव्याने सुरू करा. समवयस्क लोकां सोबत आनंदात रहा. हा मुली तुझं म्हणणं पटते मला. तसेच करेन आता. असे पन ते घर ही माझे नाही आणि तिथली माणसे ही. चला आजोबा मी निघते काळजी घ्या तुम्ही. हो मुली पण तुझे नाव काय आजोबांनी विचारले पण मी गायब झाले होते. आजोबांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते. मला खूप छान वाटत होते. लोक आपल्या मनातले सांगत होते. मन हलकं करत होते आणि मी त्यांच बोलणं ऐकून घेत होते. दिवसभर बरेच लोक माझ्याशी बोलते झाले. आपलं ऐकून घेणार कोणी आहे ही भावना खूप सुखद असते. आता रात्र होत आली होती. घरी जायला हवे सगळे जण माझी वाट पाहत असतील मी न सांगता आले होते. माझी काळजी करत असतील म्हणून मी घरी जायला निघाले.


अगं किती झोपणार अजून. अलार्म वाजून वाजून थकला उठ लवकर मला ऑफिस आहे मुलांना शाळा आहे उठ मला जोर जोरात कोणी तरी हलवत होते. मी खाडकन डोळे उघडले पाहते तर आमचे अहो मला उठवत होते. किती झोपतेस ग उठ लवकर. अहो ऐका ना मला स्वप्न पडले होते त्यात मी अदृश्य झाले होते. अहो मॅडम संपले स्वप्न आता काही ही त्या टि व्ही वर बघत असतेस तेच डोक्यात राहते. नाही ओ खूप छान स्वप्न होते. पण आमचे अहो नवहते तिथे अदृश्य झाले होते. सकाळ सकाळ हिला वेड लागले बहुतेक असा त्यांचा समज झाला असेल. असो पण छान होत एक दिवस अदृश्य होणं..


या काल्पनिक कथेतून मला हेच सांगायचे आहे की मनात जे साचले आहे ते कोणाजवळ तरी बोलून मन हलके करा. आयुष्यात दुःख संकटे येत राहणार त्यातून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. प्रत्येक अडचणी वर सोल्युशन असते. उगाच नैराशयाच्या भरात अनमोल जीवन सपंवू नका. जवळ च्या व्यक्ती जवळ बोला . आणि गरज असेल त्याला नैराश्यातून बाहेर यायला मदत करा. 


Rate this content
Log in

More marathi story from Sangieta Devkar

Similar marathi story from Abstract