अशी बेडी नकोच
अशी बेडी नकोच
नेहा दिसायला सुंदर, हुशार आणि मनमिळावू. गल्लितल्या सर्वांना आपलीशी वाटणारी. सगळ्यांच्या अडचणींवर तिच्याकडे उपाय असणारी. नेहाला लग्नाकरता स्थळ बघायला सुरवात झाली. तेव्हा गल्लीतल्या लोकांनी सांगितले चांगल्या मुलालाच आपली नेहा द्यायची. तो तिच्या हळव्या स्वभावाला समजून घेईल. तसच स्थळ पहायला हव.
शेजारच्या पांडे काकूंनी साजेसे स्थळ आणले. गल्लीतल्या आणि घरात देखील सगळ्यांना स्थळ पसंद पडले. थाटामाटत उमेश आणि नेहाचा विवाह संपन्न झाला. उमेशचा स्वभाव सुरवातीला नेहाला भुरळ पाडून गेला. रोमॅंटिक डेटवर जाण, हाॅटेल, फिरायला जाणे, गिफ्ट, सुंदर साड्या, दागिने काही कमी नव्हते. नेहा खूश होवून माहेरी यायची. सगळ्यांना नेहाच्या आयुष्याचे सोनं झाले असेच वाटले.
आयुष्याने मात्र निराळेच वळण घेतले. नेहाचा मनमोकळ्या स्वभावामुळे नेहा सासरी पटकन रमली होती. मुल देखील तिच्याशी बोलत होती. उमेशला हे पटत नव्हते. त्याने नेहाचे घराबाहेर पडणे बंद केले. बाहेर जायचे असल्यास दोघांनी बरोबर जायचे. तो ऑफीस ला गेला तरी दाराला कुलूप लावून जायचा. जेणेकरुन नेहा घराबाहेर पडणार नाही. नेहाने अनेकवेळा उमेशला याबाबत विचारले. पण कळायला मार्ग नव्हता.
आता उमेश तर नेहाचे फोन रेकॉर्ड देखील तपासून पाहू लागला. नेहाचा फोन देखील काढून घेवू लागला. उमेश दिवसेंदिवस क्रूर बनत चालला होता. नेहाचे प्रेम त्याला समजतच नव्हते. नेहाला हे बंदिवसाचे आयुष्य नकोसे वाटू लागले. तिला माहेरी देखील जाण्यची परवानगी नव्हती.
पांडे काकू स्वत: घरी आल्या एक दिवस. बरेच दिवस झाले नेहा आली नाही. तिला घ्यायला आले. पांडे काकूंना घरातले वातावरण थोडे वेगळे भासत होते. उमेशला पांडे काकूंना नाही म्हणता आले नाही. घेवून जा. असे बोलला. तिला राहू द्या जितके दिवस राहयचे तितके. नंतर येतो मी घ्यायला.
नेहाच्या घरी काही दिवसात घटस्फोटाचे पेपर आले. घरी आणि गल्लीत ही बातमी वा-यासारखी पसरली. गोड मुलीच्या आयुष्यचे वाटोळे झाले. पांडू काकू बोलत होत्या. माझ्यामुळे झाले. स्वत:ला दोष देत होत्या. नेहाला गोष्ट इतक्या शेवट पर्यंत जाईल असे वाटत नव्हते. नेहाने सही केली. आणि नकोच ती लग्नाची बेडी जिव्हारी लागणारी.
एक दिवस नेहाला या गोष्टीचा उलगडा समजला. इतर कोणीही नेहाशी बोललेले उमेशला आवडत नाही. न राहवून नेहाने उमेशशी बोलायचे ठरवले. उमेशने यावेळी आवाज चढवून नेहाला सांगितले. तू सुंदर आहेस. तुझ्यावर माझा अधिकार आहे. बाकी कोणी बोललले नाही सहन होत मला. नेहा बोलली मी बोलले ते त्यांच्या समस्येवर उपाय सांगण्याकरता. मला लग्ना आधी पासून अशी परिस्थितीशी सामना करण्याची सवय आहे. घरातल्यांना याबाबत कधीच आक्षेप नव्हता उलट माझ कौतुकच होत असायच. पण आता हे सांगण्यात का वेळ घालवते. यापुढे तुझा आणि माझा मार्ग वेगळा.
