Pradnya Tambe-Borhade

Action Fantasy

3  

Pradnya Tambe-Borhade

Action Fantasy

मी पण राजकुमारी

मी पण राजकुमारी

3 mins
158


लता लग्न करुन सासरी आली. स्वयंपाकात फारसा रस नसणारी लता लग्ना नंतर मात्र स्वयंपाक बनवावा लागणार. घरातले काम करावे लागणार या विचाराने आधीच कावरीबावरी झाली होती. माहेरी असताना फक्त आईने बनवलेल्या जेवणावर ताव मारायचे हेच माहित होते. आईला कधीच जेवण बनवयाला मदत केली नाही. तेव्हा आई बोलायची. लता सासरी गेल्यावर कोण अस आयत ताट तूला करुन देणार नाही. उलट तूलाच सगळ्यांसाठी बनवावे लागणार आहे. आत्ताच थोड शिकून घे. नाहीतर नंतर तूला जड जाईल.


लताचे उत्तर मात्र ठरलेले. बघता येईल ग आई. पाण्यात पडल्यावर पोहता येत. नाही तर हात-पाय मारुन जीव वाचवता येतो. तसेच तोडक-मोडक बनवता येत मला. लताने लग्ना नंतर पहिले पाऊल किचन मध्ये ठेवले. नवी नवरी असल्याने तीला फक्त चहा बनवणे व घरातल्या मंडळींना देणे हे काम सुरवातीला दिले. नंतर मात्र हळूहळू तीला घर, आंगण झाडायला लावले, चहा बनवणे, कपडे वाळत घालणे अशी कामे करावी लागली. लता शिक्षणामुळे घर कामात फारसे लक्ष देत नव्हती. ही सोपवण्यात येणारी कामे तीच्याकरता नविन होती.


नंतर नंतर तर लता ने सतत कामात दिसायला हवे अशी जणू काही दहशत पसरली असावी. दुपारच्या वेळी झोपायचे नाही. भाजीपाला निवडणे,दळण, शेंगदाणे फोडणे, पाहुण्यांना चहा अथवा सरबत करणे हे काम पडत असे. घरात लताला नेहा नावाची नणंद देखील होती. तिच्याच वयाची. पण ती कोणतेच काम करत नसायची. सासूबाई नेहाला कोणतेच काम सांगत नसायच्या. जरी सांगितले तरी ती लताला तीचे काम करायला लावायची.


संस्काराने शिकलेल्या लताला पटत नसले तरी कोणाच्या विरोधात जाऊन वागता किंवा बोलता येत नव्हते. खरतर लताला मनातून खूप चिड येत असायची. का वागतात माझ्या बरोबर अश्या सासूबाई. मुलीला जराही काम सांगत नाही. मला तर...... थोडावेळ सुद्धा आराम करू देत नाही. सांगू तर कोणाला सांगू मी. नव-याला काही सांगायला गेल तर आपल्या माणसांच करायला काही बिघडत नाही. कोण समजून घेणार मला तरी. मी तरी घरच्यांच करायला कुठ नाही म्हणते लता बोलते. पण मलाही थोड जाणायला हव. नेहा सारखीच मी ही माझ्या आईची राजकुमारी आहे. मग मला त्या अशी वागणूक का देतात. मुलीने कुठे बाहेर जायचे म्हटले तर.... लगेच परवानगी. मी बोलले तर मला मात्र १०० एक प्रश्न करतात.


मला काही घ्यावे वाटले तर आता नको. किती उधळते ही पैशे,असे बोलतात. नेहा मात्र मैत्रिणीं बरोबर जाऊन खरेदी करुन येते तेव्हा नाही होत उधळपट्टी. आता तर नेहाचे देखील लग्न झाले. ती सारखी माहेरी आलेली चालते सासूबाईंना. मी मात्र नाव जरी काढले तरी. त्या आजारी तरी पडतात किंवा मला आत होत नाही तू नको जाऊ असे बोलतात.


नेहाला तीच्या सासूबाई मदत करतात. तीला नोकरी करु देतात. ती नसताना घरातले काम आवरुन घेतात. इथे मी नोकरीचा विषय काढला तरी घराकडे कोण बघणार......??? मुलांना मी नाही शाळेत सोडणार अस १० कारणे तयार असतात. आपल्या मुलीनेच सर्व क्षेत्रात पारंगत असावे प्रत्येक आईला वाटते. पण मग माझ्या आईलाही असेच वाटत असणार. हे सासूबाईंना नाही का समजत.


नोकरीला लागल्यावर घरातल्या कोणत्याच कामाला हातभार लावणार नाही. पाठिंबा द्यायचा सोडून विचार करायला लावून मला कधी पुढे झेप घेऊच देत नाही. कोणाला सांगू माझी ही आर्तता मी. कधी थांबणार हा पक्षपात. मला ही माझ स्वप्न साकारायचे आहे. माझ्याही आई-वडिलांचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे.


थांबवा आता तरी सून आणि मुली मध्ये पक्षपात करणे. सूनेला मुलगी मानून तीच्यात आपल्या मुलीच प्रतिबिंब पाहून करा तीचेही स्वप्न साकार. सूनेच्या स्वप्नांना होऊदे सासूकडून पाठिंब्याचा श्रीगणेशा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action