Pradnya Tambe-Borhade

Action Inspirational

3  

Pradnya Tambe-Borhade

Action Inspirational

ऐका हो माझही

ऐका हो माझही

3 mins
312


मेघाच नुकतच लग्न जमलेलं. अभ्यास एके अभ्यास यामुळे मेघा कधी स्वयंपाक घरात कधी डोकावत नसे. आईच्या हातच गरमा-गरमा खाण. एवढेच तीला माहित होते. शिवाय हुशार असल्याने नोकरी देखील उत्तम मिळाली होती. लग्नाकरता आलेले नातेवाईक मेघाला बोलवून दाखवत आता तरी जेवण, भाजीपाला, किराणा आणत जा. घरी. तेवढीच सासरी उपयोगात येईल. डाळी माहिती आहेत ना???? सगळ्या. नाहीतर पुरणाला तुरीची डाळ लावशील. असे जोक करत असायचे. मेघा हसण्या वारी नेत असायची. खर आहे आई. मला आता शिकायला हव सगळ. जेमतेम तीन महिने राहिले आता.


आई मात्र एकच बोलायची. पाण्यात पडल्यावर बरोबर पोहता येतं. जमेल तुला सगळ. काळजी नको करुस.

बेसिक माहिती जेवण बनवण्याची मेघाने माहित करुन घेतली. मसाला वाटणे, चटण्यांचे प्रकार, भाज्या, आमटी शिकून घेतली. पोळी आणि भाकरी मेघाला जमत होत्या.


मेघाच लग्न झाल. विराजला कामावर लवकर निघावं लागे. विराजची आई नेहमीप्रमाणे डबा बनवून देत असायची. एकदा मेघा बोलली आई मी आले आता. मी बनवत जाईल डबा. तुम्ही आराम करा. विराजची आई बोलली. अग माझ्या हातची भाजी आवडतात त्याला. हाताची बोटे चाखत खातो. घरी आल्यावर बघ तू डबा त्याचा. एक पदार्थ परत आणत नाही कधी. मेघा बोलते, " बरोबर आहे आई. पण मी करुन पाहते भाजी. तुमच्यासारखी नाही पण वेगळी छान चव असणार भाजीला. बर कर मग संध्याकाळी म्हणत विषय संपला.


भाजी मस्त बनली होती. विराज आणि सासरे भाजीचे कौतुक करायला लागले. मेघा आता रोज डबा बनवू लागली. सासूबाई खूश होत्या. चवीष्ट भाज्या खायला मिळत होत्या. एके दिवशी पाहुणे येणार होते जेवायला घरी. सासूबाईंनी लवकर जेवण बनवायला सुरवात केली. मेघाकरता गरमा-गरम पाहुणे आल्यावर चपाती करायचे ठेवले. एरव्ही जेवणात खूश होणा-या आज मात्र स्वयंपाकघरात आधीच जावून जेवण बनवून तयार होत्या.


पाहुणे आले घरी. जेवण छान झाले. नविन सुनबाईंच्या हाताला चव छान आहे. यावर सासूबाई बोलल्या मी बनवल जेवण. ती काहीतरी दुस-या कामात होती. तीच काम आटपेपर्यंत माझा स्वयंपाक देखील झाला होता. ही बाब घरातल्या कोणालाच आवडली नाही. उगाच भांडण नको म्हणून पाहुणे गेल्यावर सासूबाईंशी थोड्या चढ्या आवाजातच मेघा बोलली. मला हाक मारायची. आज पाहुणे येणार माहित पण नव्हत. मी आले असते मदतीला. किंवा लवकर लागले असते मी, जेवण बनवायला. त्यांच्या समोर माझा अपमान नको करायला हवा होता तुम्ही.


थोड तरी समजून घ्या मला. मी कोणत्या कामात असले तरी आवाज दिला असता तर आलेच असते मी. मी तुमचीच सून आहे. पाहुणे मला नाहीतर तुमच्या सुनेला नाव ठेवणार आहेत. आणि मेघाचा पार चढला. एवढे बोलून मेघा रुम मध्ये निघून गेली.


दुस-या दिवशी सासूबाई मेघाला म्हणतात माझीच चूक झाली. मला माफ कर. मी अस वागायला नको होत. पण तूच सांग तू आता जेवण बनवते. सर्वांना आवडत. सगळे तुझ कौतुक करतात. आजपर्यंत माझ कौतुक होत असायचं. त्या करता मी आतुर झाले होते. आज पण तू बनवले असते तर तुझच कौतुक झाल असतं. मी स्वार्थाकरता तुला पाहुण्यांसमोर चुकीच ठरवल.

माफ कर मला.


आई. अस काय बोलता. तुम्ही छान बनवतातच. पण आता मी घरी आले. तुम्हांला आराम मिळाव या करता. मला चांगल बनवता येत अस नाही म्हणत मी. माझ्या अश्या वागण्याने तुम्ही दुखावल्या गेल्या असाल अस वाटल नव्हत मला. मला पण माफ करा. आपण दोघी एकत्र एकमेकींच्या पद्धतीप्रमाणे जेवण बनवत जावूया.


एकत्र येवून समजूतीने सर्व प्रश्नांची उकल सुटत असते. स्पष्ट पणे आपले बोलणे समोरच्यापर्यंत मांडले की मनात कोणत्याच प्रकारची अढी निर्माण होवून भांडणे होत नाही. खेळीमेळीने यावर तोडगा काढला जावू शकतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action